संभाजीनगर येथे राष्ट्र सेविका समितीचा विजयादशमी उत्सव संपन्न

विवेक मराठी    18-Oct-2021
Total Views |

RSS_1  H x W: 0
 
"स्त्री शक्ती हीच भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा आधार" - डॉ. अश्विनी यार्दी
 
"आपला भारत देश विविध संस्कृतींनी नटलेला असून पाश्चात्त्यांनी कितीही आक्रमणे केली, तरी ती नष्ट होऊ शकत नाही, कारण स्त्री शक्ती भारतीय संस्कृतीचा आधार आहे. १९३६ साली स्थापन झालेल्या राष्ट्र सेविका समितीच्या संपूर्ण देशभर चालणार्‍या नित्यनियमित शाखांद्वारा मुलींच्या शारीरिक व बौद्धिक विकासाचे काम अविरत चालू आहे, ज्यामुळे संस्कृतिरक्षणास बळकटी मिळाली" असे डॉ. अश्विनी यार्दी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. या वेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून शुभदा पुरंदरे व संभाजीनगर शहर कार्यवाहिका स्वाती जहागीरदार उपस्थित होत्या.
 
 
दीपप्रज्वलनाने व शस्त्रपूजनाने उत्सवाची सुरुवात झाली. संध्या पाटील यांनी उत्सवाचे प्रास्ताविक केले. दीपप्रज्वलनानंतर सेविकांनी योगचापाची, दंड योगाची आणि गणसमताची प्रात्यक्षिके सादर केली. पद्मश्री केंडे यांनी सदर प्रात्यक्षिकांचे निवेदन केले. सुलभा नांदेडकर यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय करून दिला व गार्गी नांदेडकरने वैयक्तिक गीत सादर केले. संभाजीनगर शहर कार्यवाहिका स्वाती जहागीरदार यांच्या आभारप्रदर्शनानंतर संपूर्ण वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.
 
 
 
उत्सवास मेधाताई देशपांडे, शोभाताई पांडव, उज्ज्वलाताई हट्टेकर, छायाताई देशपांडे, मीनाताई जोशी यांच्यासह मोठ्या संख्येत सेविका उपस्थित होत्या.