इंधन दरवाढ आणि महागाई

विवेक मराठी    25-Feb-2021
Total Views |

@सदानंद घोडगेरीकर

 
पेट्रोलची शंभरी, डिझेलचे भाव गगनाला.
 

गेले काही दिवस ह्या बातम्या झकळत आहेत. महागाईमुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले असली विशेषणे ऐकायला येत आहेत. पण असे खरेच आहे का? इतक्या प्रचंड प्रमाणात महागाई असेल तर तो रोष का दिसत नाही? जनता शांत कशी? याचा एक ऊहापोह.

Fuel price rise and infla 

महागाई म्हणजे काय आणि ती का वाढते/कमी होते, हे सर्वप्रथम सोप्या शब्दात समजून घेऊ.

 

१. मागणी आणि पुरवठा यामधील तफावत

जास्त मागणी कमी पुरवठा = जास्त दर

जास्त मागणी जास्त पुरवठा = स्थिर दर

कमी मागणी कमी पुरवठा = अस्थिर दर

कमी मागणी जास्त पुरवठा = कमी दर

 

२. लोकांची क्रयशक्ती – म्हणजे लोकांकडे खर्च करायला पैसा आहे का? कारण पैसा असेल तरच मागणी.. मागणी असेल तरच पुरवठा.

 

३. सरकारचा ताळेबंद - म्हणजे एकूण उत्पन्न किती आणि एकूण खर्च किती. आपली अर्थव्यवस्था कायम तुटीचीच राहिली आहे. एका मर्यादेपेक्षा खूप जास्त तूट महागाई निर्माण करते.

 

ही तीन मुख्य कारणे आहेत महागाईची. इतरही तीन मुख्य कारणे आहेत किरकोळ महागाईची, पण ती मुख्यत्वे राजकीय/सामाजिक/नैसर्गिक असतात – उदा., अस्थिर सरकार, सततचे बंद संप, साठेबाजी, दुष्काळ, अवकाळी पाऊस इत्यादी.

आता महागाई की स्वस्ताई हे ठरते कसे? त्याचे मोजमाप काय?

सर्वप्रथम एक लक्षात घेतले पाहिजे की मर्यादित महागाई हे विकासाचे लक्षण आहे (जसे पगार/उत्पन्न वाढणे हे विकासाचे लक्षण, तसेच हे). रिझर्व्ह बँकेने ही महागाईची मर्यादा २% ते ६%पर्यंत अशी घातलेली आहे. स्वस्ताई हे Degrowthचे लक्षण मानले जाते.

 

आता आपण बघू कोणते मुख्य घटक महागाई दरावर परिणाम करतात आणि त्यांचे निर्देशांक काय आहेत. मुख्य पाच घटक
 

१. अन्नपदार्थ - ५४.१८%

२. इंधन आणि वीज - ७.९४%

३. कपडे, पादत्राणे - ७.26%

४. तंबाखू आणि दारू - ३.२६%

५. मिश्र सेवा - २७.२६% (औषधे, करमणूक, घरे, शिक्षण इ.)

 

महागाई दर ठरण्यात अन्नपदार्थांना खूप महत्त्व आहे. कारण त्याचा निर्देशांक जास्त आहे. त्याखालोखाल आहे इंधन आणि वीज. आधी बघू की महागाई दर काय आहे आणि मग प्रत्येक घटकाची चर्चा करू.

 

किरकोळ महागाई दर

२०१० - १०%

२०११ - %

२०१२ - ११%

२०१३ - %

२०१४ - .%

२०१५ - %

२०१६.%

२०१७ - .९०%

२०१८ - .%

२०१९ - .७६%

२०२० - .९५%

 

म्हणजे २०१४नंतर पाहिले, तर महागाई दर कायम ६%च्या खालीच राहिला आहे.

 

मग एक सर्वसामान्य प्रश्न - इंधन भाव खूप जास्त वाढत आहेत, पण महागाई का वाढत नाही?

 

ह्याचे मुख्य कारण म्हणजे अन्नधान्याच्या किमती, कारण तो महत्त्वाचा घटक आहे सामान्य माणसाच्या जगण्याचा. गेली ५ वर्षे अन्नधान्याचे दर स्थिर आहेत, खूप मोठ्या प्रमाणात वाढले नाहीत, याचे कारण आपले अन्नधान्य उत्पादन खूप जास्त आहे. सरकारी गोदामांमध्ये भरपूर माल शिल्लक आहे. मागणी तसा पुरवठा होत आहे, त्यामुळे ह्या किमती स्थिर आहेत हा सर्वसामान्य लोकांना एक मोठा दिलासा आहे. वास्तविक अन्नधान्याच्या महागाई दारात घटच झाली आहे. डिसेंबर २०२०मध्ये तो ३.७८% होता, जानेवारी २०२१मध्ये २.६७% होता. म्हणजे महागाईवर ज्याचा सगळ्यात जास्त (५४%) प्रभाव आहे, त्या घटकाच्या किमती कमी झाल्या, तर एकूण दर कमीच राहणार हे साधे सूत्र आहे.
 
 

आता अन्नधान्याच्या किमती का कमी आहेत? ह्याचे उत्तर आपल्याला अर्थसंकल्पामध्ये आणि कृषी क्षेत्रात सरकारने केलेल्या खर्चामध्ये दिसेल. उदाहरण द्यायचे झाले, तर २०१०मध्ये कृषी क्षेत्राचा खर्च १,३३,९९२ कोटी इतका होता. २०२०मध्ये तो २,३३,५७५ कोटी - म्हणजे दहा वर्षांत १७४% कोटीने वाढला. अनुदाने, पीक विमा ह्यामध्ये सरकार खूप जास्त पैसे खर्च करत आहे. देशातील शेतकरी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आहे आणि मजबूत पीक उत्पन्न घेत आहे.



