सण-उत्सवांची संस्कृती

विवेक मराठी    20-Apr-2021
Total Views |

@वैजयंती प्रदीप वडनेरकर


वर्ष
प्रतिपदेपासून अर्थात नववर्षाचा प्रारंभच हा मुळी प्रभू श्रीरामचंद्रांच्या नवरात्रापासून सुरू होतो. प्रभू श्रीराम हे सार्या हिंदू समाजाचे हृदय दैवत! घराघरातून अतिशय उत्साहात, आनंदात गुढ्या, भगवा ध्वज, आंब्याचे तोरण लावून मंगलदिन म्हणून अतिशय आनंदात नववर्षाचे स्वागत केले जाते देवदेवतांचे, प्रभू श्रीरामचंद्रांचे मनोभावे पूजन केले जाते


shree ram_1  H

नववर्षे शकारंभे पवित्र मंगलोत्सवे।

शौर्योत्साह प्रदातारं नमामो भगवद्ध्वजम्।

प्लव नाम सवत्सरारंभ

चैत्र शुद्ध प्रतिपदा. आमच्या भारतीय हिंदू कालगणनेनुसार येणार्या नववर्षाचा प्रथम दिवस. केवळ नववर्षाचाच प्रारंभ ह्या दिवशी होत नाही, तर नवे संवत्सर, शकसुद्धा सुरू होते. आणि ह्या नववर्षाच्या स्वागतासाठी सारी सृष्टी, सारा निसर्गसुद्धा आनंदाने सज्ज, सिद्ध झालेला असतो. वसंताच्या आगमनाने सार्या जीवसृष्टीमध्ये चैतन्य सळसळत असते. नवतरुलता बहरू लागतात. वसुंधराही हिरव्या शालूत खुलून आणि सुंदर सुगंधित होते. विविध प्रकारच्या रंग-आकाराच्या नवरंगी फुलांच्या अलंकारांनी अलंकारित होते. आम्रवृक्षाला आलेला मोहर, त्यावर मुक्त गोड गळ्याने कोकिळची सुरेल तान, त्याचे गाणे मोहून टाकते. पहाटेचा शीतल गारवा तनामनाला लपेटून जात एक उत्साहाची शाल पांघरून जातो. संजीवन देत कोवळ्या सुवर्णांकित सूर्यकिरणाने विश्व सुवर्णमय बनते. अशाच प्रसन्न पहाटेच्या वेळी उमलून येणारा गंधित मोगरा, सोबत फुलणारी जाईजुई, मधुमालती, केशरी गुलमोहर, शुभ्र कुंदा, प्राजक्ताची केशरी रंग ल्यायलेली नाजूक लाजरी फुले, जी अंगणात आपल्या तनुलतेचा सडा शिंपून पायघड्या घालीत असतात. शितल गुलमोहरासह औषधीयुक्त कडुनिंबसुद्धा स्वागतासाठी सळसळत असतो. निसर्ग वातावरणात जणू काही रंग-गंध-वास यांची रंगपंचमीच खेळत असतो आणि अशा ह्या सुंदर रंगांच्या दुनियेत निष्पर्ण फांदीवर फुलून आपल्या अनोख्या मोहक रंगाने रंगलेला मनाला रंगविणारा पळस सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असतो जगायची, संकटावर मात करून जीवन आनंदाने जगण्याची आशा, प्रेरणा सर्वांना देत असतो. सार्या आसमंतात ॠतूंचा राजाॠतुराज वसंतच्या आगमनाने एक नवचैतन्य, संजीवनी लहर बनून, समीर बनून गुणगुणत असतो. त्याला साथ असतेनवपल्लवीची, जी जगण्याची नवीन प्रेरणा, आशा, आकांक्षा घेऊन जन्माला येताना म्हणत असते, ‘दिल है छोटासा। जीने की आशा’.

