हायटेक बँकिंगसाठी ‘फिनॅकस’ची साथ

विवेक मराठी    05-Oct-2021
Total Views |
आधुनिक बँकिंग क्षेत्रात तंत्रज्ञानावर आधारित सेवांना अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. बँकिंग क्षेत्रासाठी अशी सेवा उत्पादने तयार करण्यात फिनॅकस सोल्युशन्स प्रा.लि. ही संस्था आघाडीवर आहे. एकूणच बँकिंग क्षेत्रात होत चाललेले बदल आणि त्यानुसार फिनॅकस तयार करत असलेली उत्पादने याविषयी फिनॅकसचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भूषण कोंडुरकर यांच्याशी साधलेला हा संवाद.

Finacus_1  H x

फिनॅकसची सुरुवात कधी आणि कशी झाली?

2007मध्ये तंत्रज्ञानाची रचना आणि त्याआधारित सेवांचा विकास याद्वारे फिनॅकस सोल्युशन्स प्रा.लि.च्या प्रवासाला सुरुवात झाली. सुरुवातीला आम्ही मोबाइल बँकिंग आणि डिजिटल पेमेंट यासाठीच्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित केले. त्या वेळी इतर स्पर्धक कंपन्या कोअर बँकिंगवर लक्ष केंद्रित करत होत्या. बहुराष्ट्रीय कंपन्या या स्पर्धेत उतरलेल्या असल्याने नव्या कंपन्यांना त्यात स्थान नव्हते. त्यामुळे आम्हाला या क्षेत्रात आमचे वेगळे स्थान निर्माण करण्याशिवाय पर्याय नव्हता. आम्ही आमच्या ग्राहक बँकांना आघाडीच्या राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या तुलनेत किफायतशीर आणि सर्व पर्याय उपलब्ध करून देत होतो. 2012मध्ये IMPS (Immediate Payment Service) आल्याने आर्थिक व्यवहारांचे स्वरूप बदलून गेले. खचझडने पूर्ण क्षमतेच्या मोबाइल बँकिंग सेवेची पायाभरणी केली. त्यानंतर स्मार्ट फोन वापरणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे मोबाइल बँकिंग आणि डिजिटल पेमेंट सेवांमध्ये गुंतवणूक करण्याचे आमचे धोरण योग्यच ठरले.
 
फिनॅकस बँकांना लागणारे सॉफ्टवेअर पुरवते. या क्षेत्रासाठी कोणत्या प्रकारच्या सॉफ्टवेअरची गरज असते?

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँकांना कोअर बँकिंग आणि आर्थिक गैरव्यवहाराला प्रतिबंध करणारी व्यवस्था राबवणे बंधनकारक असते. म्हणजे बँकांसाठी काही सॉफ्टवेअर अनिवार्य असतात, तर काही अधिक चांगल्या ग्राहकसेवेसाठी, कामाची गती वाढवण्यासाठी, नियंत्रणासाठी आणि पारदर्शकता राखण्यासाठी स्वीकारली जातात. डिजिटल बँकिंग सोल्युशन्स हा आधुनिक बँकिंगमधील अविभाज्य भाग बनला आहे आणि अन्य बँकांबरोबरच्या स्पर्धेत आघाडीवर राहण्यास बँकांना उपयोगी ठरतात.


Finacus_1  H x


फिनॅकसची वैशिष्ट्ये काय सांगता येतील?

बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील संस्थांसाठी कस्टमाइज्ड आणि मूल्यवर्धित सेवा उपलब्ध करून देणे हे फिनॅकसचे वैशिष्ट्य आहे. बँकिंग आणि वित्तपुरवठा क्षेत्रातील संकल्पना, विकास आणि साहाय्यभूत उपाययोजनांवर वर्षानुवर्षे काम करणार्‍या प्रवर्तकांच्या नेतृत्वाखाली फिनॅकसचे काम चालते. बँकेच्या सर्व गरजा एका छताखाली पूर्ण करू शकतील अशी सर्वसमावेशक बँकिंग सेवांची उत्पादने तयार करून देण्याची क्षमता आमच्यात आहे. आमच्याकडे उत्पादनांची गुणवत्ता आहे आणि आमच्या ग्राहक बँकांना सर्वप्रथम चांगली सेवा पुरवण्यासाठी आम्ही सातत्याने संशोधन करत असतो.
 
