देहदान महर्षी दधिचींचा वारसा

22 Mar 2021 16:27:28

@रामकृष्ण अभ्यंकर

अपंगांचे
, नेत्रहीनांचे अपंगत्व दूर करण्यात अवयवदान महत्त्वाची भूमिका बजावते. त्याचप्रमाणे समाजाला उत्तम डॉक्टर्स मिळण्यासाठी देहदान ही महत्त्वाची गरज आहे. ही गरज ओळखूनदधीचि देहदान मंडळ, डोंबिवलीही संस्था आणि त्याचे कार्यकर्ते या विषयाबाबत जनजागृती आणि समन्वयाचे कार्य अव्याहतपणे करत आहेत. त्या विषयीची विशेष माहिती देणारा लेख.

 
donetion_1  H x


मुंबईच्या
ग्रँट मेडिकल कॉलेजचा ॅनाटॉमी विभाग. 27 जानेवारी 2020चा दिवस. कृष्णा (नाना) कुलकर्णी (वय 94 वर्षे), राहणार मालाड (दिंडोशी) यांनी शांतपणे जगाचा निरोप घेतल्याने त्यांच्या पूर्वघोषित इच्छेनुसार त्यांची कन्या मेधा कुळकर्णी अन्य जणांनी त्यांचा देह संबंधितांच्या ताब्यात देऊन अत्यंत समाधानाने कॉलेजचे असि. डीन आणि ॅनाटॉमी विभागप्रमुख डॉ. दीपक जोशी यांना भेटण्यास गेले. देहदान त्याची उपयुक्तता, शिक्षण-संशोधनासाठी अत्यंत गरजेचा . बाबतीत डॉक्टर सांगत असतानाच कृतज्ञता व्यक्त करून त्यांनी उपस्थितांना एकच अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली, “वैद्यकीय अभ्यास, संशोधन .साठी मृतदेहांचा (dead bodiesचा) तुटवडा जाणवत असल्याने जास्तीत जास्त लोकांनी देहदान करायला हवे. देहदानामुळे अधिकाधिक डॉक्टर्स तयार होण्यास मदतच होते, ज्यामुळे देशाचे समाजाचे आरोग्य नक्कीच सुधारण्यास मदत होते.” नानांनी डोंबिवलीच्या महर्षी दधीचि देहदान मंडळातर्फे नोंदणी केली होती. साहजिकच डॉ. जोशी यांनी मंडळाचे कौतुक केले.
 

त्याच दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या मातोश्रींचे वयाच्या 89व्या वर्षी हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झाले. त्यांच्याच ट्वीटद्वारे मातेच्या मृत्युपश्चात नेत्रदान देहदान करण्याच्या त्यांच्या इच्छेनुसार दिल्लीतील एम्समध्ये नेत्रदान, तर मौलाना आझाद मेडिकल कॉलेजकडे त्यांचा मृतदेह सोपविण्यात आला. सदर देहदानामुळे समाजासाठी जगण्याची प्रेरणा सतत मिळत राहणारी असल्याची प्रतिक्रिया डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केली. (सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स टा, 7 फेब्रुवारी 2020.)

 
donetion_3  H x

बाळकृष्ण भागवत


देहदानासंबंधी
उपरोक्त दोन उदाहरणे विषयाच्या गांभीर्यासंबंधी गरजेसंबंधी अगदी पुरेशी आहेत.


डोंबिवलीचे
गुरुदासजी तांबे (संस्थापक) अन्य समविचारी मंडळींच्या सहकार्याने 1988मध्येदधिची देहदान मंडळ, डोंबिवलीची रीतसर स्थापना झाली. आजमितीस त्याचे 3500पेक्षा जास्त सभासद असून त्यांच्यामार्फत 750पेक्षा जास्त देहदाने झाली आहेत. समाजाला उत्तम डॉक्टर्स मिळावेत हाच मंडळाचा सद्हेतू. आजतागायत त्या संस्थेच्या कार्यकर्त्यांद्वारे हे पुण्यकर्म अव्याहतपणे चालूच आहे. मृत व्यक्तीचे संबंधित नातेवाईक वैद्यकीय महाविद्यालय यांच्यामध्ये धागा जुळवून देण्याचे त्यांचे महत्त्वाचे पुण्यकर्म खचितच आहे.


donetion_2  H x

त्या
अविरतपणे कार्य करणार्या कार्यकर्त्यांपैकी एक बाळकृष्ण (बाळासाहेब) वासुदेव भागवत, वय 87 वर्षे (राहणार बोरिवली). रेल्वेत शिक्षकाची नोकरी, निवृत्तीनंतरही हे अन्य कार्य सांभाळीत असतानाही दधिचि देहदान-नेत्रदान कार्याच्या प्रचाराची धुरा आजपर्यंत तितकीच समर्थपणे वाहत आहेत. यासंबंधी त्यांची बर्याच वेळा प्रवचने/व्याख्यानेदेखील झाली आहेत. त्यांनी सुमारे 500पेक्षा जास्त इच्छुकांची नोंदणी केली आहे. अशा या मातबर वयस्कर तरुणाकडून मला मिळालेली देहदानासंबंधीची माहिती मी वाचकांपुढे देत आहे.


