भरकटलेली दिशा

विवेक मराठी    20-Feb-2021
Total Views |

@वरदा मराठे

दिशा रवीचे वय हा केवळ एक दाखविण्याचा मुद्दा आहे, पण तिच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या चौकशीमधून एक मोठे देशविरोधी षड्यंत्र आणि डाव्यांची खरी विघटनकारक विचारधारा पुन्हा एकदा सर्वांसमोर येईल, या भीतीने आज दिशा रवीला सोडविण्याचा आटापिटा चालला आहे. अशा वेळी सर्वांनीच स्वतःसाठी ठरवावे - आपण टूलकिटमधले एकटूलबनून राहणार की देशाच्या हितासाठी झटणारे सुजाण नागरिक?


disha_3  H x W:

गेल्या चार-पाच दिवसांपासून दिशा रवी हे नाव सर्व वृत्तवाहिन्यांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये केंद्रस्थानी येऊन बसले आहे. दिशा रवी ह्या एकवीस वर्षीय मुलीला बेंगळुरूमध्ये पोलिसांनी अटक केली आणि तेव्हापासून इतक्या लहान वयाच्या मुलीला अटक का केली? या आशयाचा सूर डाव्या विचारसरणीच्या लोकांनी आणि त्यांची री ओढत प्रसारमाध्यमांनी लावला. दिल्लीत गेले दोन महिने सुरू असलेले शेतकर्यांचे आंदोलन, त्या आंदोलनात शेतकर्यांच्या नावाखाली खलिस्तानी आणि फुटीरतावादी घटकांनी माजवलेले अराजक आणि दिशा रवी ह्यांचा परस्परसंबंध अनेक गोष्टींचा उलगडा करून देतो.

नव्याने पारित झालेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या काही महिन्यांपासून राजधानी दिल्लीमध्ये तथाकथित शेतकर्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनस्थळी पिझ्झा आणि बर्गर्समध्ये रमणार्या ह्या शेतकर्यांना सरकारने - कृषी मंत्रालयाने - अनेकदा चर्चेस बोलावले. प्रत्येक वेळी चर्चा करून आल्यावरआम्हाला चर्चा करायची नाही. आम्हाला फक्त कृषी कायदे मागे घेतले जायला हवे आहेतअशी प्रतिक्रिया किसान आंदोलनाच्या नेतृत्वाकडून येत राहिली. मला वाचल्याचे आठवते की प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करू असे कृषीमंत्र्यांनी म्हटल्यावर त्यासही शेतकरी नेतृत्वाने नकार दिला. परिणामतः ज्यांना चर्चा करता फक्त स्वतःचाच अजेंडा पुढे चालवायचा आहे, अशा आंदोलनकर्त्यांना सामान्य नागरिकांचा पाठिंबा मिळणे कमी होत गेले. असे असतानाच 26 जानेवारीला - प्रजासत्ताक दिनी शेतकर्यांच्याट्रॅक्टर मार्चने हिंसक वळण घेतले. दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंग्याजवळ फडकावलेलानिशाण साहिबध्वज, मोर्चात दिसलेले खलिस्तानी झेंडे, कायदा सुव्यवस्था पाळण्यासाठी झटणार्या पोलिसांवर आंदोलनकर्त्यांनी केलेला हिंसक हल्ला यामुळे जनमानसात या किसान आंदोलनाबद्दलचा रोष वाढत चालला होता. त्यानंतर काहीच दिवसांनी प्रसिद्ध बार्बाडीयन अमेरिकन गायिका रिहाना हिने तिच्या ट्विटर पेजवरून शेतकर्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केले. त्यानंतर स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि पॉर्नस्टार मिया खलिफा ह्यांनीही किसान आंदोलकांच्या बाजूने ट्वीट केले. भारतातील कृषी कायदे, शेतकर्यांचे प्रश्न, इथली राजकीय आणि सामाजिक परिस्थिती ह्याचा गंधही नसताना लिहिल्या गेलेल्या या पोस्ट्सना तथाकथित लिबरल लोकांनी उचलून धरले. अचानक एक अमेरिकन गायिका, एक स्वयंघोषित बाल पर्यावरण तज्ज्ञ आणि एक पॉर्नस्टार कृषी आंदोलनाचे चेहरे बनले! ह्या संदर्भहीन ट्वीट्सची चर्चा देशभर होऊ लागली. ह्या ट्वीट्स शेतकर्यांबद्दल असलेल्या सहानुभूतीने लिहिल्या आहेत, असे काही जण म्हणू लागले, तर ते लिहिण्यासाठी अमाप पैसे ओतले गेले आहेत अशी भूमिका अनेकांनी घेतली. ‘ प्रिंटनावाच्या ऑनलाइन वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताप्रमाणे त्या ट्वीटसाठी रिहानाला 25 लाख डॉलर्स दिले गेले. ‘ प्रिंटच्या ह्या आरोपातील तथ्य शोधून काढण्याचे काम पोलीस करतीलच. पण गरीब शेतकर्यांच्या आंदोलनात इतके पैसे कुठून येतात, हा प्रश्न मात्र नक्कीच सर्वांसमोर उभा राहिला.