 
आतापर्यंत तुम्ही किती आर्थिक संस्थांना सेवा पुरवली आहे? त्यापैकी काही नामांकित संस्थांची नावे सांगता येतील का?

भारतातील आणि परदेशातील बँकिंग आणि वित्तपुरवठा क्षेत्रातील दीडशेहून अधिक प्रस्थापित नामांकित संस्थांबरोबर फिनॅकस काम करत आहे. खासगी क्षेत्र, राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि नागरी सहकारी बँका अशा सर्वच क्षेत्रांत आमचे ग्राहक आहेत.


Finacus_2  H x

तुम्ही परदेशातही सेवा देता. त्याची सुरुवात कशी झाली आणि किती देशांमध्ये तुमची सॉफ्टवेअर्स वापरली जातात?
 
2012पासून आम्ही आफ्रिकेत पार्टनर नेटवर्क विस्तारण्यास सुरुवात केली, ज्यामुळे अन्य देशांतही आम्हाला चांगले यश मिळाले आणि जागतिक पातळीवर आम्ही लॅटिन अमेरिकी देशांत, आफ्रिकी देशांत आणि भूतानमध्ये काम करत आहोत. भारतातील लक्षणीय कामगिरीबरोबरच फिनॅकस मेक्सिको, कोलंबिया, बोलिव्हिया, पॅराग्वे, नायजेरिया, दक्षिण सुदान, इथियोपिया, द. आफ्रिका आणि भूतान या देशांतही सेवा देत आहे.
 
संपर्क
फिनॅकस सोल्युशन्स प्रा.लि.

8291936871

 
  
कंपनीची सर्वात मोठी कामगिरी कोणती?
 
आमच्या या प्रवासात अनेक चढ-उतार आले. पण यात आमच्या एका कामगिरीचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. ज्या वेळी BBPS (भारतीय बिल पेमेंट सर्व्हिस), IMPS (इमिजिएट पेमेंट सर्व्हिस), UPI आणि अन्य डिजिटल चॅनल्स सुरू करण्यात आली, त्या वेळी आम्ही आमच्या भागीदार बँकांना TSP सहभागी म्हणून सोबत घेऊ शकलो.
 
आधुनिक तंत्रसुसज्ज बँका ही आता काळाची गरज आहे. मोठमोठ्या बँका पूर्णपणे डिजिटल झाल्या आहेत. छोट्या बँका आणि पतसंस्था यांच्या बाबतीत काय परिस्थिती आहे?
 
तंत्रज्ञानाचा स्वीकार ही काळाची गरज आणि यशाचा मंत्र आहे. छोट्या बँकांना/वित्तसंस्थांना (NBFCना) पारंपरिक मार्गांनी नव्या ग्राहकांना आकर्षित करता येणार नाही. नवीन पिढीला तंत्रज्ञानाधारित सुविधा हव्या आहेत. तंत्रज्ञान स्वीकारताना त्यासाठी कुशल मनुष्यबळाचीही गरज असते.
 
पण आधुनिक तंत्रज्ञानासाठी होणारा खर्च हे मोठे आव्हान आहे. SAAS (Software as a Sevice)चा जितका वापर, त्यानुसार त्याचे पैसे देता येतात. फिनॅकस अशा प्रकारची सुविधा बँकांना आधीपासूनच देत आहे. जर तंत्रज्ञान स्वीकारले नाही, तर अधिक मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागेल.


Finacus_4  H x
 
भविष्यातील बँकिंग तंत्रज्ञानासाठी फिनॅकस कशा प्रकारे तयारी करत आहे?
 
