मका सोलणी यंत्र

स्रोत: विवेक मराठी    दिनांक03-Jul-2020
|
लहान शेतक-यांसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीने ‘मका सोलणी यंत्र’ विकसित केले आहे. हे यंत्र लोखंडी पाइपच्या तुकड्यापासून बनविलेले असून त्याला आतून चार दातेरी पट्ट्या जोडलेल्या असतात. मक्याचे कणीस यातील पट्ट्यांवर गोल फिरवून कणसातील मक्याचे दाणे वेगळे होतात.

seva_1  H x W:

मक्याचा आहारात समावेश असणारे लहान शेतकरी मका या पिकाची थोड्या प्रमाणावर लागवड करतात. मक्याच्या कणसाची तोट्यावरून काढणी झाल्यानंतर दाणे काढण्याचे काम जिकिरीचे आहे. सध्या पारंपरिक पद्धतीने हाताच्या बोटाने किवा लाकडाने बदडून मक्याचे दाणे काढण्याची पद्धत काही भागात आजही आहे. हाताच्या बोटांनी दाणे काढल्यानंतर घर्षणाने बोटांना फोड येतात. त्यामुळे दाणे काढण्याची मनुष्याची कार्यक्षमता कमी होते.

अशा लहान शेतक-यांसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीने ‘मका सोलणी यंत्र’ विकसित केले आहे. हे यंत्र लोखंडी पाइपच्या तुकड्यापासून बनविलेले असून त्याला आतून चार दातेरी पट्ट्या जोडलेल्या असतात. मक्याचे कणीस यातील पट्ट्यांवर गोल फिरवून कणसातील मक्याचे दाणे वेगळे होतात. या यंत्राद्वारे एका दिवसात २०० किलो मक्याची कणसे सोलता येतात. हे यंत्र हाताळण्यास सोपे असून दीर्घकाळ टिकणारे आहे.

@आरती देशमुख

@जयंत उत्तरवार

डॉ हेडगेवार सेवा समिती
कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार