सुहृदांच्या साथीने ध्येयपूर्तीचा आनंदसोहळा

विवेक मराठी    04-Oct-2021
Total Views |

RSS_1  H x W: 0


आपले स्वीकृत कार्य सतत डोळ्यांसमोर असले की, शारीरिक मर्यादा सांभाळूनही आपण चांगले काम करू शकतो, हा अनेकांचा अनुभव आहे. सा. विवेकने ‘संघमंत्राचे उद्गाते डॉ. हेडगेवार’ हा विशेषांक प्रकाशित करणार असल्याचे जाहीर केले आणि त्याच वेळी निश्चय केला की 1000 अंकांची नोंदणी करावी. केवळ मनात आणून थांबलो नाही, तर कार्यक्षेत्राबाहेरही संपर्क करून 1250 अंकांची नोंदणी केली. यापूर्वीसुद्धा सा. विवेकने राबवलेल्या अनेक उपक्रमांमध्ये भरभरून यश मिळवता आले, याचा आनंद वाटतो.
दि. 21 सप्टेंबरला माझे सासरे नागोरावजी गवळी, (माजी संघप्रचारक अमडापूर ता. चिखली, जि. बुलढाणा) वैद्यकीय उपचार आटोपून बुलढाणा येथील माझ्या घरी आले. डोळ्यांची तपासणी करण्याची इच्छा व्यक्त केली. गेली 15 वर्षे ते अर्धांगवायूने आजारी आहेत. त्यांना उभेही राहता येत नाही. मी येथील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. सुभाषजी जोशी यांना फोन केला व त्यांची अडचण सांगितली. दवाखान्यात आणून तपासणी करणे अडचणीचे आहे, हे समजून घेऊन त्यांनी माझ्या घरी येऊन तपासणी करतो असे सांगितले.


RSS_2  H x W: 0
एवढ्या सर्व व्यापातून डॉ. आपल्या घरी येणार म्हणून मी निवडक संघकार्यकर्त्यांनाही आपण यावे अशी विनंती केली. नियोजित वेळी मी दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना घरी आणले. डॉक्टरांनी नागोराव यांच्या डोळ्यांची तपासणी केल्यानंतर त्यांनी आपल्या आठवणी सांगितल्या. या कौटुंबिक कार्यक्रमात प्रा. विजयराव जोशी, (अध्यक्ष, संस्कृत भारती, बुलढाणा) यांनी नागोराव गवळींना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला, तर रामभाऊ शिंदे यांनी डॉ. सुभाषजी जोशी यांना ‘संघमंत्राचे उद्गाते डॉ. हेडगेवार’ हा विशेषांक देऊन त्यांचा सत्कार केला.
या कार्यक्रमाला बुलढाणा विभाग संघचालक मा. चित्तरंजनजी राठी, माजी नगर संघचालक बाळासाहेब देशपांडे, प्रा. विजयराव जोशी, पत्नी मंगला, मुलगी डॉ. प्रज्ञा, तसेच गवळी परिवारातील महेंद्र गवळी, गंगा गवळी, प्राची गवळी उपस्थित होते.