कर्तव्यदक्ष पिता आणि राजकीय गुरू

विवेक मराठी    09-Jan-2021
Total Views |

माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू रामा सवरा यांचे दि. 20 डिसेंबर 2020 रोजी निधन झाले. त्यांच्या मासिक श्राद्धानिमित्त ही विशेष श्रद्धांजली पुरवणी. सवरा यांचे पुत्र डॉ. हेमंत सवरा यांच्या लेखाने या पुरवणीची सुरुवात करत आहोत. कर्तव्यदक्ष पिता आणि राजकीय गुरू या दोन्ही भूमिकेतील विष्णू सवरा यांची स्वभाववैशिष्ट्ये उलगडणारा हा लेख आहे.

bjp_1  H x W: 0

ऑक्टोबर
2014, विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. शिवसेना-भाजपा युतीचं घोंगडं भिजत राहिलं होतं. निर्णय होत नव्हता. दादा - म्हणजे विष्णूजी सवरासाहेब 2009मध्ये भिवंडी ग्रामीण विधानसभेचे आमदार होते. साधारणपणे ज्या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून निवडून आलेले असतात, ते त्याच मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याची तयारी करतात. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या मुलाखती जाहीर झाल्या. परंतु दादांनी भिवंडी ग्रामीणऐवजी विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याचं ठरवलं मुलाखत दिली.

 
 पुढे युतीची बोलणी विस्कटली दादांना विक्रमगड मतदारसंघात भाजपाची उमेदवारी मिळाली. खरं तर हा खूप मोठा निर्णायक प्रसंग होता माझ्या दृष्टीने घातकही. चार वेळा वाडा मतदारसंघातून, पाचव्यांदा नव्याने निर्माण झालेल्या भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून ते विजयी झाले होते. त्यामुळे हा निर्णय माझ्यासाठी कदाचित राजकारणातील धुरीणांसाठी कुतूहलाचा, औत्सुक्याचा चकित करणारा होता. परंतु राजकारणातील तब्बल 35 वर्षांचा अनुभव असल्याने त्यांच्या दूरदृष्टीपणाबद्दल कोणतीही शंका नव्हती आणि त्यांचा निर्णय धाडसी योग्य होता, हे त्यांनी निवडणूक जिंकून सिद्ध केलं अनुभवी असल्याने पहिल्याच मंत्रीमंडळात स्थान पक्कं केलं. त्यांची राजकारणातील समज, द्रष्टेपणा दूरदृष्टीकोन या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले.
 

1980मध्ये जेव्हा माधवराव काणेसरांनी त्यांना स्टेट बँकेतील नोकरी सोडून पूर्णवेळ राजकारणात उतरण्याविषयी सांगितलं विचारलं, “तू शिकलास म्हणजे कुटुंबाचा अथवा घराण्याचा विचार करशील, पण समाजाचा विचार कोण करणार?तुझ्यासारख्या शिकलेल्या आदिवासी तरुणांनी आपल्या समाजासाठी काम केलं पाहिजे!” त्या वेळी कुटुंबामध्ये त्यांच्याइतके शिकलेलं कुणीही नव्हतं, त्यामुळे या निर्णयाविषयी चर्चा कोणाशी करणार? सारासार विचार करत त्यांनी नोकरी सोडली ते राजकारणात उतरले. खरं तर मोठं कुटुंब - 5 बहिणी, 3 भाऊ, चुलते, मामा, मावशी असं मोठं घराणं. नोकरी मिळाली, पण तिचाही राजीनामा दिला. समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे यावर ते ठाम होते तसा विश्वासही होता. पण 1980 1985 सलग दोन पराभवांमुळे थोडं खच्चीकरण व्हायला लागलं होतं. काम चालू होतं, 1990ला मात्र त्यांनी माधवरावांना सांगितलं होतं, “आता विजयी नाही झालो, तर पोटापाण्याचं काहीतरी बघावं लागेल.” माधवरावांचा विश्वास, दूरदृष्टी कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे 1990ला पहिला विजय मिळाला नंतर इतिहास घडला. पण 1980 ते 1990 ही दहा वर्षं खरंच परीक्षेची होती. तळागाळातील लोकांशी संवाद साधणं, संपर्क ठेवणं, काम उभं करणं, गावागावात कार्यकर्ते उभे करणं, पक्षाचा विचार रुजवणं, लोकांच्या सुखदु:खात सहभागी होणं, निष्ठावान कार्यकर्ते घडवणं या आणि अशा अनेक गोष्टींमधून त्यांनी स्वत:चा पक्षाची पाया रचला. त्यानंतर सलग सहा वेळा निवडून येऊन इतिहास घडवला पक्षानेही दोनदा मंत्रिपद देऊन त्यांचा गौरव केला.

