कार्यकर्तेपण जगणारा लोकप्रतिनिधी - आ. महेश शिंदे

विवेक मराठी    25-Jan-2021
Total Views |

@कृष्णात कदम

शेतकर्यांचे प्रश्न असो किंवा नागरिकांच्या आरोग्याचा विषय असो, प्रत्यक्षात कार्यक्षेत्रात उतरून काम करणारे लोकप्रतिनिधी म्हणजे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे. कोरोना काळात स्वत: काम करतानाच लोकांनाही त्यांनी या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी करून लोकचळवळीत त्याचे रूपांतर केले. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा लेख.
 
bjp_4  H x W: 0

लोकशाहीचा एक महत्त्वाचा स्तंभ म्हणजे लोकप्रतिनिधी. कृषिप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या आपल्या देशात जे लोकप्रतिनिधी शेतकर्यांमधून तयार होतात आणि बळीराजाचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देतात, ते खरोखरचप्रजासत्ताकाचे प्रहरीसिद्ध होतात. शेतकर्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यासमवेत भोजन करणार्या कोरेगाव मतदारसंघाच्या आमदार महेश शिंदेंची भेट घेतली, तेव्हा याची प्रत्यक्ष अनुभूती आली.

 

फेब्रुवारी-मार्चदरम्यान सुरू झालेल्या कोरोना संकटाच्या काळात लोकप्रतिनिधींचा कस लागला होता. प्रत्यक्ष कार्यभूमीवर उतरत जनतेला कोरोनापासून वाचवायचे आव्हान त्यांच्यासमोर होते. आमदार महेश शिंदेंनी स्वत:च्या जिवाची पर्वा करता हे आव्हान स्वीकारले. कोरोनाची जेव्हा सुरुवात झाली, त्या वेळी अधिवेशनावरून परत येत असताना कोरोनाचे संकट कसे असेल, त्याची तीव्रता कशी असेल याचा अंदाज त्यांनी घेतला. त्यानंतर शांतपणे नियोजन केले. या नियोजनाचा पहिला टप्पा होता लॉकडाउनचा. त्यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि लोकांच्या सुरक्षेसाठी प्रथम आपण सर्वांनी 15 दिवसांसाठी स्वत:ला कोंडून घ्यायचे, असे त्यांना सांगितले. 15 दिवसानंतर महेश शिंदेंसह सर्व कार्यकर्ते घराबाहेर पडले. त्यानंतर लोकांना आवाहन करत लॉकडाउन यशस्वी केले. लॉकडाउन तर यशस्वीरित्या सुरू होते, पण लॉकडाउनमुळे लोकांना खायला अन्न नव्हते. अर्थार्जनाचे सर्व मार्ग बंद झाले होते.

 

. महेश शिंदे सांगतात, “आम्ही लोकांना अन्नधान्याची जीवनावश्यक वस्तूंची किट्स देण्यास सुरुवात केली. कोरेगाव मतदारसंघातील साधारणत: 8800 कुटुंबांना ही किट्स देण्यात आली. ही किट्स वाटताना सार्वजनिक अन्नधान्य वितरण यंत्रणेत काही दोष असल्याचे आढळले, म्हणून प्रशासनाच्या आढावा बैठका घेऊन आम्ही हे दोष दूर केले आणि प्रत्येक घरामध्ये संपूर्ण किट कशा प्रकारे देता येईल याचे योग्य प्रकारे नियोजन केले. या सगळ्या गोष्टी घडत असताना आमच्या लक्षात आले की लघुउद्योगांना या सगळ्याचा मोठा फटका बसत आहे. अशा उद्योजकांना आर्थिक मदत करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. ही मदत पोहोचवत असतानाच कोरोना थोपवण्याचाही आम्ही प्रयत्न करत होतो. कारण मुंबई-पुण्यातील भीतियुक्त वातावरणामुळे आणि आर्थिक चणचणीमुळे तेथून अनेक लोक मतदारसंघात येत होते. आम्ही मुंबई-पुणे येथे राहणार्या आमच्या भागातील लोकांचे जे संपर्क उपलब्ध होते, अशा अडीच-तीन हजार लोकांच्या खात्यात आर्थिक मदत पाठवली. जे लोक येथे परत आले होते, त्यांना गावाच्या बाहेर असलेल्या शाळांमध्ये क्वारंटाइन केले होते. त्यांच्या राहण्याची, जेवण्याखाण्याची चांगली व्यवस्था केली होती. संपूर्ण सातारा जिल्ह्यात हाहाकार माजलेला असतानाही कोरेगाव मतदारसंघात कोरोनाचा रुग्ण सापडला नव्हता. परंतु जुलैदरम्यान कोरेगावमध्ये तुरळक प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले. त्यानंतर प्रशासनाच्या मदतीने जिल्हा उपरुग्णालयात आम्ही कोरोनाचा कक्ष सुरू केला. त्यानंतर पूर्ण लक्ष देऊन कोरोनाच्या रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था केली. त्या वेळी काही सहकार्यांनाही कोरोनाची लागण होऊ लागली आणि नंतर मलाही कोरोना झाला. माझी तब्येत खूपच बिघडली होती.”

