डोंबिवली बँकेचा आज 50 वा वर्धापनदिन

स्रोत: विवेक मराठी    दिनांक06-Sep-2020
|


bank_1  H x W:

डोंबिवली नागरी सहकारी बँक लि. ही देशातील अग्रगण्य मल्टी स्टेट शेड्यूल्ड सहकारी बँक आपला 50 वा वर्धापनदिन रविवार, दि. 6 सप्टेंबर, 2020 रोजी साजरा करीत आहे.

गेल्या सर्व 50 वर्षांमध्ये बँकेचा निव्वळ नफा दरवर्षी वाढत राहिला असून या सर्व वर्षात बँकेने प्रतिवर्षी उत्तम लाभांश दिला आहे.
कोरोनाच्या संकटकाळात, सर्वसामान्यांच्या गरजा ओळखून त्यांच्यासाठी तसेच उद्योजकांसाठी किफायतशीर व्याजदराच्या अनेक कर्ज योजना बँकेने कार्यान्वित केल्या आहेत. 7.75% इतक्या कमी व्याजदरापासून सुरु होणा-या गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनेतारण कर्ज, वस्तु खरेदी कर्ज, शैक्षणिक कर्ज तसेच उद्योजक व व्यावसायिक यांच्यासाठीही अत्यंत कमी व्याजदराच्या अनेक कर्ज योजना “डीएनएस केअर्स’’ या कर्ज धोरणाखाली कार्यान्वित केल्या आहेत. ह्या सर्व योजनांस ग्राहकांचा सर्वदूर अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. लॉकडाऊनच्या काळातही बँकेच्या सर्व शाखा सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून उत्तम ग्राहक सेवा नियमीतपणे देत आहेत. ग्राहकांना बँकेत प्रत्यक्ष येण्याचा त्रास होऊ नये यासाठी मुदत ठेवींचे परस्पर नूतनीकरण करण्याची सुविधा बँकेने उपलब्ध करून दिली. तसेच डिजिटल बँकिंगला उत्तेजन मिळावे या हेतूने डू-मोबाईल प्लस हे बँकेचे अ‍ॅप तसेच भीम, फोन पे या अॅपशी बँकेतील खात्यांशी संलग्नता करण्याचा आग्रह धरला. सहकारी सोसायट्यांना व त्यांच्या सभासदांना हिशेब, मासिक सभा, सूचना इत्यादीसाठी उपयुक्त ठरेल असे डीएनएसबी सोसायटी अ‍ॅपही विकसित केले आहे.
 
बँक, सर्वसाधारण, जीवन व आरोग्य विम्याच्या क्षेत्रातही कार्यरत असून, कोरोनावरील औषधोपचारांचा खर्च विचारात घेऊन, कोविड-19 साठी अत्यल्प प्रिमियमची विशेष आरोग्य विमा पॉलिसी उपलब्ध केली आहे. अनेक ग्राहकांना याचा लाभ झाला आहे.
बँकेच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.