‘शिवसृष्टी’ नाही, ‘संस्कारसृष्टी’!

विवेक मराठी    29-Nov-2021
Total Views |
babasaheb_3  H
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘शिवसृष्टी’च्या रूपात छत्रपती शिवाजी महाराजांचे वैश्विक स्मारक साकारण्याचे स्वप्न पूर्ण होताना त्यांना पाहता आले नाही. मात्र अनेक शिवप्रेमींच्या योगदानाने त्यांचे हे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात साकारेल. या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाविषयी अधिक माहिती देणारी पाक्षिक मालिका या लेखाने सुरू करत आहोत.
‘शिवसृष्टी’ हे श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेेंचे अपुरे राहिलेले स्वप्न! आता ते पूर्ण करण्याची जबाबदारी तमाम शिवप्रेमींवर आहे.
 
 
1974च्या अस्थायी ‘शिवसृष्टी’नंतर स्थायी/कायमस्वरूपी ‘शिवसृष्टी’ उभारण्याची तयारी सुरू झाली. त्यासाठी प्रमुख माध्यम होते ‘जाणता राजा’ या महानाट्याचे उत्पन्न. नाटकासारख्या एका क्षणभंगुर माध्यमातून आपल्या महानायकाचे - म्हणजेच शिवाजी महाराजांचे कायमस्वरूपी स्मारक उभारण्याची ही सर्वात अभिनव कल्पना! असे जगात आणखी कुठे झाले आहे किंवा होते आहे असे माझ्या माहितीत नाही. ‘जाणता राजा’च्या उत्पन्नातून प्रकल्पातील ‘सरकारवाड्याचे’ व इतर पायाभूत सोयींचे कोट्यवधीच्या रकमेचे काम पूर्ण झाले आहे. नाट्यसृष्टीतील हा एक आगळावेगळा विक्रमच आहे.
 
 
बाबासाहेबांचे अखंड ‘शिवचिंतन’, ‘शिवजागरण’ व जगभरातल्या अनेक ठिकाणांचे भ्रमण यातून ‘शिवसृष्टी’ची कल्पना परिपक्व होत गेली आहे. महाराष्ट्रातील अनेक शिवप्रेमी, इतिहास अभ्यासक, कलाकार, वास्तुरचनाकार, अभियंते यांच्या सूचनांचाही त्यात अंतर्भाव आहे. एका परीने हा असंख्य शिवप्रेमींचा प्रकल्प आहे. त्यामुळे ‘डिस्नेलँडच्या धर्तीचा, पण अस्सल देशी वाणाचा प्रकल्प’ असे मी याचे वर्णन करेन.
 

babasaheb_1  H
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘स्वराज्य’निर्मितीचे आणि त्याचे ‘सुराज्य’ करण्याच्या यथार्थ खटपटीचे 70 एम.एम. दर्शन या प्रकल्पातून जगाला घडेल, यात काही शंका नाही.
 
 
सन 1980मध्ये भारताच्या माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 300व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर आल्या होत्या. प्रथेप्रमाणे त्यांनी शिवाजी महाराजांवर भाषणही केले, शिवाजी महाराजांचा यथोचित गौरवही केला. तथापि त्या भाषणामध्ये त्यांनी जी दोन वाक्ये उच्चारली, ती आपण सर्वांनी - विशेषत: मराठी शिवप्रेमींनी लक्षात ठेवावी अशीच आहेत, ती अशी - “शिवाजी महाराज को मराठी बोलना या उनको हिंदू बोलना यह उनको छोटा बनाना है। वह विश्वनायक थे।”
शिवाजी महाराजांचे असे वैश्विक/विराट रूप दाखवणे हे एक प्रमुख उद्दिष्ट आहे ते त्यामुळेच. ‘वैश्विक’ किंवा ‘विराट’लाच आज ॠश्रेलरश्र म्हणतात. मराठी माणसांच्या सोयीसाठी ॠश्रेलरश्र हेच अधिक उपयुक्त. असो. अर्थात, अशा कामांसाठी व्यापक पूर्वतयारी लागते, सुमारे 20 वर्षांपूर्वीच बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्याची सुरुवात झाली. 2000 सालाच्या जानेवारी महिन्यात आंबेगाव (बु.) येथील 21 एकरांची सदर जागा ताब्यात आली. त्यानंतरच इतर अनेक कामांना वेग आला. त्याविषयी पुढील लेखामध्ये.
 

babasaheb_2  H
 

शिवसृष्टी प्रकल्पासाठी निधी देऊ इच्छिणार्‍यांसाठी
बँकेचे तपशील
Maharaja Shivchatrapati Pratisthan Trust
State Bank Of India
Branch :- Ambegaon
· A/C. No: 40355723518 · IFSC Code: SBIN0011648
1) 80 G AAATM5937EF20214
2) 12A AAATM5937EE20214
3) CSR :- CSR00009176
 

पत्ता
महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान (ट्रस्ट)
‘शिवसृष्टी’ स.नं. 13, आंबेगाव (बु.), कात्रज बाह्यवळण रस्ता, ता. हवेली, जि. पुणे - 411046