विश्व हिंदू परिषदेतर्फे प्रवरा संगम येथे दशक्रिया विधी मंडपाचे लोकार्पण

विवेक मराठी    09-Oct-2021
Total Views |

vhp_1  H x W: 0

प्रवरा संगम येथील गंगेचे ठिकाण नाशिकएवढेच श्रेष्ठ आहे, कारण मारीच राक्षसाला मारण्यासाठी प्रभू रामचंद्र प्रवरा संगम येथे आले होते. अशा या पवित्र ठिकाणी हिंदू धर्मात महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या दशक्रिया विधीसाठी विहिंप देवगिरी प्रांत अध्यक्ष संजयआप्पा बारगजे यांनी त्यांच्या मातोश्री स्व. लीलाबाई प्रल्हादराव बारगजे यांच्या स्मरणार्थ, सर्व सोयींनी युक्त दशक्रिया विधी मंडप उभारला असून, दि. 1 ऑक्टोबर 2021 रोजी देवगड संस्थानचे पू. ह.भ.प. भास्कर गिरी महाराज, विहिंप क्षेत्रीय मंत्री शंकरजी गायकर, विहिंप प्रांत मंत्री अनंतजी पांडे, विहिंप प्रांत अध्यक्ष संजयआप्पा बारगजे यांच्या व विविध संत-महंताच्या उपस्थितीत विधिवत पूजन होऊन या दशक्रिया विधी मंडपाचा लोकार्पण सोहळा पार पडला.

लोकार्पण सोहळ्यानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमात व्यासपीठावरील प.पू. गुरुवर्य महंत भास्कर गिरीजी महाराज (श्रीक्षेत्र देवगड), प.पू. महंत कैलास गिरीजी महाराज (श्रीक्षेत्र सावखेडा), प.पू. महंत विशद्धानंद गिरीजी महाराज (वाघोळा आश्रम), प.पू. देवानंद गिरीजी महाराज (वज्रेश्वरी आश्रम, वज्रेश्वरी), प.पू. नारायण महाराज (सावखेडा), प.पू. दादा महाराज वायसळ (रामकृष्ण भक्तिधाम), प.पू. अरुण महाराज पिंपळे, संभाजीनगर (राष्ट्रीय वारकरी परिषद), प.पू. विजय महाराज खेडकर (लिंबे जळगाव), प.पू. ससे महाराज (जळका), प.पू. बाबासाहेब महाराज जाधव (प्रवरा संगम), प.पू. किशोर महाराज निकम (शेंदूरवादा), वे.शा.सं. काटकर गुरुजी व ब्रह्मवृंद पू. संत-महंतांनी या कार्याला आशीर्वाद दिले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रल्हादराव बारगजे व श्रीधरराव जिंतूरकर या ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला विहिंप क्षेत्रीय संघटन मंत्री श्रीरंगजी राजे, प्रांत सहमंत्री रामदासजी लहाबर, प्रांत प्रचारप्रसिद्धी प्रमुख राजीव जहागीरदार, काशिनाथ दाबके, सुभाष कुमावत, भाऊ सुरडकर यांसह क्षेत्रावरील अत्रे गुरुजींसह बृह्मवृंद व गावातील सरपंच, लोकप्रतिनिधी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजयआप्पा बारगजे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व ह.भ.प. जनार्दन मेटे यांनी सूत्रसंचालन केले. प्रवरा संगम येथील स्थानाचे महत्त्व सांगताना मेटे महाराजांनी “वाराणशी चालीजे मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाउले पर्यसा, ऐसा ठसा नामाचा’ - थोडक्यात, प्रवरा संगम येथील गोदावरीवरील एक दिवसाचे पुण्यकर्म आणि वाराणसी येथील एक महिन्याचे पुण्यकर्म याची फलप्राप्ती सारखीच आहे” असे सांगितले.