 
disha_1  H x W:

हे सर्व सुरू असतानाच अनवधानाने येते ग्रेटा थनबर्गचीटूलकिटट्वीट. टूलकिट म्हणजे असे डॉक्युमेंट, ज्यात आंदोलनाला समर्थन देणार्यांसाठी काय करायचे, कसे करायचे याची सविस्तर माहिती दिली आहे. टूलकिट पोस्ट झाल्यापासून काही मिनिटांतच ते डिलीट केले गेले. पण त्या टूलकिटचे डॉक्युमेंट तोपर्यंत अनेकांनी सेव्ह करून घेतले. जगभरातल्याइन्फ्लुएन्सर्सना आणि सेलिब्रिटीजना किसान आंदोलनाला कसा पाठिंबा देता येईल, शेतकर्यांच्या प्रश्नांना उत्तर देता संघ-भाजपाचेफॅसिस्टसरकार अदानी आणि अंबानींना कशी मदत करत आहेत, कृषी क्षेत्रात भांडवलशाही आणणार्या सरकारचा विरोध देशात आणि देशाबाहेर दूतावासांच्या समोर कसा करता येईल, सोशल मीडियामध्ये ह्या विषयावर कसे व्यक्त व्हावे, कुठले हॅशटॅग वापरावे हे सर्व ह्या टूलकिटमध्ये लिहिले होते. त्याचबरोबर भारतातूनचहाआणियोगयांना नष्ट करावे, असेही सूचकपणे लिहिले होते. चहाचा आणि योगाचा कृषी कायद्यांशी किंवा किसान आंदोलनाशी काय संबंध? संपूर्ण तपशील वाचताना हे स्पष्ट झाले की भारतात आणि भारताबाहेर राहणारे देशविरोधी घटक देशभरात अशांतता आणि अराजक माजविण्याचा प्रयत्न करीत होते. त्या टूलकिटमधून एक आंतरराष्ट्रीय षड्यंत्र उघडकीस आले. साहजिकच दिल्ली पोलिसांनी टूलकिटची नोंद घेत गुन्हा दाखल केला. तपास सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच ते टूलकिट बनवण्यामागे आणि ते ग्रेटा थनबर्गला पुरविण्यामागे हात असणार्या दिशा रवी ह्या 21 वर्षीय तरुणीला बेंगळुरूहून अटक करण्यात आली. दिशा रवीला अटक होताच तथाकथित पुरोगामी आणि डाव्या संघटनांनी समाजमाध्यमांतून निषेध नोंदवायला सुरुवात केली. निषेधाचे कारण काय, तर एका 21 वर्षाच्यालहानमुलीला हे विचारस्वातंत्र्यविरोधी सरकार एका सामाजिक विषयावर भाष्य केले म्हणून अटक करते आहे. ती मुलगी देशात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न करीत होती, याचा सर्व पुरोग्यामांना अशा वेळी सोयीस्करपणे विसर पडतो. ग्रेटासारख्या अठरा वर्षांच्या मुलीने मुद्द्याची पार्श्वभूमी जाणून घेता केलेल्या ट्वीटचा उदोउदो करणारे अचानक दिशा रवीच्या लहान वयाचे कारण देत तिच्या सुटकेची मागणी करतात! अठरा वर्षांची ग्रेटा ही अधिकाराने कुठल्याही विषयावर लिहिण्याइतपत मोठी आहे, पण एकवीस वर्षांची दिशा स्वतःच्या कृतीच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी लहान आहे, हे डाव्यांचे मोठे अजबच गणित आहे.