आपली भारतीय संस्कृतीसण-उत्सवसंस्कृती! उत्सव म्हणजे आनंद! आणि वर्षभर विविध सणांच्या माध्यमातून हा आनंद साजरा करीत जीवनगाणे सुंदर बनवत असतो. ह्या काळात असाचवसंतोत्सवआपण साजरा करत असतो. ‘वसंतोत्सवजो रंगाचा राजा। निसर्गाचा राजा। देवांचा आवडता ॠतू। असा हाॠतुराज वनी येतोकसा.. तर नव कलिकांचा, नव लतिकांचा बहर घेऊन. आमच्या शास्त्रीय संगीतातदेखील बंदिशी राग वसंत, बहार यावर आधारित आहेत. शिवाय जोडीलाबसंत बहारहा जोड राग! वसंत म्हणजे प्रत्यक्ष संगीत संगीतमय जीवन आणि अशा वसंतातले पहिले पूजन करून आम्रवृक्षाच्या पर्णांमधून कोकीळसुद्धा आम्हाला हेच सांगत असतो. असा हा ॠतू वसंत ॠतू.

 

अशा ॠतूच्या रंगीत, मनमोहक रमणीय वातावरणात होळीच्या रंगपंचमीत तन-मन रंगवून प्रसन्नचित्ताने, श्रीरामनामाच्या आध्यात्मिक शक्तीच्या प्रेरणेतून सारी सृष्टी आता चैत्राकडे पाऊल टाकतेय. चैत्र शुद्ध प्रतिपदा - अर्थात वर्षप्रतिपदा. केवळ हिंदूंचाच नव्हे, तर सगळ्या विश्वाचाच वर्षारंभ दिन. जगातली सर्वात प्राचीन शास्त्रशुद्ध कालगणना प्रारंभ झाली तो दिवस म्हणजे वर्ष प्रतिपदा. आज वैज्ञानिकद़ृष्ट्याही ह्या कालगणनेना महत्त्व प्राप्त झाले आहे. प्राचीन भारतीय कालगणना ही सृष्टीच्या उत्पत्तीशी जोडलेली आहे.

वर्ष प्रतिपदेलाच विक्रम संवताचा आरंभ होतो. शक आक्रमक शक्तीने संख्येने मोठे होतेच, पण स्वत:चा भूप्रदेश सोडून यावे लागल्यामुळे भूमिहीन, निराधार झाले, त्यामुळे जिवावर उदार होऊन संघर्ष करीत होतो. ते क्रूर असभ्य होते. उज्जैनचा राजा विक्रमादित्य जो अत्यंत पराक्रमी शूर होता, त्याच्या नेतृत्वाखाली हिंदू समाजाने शकांशी कडवी झुंज घेऊन आपल्या अतुलनीय पराक्रमाने शकांचा पराभव केला. ह्या वैभवशाली अतुलनीय पराक्रमाची, ऐतिहासिक विजयाची जाणीव, त्याचे स्मरण पुढील पिढीला नित्य प्रेरणादायक ठरावे, म्हणून विक्रमादित्याच्या नावानेसंवताची स्थापना करण्यात आली. विक्रमादित्य हा अत्यंत न्यायी राजा होता, त्यामुळे त्याच्या सिंहासनालाविक्रमादित्याचे सिंहासनअसे ऐतिहासिक विशेषण मिळाले. ऐतिहासिक विजयाचा दिवस म्हणूनही ह्या तिथीचे विशेष महत्त्व आहे.


shree ram_3  H

परंतु दीडशे वर्षांनंतर शकांनी पुन्हा आक्रमण केले. त्यांच्या आक्रमणाने भारत त्रस्त झाला. मात्र या वेळी आपल्या शौर्याने, पराक्रमाने शकांचा दारुण पराभव केला तो पैठणच्या शालिवाहन राजाने. त्याच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भारतीय हिंदू राष्ट्र त्वेषाने लढले विजय प्राप्त केला. ह्या विजयाची स्मृती म्हणून शालिवाहनाच्या नावाने वर्ष प्रतिपदेला कालगणना सुरू झाली.