 

कोरोनाचा सर्वत्र उद्रेक झालेला असल्याने कोरेगाव परिसरातील कोणत्याच रुग्णालयात रुग्णांसाठी बेड उपलब्ध होत नव्हते. त्या वेळी नवे रुग्णालय उभारण्याची आवश्यकता महेश शिंदेंना तीव्रतेने जाणवली आणि ते सुरू करण्याचा त्यांनी निश्चय केला. स्वत: कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. सर्व प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर्स यांच्या समन्वयाने सात दिवसांत रुग्णालय सुरू झाले. ऑक्सिजन पुरवठ्याची मशीन्स परदेशातून मागवली. बेड्सची व्यवस्था केली. पायाभूत सुविधा उभारल्या, पण मुख्य गरज होती वैद्यकीय कर्मचार्यांची. डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, नर्सेस अशा मोठ्या कर्मचारिवर्गाची भरती केली.


bjp_3  H x W: 0

रुग्णालय उभारल्यानंतरही लोकांची भीती घालवणे फार गरजेचे होते. घरात कोणी रुग्ण असतील, तरी घरातील अन्य सदस्य घाबरून जात. महेशजींनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या की, तुम्ही तुमच्या गाड्यांचा ॅम्ब्युलन्सप्रमाणे कोविड रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी वापर करा. कारण सार्वजनिक यंत्रणेवर प्रचंड ताण येत होता. गावागावात कार्यकर्ते नेमले. ते पल्स ऑक्सिमीटर हातात घेऊन फिरायचे. ज्या व्यक्तीची ऑक्सिजन लेव्हल कमी आढळायची, त्यांना क्वारंटाइन केले जायचे किंवा रुग्णालयात दाखल करायचे. नवीन रुग्णालयात 120 बेड्स होते, त्यापैकी 100 बेड्ससाठी ऑक्सिजन पुरवठा मशीन्सची, तर 20 बेड्ससाठी व्हेंटिलेटरची सोय करण्यात आली. बर्या झालेल्या रुग्णांना पोस्ट कोविडचा त्रास होऊ नये, यासाठी रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये योगाच्या प्रशिक्षणाची आणि अन्य आरोग्य सुविधांची व्यवस्था केली गेली. या सर्व प्रयत्नांमुळे कोरेगाव मतदारसंघात मृत्युदर कमालीचा घटला.