 

उठता-बसता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणारे, स्वत:ला संविधानाचे रक्षक म्हणविणारे जेव्हा संविधानाच्या मार्गाने घडणार्या कायदेशीर प्रक्रियेला दडपशाहीची उपमा देतात, तेव्हा त्यांच्यातील फोलपणा नव्याने जाणवू लागतो. देशात असंतोष पसरविण्याचा प्रयत्न करणार्यांवर चुकीची माहिती आणि अफवा पसरविणार्यांवर कारवाई केली की देशाला, देशातील व्यवस्थेला नाव ठेवू लागणारे ह्यांना कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार्यांची दडपशाही वाटणारच!disha_2  H x W: 

मुळात दिशा रवीसारखे अनेक युवक आणि युवती हे या डाव्या संघटनांचे लक्ष्य असतात. पण त्याआधीच, विद्यार्थी शाळेत असताना आपली प्रसारमाध्यमे, आपली शिक्षणव्यवस्था विद्यार्थ्यांना एका विशिष्ट पद्धतीने विचार करण्यासाठीच घडवत असते. प्रसारमाध्यमे आणि शिक्षण क्षेत्र, दोन्ही डाव्या आणि काँग्रेसी विचारधारेच्या लोकांच्या छत्रछायेखाली आहेत. त्यामुळे समाजवादी, मार्क्सवादी विचार कसे सर्वोत्तम हेच लहानपणापासूनच विद्यार्थ्यांवर बिंबवले जात असते. लहानपणी जरी त्यांना हे विचार नक्की काय हे कळले नाही, तरी त्यांची पाळेमुळे कुठेतरी रुजतातच. देशात जे काही चांगले घडले ते नेहरू आणि गांधींमुळे हे शाळेच्या पुस्तकांमधूनच शिकविले जाते, दूर कशाला जायला हवे. शालेय विद्यार्थ्यांची इतिहासाची पुस्तके ही तर डाव्यांची सुरुवातीपासूनचीटूलकिट्स’! हिंदी चित्रपटांतून सतत मार्मिकपणे हिंदू संस्कृतीला हास्यास्पद बनवून दाखविले जाते. चित्रपटांना सत्य मानून चालणारे युवक या देशात कमी नसल्यामुळे डाव्यांचे काम सोपे होऊन जाते. त्यामुळे विद्यार्थी कॉलेजमध्ये जाऊ लागतात, तोपर्यंत त्यांचंओरिएंटेशनझालेलेे असते. कॉलेजेसमध्ये स्वतःची वैचारिक ओळख लपवून डाव्यांचे अनेक गट काम करत असतात. विद्यार्थ्यांना सुरुवातीला जगण्याचे स्वातंत्र्य, स्त्री स्वातंत्र्य यांबद्दल पढवून धूम्रपान आणि मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन आणि इतर नको नको त्या गोष्टींची सवय लावली जाते. आणि तिथून खरी त्यांना भ्रमित करण्याची सुरुवात होते. या तरुणांना समाजवादी आणि मार्क्सवादी विचारधारा, मुक्त विचार, स्वातंत्र्य आणि क्रांती अशा विषयांनी भुरळ घालून त्यांना आपल्या पठडीत आणले जाते. त्यांना सुरुवातील साधे सोपे लेख वाचायला दिले जातात. फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम यासारख्या समाजमाध्यमांतून एका विशिष्ट विचारधारेच्या पोस्ट्स त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या जातात. वरवर बघता स्वातंत्र्य आणि क्रांती ह्या दोन्ही मुद्द्यांमध्ये चुकीचे काहीच नाही. परंतु स्वातंत्र्याची आपल्याला अभिप्रेत व्याख्या आणि डाव्यांची स्वातंत्र्याची व्याख्या