आम्ही 14 वर्षे या क्षेत्रात कार्यरत असून वाजवी दरात वर्षाचे 365 दिवस 24x7 SAASची सुविधा पुरवतो. 2-3 शाखा असलेल्या छोट्या बँकांपासून ते 300पेक्षा जास्त शाखा असलेल्या मध्यम आकाराच्या बँकांपर्यंत सर्व जण आमच्या या सेवांचा लाभ घेत आहेत. अखंड विस्तार, विश्वासार्ह सेवेची शाश्वती, आंतरराष्ट्रीय दर्जाची कामगिरी आणि सुरक्षेचा दृष्टीकोन ही आमची ओळख आहे. भारतीय आणि परदेशी बँकांसाठी अत्याधुनिक उत्पादने विकसित करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. सध्या बहुतांश बँकांनी कोअर बँकिंगचा वापर सुरू केला आहे. त्यांना डिजिटल पेमेंट आणि कार्ड, यूपीआय, बीबीपीएस मोबाइल बँकिंग यांसारख्या उत्पादनांचा (सेवांचा) लाभ मिळवून द्यावा, या सेवा त्यांना अ‍ॅपेक्स मॉडेलप्रमाणे किंवा परवाना पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात असा आमचा प्रयत्न आहे. बँकिंग व्यवहारांच्या सुरक्षा पालनाच्या यशावर डिजिटल सेवांचे यश अवलंबून असते. आम्ही डिजिटल व्यवहारांवर अधिकाधिक भर देत आहोत.
 
सध्या तंत्रज्ञानाचे युग आहे, हे लक्षात घेऊन फिनॅकसही नावीन्यपूर्ण उत्पादनांच्या बाबतीत तेच पाऊल उचलत आहे. चॅटबोट्स, व्हिडिओ केवायसी आणि व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग यांसारख्या सेवा पुरवून बँकांना आणि वित्तपुरवठा संस्थांना सातत्याने नवीन गोष्टी करण्यासाठी मदत करणे इतकेच आमचे काम नाही. त्याचबरोबर ‘डिजिटल फर्स्ट’ हा दृष्टीकोन ठेवत त्यांच्या आधीच्या सॉफ्टवेअरच्या पूर्ण जोडणीला धक्का न लावता त्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी आम्ही बँकांना मदत करतो.
 

Finacus_3  H x  
 
यामुळे या आर्थिक संस्था लवचीक, गतिमान आणि अधिकाधिक ग्राहकाभिमुख होतात. या क्षेत्रातील ताज्या बदलांना स्वत:होऊन सामोरे जाण्याची क्षमता त्यांच्यात येते. फिनॅकसने बँकांसाठी आणि वित्तपुरवठा संस्थांसाठी वेगवेगळ्या स्वरूपाच्या मूल्यवर्धित संगणकीय प्रणाली (Software systems) विकसित करून दिल्या आहेत.
 
फिनॅकसची भविष्यातील उद्दिष्टे काय आहेत?
 
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI ने) आणलेली सर्व नवीन उत्पादने आम्ही उपलब्ध करून देतो. एसएमई बँकांच्या नवीन गरजांसाठी तांत्रिक सल्ला देतो. डोमॅस्टिक मनी ट्रान्स्फर आणि प्रीपेड कार्ड यासारख्या नावीन्यपूर्ण सुविधांच्या नव्या क्षेत्रांतही आम्ही काम करत आहोत. मार्केटमध्ये अनेक नावीन्यपूर्ण सुविधा आहेत आणि येत आहेत, हे लक्षात घेऊन आम्ही या कामात वेग ठेवला आहे. अधिकाधिक नावीन्यपूर्ण सेवा तयार करण्याच्या कामी समर्पित अशी आमची प्रयोगशाळा आहे. आमच्या चालू उपक्रमांवर गुंतवणूक करतानाच आम्हाला इतर देशातही UPI सारखी पेमेंट चॅनेल्स आधारित नावीन्यपूर्ण पेमेंट सेवा सुरू करायची आहे.
आगामी काळात आम्ही स्वत:ला सेवा पुरवठादार म्हणून पाहत आहोत. बँका, अन्य वित्तपुरवठा संस्था आणि फिनटेक यांच्यासाठी तांत्रिक सेवा पुरवण्यात आम्ही महत्त्वाची भूमिका बजावू.
 
 
मुलाखत : प्रतिनिधी