bjp_1  H x W: 0 

या पुढच्या टप्प्यात कोविडविरुद्धचा हा लढा लोकचळवळ झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचे महेशजींनी ठरवले. ते सांगतात, “आम्ही रुग्णालयात सकाळचा नाश्ता, दोन वेळचं जेवण, रात्री देशी गायीचं दूध देत होतो. आम्ही या सगळ्यात लोकांना सहभागी करून घेतलं. स्वयंपाक कोणी करायचा, भाजीपाला कोणी आणून द्यायचा हे ठरवून द्यायला सुरुवात केली. शेतकर्यांनाही त्यासाठी आवाहन केलं. त्यांनी त्यांच्या शेतात पिकणारा माल या कामासाठी आणून देण्यास सुरुवात केली. कोरेगावची जनता इतकी समजूतदार आहे की 200 लोकांच्या जेवणाचा खर्च लोकांनीच उचलला. लोकांनी स्वत:च्या वाढदिवसाचे पैसे दिले. लहान मुलांनी स्वत:च्या पिगी बँकमधील पैसे दिले. अनेक लोकांकडे औषधाचा खर्च करण्याइतकेही पैसे नसायचे. रोज 4-6 रुग्णांच्या औषधांचा खर्च करावा लागे. गावातील लोकांना आवाहन केल्यावर त्यांनी रेमडेसिवीरसारखी महागडी औषधं मदतरूपाने देण्यास सुरुवात केली. या मदतीतून रोज दीड-दोन लाखांची औषधं येण्यास सुरुवात झाली. अशा प्रकारे कोरेगाव मतदारसंघात एक मोठी लोकचळवळ उभी राहिली. संपूर्ण जिल्ह्यात जेव्हा कोरोनाच कहर वाढला होता, तेव्हा कोरेगाव मतदारसंघात कोरोनाला नियंत्रित करण्याचं कार्य केवळ जनतेच्या सहकार्याने शक्य झालं. यामध्ये रा.स्व. संघाची भूमिका फार महत्त्वाची होती. रा.स्व. संघाच्या जिल्हा शाखेने मोठं काम केलं. पोस्ट कोविड रिहॅबिलिटेशन सेंटर संघामार्फत चालवलं जात होतं. लोकांचं मानसिक आरोग्य राखण्याचं काम त्यांनी केलं. लोकांच्या मनात जेव्हा कोरोनामुळे भीती निर्माण झाली होती, तेव्हा मी ठरवलं की रुग्णांसमोर पीपीइ किट घालता केवळ मास्क घालून जायचं आणि रुग्णांना दिलासा द्यायचा. डॉक्टरांनीही पीपीइ किट घालता उपचार केले. त्यामुळे सामान्य वातावरणाची जाणीव होऊन रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाइकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी होऊ लागली. नातेवाईक स्वत: रुग्णांच्या सेवेसाठी येऊ लागले, त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळू लागला.”

 

संस्काराभिमुख पिढी घडवताना

कोरोना काळातील ही धडपड म्हणजे महेश शिंदे यांच्यातील सामाजिक कार्यकर्त्याची झलक होती. भौतिक विकास हा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होऊ शकतो, परंतु बौद्धिक आणि संस्कारांचा विकास हा सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच होऊ शकतो, ही त्यांची भावना आहे. त्यामुळे बालकांवर, शालेय विद्यार्थ्यांवर संस्कार होण्याच्या दृष्टीने ते अनेक उपक्रम राबवत असतात. आजची तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे ओढली जात आहे. अशा तरुण पिढीला व्यसनमुक्त करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. राजकीय व्यवस्थेतून तरुण मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होतात हा सगळीकडचाच अनुभव आहे. महेशजींनी मात्र कोरेगाव मतदारसंघातून निवडणुकीत मतासाठी दारूचा वापर पूर्णपणे थांबवला.

 

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने त्यांनी बचत गटांसाठी काही मॅन्युफॅक्चरिंग प्लान्ट सुरू केले आहेत. “माझे गुरू अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या ग्रामविकासाच्या ज्या संकल्पना आहेत, त्या पूर्ण ताकदीने मतदारसंघात राबवत आहोत. बचत गटांमार्फत चालणार्या लघुउद्योगांमध्ये लाकडी घाण्याचं तेल, सेंद्रिय उत्पादनं आदींचा समावेश असेलअसे त्यांनी सांगितले.bjp_2  H x W: 0 