ह्यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. ह्या विद्यार्थ्यांना आणि युवकांना हक्कांची जाणीव पुरेपूर करून दिली जाते, पण कर्तव्य कशाशी खातात हे त्यांच्या गावीही नसते. अभिव्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य ह्यांना संविधानाने घालून दिलेल्या काही मर्यादा असतात, ह्याची जाणीवही त्यांना नसते. देशविरोधात बोलली गेलेली वाक्य ही त्यांच्यालेखीकूलअसतात. आम्ही जात किंवा धर्म मानत नाही असे म्हणताना ही पुरोगामी मंडळी समाजात फूट पाडण्याचा, जातीय तेढ वाढविण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. आणि त्यांचेच बघून पुरोगाम्यांची नवी पिढी शिकते. अतिशयोक्ती वाटेल, पण इतर धर्मांतील कुप्रथांकडे दुर्लक्ष करत हिंदू धर्माच्या सणांचा अनादर करणे, हिंदूची अवहेलना करण्यातच धन्यता मानणे, हे सर्व पुरोगामी बनण्याचे मापदंड आहेत. ह्यातूनच डाव्या संघटना आपले मनुष्यबळ उभे करत असतात. विद्यार्थ्यांना भ्रमित करत असताना समांतरपणे त्यांचीस्क्रीनिंग प्रोसेससुरूच असते. असे विद्यार्थी जे आताकार्यकर्तेबनण्यासाठी तयार आहेत, त्यांना नवीन साहित्य पुरविले जाते. पर्यावरण, मानवी हक्क अशा विषयांबद्दल त्यांना जागृत केले जाते. परंतु वरकरणी छान वाटणार्या ह्या विषयांमध्ये लपलेला असतो डाव्यांचा विघटनकारक अजेंडा. त्यातूनच दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात दिल्या गेलेल्या भारतविरोधी घोषणा, सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध (पाकिस्तान, बांगला देश आणि अफगाणिस्तानमधल्या अल्पसंख्याकांच्या मानवी हक्कांची डाव्यांना तमा नाही), त्यातून उसळलेली दंगल, आत्ताचे शेतकरी आंदोलन आणि त्यानंतरची हिंसा - हे सर्वच एका मोठ्या कारस्थानातून घडवून आणले जाते आणि निव्वळ एक प्यादे म्हणून आपला उपयोग करून घेतला जात आहे, हे ह्या युवकांच्या लक्षातही येत नाही. हैदराबाद सेन्ट्रल युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारा रोहित वेमुला जेव्हा 'There are some bad waters in us' असे नैराश्याने भरलेल्या पत्रात लिहून आत्महत्या करतो, तेव्हा त्या दुर्दैवी आत्महत्येमागे असते आपण फसविले गेल्याचे एक विदारक सत्य. शिक्षण व्यवस्थेमध्ये डाव्यांचे वर्चस्व, डाव्या विचारसरणीला जगभरात मिळणारेग्लॅमरइत्यादी गोष्टींमुळे नव्याने स्वातंत्र्याची चव चाखणारे तरुण-तरुणी ह्या विचारधारेचा भाग बनू लागतात. हळूहळू कुठल्याही गोष्टीतव्हिक्टिम कार्डखेळण्याचीही सवय होऊ लागते. मग कधी कमी वय म्हणून दिशा रवी, जास्त वय म्हणून वरवरा राव, तर गरोदर म्हणून सफूरा जरगर यांना त्यांच्या गुन्ह्याच्या गांभीर्याची पर्वा करता सोडविण्यासाठी जागोजागी मोर्चे काढणे, मोठेच्या मोठे लेख छापणे, जाहीर सभा घेणे ह्या सर्वांची सुरुवात होते.

