गौरवशाली भारताचा आधार होईल श्रीराम मंदिर – डॉ. सुरेंद्र जैन

विवेक मराठी    01-Aug-2020
Total Views |

(VSK) - राम मंदिराचे भूमीपूजन हा देशासाठी परम गौरवाचा क्षण आहे. या राष्ट्रीय गौरवास कोणी मलीन करू शकत नाही. ४९२ वर्षांपूर्वी श्रीराम जन्मभूमीवर विदेशी आक्रमक बाबर याने बांधलेल्या स्मृती हटवून, राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असणारे श्रीराम मंदिर उभे करण्यासाठी हिंदू समाजाने निरंतर संघर्ष केला आहे. १९८४ साली सुरु झालेल्या संघर्षात तीन लाखांहून अधिक गावांतील १६ कोटी रामभक्तांचा सहभाग होता. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देईपर्यंत हा संघर्ष सुरु होता. या अद्वितीय मोहिमेमुळेच राष्ट्रीय लज्जेचे प्रतीक असणारा बाबरी ढांचा आज तिथून नष्ट झाला आहे आणि राष्ट्रीय गौरवाचे प्रतीक असणाऱ्या श्रीराम मंदिराच्या भव्य निर्मितीच्या संकल्पाकडे आपण पाऊले टाकत आहोत, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी येथे केले.


vsk_1  H x W: 0

आज नवी दिल्ली येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत वार्ताहरांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, राम जन्मभूमी आंदोलनाचा इतिहास हा देशाला आत्मग्लानीकडून आत्मविश्वासाकडे घेऊन जाणारा एक प्रवास आहे. सुमारे १००० वर्षांपासून विदेशी आक्रमकांविरुद्ध निरंतर संघर्ष करून आपण हा विजय प्राप्त केला आहे. हिंदू समाजाचे केवळ काल्पनिक आधारावर विभाजन करण्यात येत होते तसेच हिंदूंमध्ये हीन भावना तयार करण्यात आली होती. या आंदोलनाने विभाजनाच्या सर्व रेषा समाप्त केल्या आहेत. जाती, पंथ, भाषा, क्षेत्र यांच्या पलीकडे जाऊन हिंदू समाज संघटीत झाला आहे. "गर्व से कहो हम हिंदू हैं"। असे आज कोट्यवधी हिंदू गौरवाने आणि आत्मविश्वासाने म्हणतात. याच स्वाभिमान, आत्मविश्वास आणि राष्ट्रीय गौरवाचा परिणाम म्हणून भारतातील विभाजनाचे धोरण राजकारणाच्या सर्व क्षेत्रातून लुप्त होत आहे. संपूर्ण देश आत्मविश्वासाने प्रत्येक क्षेत्रात आज कल्याणकारी परिवर्तन करीत आहे. त्याचप्रमाणे भारत जागतिक स्तरावर एक महाशक्ती म्हणून आकाराला येत आहे.

 

डॉ जैन म्हणाले की, राष्ट्रीयतेचा गौरव हे देशासाठी महत्वपूर्ण प्रेरक तत्त्व असते. परंतु विभाजनकरी तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे भारताच्या राष्ट्रीयतेच्या व्याख्येत बदल करण्यात आला. आता भारताच्या राष्ट्रीय्तेस कोणत्याही विदेशी आक्रमकांशी जोडता येत नाही. राष्ट्र पुरुषांच्या प्रेरक गाथा ही व्याख्या ठरवतात. भगवान श्रीराम यांच्यापेक्षा मोठा राष्ट्रपुरुष दुसरा कोण असू शकेल? देशाच्या घटनेनेही हे स्वीकारले आहे.

या कल्याणकारी परिवर्तनाची गती वाढत चालली आहे. प्रभू श्रीराम यांच्या मंदिरावर कळस स्थापन होईपर्यंत सर्व विभाजनकारी तत्त्वे पूर्णतः निरर्थक आणि निस्तेज होतील. तसेच आत्मगौरव, स्वाभिमान आणि आत्मविश्वासयुक्त अशा एका नव्या भारताचा संकल्प साकार होईल, असेही जैन म्हणाले.