 पाणंद रस्त्यांसाठी प्रयत्न

सुरुवातीलाच शेतकरी बांधवांविषयी महेशजींच्या मनात असलेल्या आत्मीयतेचा उल्लेख केला आहे. शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असून, त्याने पिकवलेला शेतीमाल शेतातून सहज बाहेर आला पाहिजे, अशी त्यांची पक्की धारणा आहे. त्यासाठी पाणंद रस्त्यांची आवश्यकता लक्षात घेऊन सरकारने पाणंद रस्त्यांसाठी लागणारी रॉयल्टी माफ केली पाहिजे आणि शेतकर्यांच्या शेतांमध्ये असलेले रस्ते मजबूत केले पाहिजेत, याबाबत अधिवेशनात त्यांनी प्रश्न मांडला होता. त्यानुसार शेतकर्यांच्या शेतातून जाणार्या पाणंद रस्त्यांसाठी लागणार्या गौण खनिजांवरची रॉयल्टी सरकारने माफ केली आहे. विधानसभेपूर्वी त्यांनी जनतेला सांगितले होते की विधानसभा आमदार म्हणजे जनता आमदार. त्यामुळे स्वत:ला मिळणारे वेतनही त्यांनी जनतेसाठीच वापरायचे ठरवले. या निर्णयानंतर ते स्वत:च्या आणि त्यांच्या स्वीय साहाय्यकाच्या वेतनाचे सर्व पैसे शेतकर्यांच्या पाणंद रस्त्यांसाठी वापरत आहेत. कोरेगाव मतदारसंघात 588 कि.मी.चे पाणंद रस्ते त्यांनी निश्चित केले आहेत. आतापर्यंत त्यातील 124 कि.मी.चे रस्ते पूर्ण झाले आहेत. बाकीचेही रस्ते लवकरात लवकर पूर्ण होतील. तसेच कोरेगाव मतदारसंघातील 30 टक्के क्षेत्र रस्ता नसल्यामुळे लागवडीखाली येत नव्हते. आता रस्ते बांधून ते 100 टक्के लागवडीखाली आणण्याचा महेशजींचा प्रयत्न आहे.

 
bjp_1  H x W: 0

जनसंपर्काच्या पद्धती आणि सातत्य

जनसंपर्क हा राजकारणाचा मूळ गाभा आहे, असे महेशजी मानतात. ते म्हणतात, “राजकीय नेत्याचे एक पाऊल जनतेत दुसरे विकासासाठी प्रशासनात पाहिजे. जनसंपर्क हा विकासकामातून व्हावा असा माझा प्रयत्न असतो. आमच्या संकल्पनेतील मतदारसंघ घडवण्याच्या कामातूनच आमचा जनसंपर्क सुरू आहे.”

 

गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा जलसिंचन

खरे तर कोरेगाव मतदारसंघाचा पूर्व भाग संपूर्ण दुष्काळी आहे. या भागाच्या हिश्शाचे कृष्णेचे पाणी इकडे भागात वळवणे गरजेचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय गुरू लक्ष्मणराव इनामदार यांचे जन्मगाव खटाव. त्यामुळे केंद्र सरकारच्या गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा जलसिंचन योजनेचा फायदा या भागाला मिळवून देण्याचे महेशजींनी ठरवले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसंच नितीनजी गडकरी, देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे या चौघांच्या योगदानातूनच बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नातील लक्ष्मणराव इनामदार उपसा जलसिंचन योजना पूर्णत्वास गेली आहे. यातील नगण्य 1 ते दीड टक्का काम बाकी आहे, तेही येत्या दीड-दोन महिन्यात होऊन जाईल. ही योजना यशस्वी झाल्यामुळे त्या भागात सिंचन होण्यासाठी महत्त्वाचा उपयोग होणार आहे. तसंच याचा आणखी एक फायदा म्हणजे तरुणांना नोकरीच्या शोधार्थ मुंबई-पुण्याला जायला लागत असे, ते जावं लागणार नाहीअशी माहिती महेशजींनी दिली.

 

आगामी योजना

सध्या लोकांच्या आहारात प्रोटीन कमी पडत आहे. ही प्रथिने आज शेतकर्यांच्या शेतात तयार झाली पाहिजेत, ही काळाची गरज त्यांनी ओळखली. सध्याच्या काळातील प्रोटीन ट्रेडिंगचे महत्त्व लक्षात घेऊन महेशजी त्यावर आधारित कोंबडीपालन, मत्स्यपालन, दुग्धव्यवसाय अशा शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देत आहेत.

 

राजकीय क्षेत्रातील तरुण प्रेरणादायक व्यक्तिमत्त्वांपैकी महेश शिंदे एक आहेत. राजकीय क्षेत्रात येऊ इच्छिणार्या तरुणांसमोर त्यांच्या कार्याचा आदर्श आहेच. “जीवन हे राष्ट्रासाठी समर्पित करा. निरोगी आणि निर्व्यसनी आयुष्य जगाहा तरुणाईला दिलेला त्यांचा संदेश लाखमोलाचा आहे.