नव्या शिक्षणनीतीमध्ये पारंपरिक कौशल्यांचा समावेश

स्रोत: विवेक मराठी    दिनांक07-Sep-2020
|
@गिरीश प्रभुणे


व्या शैक्षणिक धोरणात पारंपरिक कला-कारागिरी तंत्रकौशल्याचा अंतर्भाव केल्याने, अस्तंगत होत जाणार्‍या पारंपरिक लाखो वर्षांपासून विकसित होऊन सर्व जगाला पुरवठा केला जाणारा या भारताच्या आत्मा असणार्‍या ग्रामोद्योगास चालना मिळून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊन ग्रामीण भागातील उद्योग-व्यवसायास - विशेषत: गृहउद्योगास चालना मिळणार आहे. यामुळे भारतातील खूप मोठा वर्ग उद्योगप्रधान होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल.

shikshan_1  H x

नवीन शैक्षणिक धोरणात व्यावसायिक शिक्षणाअंतर्गत तंत्रशिक्षणामध्ये लोकविद्यांचा समावेश करण्यात आला आहे. आजही भारताच्या लोकसंख्येमध्ये ग्रामीण भागात सर्वत्र शेतीवर आधारित लागणारी अवजारे लोहार-गाडीलोहार-घिसाडी यांच्याकडूनच बनवून घेतली जातात. याच जोडीला तांब्यापितळेच्या भांड्यांचा वापर पुन्हा या दशकात वाढलेला दिसतोय. तसेच कुंभारकाम - पॉटरी व्यवसाय आज शहरी भागातील अग्रणी व्यवसाय आहे. कापूस आणि रेशीम, तसेच लोकर आधारित उद्योग हे भारतातील आजही सर्वात मोठे विकेंद्रित जाळे असणारे उद्योग आहेत. कापड उद्योग ग्रामीण भागातील महत्त्वाचा उद्योग होता. त्यात शेतकरी, सूत कातणारे, विणकर कोष्टी, धनगर समाजातील काही घटक, रेशमाची निर्मिती हा इथल्या आदिवासींचा महत्त्वाचा व्यवसाय.

नव्या शैक्षणिक धोरणात या पारंपरिक कला-कारागिरी तंत्रकौशल्याचा अंतर्भाव केल्याने, अस्तंगत होत जाणार्‍या पारंपरिक लाखो वर्षांपासून विकसित होऊन सर्व जगाला पुरवठा केला जाणारा या भारताच्या आत्मा असणार्‍या ग्रामोद्योगास चालना मिळून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊन ग्रामीण भागातील उद्योग-व्यवसायास - विशेषत: गृहउद्योगास चालना मिळणार आहे. यामुळे भारतातील खूप मोठा वर्ग उद्योगप्रधान होईल. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल. आज जो वर्ग कर्जाच्या विळख्यात अडकलाय, त्याची कर्जातून मुक्तता होईल. या कौशल्यावर आधारित शिक्षण धोरणाने नवीन उद्योगांना चालना मिळून आज जगण्यासाठी जे सर्व जण शहराकडे धावतात, त्याला थोडा आळा बसेल.

या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी दहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. हा मोठा कालावधी आहे. यात ५-३-३-४ या सत्रात वयाच्या तिसर्‍या वर्षापासून ते इयत्ता पहिलीपर्यंतचा आणि पहिली ते पाचवीपर्यंतचा कालावधीच अत्यंत महत्त्वाचा आहे. या आठ वर्षांच्या काळातच मुलांचे आयुष्यभराचे संचित त्यांच्या स्मृतिपटलामध्ये गोळा होते. यातूनच त्यांच्या आवडीनिवडी तयार होतात. याच काळात त्याचा ‘कल’ नक्की होत जातो. याच काळात सर्व प्रकारची कौशल्ये हस्तगत होतात. विकसित होतात. हा कालखंड हा त्याच्या मातापित्यांच्या सहवासाचा, त्यांच्यावर अवलंबून असण्याचा, त्यांच्याकडून विविध संस्कार आत्मसात करण्याचा असतो आणि हीच त्याच्या जीवनाची, शिक्षणाची पायाभरणी असते.


प्राचीन काळापासून भारत कला-कौशल्य, ज्ञान-विज्ञान, आयुर्वेद, धातुकाम, शिल्पकला, बांधकाम, दगडातील-मातीतील ??? यात अग्रेसर होता. या सर्व कौशल्यांच्या ज्ञानशाखांचा विकास व्हायला मानवी संस्कृतीत लाखो वर्षे लागली. त्याची रचना गुरुकुल पद्धतीत आणि जीवनपद्धतीत केली गेली. घर, वस्ती हीच शाळा असे. त्यातूनच शिक्षणाचा-व्यवसायाचा-तत्त्वज्ञानाचा-कार्यकौशल्याच्या संस्कार सहजतेने आपोआपच होत असे. या माता-पित्यांसह अनेक जण त्या मुलांना सतत आपल्या आचरणातूनच शिक्षण संस्कार करीत. त्या वस्तिशाळेचे वातावरण तसेच असे. आयुर्वेद हा परिसरातील वनौषधीच्या अनुभवातून आलेल्या ज्ञानावर आधारित असे.

