महाराष्ट्राचा शतकभराचा चालताबोलता इतिहास - रा. व्यं. जोशी

विवेक मराठी    19-Apr-2021
Total Views |

@प्रशांत असलेकर

रा.व्यं. जोशी यांचा मूळ पिंड समीक्षकाचा आहे. इतिहास असो, साहित्य असो की चित्रपट... त्यांची त्याकडे बघणारी दृष्टी चिकित्सक, मूलगामी, रीडिंग बिट्वीन लाइन्सची आहे. गाण्यामागे सतारीची साथ असते, तशी त्यांची सत्यान्वेषी वृत्ती सर्व प्रकारच्या लेखनामागे रुणझुणताना जाणवते. आज शंभरीच्या उंबरठ्यावरही त्यांचे लेखन जोमाने चालू असते. रा.व्यं. जोशी हे काळाच्या त्या तुकड्याचे प्रतिनिधी आहेत, जो आपण कधी बघितलेला नाही.

shivaji maharaj_1 &n

आपण एखाद्याबद्दल बोलत असतो आणि नेमक्या त्याच वेळेला ती व्यक्ती हजर झाली, तर सहज आपल्या तोंडून शब्द निघतात, “तुला अगदी शंभर वर्षे आयुष्य आहे.” प्रत्यक्षात एवढे दीर्घायुष्य कुणालाच नको असते. चाळिशी-पन्नाशीतच तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात. वयोमानानुसार शारीरिक शक्ती उतरणीला लागते. ‘साठी बुद्धी नाठीहोते. वास्तवाचे भान कमी होते. परंतु यांपैकी कुठलीही लक्षणे नसलेले आणि शतकाच्या उंबरठ्यावर उभे असलेले एक गृहस्थ अंबरनाथ येथे राहतात, ते म्हणजे मागच्या पिढीतील सुप्रसिद्ध लेखक-इतिहासकार रा.व्यं. जोशी.

रामचंद्र व्यंकटेश जोशी यांचा जन्म 1921चा. शतकाच्या उंबरठ्यावरही ते उत्तम आरोग्य राखून आहेत. नियमित व्यायाम आणि मिताहार यांमुळे ते सुदृढ, खंबीर आहेत. आजही ते लेखन करतात. तरुणांशी संवाद साधतात.

कोल्हापूर संस्थानातील गडहिंग्लज हे त्यांचे जन्मगाव. त्यांचे आजोबा कवी माधव ज्युलियन यांचे स्नेही होते. बालपणीच त्यांच्या कुटुंबाला विपन्नावस्था प्राप्त झाली. त्यांना नातेवाइकांकडे आश्रित म्हणून राहून कसेबसे शिक्षण पूर्ण करावे लागले. त्यात लहानपणीच मातृछत्र हरपले आणि दुर्दैवाला पारावार उरला नाही. तरीही त्यांनी जिद्दीने बीए (ऑनर्स)ची पदवी संपादन केली. 1942 ते 46 या काळात कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. हा त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ होता. विद्यार्थिदशेत विंदा करंदीकर त्यांचे शिक्षक होते. राजाराम कॅलेजात ना.सी. फडके, बॅरिस्टर खर्डेकर, डॉ. बालकृष्ण, प्रा. .सी पंगू, डॉ. अण्णासाहेब पवार त्यांचे प्राध्यापक होते. प्रा. पंगू यांच्याकडून त्यांना मराठी साहित्य-समीक्षेची, अण्णासाहेब पवारांकडून त्यांना इतिहास समीक्षेची, तर त्यांचे एक सहाध्यायी आर.आर. जायदे यांच्याकडून इंग्लिश साहित्य चित्रपट समीक्षेची दृष्टी लाभली. जाण निर्माण झाली. पुढे सार्वजनिक बांधकाम खात्यासारख्या रूक्ष विभागात प्रदीर्घ काळ नोकरी करतानाही त्यांनी हा साहित्य-समीक्षा-इतिहासप्रेमाचा वारसा जिवापाड जपला. नोकरीच्या काळात आणि नंतर निवृत्तीनंतरही त्यांनी विपुल लेखन केले.

रा.व्यं. जोशी हे प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे आहेत आणि स्वा. सावरकर हे त्यांचे परमदैवत आहे.

त्यांनी केलेल्या लेखनाचे तीन ठळक विभाग पडतात - इतिहासविषयक, साहित्य चित्रपट समीक्षात्मक आणि ललित लेखन. ऐतिहासिक विभागात त्यांच्यापरकीयांच्या दृष्टीतून शिवाजी’, ‘इतिहासाच्या राखेतील स्फुल्लिंगवगैरे पुस्तकांचा समावेश होतो. ‘परकीयांच्या दृष्टीतून शिवाजीया त्यांच्या अभ्यासपूर्ण ग्रंथाच्या तीन आवृत्त्या निघाल्या आहेत. तसेचबाबर - खर्या व्यक्तिमत्त्वाचा शोध’, ‘लेनिनग्राडचा वेढा’, ‘अफजलखान वध’, ‘संभाजी चरित्र - अपसमज वास्तवाचा शोध’, ‘टिपू सुलतान’, ‘छत्रपतींची अखेर’, ‘माउंटबॅटन आणि भारताचे विभाजन’, ‘जालियनवाला बाग’, ‘विजयनगर साम्राज्याची शोकांतिका’, ‘स्वातंत्र्यचळवळीतील क्रांतिकारकांचे स्थानअशा विविध विषयांवर त्यांनी संशोधनात्मक लेखन केले आणि ते आघाडीच्या विविध नियतकालिकांत वेळोवेळी प्रसिद्ध झालेले आहे.

