होमिओपॅथी व क्षयरोग निर्मूलन

विवेक मराठी    24-Feb-2021
Total Views |

@डॉ. सुबोध नाईक

क्षयरोग होण्यात शरीर महत्त्वाची भूमिका बजावत असतेच! कोणताही रोग होण्यात मानवी शरीर जी भूमिका बजावते, त्यालाच होमिओपॅथिक भाषेत susceptibility म्हणतात, ज्याला आपण सगळ्यांना समजण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्तीम्हणू शकतो! म्हणजेच प्रत्येक माणूस हा त्याच्या आजारांचा शिल्पकार आहे आणि ती शक्ती सुधारल्यास आपण आजार बरा करू शकतो - म्हणजेच आपले आजार बरा करण्याची शक्ती आपल्यातच आहे.

 
tb_1  H x W: 0

घनदाट वस्तीतील लोकजीवन, कुपोषण, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव, प्रदूषण हे घटक संसर्ग होण्यास प्रामुख्याने जबाबदार असणारा क्षयरोग ही भारतापुढील एक महत्त्वाची वैद्यकीय समस्या आहे. उत्तम वैद्यकीय साधने व औषधे उपलब्ध असूनही तिचे पूर्ण निर्मूलन होऊ शकलेले नाही. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे प्रामुख्याने फुप्फुसात होणारा हा आजार शरीराच्या बाकीच्याही बर्याच अवयवांना किंवा संस्थांना (systemsना) त्रास देतोच. रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती कमी करणार्या HIV विषाणूचा वाढत असलेला प्रादुर्भाव, वाढत असणारी multi drug resistant क्षयरुग्णांची संख्या अशा विविध कारणांमुळे तर क्षयरोग्यांच्या संख्येवर काबू मिळवणे आणखीनच अवघड जात आहे.
 

तेव्हा ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आधुनिक वैद्यकीय विज्ञानाचीशास्त्रशुद्ध होमिओपॅथीशी सांगड घालून आपल्याला क्षयरोगाचे निर्मूलन कसे करता येईल, हे आपण आज सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करू.

 

क्षयरोग आणि शरीर

सर्वप्रथम आपण क्षयरोगाबाबतची एक वैद्यकीय संज्ञा समजून घेऊ. Primary lesion - जेव्हा क्षयरोगाचा जीवाणू शरीरात जातो, तेव्हा शरीर त्या जीवाणूचा बंदोबस्त करताना त्याला एका मृतपेशींच्या समूहात (necrotic massमध्ये) बंद करून टाकते. जेव्हा त्या जीवाणूला कह्यात ठेवायची शरीराची शक्ती कमी होते, तेव्हा क्षयरोगाची विविध लक्षणे दिसू लागतात किंवा लक्षणविरहित संसर्ग सुरू होतो.

 

म्हणजेच क्षयरोग होण्यात शरीर महत्त्वाची भूमिका बजावत असतेच! कोणताही रोग होण्यात मानवी शरीर जी भूमिका बजावते, त्यालाच होमिओपॅथिक भाषेत susceptibility म्हणतात, ज्याला आपण सगळ्यांना समजण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्तीम्हणू शकतो! पण ही शक्ती केवळ रोगाचा प्रतिकारच करत नसून, प्रत्येक आजाराची सुरुवात आणि त्याची दिशा (course and end point) (ODP of disease) ठरवत असते. म्हणजेच प्रत्येक माणूस हा त्याच्या आजारांचा शिल्पकार आहे आणि ती शक्ती सुधारल्यास आपण आजार बरा करू शकतो - म्हणजेच आपले आजार बरा करण्याची शक्ती आपल्यातच आहे.
 

आणि म्हणूनच आजाराला, त्याच्या लक्षणांनाबरे करण्याबरोबरच आजारी माणसालाहीबरे करणे हेच मूलतत्त्व असणारी, म्हणजेच ही susceptibility बरी करणारी क्लासिकल होमिओपॅथी व क्षयरोग बरा करण्यात असणारे तिचे योगदान आपण समजून घेऊ.

 

शास्त्रशुद्ध क्लासिकल होमिओपॅथिक उपचारपद्धती

शास्त्रशुद्ध पद्धतीने होमिओपॅथिक इलाज करताना आजाराच्या लक्षणांचा अभ्यास करण्याबरोबरच आजारी माणसाचाही अभ्यास करायचा असतो, हे सर्वात महत्त्वाचे! माणसाचे मन, त्याला घर, समाज आणि कार्यस्थळ ह्या तीन ठिकाणी आलेला ताणतणाव, त्याचे त्याच्या मनावर व शरीरावर झालेले परिणाम, त्याची शरीररचना वैशिष्ट्ये, माणसाचा आहार, खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी, त्याचा विहार, राहण्याच्या पद्धती व सवयी, झोप, स्वप्ने, लैंगिक आयुष्य, त्याला पूर्वी झालेले आजार, रक्ताच्या नातेवाइकांचे आजार( Genetic load) ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे त्याचा आजार असतो.

