आलोक कुमार पुढे म्हणाले की, “लाखो गावांतील आणि शहरांतील कोट्यवधी हिंदू कुटुंबांनी भावभक्तिपूर्वक यात सहभाग घेतला. या मोहिमेदरम्यान कार्यकर्त्यांनी अनेक भावुक क्षणांचा अनुभव घेतला. तसेच अनेक व्यक्तींना त्यांच्या क्षमतेहून अधिक समर्पण करतानाही पाहिले. प्रभू श्रीरामांसाठी साश्रुनयनांनी अनेक भक्तांनी यथाशक्ती समर्पण केले. अनेक ठिकाणी निधी समर्पण गटांना रामदूत मानून त्यांचे अगत्याने स्वागत करण्यात आले. भारताचे प्रथम नागरिक असणारे राष्ट्रपती ते फूटपाथवर राहणारी एखादी व्यक्ती यांनी पवित्र कार्यासाठी निधी समर्पण करून स्वतःला प्रभू श्रीरामांशी जोडले. अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थानी होणारे हे भव्य राममंदिर हे राष्ट्र मंदिराचेही प्रतीक असेल. जगातील सर्वात मोठ्या अशा या महामोहिमेच्या आकड्यांचे, अनुभवांचे आणि प्रेरक प्रसंगांचे संकलन करण्याचे कार्य सुरू झाले आहे. लवकरच ही माहिती देशासमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करू.”
- VSK-KOKAN