दूरदर्शी, प्रेरणादायक नेतृत्व आ. रमेशअप्पा कराड

विवेक मराठी    29-Jan-2021
Total Views |

@विलास आराध्ये

26 जानेवारी 2021 हा आपल्या देशाचा 72वा प्रजासत्ताक दिन. त्या निमित्ताने सा. विवेकनेप्रजासत्ताकाचे प्रहरीहा विशेषांक काढण्याचे निश्चित केले. या अंकात भाजपाचे लातूर जिल्हाध्यक्ष आमदार रमेशअप्पा कराड यांचे कार्यकर्तृत्व प्रकाशित व्हावे या हेतूने रमेशअप्पा यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी जो संवाद साधला.

 
bjp_1  H x W: 0

रमेशअप्पांचा जन्म लातूर जिल्ह्यातील रामेश्वर या गावी एका सांप्रदायिक कुटुंबात झाला. दादाराव साधू कराड यांच्या अध्यात्माचा वारसा आणि पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती वै. प्रयागअक्का कराड यांचे कृपाछत्र रमेशअप्पांना लाभले. विश्वशांतिदूत डॉ. विश्वनाथ कराड, ... तुळशीरामअण्णा कराड, शेतीनिष्ठ वडील काशीरामनाना कराड यांचे उत्तम संस्कार त्यांना मिळाले आणि त्यांची जडणघडण झाली.

दिवंगत लोकनेते मा. गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रमेशअप्पांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. तेथूनच त्यांचे नेतृत्व खर्या अर्थाने बहरण्यास सुरुवात झाली. आपल्या नियोजनबद्ध सामाजिक कार्यातून रमेशअप्पांनी लातूर ग्रामीण मतदारसंघाची उत्तम बांधणी केली. राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व दिले. स्वपक्षीय कार्यकर्त्यांबरोबरच त्यांनी बाहेरच्या असंख्य नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि सामान्य लोकांना जोडले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपाची जननी आहे आणि कोणत्याही प्रकारे जातपात मानायची नाही हेच धोरण मा. आप्पांनी स्वीकारले. येणार्या प्रत्येक गरजूला त्यांनी सढळ हस्ते मदत केली आणि आजही करीत आहेत.

शेतकरी, कष्टकरी यांच्या जीवनात क्रांती घडवून आणून त्यांची पत प्रतिष्ठा वाढविण्याचा ध्यास घेतलेल्या एका कर्मयोग्याप्रमाणे अप्पांची ही वाटचाल सुरू असून त्यांच्या सामाजिक कामाची यादी खूप मोठी आहे. रमेशअप्पांनी 18 मे 2020 रोजी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. ‘जनसेवा ही ईश्वरभक्ती, बोध यातला उमजू याया गीतपंक्तीप्रमाणे त्यांचे कार्यकर्तृत्व फार पूर्वीपासूनच बहरते आहे. हे पुढील उदाहरणांवरून स्पष्ट होते.


bjp_1  H x W: 0 

 लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे 30 सप्टेंबर 1993 रोजी झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपात क्षतिग्रस्त झालेल्या लोकांना अप्पांनी मोठा धीर दिलाच आणि त्यांची उभारणी व्हावी म्हणून आर्थिक मदत केली. एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र कक्ष उभा करून अनेक जखमींचे प्राण वाचविले.

 माइर्स एमआयटी पुणेचे संस्थापक, विश्वशांती केंद्र आळंदीचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ कराडसाहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोरगरीब कुटुंबांतील 131 मुलामुलींचे विवाह स्वखर्चाने लावून दिले. त्या वेळी हा विवाहसोहळाएक आदर्श सामुदायिक विवाहसोहळाम्हणून महाराष्ट्रभर गाजला.

 रामेश्वर या आपल्या जन्मभूमीचा कायापालट करण्यासाठी संपूर्ण परिसरात अप्पांनी वृक्षलागवड केली आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. तसेच संपूर्ण ग्रामीण मतदारसंघामध्ये हजारो नारळ वृक्षांच्या रोपांचे वाटप केले. त्यातून वृक्षलागवड आणि पर्यावरण रक्षणाचे महत्त्व जनतेला कृतीतून पटवून दिले.

 आपल्या घरातूनच अध्यात्माचे संस्कार लाभलेल्या अप्पांनी मतदारसंघातील गावामधील भजनी मंडळांना टाळ, मृदंग, वीणा, पेटी, तबला या अनेक साहित्यांचे वाटप केले. तसेच प्रत्येक गावातील एकोपा टिकून राहावा म्हणूनएक गाव एक गणपतीही संकल्पना रुजावी यासाठी गणेश मंडळांना गणेशमूर्तींचे वाटप केले.

 रमेशअप्पांनी मतदारसंघातील 75 हजार कुटुंबांना अक्कांच्या नावानेत्यागमूर्ती प्रयागअक्का कराड आरोग्य सुरक्षा कार्डचे मोफत वाटप केले. त्याद्वारे ते मतदारसंघातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. कोणतेही मूल्य घेता रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

 दुष्काळ, नापिकी इतर कारणामुळे शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. अशा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील आप्तेष्टांना धीर देऊन त्यांचे संसार उभे राहावेत म्हणून अप्पांनी अत्यंत मोलाची आर्थिक मदत केली.

 लातूर ग्रामीण मतदारसंघातील गावांना गेल्या दोन-तीन वर्षांपासून दुष्काळाच्या तीव्र झळा बसत आहेत. या दुष्काळात होरपळणार्या कुटुंबांना मदत आणि सहकार्य करण्यासाठी रमेशअप्पांनी आपली स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली.