महर्षी
दधिचींचे अमूल्य कार्य


तप
:सामर्थ्याने महाबलाढ्य बनलेल्या वृत्रासूर या दैत्याचा वध होणे अत्यंत गरजेचे होते. कारण तो सर्वांना त्रासदायक ठरत होता. त्यासाठी इंद्रादी देवगणांनी तत्संबंधी प्रार्थना केल्यावर असे समजले की, महर्षी वृत्रासुराचा वध होण्यासाठी महर्षी दधिचींच्या अस्थींपासून बनलेलेवज्नावाचे शस्त्रच योग्य आहे. तसे कळल्यावर दधिची महर्षींनी योगसामर्थ्याने आपले दिव्य बलिदान केले त्यांच्या अस्थीपासून बनलेलेवज्रास्त्रवृत्रासुराचा काळ ठरले. ते स्थान म्हणजे प्रसिद्ध निमिषारण्य (. प्रदेश). दधिची हे देहदान करणारे जगातील पहिले महामानव ठरले. (संदर्भ - भागवत कथासार). साहजिकच देहदानाचे अमोल कार्य करणार्या या संस्थेनेदधीचि देहदान मंडळहे अत्यंत समर्पक नाव स्वीकारले त्यांचा आदर्श पुढे चालू ठेवला. तो आजही तितक्याच उमेदीने चालू आहे.

देहदान-नेत्रदानसंबंधीचे नियम कार्यप्रणाली

1) मृत शरीरविच्छेदन (पोस्ट मॉर्टेम) प्रात्यक्षिके, शरीरविज्ञानासंबंधीचे ज्ञान अधिकाधिक होऊन त्यातून समाजाला उत्तम, शिक्षित डॉक्टर्स लाभावे, त्याद्वारे अपंगाला सावयव करावे, ही देहदानामागील मूळ कल्पना आहे.

2) समाजातील जिवंत व्यक्तींनी मृत्यूनंतर देहदान/नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केल्यास मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून रीतसर फॉर्म भरायचा असतो आपल्या तपशिलासह लेखी स्वरूपात आपली देहदानाची इच्छा व्यक्त करायची असते. त्याचबरोबर साक्षीदार/वारस/जवळचे नातलग यांच्या स्वाक्षर्या आवश्यक असतात. त्याबरोबर वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक तो फॉर्म भरायचा असतो नातेवाइकांची ना हरकत परवानगी (No objection from close relatives) लेखी स्वरूपात द्यायची असते. पासपोर्ट आकाराचे दोन फोटो देणे गरजेचे असते. नातलगांनी/जवळच्या मंडळींनी हे लक्षात ठेवायचे असते. ही सारी कागदपत्रे महाविद्यालयांत दिल्यानंतर त्यावर महाविद्यालयाचे पत्र त्यावर नोंदणी क्रमांक दिलेला असतो. वारसांना/अन्य जणांना या सार्या गोष्टी दाखवून ठेवाव्यात.

3) देहदान प्रक्रिया होण्यापूर्वी डॉक्टरांनी निधनाच्या कारणासह (Cause of death) प्रमाणपत्र द्यायचे असते. सामान्य/नैैसर्गिक मृत्यू असल्यासच देहदान होऊ शकते. संसर्गजन्य रोग, जखमा, क्षय, कावीळ, कर्करोग, एड्स आदी किंवा तत्सम कारणे असल्यास देहदान होऊ शकत नाही. अवयवदान उदात्त असून त्यासाठी मेंदू मृत असावा लागतो. पण देहदान मृत्यूनंतर सुमारे 8 तासापर्यंत होऊ शकते. नेत्रदानासाठी 5 ते 5.1/2 तासाचा कालावधी चालतो. नोंदणी अगोदर केली नसल्यास, पण मृताच्या नातेवाइकांनी देहदानाची इच्छा प्रदर्शित केल्यास तसे प्रतिज्ञापत्राद्वारे देहदानासाठी वैद्यकीय महाविद्यालयाशी (Medical college) संपर्क साधता येतो. मेंदू मृत झाल्यावरच केवळ हृदय, यकृत, मूत्रपिंड, डोळे आदी अवयवदानासाठी पात्र ठरतात.

 

4) अमेरिकेतील देहदान/अवयवदान सरकारदरबारी नोंदणीची पद्धती वेगळी आहे. वाहन परवान्यासाठी अर्ज करतेवेळीच पर्याय विचारला जातो. तो पूर्णपणे ऐच्छिक असतो, त्यामुळे वेगळे कुठे नोंदणीची गरज पडत नाही.
 