नव्या धोरणात या सर्व पारंपरिक ज्ञानशाखांचा आपोआपच उपयोग होईल. यासाठी गावातील आजच्या शाळेला काही गोष्टी जोडाव्या लागतील. परिसरात वनौषधींची लागवड करावी लागेल. त्याची रोपवाटिका (नर्सरी) बनवावी लागेल. परिसरातील ज्येष्ठ व्यक्तींशी चर्चा करून परिसरातील नष्ट झालेल्या वनस्पतींची सूची करता येईल. त्याचे सचित्र तक्ते बनविता येतील. यासाठी जो प्रशिक्षकवर्ग लागेल, तो गावातल्या गावातच असणारे गवंडी, लोहार-कुंभार-सुतार यांच्यातून घेता येईल. या कारागीरांना शिकविण्याचे ज्ञान उपलब्ध असते. त्यांना प्रशिक्षित करून त्यांचा उपयोग करून घेता येईल. झाबुआ-शिवगंगा अभियानात अशा अक्षरश: हजारो पारंपरिक गाव कारागीरांना इंदूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रशिक्षण देण्यात आले. त्याचे दृश्य परिणाम झाबुआमध्ये (म. प्रदेश) दिसतात.

शाळेच्या परिसरात कुंभाराचे चाक, जे विजेवर चालणारे, मुलांना चालविण्यास सुलभ सुरक्षित. लोहार-सुतार कार्याचा कार्यशाळा (ैदव्ेप्दज्) फार कमी खर्चात गावपातळीवर उभारता येईल. या सर्व प्रशिक्षणात इयत्ता पहिलीपासूनच संगणक प्रणाली-इंटरनेट-आंतरजालाचा समावेश केल्यास आधुनिक तत्त्वज्ञान इंटरनेटच्या आंतरजाळ्यातून जगभराचे अनुकरण येईल. गावशाळा पातळीवर माती परीक्षणापासून शेतीला आवश्यक अशी प्रयोगशाळा उभी करता येईल. शाळेत येणार्‍या मुलांना आपल्या पारंपरिक जमिनीचा, उद्योगाचा अभ्यास करता येईल. त्याचा तोच गावाच्या विकासाचा आराखडा बनवून गावातील शेतमालावर प्रक्रिया करणारा उद्योग (लघू) उभारू शकेल. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, आरोग्य केंद्र, प्रशिक्षित शेतमजूर, ग्रामसेवक, तलाठी या सर्व ठिकाणी बारावी पास अशा गावातील विविध समस्त अध्ययन केंद्रातून बारावी असलेल्यांना नोकरी मिळू शकते.

यासाठी ग्रामीण बचत गटांतून त्यांची चार-पाच गावसमूहांची पंचक्रोशी बँक स्वयंसाहायता बँक, आठवडे बाजारांना धरून उभी करता येऊ शकते. (आंध्र, तेलंगणात तसेच पुणे जिल्ह्यात ‘प्रयास’ या संस्थेने हा प्रयोग यशस्वीपणे केला आहे.)

तात्पर्य - नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना शिक्षण आणि ग्रामविकास या क्षेत्रात काम करणार्‍या एनजीओ-स्वयंसेवी संस्थांना स्थानिक पातळीवर सहभागी करून घेतले, तर याची अंमलबजावणी अधिक सक्षमपणे करता येईल. या शैक्षणिक धोरणातील सर्व मुद्द्यांचा विचार करून शिक्षणात - प्रचलित शिक्षणात जे करावे लागले, त्याचे प्रात्यक्षिक लवादा, ता. धारणी, मेळघाट, संपूर्ण बांबू केंद्र ग्राम ज्ञानपीठ आणि पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या ठिकाणी पाहता येईल.

याच्या अंमलबजावणीत मुख्यत्वे शिक्षकांच्या मानसिकतेची अडचण येईल. त्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. नवी भरती करताना कौशल्यप्रधान शिक्षकांना प्राधान्य द्यावे लागेल.

नव्या शैक्षणिक धोरणातील तंत्रकौशल्य, व्यवसायकौशल्य आणि पारंपरिक लोकविद्या यांच्या सर्वंकष समावेशाने भारत हा कुशल कारागिरीने समृद्धीकडे पुन्हा एकदा वाटचाल करू लागेल. बेकारी, आर्थिक दुर्बलता, आरोग्य सर्वच समस्यांवर हा उत्तम उपाय आहे. प्रंतप्रधान नरेंद्र मोदी, मा. प्रकाश जावडेकर यांनी या धोरणाचा स्वीकार करण्याचा धाडसी निर्णय घेतला. भविष्यात निश्चितच याचे सकारात्मक परिणाम दिसतील.