विवेकानंद सेवा मंडळातर्फे तीन दिवसीय 'राष्ट्रपूजन व्याख्यानमाला'

10 Aug 2020 11:51:20

seva_1  H x W:

डोंबिवली  : विवेकानंद सेवा मंडळ, डोंबिवली यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपूजन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. वेबिनार स्वरूपात तीन दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेची सुरुवात शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७ वाजता, 'ऑपरेशन मेघदूत' वीर (सियाचिन ग्लेशियर) आणि निवृत्त पायदळ प्रमुख ले.जन.(निवृत्त) श्री.संजय कुलकर्णी यांच्या 'आपली सामर्थ्यशाली संरक्षण व्यूहरचना' या विषयावरील व्याख्यानाने होईल. शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७ वाजता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक आणि विज्ञान भारती संस्थेचे राष्ट्रीय संघटन मंत्री मा.श्री.जयंतराव सहस्रबुद्धे यांचे 'आत्मनिर्भर भारतासाठी सांस्कृतिक राष्ट्रविचारांची गरज' या विषयावर व्याख्यान होईल. आणि रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७ वाजता, माजी केंद्रीय मंत्री आणि भारताचे जी-२० शेर्पा मा.श्री.सुरेशजी प्रभु, 'लक्ष्य ५ लाख कोटी डॉलर उत्तुंग अर्थव्यवस्थेचे' या विषयावर मार्गदर्शन करतील.
या व्याख्यानमालेसाठी शिवाजी महाराज अमेरिका परिवार, ट्रेकक्षितीज संस्था, ध्रुव नॉलेज फाऊंडेशन, पै फ्रेंड्स लायब्ररी, रोटरॅक्ट ३१४२ डिस्ट्रिक्ट, ट्रायनेट कम्युनिकेशन या सहयोगी संस्थांचे सहकार्य लाभले आहे.
सदर व्याख्यानमाला वेबिनार स्वरूपात होणार असून मंडळाच्या फेसबूक पेजवर (https://www.facebook.com/VivekanandSevaMandal/) आणि मंडळाच्या युट्युब चॅनल वर ( Vivekanand Seva Mandal Dombivli) याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0