 

या दहा वर्षांतच आम्ही भावंडं घडलो. आम्ही तीन भावंडं - मोठा मी, बहीण निशा मधली छोटा संदेश अर्थात बंधू. सुरुवातीला परिस्थिती अतिशय बिकट होती. दादांना पक्षाचं तुटपुंजं मानधन मिळायचं, त्यावरच सगळ्या घराण्याचा गाडा चालायचा. सुदैवाने 1985ला आईला शिक्षिकेची नोकरी मिळाली प्रपंच थोडा सुसह्य झाला.

 
bjp_1  H x W: 0

नंतरच्या काळात सहावीनंतर मला नवोदय विद्यालय येथे शिकण्याची संधी मिळाली. मी बोर्डी, ता. डहाणू येथे वसतिगृहात गेलो. देशभरात प्रत्येक जिल्ह्यात केंद्रीय विद्यालयाच्या धर्तीवर आश्रमशाळा निर्माण करण्यात आल्या होत्या. पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यातील आमची पहिलीच तुकडी होती. दादा, आई दोघंही वसतिगृहात शिकलेले असल्यामुळे त्यांना या गोष्टींची कल्पना होती. वसतिगृहातील शिक्षण म्हणजे मुलांना स्वावलंबी बनवण्याची पहिली पायरी आहे, असं त्यांना वाटत होतं. मीसुद्धा तेथे राहण्यास तयार झालो.

वसतिगृहाच्या नियमानुसार महिन्यातून एकदाच पालकांना आपल्या मुलांना भेटता येत असे. अन्य वेळी नाही. त्यामुळे दादाही कधी सगळे, कधी एकटे भेटण्यास येत. अर्थात येताना महिनाभर पुरेल एवढा खाऊ नक्की आणायचे. त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन असायचं. परीक्षेच्या वेळी मात्र अभ्यासात आळस करायचा नाही, नीट परीक्षा दे असं आवर्जून सांगायचे

 

कालांतराने अकरावीसाठी जागा अपुरी पडल्याने आम्हाला सिल्व्हासा येथील नवोदय विद्यालयात पाठवलं. तिथेही दादा, आमचे शेजारी नामदेव पाटील भेटायला यायचे. नवोदयमध्ये जरी असलो, तरी त्यांच्या सततच्या येण्यामुळे संपर्कामुळे एकटेपणाची जाणीव कधीच वाटली नाही.

 

बारावीनंतर मी माझ्या मित्रांनी (डॉ. अनिरुद्ध पाटील डॉ. प्रवीण भोले) मेडिकलला जायचं ठरवलं होतं. “चइइडचा फॉर्म भरतो.” एवढंच दादांना सांगितलं होतं. त्यांनीही विश्वास दाखवूनमेडिकलला ॅडमिशन घेअसं सांगितलं होतं. त्याप्रमाणे ग्रँट मेडिकल कॉलेजला ॅडमिशन मिळाली. एका आठवड्याने दादा सगळ्यांना घेऊन मला भेटायला जे.जे. हॉस्पिटलमध्ये आले होते. माझ्यावर त्यांनी मोठा विश्वास दाखवला होता. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी मी नायर हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल, मसीना हॉस्पिटल भायखळा, छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा येथे गेलो. दादांनी मला आडकाठी केली नाही. हे माझ्या बाबतीतच नव्हे, तर ताई बंधू यांनासुद्धा विश्वासात घेऊन पाठिंबा दिला. त्यांनी आम्हाला कधी अडवलं नाही. त्यांच्या भावंडांनासुद्धा नेहमी पाठिंबा दिला मार्गदर्शन करत राहिले. आमच्या घराण्यामध्ये एक दादा शिकले त्यांनी अनेकांना शिकवलं आधार दिला. नोकरीलासुद्धा लावलं. स्वत: घराण्यामध्ये मोठे असल्याची जाणीव ठेवली जबाबदारीने सगळ्यांना वाढवलं मार्ग दाखवला.