 

राष्ट्रीय विचारांच्या यूथ आयकॉनची गरज

सध्या विशेषत: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र ऑनलाइन पद्धतीने व्यवहार चालू आहेत. शिक्षण क्षेत्रसुद्धा त्याला अपवाद नाही आणि विशेषत: युवा वर्ग तर यामध्ये रममाण झाला आहे असे जाणवते. यात तो इतका गुंतून गेला आहे की बाकी सर्व जग त्याला एका अर्थाने दिसतच नाही असे जाणवते किंवा जगाकडे तो या ऑनलाइन पद्धतीनेच बघतो आहे. बरे, सध्या आपद्धर्म म्हणून ऑनलाइन पद्धतीला विरोध करण्याचे कारण नाही. त्यामुळे घरच्यांनीसुद्धा त्याला दिलेली ही एक मोकळीक आहे, असे त्याला वाटते.

युवकांची मते, विचार, स्वभाव, वागणूक, माहिती, ज्ञान या सर्वांवर या आभासी जगाचा परिणाम होतो आहे. त्यामुळे त्यांना जे भावते, आवडते, पटते, समजते अशा गोष्टीकडे ते स्वाभाविक रितीने आकृष्ट होतात आणि हे आकृष्ट होणे कधीकधी घातक ठरत आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सध्या शेती कायदे यावर जी आंदोलने सुरू आहेत, चर्चा सुरू आहे याबद्दल फारशी तांत्रिक आणि कायदेशीर माहिती नसताना केवळ कोणीतरी यूथ आयकॉन एखादी भूमिका घेतो आणि ती भूमिका योग्य आहे असे या पिढीला वाटू लागते. कारण पर्यावरण, शेती, पाणी, आरोग्य, गरिबी, रोजगार हे विषय असे आहेत, ज्यांविषयी कोणीही सर्वसामान्य माणूससुद्धा सहानुभूती व्यक्त करतो आणि युवा वर्ग - जो शिकलेला आहे, तो याला अपवाद असू शकत नाही.

परंतु अशा गोष्टींना पाठिंबा देताना बाकी तपशील लक्षात घेता केवळ भावनेच्या भरात तो आपली भूमिका विचारसरणी व्यक्त करतो. त्यामुळे कधीकधी त्याला त्याचा नंतर त्रास होतो, कारण अशी भूमिका घेतानाराष्ट्र प्रथमही बाब कुठेतरी मागे पडते आणि केवळ राजकारण आणि राजकारणी यांच्या मोहात किंवा आपण किती स्वतंत्र विचाराचे आहोत, आम्हाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य पाहिजे जे आत्ता मिळत नाही, असे भासवले गेल्याने असे युवक (अर्थात सर्व नाही) या मायाजालात ओढले जात आहेत.

मला वाटते, अशा सर्व युवकांची मने समाजमाध्यमांद्वारे तयार करावी लागतील - म्हणजे असे यूथ आयकॉन समोर आणावे लागतील, जे राजकारणासाठी नाही, तर राष्ट्रकारणासाठीच कटिबद्ध आहेत, अशी या युवकांची पक्की खात्री करावी लागेल, तरच ते आपली मते आणि विचार नक्की बदलतील.

आपली मुले कोणत्या समाजमाध्यमांवर आहेत, ते काय चर्चा करत आहेत, त्यांचे मित्र कोण आहेत, ते किती वेळ ऑनलाइन असतात या सर्व गोष्टींचा पालकांनी निदान कानोसा तरी घेतला पाहिजे. शिक्षण संस्था आणि संस्थाचालकसुद्धा नियमावली करून अप्रत्यक्षरित्या या युवकांवर नियंत्रण ठेवू शकतात - किंबहुना तसे ठेवले पाहिजे.

कारण एकदा चेंडू हातातून निसटून गेल्यावर परत घेणे शक्य नसते, म्हणून मैत्रीच्या माध्यमातून आपल्या पाल्यांशी - मुलांशी संवाद साधला जावा ते कोणता विचार, कृती करत आहेत हे यतो लांबून पाहावे; पण आपले त्यांच्यावर लक्ष आहे याची त्यांना जाणीव होणे गरजेचे आहे.

मला वाटते, शिक्षक या नात्याने एक पालक या नात्याने प्रत्येकाची हीच भूमिका असली पाहिजे.