वर्ष
प्रतिपदेपासून अर्थात नववर्षाचा प्रारंभच मुळी प्रभू श्रीरामचंद्रांच्या नवरात्रापासून सुरू होतो. प्रभू श्रीराम हे सार्या हिंदू समाजाचे हृदय दैवत! आसुरी शक्तींवर विजय प्राप्त करणारे श्रीराम आजही हिंदू समाजाचे क्षात्रतेज जागृत करणारे दैवत आहे. आजच्या शुभदिनीच त्यांनाअयोध्येचा राजा राजारामम्हणून राज्याभिषेक करण्यात आला होता. ‘विजयपताका श्रीरामाची झळकते अंबरी। प्रभू आले मंदिरीअसे म्हणून विजयोत्सव साजरा केला गेला.


श्रीरामांच्या
नामोच्चारानेच आपले अंत:करण शुद्ध भक्तिरसाने भरून येते. श्रीराम भारताचा आत्मा आहे, धर्माचे मूर्तिमंत रूप आहे. रामायणाच्या प्रत्येक कांडात श्रीरामांचे व्यक्तित्व त्या त्या परिस्थितीत आदर्श रूपांत व्यक्त झालेले आहे. भारतीय संस्कृतीला जगात काय उत्पन्न करायचे आहे, याचे उत्तर म्हणजे रामायण. ज्या वेळी समाज पतनाच्या सीमारेषेवर येऊन ठेपला, त्या त्या वेळी राष्ट्रीय पुनरुत्थानासाठी उपासनेचे केंद्र म्हणून, जीवनध्येयाचे सुस्पष्ट दर्शन व्हावे म्हणून रामायणच तारणहार ठरले आहे. समाजाची नैतिक पातळी उंच करण्यासाठी आवश्यक असलेले उच्च आदर्श रामायणातच आहेत. रामायणाने समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे. कारण प्रत्येकच रामायणात एकवचनी, एकबाणी, एकपत्नी, कोदंडधारी, ‘कर्तव्यदक्ष पालनहारहे ज्याच्या जीवनाचे सूत्रच आहे, अशा श्रीरामांच्या आदर्शांचे संस्कार समाजात परिवर्तन आणू शकतात.


याच
वर्ष प्रतिपदेच्या तिथीला धर्मराज युधिष्ठीराचाही राज्याभिषेक झाला होता. धर्माच्या सत्याचा, राष्ट्रीय विजयाचा दिवस म्हणून या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या सर्व इतिहासाचा अभ्यास केला, तर लक्षात येईल की या सर्व राजांचा धर्मध्वज हा भगवा ध्वजच होता. राज्य, लढाई, न्याय, राज्यकारभार भगव्या धर्मध्वजाखाली झाला. तो राजध्वज होता, राष्ट्रध्वज होता आणि म्हणून आजही गुढीपाडव्याला गुढीसह घराघरांवर भगवा ध्वज उभारला जातो. त्याचा आग्रह धरला जातो गुढीच्या आनंदासह भगव्या ध्वजाच्या सन्मानाचे, संस्काराचे स्मरण राष्ट्राविषयी स्वाभिमान अभिमान प्रत्येक हिंदूच्या मनात जागृत होतो. कारण भगवा ध्वज हा शौर्य, तेज, पावित्र्य, त्याग, वैराग्य, ऐश्वर्य, संपत्ती, ज्ञान ह्या गुणांनी परिपूर्ण, युक्त असा कल्याणकारक विष्णुध्वज आहे.

