भारतातील पहिला वैज्ञानिक महाकुंभ ऑक्टोबरमध्ये

विवेक मराठी    18-Sep-2020
Total Views |

 ***विद्यार्थी विज्ञान मंथन २०२०-२१चे आयोजन****

vivek_1  H x W:

(वि.सं.कें.) - विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत व्हावा, वैज्ञानिक विश्लेषणाची क्षमता वृद्धिंगत व्हावी, शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी वाढावी तसेच वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांची पारख व्हावी अशी अनेक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थी विज्ञान मंथन २०२०-२१ या भव्य ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस ही स्पर्धा घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे ऑक्टोबरमध्ये ‘आहारशास्त्र आणि पर्यावरण’ या संकल्पनेवर आधारित भारतातील पहिल्या वैज्ञानिक महाकुंभाचेही आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान भारती, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची स्वायत्त संस्था विज्ञान प्रसार आणि शिक्षण मंत्रालय राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सहावी ते आठवी आणि नववी ते अकरावी अशा दोन टप्प्यांमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे. https://www.vvm.org.in या वेबसाईटच्या माध्यमातून वैयक्तिक तसेच संस्थात्मक नोंदणी करता येणार असून १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या काळात १०० रुपये भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. १ ते १५ ऑक्टोबर या काळात विलंबशुल्क भरून प्रवेश घेता येईल. ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम, मराठी, गुजराती, पंजाबी, बांगला, ओडिया, आसामी अशा प्रमुख प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाणार आहे. विंडोज किंवा एंड्रोइड सिस्टीम असणाऱ्या स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा संगणक यावरूनच ही परीक्षा देता येणार आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना २५ नोव्हेंबर रोजी विविमं परीक्षा अॅप डाउनलोड करून २९ वा ३० नोव्हेंबर यापैकी आपल्या निवडीनुसार कोणत्याही एका दिवशी विद्यार्थी ही परीक्षा देता येणार आहे. अॅप वापरण्यासाठी विद्यार्थ्यांना युजर नेम आणि पासवर्ड दिला जाईल. सकाळी ८ ते रात्री 10 दरम्यान कोणत्याही वेळी एकदाच लॉग इन करून विद्यार्थी परीक्षा देऊ शकतो. परीक्षेशी संबंधित स्टडी मटेरीअल विविमंच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल. सर्वाधिक गुण मिळवणारे प्रत्येक इयत्तेतील २० विद्यार्थी राज्यस्तरीय शिबिरास पात्र असतील. राज्यातील सर्वाधिक गुण मिळवणारे दोन विद्यार्थी हे राष्ट्रीय शिबिरास पात्र असतील. या शिबिरातील सर्वाधिक गुण मिळवणारे तीन विद्यार्थी हे राष्ट्रीय विजेते ठरतील. राष्ट्रीय शिबिरातील प्रत्येक इयत्तेतील पहिल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि 10 हजार अशी रोख पारितोषिके आहेत. तर प्रत्येक झोन मधील प्रत्येक इयत्तेतील तीन गुणवंत विद्यार्थ्यांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार आणि दोन हजार अशी रोख पारितोषिके आहेत. राज्यस्तरीय विजेत्या विद्यार्थ्यांना प्रत्येक इयत्तेतील पहिल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांना अनुक्रमे 5 हजार 3 हजार 2 हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.