इतिहासविषयक लेखनाइतकेच रा.व्यं. जोशी यांनी पाश्चात्त्य भारतीय चित्रपटांबाबतही समीक्षात्मक लेखन केले आहे. न्यू थिएटर्स, बाँबे टॉकीजचा कालखंड, शांतारामबापूंच्या नायिका, नार्मा शिअरर इन्ग्रिड बर्मन या नायिकांवरही त्यांनी लिहिले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वाङ्मय कोशात त्यांनी लिहिलेल्या अनेक टिपणांचा समावेश आहे.

रा.व्यं. जोशी यांच्या लेखनात कमालीची विविधता आढळते. पनामा कालवा, दयानंद सरस्वती आर्य समाज, संत एकनाथ तुकारामांचे समाजप्रबोधन, गुरुदेव रानडे, स्त्रियांची आत्मचरित्रे, विरहतरंगातील नायिका इथवर कुठलाही विषय त्यांच्या प्रतिभेला वर्ज्य नाही. विद्युतप्रवाहात आपण ज्या तर्हेचा भार बसवू त्याप्रमाणे कार्य घडते, तसे रा.व्यं. जोशी यांची समीक्षात्मक दृष्टी ज्या विषयांवर फिरली, त्या-त्या विषयाचे त्यांनी सोने केले आहे.

रा.व्यं. जोशी यांचा मूळ पिंड समीक्षकाचा आहे. इतिहास असो, साहित्य असो की चित्रपट.. त्यांची त्याकडे बघणारी दृष्टी चिकित्सक, मूलगामी, रीडिंग बिट्वीन लाइन्सची आहे. गाण्यामागे सतारीची साथ असते, तशी त्यांची सत्यान्वेषी वृत्ती सर्व प्रकारच्या लेखनामागे रुणझुणताना जाणवते.

मात्र रा.व्यं. जोशी यांचे सर्वच लेखन बोजड समीक्षात्मक नाही. त्यांनी ललित आणि कथालेखनही केले आहे. सत्यकथेसह हेर, रंभा, हंस यांसारख्या भिन्नभिन्न प्रकृतीच्या मासिकांतून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. एकूण रा.व्यं. जोशी हे एक बहुआयामी लेखक आहेत.

वैयक्तिक जीवनात त्यांनी अनेक आघात पचवले. अंबरनाथच्या कारखानीस महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या रेखा मैड या त्यांची कन्या होत, तर अलीकडेच निधन झालेले ज्येष्ठ संघस्वयंसेवक चंद्रकांत जोशी (सेन्सॉर बोर्डाचे सदस्य) हे त्यांचे पुत्र अंबरनाथमध्ये साहित्य चळवळ रुजवणारे अरुण मैड हे त्यांचे जावई होते. जवळच्या अनेक नातलगांचा वियोग त्यांना भोगावा लागला, पण समीक्षात्मक लेखनानेच कमावलेल्या साक्षेपी, वृत्तीने त्यांनी हे सर्व आघात पचवलेले आहेत. जीवनाकडे बघण्याची त्यांची दृष्टी अतिशय सकारात्मक आहे. आज शंभरीच्या उंबरठ्यावरही त्यांचे लेखन जोमाने चालू असते.

रा.व्यं. जोशी हे काळाच्या त्या तुकड्याचे प्रतिनिधी आहेत, जो आपण कधी बघितलेला नाही. महाराष्ट्राच्या गेल्या शतकभराच्या इतिहासाचे आणि सामाजिक बदलांचे ते साक्षीदार आहेत. तत्त्वनिष्ठा, साधनशुचिता, साधी राहणी-उच्च विचार या मूल्यांच्या काळापासून ते स्वार्थासाठी वैचारिक कोलांटउड्या मारण्याच्या आजच्या उथळ, चंगळवादी जीवनशैलीपर्यंतच्या सर्व स्थित्यंतरांचे ते साक्षीदार आहेत.

रा.व्यं. जोशी इतिहासात रमले. वावरले. नाचले. बागडले. हुंदडले. दरम्यान स्वत: इतिहास बनले. रा.व्यं. जोशी म्हणजेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, चित्रपट आणि कलाजीवनाचा गेल्या शतकभराचा चालताबोलता इतिहास आहेत.

 

9322049083