 
shree ram_2  H

असा हा वर्षाचा शुभारंभ दिन अतिशय प्रसन्नचित्त, निसर्गाच्या मंगलमय वातावरणात सुरू होतो. सुवर्णकारांनी मंडित अशा सहस्रकिरणांवर स्वार होऊन येणार्या सूर्यदेवांचे आगमन जे अरुणोदयाच्या वेळी, गगनात शिंपलेल्या केशरी सड्याच्या सुवासिक वातावरणात संपूर्ण पृथ्वीला विश्वाला आशीर्वचन देतच होत असते आम्हीहीपहिला नमस्कार उगवत्या भास्कराला। तेजाच्या अंकुराला।म्हणून त्याचे - अर्थात तेजाचे पूजन स्मरण करतो. वसंत ॠतूची नैसर्गिक आनंदोत्सवाची मैफल, कोकिळच्या गोड कूजनाने आधीच सजलेली आहे. प्रभू रामचंद्रांच्या राज्याभिषेकाच्या मंगल सोहळ्याचे मंगल स्मरण करत आणि घराघरातून अंगणात रेखलेल्या सुंदर रांगोळ्यांच्या गालिच्यावर पाऊल ठेवीत ह्या शुभदिनाचे आगमन होते. ‘पहाट पाडवाचे मंजुळ गाण्याचे स्वर त्याचे स्वागत करतात.


घराघरातून
अतिशय उत्साहात, आनंदात गुढ्या, भगवा ध्वज, आंब्याचे तोरण लावून मंगलदिन म्हणून अतिशय आनंदात नववर्षाचे स्वागत केले जाते देवदेवतांचे, प्रभू श्रीरामचंद्राचे मनोभावे पूजन केले जाते.

सर्वेपि सुखिन: सन्तु। सर्वे सन्तु निरामयह्न।

सर्वे भद्राणि पश्चन्तु। मा कश्चिव दु: भागभवेत।


अशा
सामाजिक राष्ट्रीय प्रार्थनेबरोबर परिवाराच्या सुखाची, आरोग्याची, संपन्नतेची प्रार्थना केली जाते नऊ दिवसश्रीरामकथामृताचेसेवन करून श्रीरामनवमीला मोठ्या थाटात कीर्तनाच्या, भजनाच्या रंगात श्रीरामजन्म साजरा केला जातो.


चारही
पुरुषार्थांतील कर्तव्याचा उपदेश ज्यात आहे, असे कथा स्वरूपातील इतिहास म्हणजे रामायण. इतिहास हा वर्तमानाचा मार्गदर्शक गुरू असतो त्याच्याच पायावर वर्तमान भविष्यकाळाच्या इमारतीचे रेखाकंन करीत असतो. वाल्मिकींनी रामायणाततरुण श्रीरामाचे वर्णन केले आहे. युवा धनुर्धारी श्रीरामाचा आदर्श त्यांनी युवकांसमोर ठेवला आहे. कारण आजचे युवा हे उद्याच्या भविष्याचे शिल्पकार आहेत, आधारस्तंभ आहेत.


श्रीराम
मर्यादापुरुषोत्तम आहेत. श्रीरामांचे यथोचित वर्णन करावयाचे झाल्यास ते आदर्श पुत्र, बंधू, पती, सखा, मित्र, साहाय्यक, लोकशिक्षक, आदर्श मार्गदर्शक, आदर्श शिष्य आणि आदर्श शत्रूसुद्धा. श्रीराम म्हणजे साक्षात धर्मच. धर्म, कर्म आणि कर्तव्य यांचा अपूर्व त्रिवेणी संगम त्यांच्या जीवनात आढळतो. असा हा चारित्र्यसंपन्न, धर्मज्ञ, कृतज्ञ, नीतिमान, द़ृढसंकल्पी, बुद्धिमान, सत्यभावी, सर्वभूत हितेश्च, विद्वान, इंद्रियजयी, आत्मवान, वेदवेदांग पारित, सर्वशास्त्रसंपूर्ण तत्त्वज्ञ, साधुत्व . गुणांनी परिपूर्ण असा हा राजा, गंभीरतेत समुद्रासारखा, धैर्याचा मेरू हिमालयासारखा, वीरतेत विष्णूसारखा, क्रोधात काळाग्रीसारखा, क्षमतेत पृथ्वीसारखा आणि दानात कुबेरासारखा. गीतेच्या 16व्या अध्यायात जे 26 गुण सांगितले आहे, त्या सर्व गुणांनी परिपूर्ण असे श्रीरामचंद्राचे चरित्र चारित्र्य आहे.