क्लासिकल होमिओपॅथीमध्ये आजाराच्या लक्षणांबरोबर ह्या सर्व घटकांचा सखोल अभ्यास करून मगच औषध ठरवले जाते. ह्याच औषधाला constitutional medicine असे म्हणतात. ‘घटाघटाचे रूप आगळेह्या उक्तीप्रमाणे प्रत्येक माणूस वेगळा असतो, तसेच त्याचा आजारही. ह्याच वेगळेपणाचा सखोलात अभ्यास करून होमिओपॅथिक औषध दिले असल्याने ते प्रत्येकाचे वेगळे (individualistic) असते, तसेच आजाराचा आणि आजारी माणसाचा विस्तारात व सखोल अभ्यास केला गेला असल्यानेच ह्या पद्धतीने दिले गेलेले औषधच आजार मुळापासून बरा करू शकते.

 

आधुनिक वैद्यकशास्त्राचे ज्ञान व विविध वैद्यकीय तपासण्या ह्यांच्या मदतीनेच क्षयरोगाचे व त्याच्या stageचे, शरीराच्या निरनिराळ्या ठिकाणी झालेल्या त्याच्या निरनिराळ्या परिणामांचे निदान केले जाते, ज्याचा पुढेही उपचारांदरम्यान उपयोग होतो. (to determine efficacy of constitutional medicine and different positive or negative anticipations .)

 

उपलब्ध अॅलोपॅथिक औषधे ही उत्तम bactericidal आणि bacteriostatic आहेत, त्यामुळे होमिओपॅथिक चिकित्सा सुरू करताना ही औषधे सुरूच ठेवली जातात. होमिओपॅथी इथे भर देते ती शरीराची susceptibility बरे करण्यावर, ज्यामुळे आजार लवकर बरा होतो. त्यामुळेच कोणत्याही प्रकारची प्रतिजैविके नसतानादेखील multi drug resistance conditions आपण बर्या करू शकतो.

 

क्षयरोग अगदीच सुरुवातीच्या स्टेजमध्ये असेल, तर फार कमी कालावधीत आपल्याला तो बरा करता येतो. विविध लक्षणांवर तर मात करता येतेच. पण ह्याच औषधाने रुग्णाची भूकही सुधारते, त्याचा अशक्तपणा कमी व्हायला सुरुवात होते, वजन वाढायलाही सुरुवात होते.

 
क्षयरोगाने जसा शरीरावर परिणाम होतो, तसाच त्याच्या मनावरसुद्धा होतोच. आणि जेव्हा मनावर ताण असेल, तेव्हा शारीरिक आजार बरा होण्यास वेळ लागतोच हे सत्य सगळ्यांच्याच अनुभवाचे आहे. ह्या उपचारपद्धतीत औषध देताना मनाचाही विचार केला गेला असल्याने हे औषध मनही शांत करते, ज्याचा आजार बरा होण्यास खूपच मदत होते.

 

फुप्फुस क्षयरोग लवकर बरे होण्यासाठी जशी ह्या उपचारपद्धतीची मदत होते, तसेच इतर ठिकाणचा संसर्ग बरा होण्यासही मदत होते. फुप्फुस क्षयरोगात दुसर्याला संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते, पण बाकी ठिकाणी संसर्ग झाल्यास ती फारशी नसतेच. तिथे तर आपल्याला constitutional medicineची खूपच मदत होते. उदाहरणार्थ, Tuberculoma, lymph node affection, intestinal involvement, bone T. B. इत्यादी. निरनिराळ्या प्रकारच्या क्षयरुग्णांमध्ये होमिओपॅथिक constitutional medicineमुळे झालेला फायदा निरनिराळ्या केसेसमध्ये बघता येईल. आजच्या लेखात ते सर्व समाविष्ट करता येणे अशक्य आहे.

 

शेवटी थोडक्यात, शरीराच्या ती महत्त्वाची शक्तीच आपण बरी करत असल्याने शास्त्रशुद्ध होमिओपॅथीच्या साहाय्याने आपण क्षयरोग बरा करू शकतो, फक्त त्यासाठी होमिओपॅथिक तज्ज्ञाला ह्या सर्व गोष्टींचे ज्ञान हवे आणि रुग्णाचा सखोल अभ्यास केला गेला पाहिजे.
 

9930988433
एम.डी. (होमिओपॅथी)
,(मुंबई