उत्तम आरोग्यासाठी फिजिओथेरपी

विवेक मराठी    07-Oct-2021
Total Views |
@डॉ. श्वेता प्रकाश पाचपुते
फिजिओथेरपी उपचारपद्धतीचा वापर करून सर्व अवयवांची कार्यक्षमता वाढविण्यास मदत मिळते. कोविड झालेल्या रुग्णांनाही कोविडनंतरची फिजिओथेरपी उपचारपद्धती लाभदायक ठरली आहे व थकज या जागतिक संस्थेनेही या उपचारपद्धतीला संमती दर्शविली आहे.

Physiotherapy_1 &nbs

आजच्या धावपळीच्या युगामध्ये मानव हा एका यंत्राप्रमाणे काम करू लागला आहे. मानवाच्या शरीरावर त्याचे अनेक दुष्परिणाम झाले आहेत. यासाठीच माणूस डॉक्टरांकडे सतत धाव घेऊन अनेक घातक अशा औषधांचे सेवन करतो. बरेचसे असे आजार आहेत, जे औषधाविनासुद्धा बरे होऊ शकतात आणि त्यासाठी फिजिओथेरपी ही आधुनिक उपचारपद्धत खूप फायदेशीर आहे. ही उपचारपद्घत दिवसेंदिवस प्रसिद्ध होत आहे.

आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिजिओथेरपिस्ट वेगवेगळ्या उपचारपद्धतींचा वापर करतात. यात प्रामुख्याने व्यायाम आणि इलेक्ट्रिक उपकरणे यांचा समावेश असतो. स्नायूंना आराम अथवा उत्तेजना मिळण्यासाठी, चालना मिळण्यासाठी, जखमा बर्‍या होण्यासाठी किंवा दुखणे कमी होण्यासाठी इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर केला जातो. यात अल्ट्रासाउंड थेरपी, डायथर्मी, टेन्स, आय.एफ.टी., लेझर, इन्फ्रारेड ही प्रामुख्याने दुखणे कमी करण्याची उपकरणे आहेत आणि त्याचबरोबर त्या भागाला लवकर बरे होण्यास मदत करतात. ही उपचारपद्धती स्नायूंची ताठरता कमी करण्यास मदत करते. विविध चेतना नसलेल्या स्नायूंना पुन्हा हालचाल करण्यास आणि त्यांची कार्यक्षमता राखण्यास मदत करते.

वयोमानाने आणि योग्य व्यायामाच्या अभावी स्नायू ताठरतात आणि त्यांची कार्यक्षमता कमी होते. लवचीकता राखण्यासाठी आणि स्नायूंची ताकद वाढविण्यासाठी फिजिओथेरपी उपचार खूप फायदेशीर ठरतात.
 
पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, सांध्याचे विकार, स्नायुदुखी, संधिवात, खांदेदुखी, सायटिका, फ्रॅक्चरसंबंधित विकार, शस्त्रक्रियेनंतरचे व्यायाम, पॅरालिसिस, पोलिओ, पार्किन्सोनिझम, सेरेब्रल पाल्सी, चेहर्‍याचा पॅरालिसिस, पोस्ट कोविड उपचार या सर्व आजारांवर फिजिओथेरपी खूप फायदेशीर ठरते. फिजिओथेरपी उपचारपद्धतीचा वापर करून सर्व अवयवांची कार्यक्षमता वाढविण्यास मदत मिळते. व्यायामामुळे मेंदूला उत्तम चालना मिळते, हृदयाची आणि फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते, शरीरात रक्ताभिसरण वाढते, थकवा जाणवत नाही, स्नायू, हाडे आणि सांधे यांचे आरोग्य, ताकद, लवचीकता आणि चपळता उत्तम राहते. कोविड झालेल्या रुग्णांनाही कोविडनंतरची फिजिओथेरपी उपचारपद्धती लाभदायक ठरली आहे व थकज या जागतिक संस्थेनेही या उपचारपद्धतीला संमती दर्शविली आहे.



फिजिओथेरपी सेवा

श्री. फकीरभाई पानसरे एज्युकेशन फाउंडेशनचे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, निगडी, प्राधिकरण येथे इझढह (बीपीटीएच - बॅचलर ऑफ फिजिओथेरपी) या साडेचार वर्षांच्या शैक्षणिक कोर्सबरोबरच, समाजाचे ॠण फेडण्यासाठी नाममात्र शुल्क दरात उत्तम फिजिओथेरपी सेवा पुरविल्या जातात.
 
येथे गुडघेदुखी, पाठदुखी, मानदुखी, संधिवात, शरीरातील विविध स्नायूंचे दुखणे, वयोमानानुसार उद्भवणारे विविध शारीरिक त्रास व दुखणी, एखाद्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर हाडांना व स्नायूंना बळकट करणे व त्यांची स्थिती पूर्ववत करणे, अस्थिभंगानंतर हाडे पुन्हा मजबूत करणे, पाठीच्या मणकाचे आजार, अर्धांगवायू/पॅरालिसीस, मेंदूचे विकार/आजार, लहान बाळांना जन्मत: उद्भवणारे मेंदूचे आजार, दम्याचा त्रास, श्वसनाचे विकार, हृदयाशी संबंधित विकार व त्यासाठी केल्या जाणार्‍या शस्त्रक्रियेनंतर आवश्यक असणारा फिटनेस प्राप्त करणे, कोविडनंतर संपूर्ण शरीरात आलेली कमजोरी कमी करणे, वजन कमी करणे, वृद्धापकाळातही शरीराचा फिटनेस व ताकद कायम ठेवणे इत्यादी सर्वांकरीता अत्यल्प दरात फिजिओथेरपीचे इलाज व सेवा पुरविल्या जातात.
 

ज्येष्ठ नागरिकांचे, तसेच समाजातील इतर सर्वच घटकांचे, सगळ्यांचेच येथे अतिशय उत्तमरित्या व मनापासून इलाज केले जातात. दि. 8 ऑक्टोबर 2021 रोजी ‘वर्ल्ड अर्थ्ररायटिस (संधिवात) डे’निमित्त येथे फिजिओथेरपी सेवेचे मोफत शिबिर आयोजित केले जाईल.
 प्रशिक्षित फिजिओथेरपिस्टद्वारे फिजिओथेरपी घेणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रामध्ये विविध फिजिओथेरपी महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये स्वर्गीय फकीरभाई पानसरे एज्युकेशन फाउंडेशनचे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, निगडी, पुणे ही संस्थादेखील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाच्या नियमावलीनुसार फिजिओथेरपी बीपीटीएच हा साडेचार वर्षांचा अभ्यासक्रम शिकविला जातो. तसेच रुग्णांच्या उपचारासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. दर वर्षी सप्टेंबर महिन्यात या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू होते.

 
या लेखाच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करते की जास्तीत जास्त रुग्णांनी फिजिओथेरपी या उपचारांचा फायदा घ्यावा.!


डॉ. श्वेता प्रकाश पाचपुते
(प्रोफेसर, एमएसकेपीटी)
एलएसएफपीईफ कॉलेज ऑफ फिजिओथेरपी,
निगडी, पुणे
9561103855


पत्ता

श्री फकीरभाई पानसरे एज्युकेशन फाउंडेशन कॉलेज ऑफ फिजिओथेरपी,
कीर्ती विद्यालय, सिंधुनगर, प्राधिकरण, निगडी, पुणे - 411044
संपर्क - 9561103855