आता पुढचा अडथळाही पार करणार?

स्रोत: विवेक मराठी    दिनांक07-Jun-2020
|


Upcoming NSE/NSE Stock 02

शेअरटेल्स : दि. ०१ ते ०५ जून

मागील लेख लिहीत असताना जे लक्ष्य निफ्टीसाठी सांगितलं होते, त्याची पूर्तता सोमवार, दि. ०१ जूनलाच झाली निफ्टी त्याच आठवड्यात १०१६८.२० वर बंद झाला. आता जे दुसरं १०६०० चं लक्ष्य सांगितलं होते म्हणजे १०६००, त्याकडे आता निफ्टीची वाटचाल सुरू आहे. निफ्टीने १०००० चा Resistence पार केला आहे आता पुढचा मोठा Resistence १०५३८.४४ आहे, त्याकडे त्याचं मार्गक्रमण सुरु आहे..

----------

निफ्टी : १०१४२.१५ (+११३.०५)

निफ्टी बँक : २१०३४.५० (+६४४.०५)

निफ्टी मिडकॅप ५० : ३९४६.४५ (+६५.५०)

निफ्टी स्मॉलकॅप २५० : ३८८७.७० (+१०६.३०)

मागील लेखात आपण चार्टच्या आधारे जे विश्लेषण केलं, जे अंदाज वर्तवले, अगदी त्याप्रमाणेच शेअर बाजारात उलाढाल होताना दिसून येते आहे. मागील लेख लिहीत असताना जे लक्ष्य निफ्टीसाठी सांगितलं होते, त्याची पूर्तता सोमवार, दि. ०१ जूनलाच झाली निफ्टी त्याच आठवड्यात १०१६८.२० वर बंद झाला. आता जे दुसरं १०६०० चं लक्ष्य सांगितलं होते म्हणजे १०६००, त्याकडे आता निफ्टीची वाटचाल सुरू आहे. आता पुढे काय होईल, ते पाहणं महत्वाचं आहे. आता आपण निफ्टीच्या खालील चार्टद्वारे काही गोष्टी समजून घेऊ.


Resistence 01_1 &nbs

वर निफ्टीचा जो चार्ट दिला आहे, तो वीकली टाईम फ्रेचा चार्ट आहे. या चार्टवर तुम्हाला दिसेल की, निफ्टीने १०००० चा Resistence पार केला आहे आता पुढचा मोठा Resistence १०५३८.४४ आहे, त्याकडे त्याचं मार्गक्रमण सुरु आहे. परंतु, त्या आधी २०० आठवड्याची चलत सरासरी जी १०३६६.७८ वर आहे, त्यामुळे निफ्टीवर १०४०० ते १०६०० हा संपूर्णपणे अडथळ्यांचा पट्टा असेल, असं चार्टवर दिसतं आहे. त्यामुळे आता जर कोणी खालच्या भावात खरेदी केली असेल, तर ती काही प्रमाणात विकून रोकड केली पाहिजे. कारण, १०६०० हा अडथळा पार करणे निफ्टीला खूप कठीण जाईल, असं दिसतं आहे.


Resistence 02_1 &nbs

आता आपण वरील निफ्टी बँकच्या चार्टचं विश्लेषण करू. हादेखील वीकली टाईम फ्रेमचाच चार्ट आहे. यात तुम्हाला दिसेल की, वीकली टाईम फ्रेमवर एका मोठ्या Trend Line च्या सपोर्टला Double Bottom हा Price Pattern बनवून Bank Nifty हा Pattern आता वरच्या बाजूने तोडायला चालला आहे. जर Bank Nifty २१६०० च्या वर बंद झाला तर हा सरळ २३७०० पर्यंत जाईल. त्यामुळे Bank Nifty चे जे मुख्य शे आहेत, त्यांना विकण्याची घाई करू नका, असेच मी सांगेन.

या लेखमालेची सुरुवात मी फार्मा कंपनी सुचवण्यावरून केली होती. आता मी Nifty Pharma या इंडेक्सच्या चार्टचे विश्लेषण सांगतो.


Resistence 03_1 &nbs

Nifty Pharma चा वरील चार्ट हादेखील वीकली टाईम फ्रेमचाच आहे. त्याने वर्षांचा Down Trend Channel वरच्या दिशेने तोडला आहे आणि १०७०० च्या लक्ष्याकडे तो मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे Sun Pharma, Dr Reddy, Lupin, Cipla, Biocon, Allembic Pharma, Aarti Drugs या कंपन्या तुमच्या भागभांडारात अवश्य असू द्या.

काही Recommendations :

खरेदी करा -

Lupin : ९०० च्या वर, लक्ष्य ११००, स्टॉप लॉस - ८००

Glenmark Pharma : ४०८, लक्ष्य ४९०, स्टॉप लॉस - ३८०

Icici Bank : ३५७, लक्ष्य ३८७, स्टॉप लॉस - ३४०

----------

- अमित पेंढारकर

(शेअर मार्केट अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार)

संपर्क : ९८१९२३०३१० / finmart99@gmail.com

----------

(वरील सर्व निष्कर्ष, अंदाजमते ही अभ्यासांती मांडण्यात आलेली आहेत. या आधारावर कोणाचाही नफा वा तोटा झाल्यास प्रस्तुत लेखक तसेच साप्ताहिक विवेक हे जबाबदार राहणार नाहीत.)