5) मृत व्यक्तीची नोंदणी केल्याप्रमाणे ओळखपत्र आवश्यक पत्रे - डॉक्टरांचे प्रमाणपत्र (मृत्यूच्या कारणासह) जवळच्या संबंधितांनी वैद्यकीय महाविद्यालयास कळवून तेथपर्यंत मृतदेह नेण्याची स्वत: स्वत:च्या खर्चाने व्यवस्था करायची असते.


वैद्यकीय रुग्ण/शववाहिका त्या वेळीच उपलब्ध असतील याची खात्री नसल्याने व विशिष्ट वेळेतच मृतदेह त्यांच्या ताब्यात द्यायचा असल्याने स्वत: मृतदेह महाविद्यालयाच्या ताब्यात देणे आवश्यक असते. तसे करताना पोलिसांकडून अनुमती पत्र घेण्याची गरज नसते. फक्त केवळ जिल्हा हद्द ओलांडतानाच तशी गरज भासते. (फक्त ग्रँट मेडिकल कॉलेज संबंधितांना मृतदेह आणण्याचा वाहन खर्च देते.)

 

6) दान केलेले मृतदेह सोईने (परगावी झाला असल्यास) कोणत्याही जवळच्या मेडिकल कॉलेजमध्ये दिला तरी चालतो. कारण आवश्यक पत्रे सोबत असल्याने कोणतीही अडचण येत नाही. तसा सरकारी आदेश आहे. मृतदेहाच्या अंत्यदर्शनासाठी फारच विलंब होणार असेल, तर मात्र वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम न्यावा, कारण वेळेची मर्यादा नाकारता येत नाही.

 

7) अवयवदान करताना डॉक्टर आवश्यक ते अवयव काढून घेऊन बँडेज पट्ट्यांनी बांधून उर्वरित देह संबंधितांच्या हाती सुपुर्द करतात. पण देहदान या प्रक्रियेत मृतदेह संंबंधितांना कोणत्याही परिस्थितीत परत दिला जात नाही. गरजेनुसार अन्य रुग्णालयात अवयव देह पाठविला जातो. देह अवयव फॉर्मालीन (Formalin) या रासायनिक द्रवात राखून ठेवला जातो. त्यामुळे तो बराच काळ चांगल्या स्थितीत ठेवला जातो. अन्य अवयव गरजेनुसार सर्व वैद्यकीय तपासणीनंतर (Matching) अन्य गरजवंताला रोपणासाठी Transplant) वापरला जातो गरजवंताचे जीवन सुकर होते.

8) वैद्यकिय महाविद्यालयात मृतदेह दिल्यानंतर अंत्यविधीच्या कोणत्याही कार्यक्रमात बाधा येत नाही. (ज्ञानप्रबोधिनी, पुणे या संस्थेद्वारे अत्यंत अल्पखर्चात दिवसवार करता येतात.)

9) शववाहिनीतून वा रुग्णवाहिनीतून त्यांच्याच स्ट्रेचरवरून फुले, हार, गुलाल .विरहित अंगावर फक्त पातळ पांघरुणासह न्यावा लागतो.

 

10) हॉस्पिटलमध्ये अनेक बेवारस प्रेते येत असतात, पण ती देहदानास चालत नाहीत. कारण मृत्यूचे निदान वेळ माहीत नसते.

11) अवयवदान केले, तर वंचित/गरजू व्यक्तीस त्याचा अवश्य फायदा होतो. अर्थात, त्यासाठी शरीरविच्छेदन करावे लागते; पण देहदानानंतर त्याचे अन्य अवयव सहाजिकच भावी डॉक्टरांचे उत्तम निपुणत्व घडवीत असतात. भारताला त्याचीच अधिक आवश्यकता आहे.

12) भारतात अंध किती आहेत याचा नक्की आकडा उपलब्ध नसला, तरी नेत्रदान केल्याने बर्याच अंध व्यक्तींना नेत्र प्राप्त होऊ शकतात, म्हणून नेत्रदान प्रत्येकाने करावेच. आज 135 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला हे अशक्य नाही.


 

संपर्क

1) महर्षी दधीचि देहदान मंडळ, डोंबिवली (.)

दूरध्वनी : 0251-2490740

गुरुदास तांबे - 9969060945

Email : gurudast@gmail.com,
stambe811@gmail.com
Website : www.dadhichidehdanmandal
---------------------

2) दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज

मु. आपटी, पो. टाळसुरे, ता. दापोली, जि. रत्नागिरी

दूरध्वनी : 0235-267801/9960193763

बी.के.एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय,

कासारवाडी, सावर्डे, चिपळूण, रत्नागिरी - 415606

-------------------------

3) ज्ञानप्रबोधिनी पुरोहिता श्रीमती शमा पुणेकर

संपर्क : 9594749657, 8655574191 डोंबिवली (पूर्व)

ज्ञानप्रबोधिनी (पुणे) 020-24207146

रामचंद्र कुळकर्णी (पुणे) 9422986244



- रामकृष्ण अभ्यंकर

9819844710



Powered By Sangraha 9.0