Fuel price rise and infla 

कृषी क्षेत्राच्या भांडवली खर्चातही सरकारने भरघोस वाढ केली आहे. २०१०मध्ये खर्च २४५ कोटी होता, २०२०मध्ये हा खर्च ३२९५ कोटी इतका केला गेला - म्हणजे तब्बल १२४५% वाढ. सरकारच्या प्रयत्नांना यश येत आहे आणि सर्वसामान्यांना त्याचे परिणाम दिसत आहेत.

 

आता वळू या खूप चर्चेच्या इंधन दराकडे.

इंधन दराचे मुख्य ४ घटक असतात (कंसात सध्याचे महाराष्ट्रातील आकडे)

१. मूळ किंमत (३०.५०)

२. केंद्राचा कर (३२.९०)

३. राज्याचा कर (२७.००)

४. विक्रेता कमिशन (३.६०)

एकूण ९४.

 

केंद्राच्या करापैकी ४०% कर राज्यांकडे परत जातो. म्हणजे महाराष्ट्रात एक लीटर पेट्रोल विकले की राज्याला ४०.३२ कर मिळतो. म्हणजे राज्याला एकूण दराच्या ४१% कर मिळतो.

 

आता हा प्रश्न विचारतात - आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव पडलेत, तरी इथे दर जास्त का?

 

ह्याचे सोपे उत्तर म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात पडलेले भाव ही सरकारना (केंद्र आणि राज्य) लागलेली लॉटरी आहे आणि सरकार पडलेल्या भावावर जास्त कर लावत आहे आणि कराद्वारे आपला महसूल वाढवत आहे. मग हा महसूल जातो कोठे?

 

सुरुवातीला आपण बघितले की सरकारी महसुलातील जास्त तूट महागाई वाढवते.

 

महसूल वाढवून मोदी सरकारने तूट कमी करत आणलेली आहे. २०१०मध्ये तूट GDPच्या ६.% होती. २०२०मध्ये तूट GDPच्या ३.४०%वर आणली, याचा थेट परिणाम कमी महागाई दरात दिसतो.


Fuel price rise and infla 

आणखी एक प्रश्न राहतोच मग. तरीही वाढलेला कर जातो कोठे? कोठे खर्च होतात हे पैसे?

ह्याचे उत्तर परत अर्थसंकल्पामध्ये मिळेल.

 

१. पायाभूत सुविधा - रस्ते, रेल्वे, वीज

 

२. संरक्षण

 

पायाभूत सुविधांवार सरकार मजबूत पैसा खर्च करत आहे. तुलनात्मक आकडेवारी बघा (कोटींमध्ये) -

 

२०१० - २८००८

२०१२ - ३१५११

२०१३ ४२२६९

२०१४ - ४१५४२

२०१५- ४९७८

२०१६ - ६६५८८

२०१७ - ९३५४१

२०१८ - ९९२६०

२०१९ - १२५६८१

२०२० - १३९९२८

 

आणि खर्च भांडवली स्वरूपातील - म्हणजे फक्त नवीन प्रोजेक्टवर केला गेलेला आहे. महसुली खर्च वेगळाच.

 

अनेक वर्षे पायाभूत सुविधाकडे हवा तितका खर्च केला गेला नाही, ह्याचे कारण महसुलात न होणारी वाढ. मोदी सरकारने त्याच मोठ्या प्रॉब्लेमवर लक्ष केंद्रित करून सरकारी महसूल जास्तीत जास्त कसा वाढेल हे बघितले आणि अर्थसंकल्पीय तूट कमी केली, पायाभूत सुविधावर भर दिला. म्हणूनच आज ईशान्य भारत असेल, उत्तर भारत असेल - जिथे रस्ते व वीज पोहोचली नव्हती, अशा ठिकाणी त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि विकासाचे नवीन दरवाजे उघडले.
 

Fuel price rise and infla 

सुरक्षित राष्ट्र, सुरक्षित जनता ह्या उद्देशाने संरक्षणावरील भांडवली खर्चही खूप प्रमाणात वाढवला. उदाहरण म्हणजे २०१०मध्ये हा खर्च ६२०५६ कोटी होता, तो २०२०मध्ये १३९९२८ कोटी - म्हणजे जवळपास १८०%नी वाढवला.

 

सरकार कराचा योग्य वापर करत आहे, हे ह्यावरून लक्षात येते. सरकारने कर वाढवून तेच पैसे लोकांना दिले असते, तर महसूल घट कमी नसती झाली, पायाभूत सुविधांवर खर्च झाला नसता. लोकांच्या हातात पैसा आला असता, पण महागाईसुद्धा खूप जास्त प्रमाणात वाढली असती. म्हणून सरकारने अन्नधान्य, महसूली तूट व पायाभूत सुविधा या महागाईला कारणीभूत ठरणार्‍या मुख्य तीन घटकांवर लक्ष केंद्रित करून महागाई नियंत्रणात ठेवली.

 

सामान्यांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने इंधन दर कमी केला, तर राज्य/केंद्र सरकारच्या महसुलावर त्याचे विपरीत परिणाम होऊन अर्थव्यवस्था कोलमडेल, ह्याची जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला जाणीव असायला हवी.

 

सदानंद घोडगेरीकर

sadanand9873@gmail.com