आमदार झाल्यानंतर मात्र त्यांनी त्यांचा मतदारसंघ हेच कुटुंब बनवलं. सगळ्यांची आपुलकीने मायेने चौकशी करणं, आमदारकीचा आव आणता त्यांच्या सुखदु:खात सामिल होणं, विधायक कामं करणं यामुळे त्यांनी सगळ्यांना आपलंसं केलं.


यशाची
अनेक शिखरं गाठत ते तब्बल सहा वेळा विजयी झाले. विजय मिळवल्यानंतर मात्र त्यांनी कार्यकर्त्यांना जनतेला त्याचं श्रेय दिलं. त्यामुळे त्यांची जनतेशी नाळ कधी तुटली नाही. आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांशी जसे त्यांनी संबंध जोपासले होते, तसेच राजकीय विरोधकांशीसुद्धा चांगले संबंध जोडले होते. मतदारसंघातील स्वपक्षीयांचा, विरोधकांचा सर्वसामान्य जनतेचा मी प्रतिनिधी आहे, याची त्यांना पुरेपूर जाणीव होती ते तसे वागतसुद्धा होते. कुणाला तोडून बोलणं, रागावणं, रागावलेल्यांना शांत करणं, व्यवस्थितपणे आपला मुद्दा पटवून देणं ही त्यांची स्वभाववैशिष्ट्यं होती. डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर पायाला भिंगरी हे प्रतिनिधीचं वर्णन म्हणजे दादा होते.

 

त्यांच्या शांत स्वभावामुळे कोणत्याही विषयातील अभ्यासामुळे अधिकारिवर्गसुद्धा त्यांच्याबद्दल आपुलकी आदर बाळगून होता. कोणत्याही अधिकार्याशी ते फटकून वागले नाहीत अथवा रागावले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांचे भूतो भविष्यती असे घरगुती सार्वजनिक प्रश्न सोडवले. अधिकार्यांनीसुद्धा दादांना कधी निराश केलं नाही. दादांच्या संपर्कात आलेला कोणताही अधिकारी त्यांची ओळख विसरला नाही, तर नेहमी संपर्कात राहिला भेटत राहिला. आजही कोणताही अधिकारी - कनिष्ठ असो वा वरिष्ठ, दादांविषयी आदरानेच बोलतो. त्यांच्याविषयी वाईट बोललेलं मलातरी आठवत नाही. अधिकार्यांशी व्यवस्थित संबंध ठेवून कामं कशी करवून घ्यावी, याचे धडे आजकालच्या राजकीय प्रतिनिधींनी दादांकडून घ्यायला हवेत. आपल्या फळीतील सहकारी कार्यकर्त्यांशी दादा अधिक संयमाने वागले. सर्वच्या सर्व सहकारी मित्रांशी सलोख्याचे संबंध ठेवले, त्यामुळे वितुष्ट आलं नाही. त्यामुळे पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यामध्ये पक्षाची मुळं खोलवर रुजली. मजबूत पाया तयार झाला. यामध्ये बरेच सहकारी नि:स्वार्थीपणे साथ देत राहिले. जिल्ह्यामध्ये आरक्षण आहे हे माहीत असूनसुद्धा पदाची अपेक्षा करता पक्षाशी एकनिष्ठ राहून पूर्णवेळ काम करत राहिले. काही सहकारी याला अपवाद असले, तरी त्यामुळे पोकळी निर्माण झाली नाही अथवा पक्षावर परिणाम झाला नाही. अव्याहतपणे जनतेची सार्वजनिक खाजगी कामं झाल्यामुळे पक्षाशी संबंधित कार्यकर्ते तयार झाले. काही वेळेस सामाजिक सलोखा बिघडवण्याचे प्रयत्न झाले, त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा अपवाद वगळता जनतेने त्यांना नाकारलं जातीयवादी राजकारण फार काळ टिकू शकत नाही, हेही अधोरेखित झालं. यामध्ये खरं तर दादांचा कस लागला होता. पण तब्बल चार दशकं समाजकारणात असल्याने दादांनी त्याला काहीही उत्तर देता, कुणबी-आदिवासी संघर्षाचा अवघड चेंडू खेळता विजयाचा षटकार ठोकला होता. या खेळीने विरोधकांची बोटं तोंडात जाऊन ते तोंडघशी पडले होते. आक्रमक जातीयवादी राजकारणाला निष्प्रभ करून दादांनी त्याला गांधीगिरीने उत्तर दिलं होतं. 2014मध्ये आदिवासी विकास विभागाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी ती अधिक सक्षमपणे पेलली. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून समाजाच्या पुनरुत्थानाच्या अनेक योजना संकल्पना आणल्या यशस्वीपणे राबवल्या. आदिवासी विकास विभागामध्ये बांधकाम विभाग सुरू करून 250हून अधिक आश्रमशाळांची अत्याधुनिक पद्धतीने बांधकामं झाली. कुपोषणाची तीव्रता कमी होऊन टक्का कमी झाला. आदिवासी विद्यार्थ्यांनी हिमालय शिखर सर केलं. पेसा कायद्याची सर्वप्रथम अंमलबजावणी महाराष्ट्रात आदिवासी विभागात झाली. 5% सबंध निधी ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिक कामांसाठी मिळू लागला. इंग्लिश माध्यमाच्या नामांकित शाळेत जवळजवळ 55000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, ज्याचं शुल्क आदिवासी विकास विभागाने भरलं. विद्यार्थ्यांना गरमगरम जेवण मिळावं, म्हणून सेंट्रल किचन निर्माण केलं. भ्रष्टाचार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी डी.बी.टी. योजना आणून पैसे थेट बँक खात्यात जमा करण्याची व्वस्था केली. पालघर जिल्ह्यातीलच नव्हे, तर प्रत्येक आदिवासी मतदारसंघामध्ये दळणवळण सुलभ व्हावं म्हणून रस्त्यांचं जाळं निर्माण केलं. मोठ्या पुलांची मंजुरी घेतली. केंद्राच्या मदतीने राज्यमार्ग निर्माण केले.