 अनेक ठिकाणी शेतकर्यांच्या सोयाबीनच्या, ज्वारी इतर धान्यांच्या गंजीला आगी लागून त्या राशी भस्मसात झाल्या आणि त्या शेतकर्यांच्या आशा-अपेक्षांची राखरांगोळी झाली. अशा वेळी अप्पांनी त्या सर्वांना धीर तर दिलाच, तसेच मोठी आर्थिक मदतही केली. याच पद्धतीने अतिवृष्टीग्रस्त, पूरग्रस्त, अन्य दुर्घटनांनी ग्रस्त अशा कुटुंबांना मदतीचा, सहकार्याचा हात देऊन सावरले. त्या सर्वांमध्ये जगण्याची नवी उमेद निर्माण केली.

 स्वत: रमेशअप्पा समाजहितैषी काम करणार्यांपैकी एक असल्यामुळे समाजासाठी तळमळीने काम करण्यार्यांचा त्यांनी वेळोवेळी योग्य तो सन्मान केला आहे. आपल्या ग्रामीण मतदारसंघातील विधवा, परित्यक्ता, बेरोजगार, निराधार .ना. वेळोवेळी माणुसकीचा हात समोर धरून त्याला योग्य ती मदत करून आधार दिला, याचा विशेषत्वाने उल्लेख रावा लागेल.

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक अशा अनेकानेक क्षेत्रांत रमेशअप्पांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा एक वेगळा ठसा उमटविला आहे. भाजपाचे एक लोकप्रिय नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आमदार होण्यापूर्वीच कित्येक वर्षांपासून त्यांनी आपल्या सामाजिक कामांना सुरुवात केली आहे, हे अनेकांनी अनुभवले आहे.

समाजजीवन भारुनी टाकू, चैतन्याने मानाने!

वैभवशाली भवितव्याला, नटवू निज कर्तृत्वाने!!

मा. अप्पांचे जीवन वरील दोन ओळींनी भरले आहे. .. 2014पासून अप्पा झपाटल्यागत काम करताना दिसत आहेत. केंद्र आणि राज्य शासनाकडून शेकडो कोटी रुपयांचा निधी खेचून आणून विविध योजनांच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवीत आहेत. कधीही पदाची अपेक्षा करता आत्मविलोपी वृत्तीने सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देत आहेत. गोपीनाथराव मुंडेंनी जिवापाड जपलेल्या रेणापूर तालुक्याच्या पालकत्वाची धुरा आपल्या या मानसपुत्राकडे सोपविली आणि गोपीनाथराव मुंडे निर्धास्तपणे राष्ट्रीय राजकारणाकडे वळले. या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी रमेशअप्पांनी घेतली आणि घेत आहेत. कोणत्याही सांविधानिक पदावर नसतानाही आप्पांनी उज्ज्वला गॅस, पंतप्रधान सडक योजना, घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना, पंतप्रधान आरोग्य योजना, जलयुक्त शिवार योजना अशा अनेक योजना आपल्या मतदारसंघात प्रभावीपणे राबविल्या. शेतकर्यांच्या प्रश्नासाठी वेळप्रसंगी शासनदरबारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे, आंदोलने, रास्ता रोको करून शेतकर्यांना न्याय मिळवून दिला. 2014च्या विधानसभा निवडणुकीतील अपयशाने खचून जाता अप्पा दुप्पट उमेदीने कामाला लागले. जिंकण्याची तयारी झाली, परंतु पक्षाची उमेदवारी मिळाली नाही (ती जागा शिवसेनकडे गेली.) कार्यकर्ते नाराज झाले. 2019ची विधानसभा निवडणूक झाली. अप्पांच्या सर्व समर्थकांनीनोटाचा पर्याय स्वीकारला आणि सुमारे 35 ते 40 हजार मतेनोटाला गेली. यावरूनच अप्पांच्या लोकप्रियतेची कल्पना येते.


bjp_1  H x W: 0 

18 मे 2020 रोजी अप्पांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लहर उमटली. त्यांना आमदार करण्यात मा. देवेंद्र फडणवीस, मा. चंद्रकांतदादा पाटील, मा. संभाजी पाटील निलंगेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याच्या पत्नीचाही मोठा वाटा असतो, याप्रमाणे संजीवनीताईंचा मोलाचा वाटा आहे. मनमिळाऊ आणि आतिथ्यशील स्वभावाच्या संजीवनीताई प्रत्येकाची आस्थेवाईकपणे विचारपूस करतात. त्या अप्पांची ढाल बनून उभ्या आहेत.

आता आपण आमदार झालात, काय काम करणार?” असे विचारले, तेव्हा अप्पा म्हणाले, “मला ही जी संधी मिळाली आहे, तिचे सोने करीन आणि गोरगरीब जे वंचित आहेत त्यांचे अश्रू पुसण्याचे दायित्व आले आहे, ते पूर्ण करणार.”

समाजकारण आणि राजकारण या बाबी भिन्न असल्या, तरी एखादाच राजकीय नेता असा असतो, जो समाजकारण अधिक करतो. अप्पा याच गटातील नेते आहेत. कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व या गुणांचा सुरेख संगम त्यांच्या ठायी दिसून येतो. त्यांच्या या गुणसमुच्चयाच्या आधारावर अप्पा पुढील काळात यशाचे शिखर सर करतील, भाजपाची ध्येयधोरणे समाजाच्या तळापर्यंत पोहोचविण्यात यशस्वी होतील, याचा विश्वास वाटतो.

. रमेशअप्पा कराड यांच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

(देवगिरी प्रांत पालक, सा. विवेक)