नकळतपणे हिंदुत्वाची भावना जपली गेली

विवेक मराठी    13-Jan-2021
Total Views |

@सुमित सन्याशिव, नाशिक

 

कधी मागे वळून पाहता सर्व भाव आयुष्यातल्या काही प्रसंगातून मला शिकता आले व समजावून घेता आले. त्यात माझे कुटुंब एकत्र, आजी-आजोबांचे गोड लाड, बाबा व काका यांच्यातील समजूतदारपणा आणि आम्हा भावंडातील एकोपा, घरातील व्यक्तींच्या प्रसंगानुसार तडजोडी या सर्व गोष्टी संस्काररूपात माझ्यात रुजत गेल्या आणि नकळतपणे हिंदुत्व ही भावना जपली गेली आणि वाढली गेली, कारण मी एका हिंदू परिवारामध्ये जन्माला आलो.
 
hindu_1  H x W:
 
हिंदू हा शब्द बहुधा लोकांना मरेपर्यंत कळत नाही. माझ्या आयुष्यातही वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षी आजोबांकडून कळले ते हे की हिंदू हा सनातन आहे, सर्वश्रेष्ठ आहे. त्यावर माझे खूप प्रश्न, पण ते प्रश्न त्या वेळेस सोडवत बसणे तेवढी बुद्धी व समज नसल्याकारणाने हे पुढील काळात काही प्रसंगांतून स्पष्ट झाले.

लहानपणी क्रिकेट खेळत असताना एक रिक्षावाला सारखा रागवायचा, त्याचा खूप राग यायचा. एकदा त्याला शिवी दिली. हा सर्व प्रकार आईला कळताच तिने खूप मार दिला. हा सर्व प्रकार जेव्हा बाबांना कळला, तेव्हा बाबांनी मला जवळ बोलावून अगदी शांतपणे समजावून सांगितले, ते हे की आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींशी आपण नम्रपणे आणि आदराने बोलायचे असते. हे पटवून देण्यासाठी बाबांनी खूप छान खूप छान गोष्ट सांगितली, ती गोष्ट होती रामाची. राम हे युगपुरुष म्हणून ओळखले जायचे, ते म्हणजे त्यांच्या आदरयुक्त वागणुकीमुळे. ते सर्वांशी नम्रतेने वागत. ते कोणालाही उलटून उत्तरे देत नसतील, म्हणून देवबाप्पाने त्यांना खूप शक्ती दिली, म्हणून ते खूप महान झाले. मी आदराने सर्वांशी वागलो, तर देवबाप्पा मला खूप बुद्धी देईल. या माझ्यात प्रसंगातून आदरभाव रुजला गेला आणि मी सतत माझ्या जीवनामध्ये माझ्याकडून मोठ्यांचा आदर व्हायला हवा ही प्राथमिकता देतो.

लहानपणी रामायण सीरियल बघत असताना त्यातले बंधुप्रेम नेहमीच स्मरणात आहे आणि त्यात आजोबांची शिकवण की भावंडांनी एकत्र यायचे असते, एकत्र आणण्यात शक्ती दिसते ही हिंदू धर्माची शिकवण. आम्ही भावंडांमध्ये कधी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद व्हायचे, तेव्हा आजोबांकडून ऐकलेली एक गोष्ट म्हणजे तुम्ही सर्व जण एकत्र असाल तर बाहेरील वाईट विचार कधीही तुम्हाला विभक्त करू शकणार नाही.

कधी मागे वळून पाहता हे सर्व भाव आयुष्यातल्या काही प्रसंगातून मला शिकता आले व समजावून घेता आले. त्यात माझे कुटुंब एकत्र, आजी-आजोबांचे गोड लाड, बाबा व काका यांच्यातील समजूतदारपणा आणि आम्हा भावंडातील एकोपा, घरातील व्यक्तींच्या प्रसंगानुसार तडजोडी या सर्व गोष्टी संस्काररूपात माझ्यात रुजत गेल्या आणि नकळतपणे हिंदुत्व ही भावना जपली गेली आणि वाढली गेली, कारण मी एका हिंदू परिवारामध्ये जन्माला आलो.

वयाच्या तारुण्यात प्रवेश करताना काही गोष्टी आवडायच्या नाहीत, रूढी-परंपरा यांबाबत थोडीशी नास्तिकता आली होती. त्यात हिंदू धर्मात रूढी-परंपरा, सण-समारंभ खूपच आणि ते साजरे करायच्या वेगवेगळ्या पद्धती. या पद्धती पाळताना खूप जिवावर यायचे, पण या सर्व रूढी-परंपरा हिंदू धर्मात समाविष्ट करण्यामागचे वैज्ञानिक कारण जेव्हा समजले, त्याच रूढी-परंपरांशी आपोआप जवळीक झाली.