 

- प्रा. प्रशांत साठे,

राष्ट्रीय उपाध्यक्ष, अभाविप

 
 
 मी एका अशा विद्यार्थी संघटनेची कार्यकर्ती आहे, जिथेआजचा विद्यार्थी हा आजचा नागरिक आहेहे शिकविले जाते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नेहमीच विद्यार्थ्याकडे स्वत:ची मते असणारा, ती ठामपणे मांडू शकणारा तरुणांचा वर्ग ह्या दृष्टीकोनाने पाहिले आहे. विद्यार्थी हा समाजात घडणार्या घटनांचा महत्त्वाचा भाग असतो. समाजात घडणार्या बदलांचा विद्यार्थ्यांवर तितकाच प्रभाव पडतो, जितका इतरांवर. आपल्या सभोवतालच्या गोष्टी बघताना, त्यांच्यावर विचार करताना विद्यार्थ्यांचे स्वतःचे विचार परिपक्व होत असतात. विद्यार्थी आणि समाज ह्यांना आपण वेगळे करून पाहू शकत नाही. समाजात चांगले बदल घडवून आणण्यात विद्यार्थी आणि युवक हे उत्प्रेरक किंवा अग्रदूत म्हणून काम करू शकतात, करतात. त्यासाठी तशी प्रगल्भ वैचारिक बांधणी होणे आवश्यक असते. म्हणूनच मतदानाचे वय 21हून कमी करून 18 केले जावे, अशी 1960च्या उत्तरार्धात, साधारण 1967-68च्या वर्षात परिषदेने पहिल्यांदा मागणी केली. पुढे ऐंशीच्या दशकात ही मागणी पूर्णही झाली. लोकशाही प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे स्वामी विवेकानंदांनी युवकाची मांडलेली व्याख्या लक्षात घेऊन, समाजभान ठेवून आपली सदसद्विवेकबुद्धी वापरून युवकांनी समाजात वावरावे, ही साधी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून आणि युवकांकडून असते.
 

समाजात किंवा देशात कुठे काही चुकीचे घडताना दिसत असेल तर निश्चितच त्याविरोधात व्यक्त व्हावे, आंदोलने करावीत. पण ती करताना आपण देशविरोधी घटकांना तर सामील होत नाही आहोत ना, ह्याचाही विचार करावा. विद्यार्थी परिषदेची कार्यकर्ती म्हणून मी आणि माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांनी अनेकदा आंदोलने केली आहेत, कधी-कधी अटकही झाली आहे. पण लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनांचा शेवटही नेहमीच घटनेच्या चौकटीतच झाला. त्यांच्यासाठी कधी ना कोट्यवधी रुपये ओतून कॅम्पेन्स चालवले गेले, ना आंतरराष्ट्रीय पातळीवर याचिका दाखल केल्या गेल्या. याउलट देशविरोधी काम करणार्यांना वाचविण्यासाठी आंतरराष्ट्रीय एन.जी.., डाव्या संघटना - सर्वच एकजुटीने धावून आले. दिशा रवी, निकिता जेकब आणि शंतनू यांच्यासारखे कार्यकर्ते त्यांच्यासाठी महत्त्वाचे नाहीत. दिशा रवीचे वय हा केवळ एक दाखविण्याचा मुद्दा आहे, पण त्यांच्या चौकशीमधून एक मोठे देशविरोधी षड्यंत्र आणि डाव्यांची खरी फुटीरतावादी विचारधारा पुन्हा एकदा सर्वांसमोर येईल, या भीतीने आज दिशा रवीला सोडविण्याचा आटापिटा चालला आहे. ह्या सर्वांना वाचविण्यासाठी आत्ता नव्याने टूलकिट बनतही असेल. अशा वेळी सर्वांनीच स्वतःसाठी ठरवावे - आपण टूलकिटमधले एकटूलबनून राहणार की देशाच्या हितासाठी झटणारे सुजाण नागरिक? ह्या प्रश्नाच्या सकारात्मक उत्तरातच या देशाच्या युवक चळवळीचे भवितव्य अवलंबून आहे.


लेखिका
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या

राष्ट्रीय मीडिया संयोजक आहेत.

वरदा मराठे

9619069263