 

1994मध्ये, केवळ आठ महिने कालावधी मिळाला असतानाही आदिवासी आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालय निर्माण करण्यात यश आलं. तसंच शबरी आदिवासी विकास महामंडळ स्थापन केलं. मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी सल्लामसलत करून मार्गदर्शन घेऊन आदिवासी विकास विभागाचा गाडा रुळावर आणला. धनगर आरक्षण असो अथवा बोगस आदिवासी प्रकरणं, कोणत्याही बाबतीत त्यांनी आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. आपल्या मतावर ठाम राहिले. एखादा राजकारणी उच्चपदावर असल्यावर आपली तत्त्व बदलतो, पण दादा त्याला अपवाद होते, त्यामुळेच ते एवढा प्रदीर्घ काळ यशस्वीपणे निभावू शकले.

 

सामान्यांतून असामान्य माणसं तयार होत असतात, परंतु असामान्य होऊन सामान्यांसारखं राहावं, वागावं ते टिकवणं हे श्रेष्ठत्वाचं लक्षण दादांनी जीवनभर आचरणात आणलं.

 

दादांच्या जीवनातील हे विविध पैलू उलगडताना आपल्याला त्यांची अनेक स्वभाववैविशिष्ट्यं दिङ्मूढ करतात दिशा दाखवतात. पहाडाएवढी कामं करूनसुद्धा त्यांची जाहिरात करणारा राजकारणी विरळाच. टीकाकारसुद्धा कालांतराने त्यांचे प्रशंसक होऊन जात असत.

 

अशा शांत, संयमी, सोज्ज्वळ, सालस, सौंदर्यपूर्ण वागणारा लोकनेता माझे वडील म्हणून आणि राजकीय गुरू म्हणून अतिशय श्रेष्ठ होते, यात शंका नाही.

 

त्यांना कोटी कोटी भावसुमनांजली!!!