उत्तरेत सिंध प्रांतापासून ते दक्षिणेत कन्याकुमारीपर्यंत जी संस्कृती एकत्रपणे नांदत आलेली आहे, त्यात वेगवेगळ्या संप्रदायांचा, समाजांचा वेगवेगळ्या जीवनपद्धती जेव्हा एकत्र येऊन हिंदू म्हणून संबोधले जाते, तेव्हा एक विलक्षण गोष्ट वाटते. कित्येक वर्षांच्या कालखंडांमध्ये जी एक संस्कृती, जीवनदृष्टी व त्यावर आधारित एक जीवन पद्धत या पूर्ण देशांमध्ये निर्माण झालेली आहे, ही हिंदू धर्माची एक शिकवण आहे. खरे तर हिंदुत्व ही संकल्पना जीवनाकडे एक वेगळा दृष्टीकोन बघण्याची गोष्ट आहे, ज्यात नैसर्गिक, वैज्ञानिक, सामाजिक संकल्पना ही पारंपरिक पद्धतीने आपल्या जीवनात लादली गेलेली आहेत. आणि तरीही कित्येक वर्षापासून ही अशी संस्कृती हिंदू धर्म म्हणून अजूनही अस्तित्वात आहे.

हिंदू म्हणून जीवन जगताना किंवा हिंदू म्हणून जीवनातील सगळ्यात गोष्टी पार पाडताना विविध पंथांमध्ये लोकांच्या किंवा सामाजिक लोकांच्या वेगवेगळ्या भाषा किंवा वेगवेगळ्या संतांना एकवटलेल्या जमाव-जातींना थोडे जवळून अभ्यास केल्यावर एक कळून येते - हे काही लोकांनी गट तयार करून त्या नवीन संकल्पना यात मांडलेल्या काही प्रमाणात चुकीच्या आहेत. आणि म्हणूनच मी हिंदू म्हणून यात काय नवीन बदल न करता हिंदू म्हणूनच फक्त ह्या सर्वांसोबत एकत्रपणे राष्ट्रहिताचा विचार करतो. कारण शेवटी आपला एक वेगळा समूह बनवून परत त्यात काहीतरी अलौकिक काम करून कोणी दुसऱ्या व्यक्तीसाठी आपण आदर्श ठरावे आणि त्या आदर्शापोटी दुसरा एक वेगळा गट निर्माण करावा असे मला मुळीच आवडणार नाही. म्हणून ज्या गोष्टी आधीपासूनच हिंदू धर्मामध्ये कार्यभूत आहेत, त्याच मी स्वीकारल्या आणि माझ्यातल्या ह्या हिंदू संस्कृतीतल्या जा ही भावना आहेत त्यांनाच जशास तशा माझ्या जीवनामध्ये राबवतो.

कुणा एका संताबद्दल, समूहाबद्दल काही विशेष टिप्पणी न करता हिंदू म्हणून बघण्याचा दृष्टीकोन आपण सर्वांनीच फक्त हिंदू म्हणूनच केंद्रित केला पाहिजे. कारण हिंदू संस्कृतीत जी जीवनपद्धत निर्माण केली गेलेली आहे किंवा जी संकल्पना जीवनाकडे पाहण्याची दृष्टीकोनातून, नैसर्गिक घटक बघून रूढी लादल्या गेल्या, सर्व संकल्पना या मूल्यांवर आधारित आहे, ती फार पूर्वीच्या काळापासून संशोधन करून रुजल्या गेलेल्या आहेत. म्हणून यात काहीतरी नवीन बदल करून आपल्या पद्धतीने नवीन हिंदू संस्कृतीचा पाया उभारणे हे मला मुळीच पटलेले नाही. हिंदू संस्कृतीचा थोडा आणखी सखोल अभ्यास करण्यात जो आला, त्यात ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या एका विशिष्ट कारणावर आधारित आहेत, म्हणूनच जो आधीपासून वेदांमध्ये ज्या गोष्टी, नियम नमूद केलेल्या आहेत त्याचे आचरण माझ्या जीवनात व्हायला हवे यासाठी मी सदैव दक्ष राहीन अशी मनाची तयारी करून ठेवलेली आहे.