या
वर्षी येणारी वर्ष प्रतिपदा, नववर्ष त्याबरोबर येणारे श्रीराम नवरात्रोत्सव श्रीरामनवमी उत्सव, अतिशय आनंदाचा, भाग्याचा काळ राहणार आहे आज खर्या अर्थाने.


श्रीरामाच्या
पूजेसाठी आज अयोध्या नटणार आहे. शरयूचा प्रवाह जलसंगीतातून आपला आनंद व्यक्त करीत वाहणार आहे. ह्या मंगल दिनासाठी श्रीराममंदिर निर्माणासाठी, श्रीराम मुक्तिआंदोलनासाठी ज्या ज्या कारसेवकांनी आपले जीवन रामचरणी समर्पित केले, त्या सर्वांचे आत्मेराममयहोणार आहेत. कारण स्वतंत्र भारतात कायद्याचे नियम पाहून सर्वसाक्षी पुराणाच्या सत्यतेचा अग्निपरीक्षा देऊन श्रीरामा, तुम्ही इतक्या दिवसांच्या बंदिवासातून उजळ माथ्याने मोकळे झालात आणि शेवटी सत्याचाच विजय होतो, हे पुन: एकदा सिद्ध झाले. आज तुमच्याच जन्मभूमीवर अयोध्यानगरीत भव्य राममंदिरराष्ट्र मंदिरम्हणून वैभवाने उभे राहणार आहे. अत्यंत खडतर, कष्टप्रद, अनेक रामभक्त अग्निदिव्याच्या बलिदानातून उभारण्यात येणार्या ह्या भव्य मंदिरात तुम्ही ताठ मानेने, तेजस्वितेच्या स्वाभिमानाने प्रवेश करणार आहात. त्याच्या भूमिपूजनाचा अलौकिक, भव्यदिव्य सोहळा पाहूनच मन तृप्त झाले, तर प्रत्यक्ष मंदिराचे पूजन दर्शन झाल्यावर ह्या जीवनाचे सार्थकच होणार आहे आणि म्हणून रामराया, या वर्षी तुझा जन्मोत्सव नवरात्रात अतिशय आनंदाने मंगलमय अशा भक्तिरसाच्या आध्यात्मिक, भावनिक जल्लोशाच्या तरंगात साजरा होणार आहे. अद्भुत आहे हा आनंद.. हे सुख.


राम
रामेति रामेती। रमे रामे मनोरमे।

सहस्रनाम ततुल्य। रामनाम वरानने।


श्रीरामसाधनेचे
पहिले अपत्य म्हणजे स्वानंद. ‘रामह्या शब्दाचा खरा अर्थ हाच आहे. राम = ++ हे तीन वर्ण असूनअग्निबीज, ‘सूर्यबीज, ‘हे चंद्रबीज प्रतीक आहे. सगळी पातके जाळून टाकून शीतलता प्रदान करणारे हे दिव्य नाम आहे. जीवनामध्ये केवळ रामनामाचा जप केला, तरी उद्धाराकरिता कुठेच जावे लागणार नाही. असा हा जीवनाचा सरळ सोपा महामंत्र, पुण्यजपनाम आहे.

रामराया, आज तुझे होणारे पुनरागमन पुन्हा आम्हाला रामराज्य होण्यासाठी आवश्यक असे वैचारिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक, भावनिक, सांघिक संस्कारित शक्ती देवो.

तुझ्या येण्याने माणसाने माणसाशी माणसासम वागण्याचा संस्कार प्राप्त होवो आणि मुखामध्ये तुझे गोड नाम सदैव राहू दे, हाच आशीर्वाद रामराया आम्हा समस्त रामभक्तांना दे.

कल्याणकारी रामराया

रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशंभजे।

रामणाभिहता निशाप्ररचम्। रामाय तस्मै नम:

रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोस्म्य:

रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मा मुद्धर ....

जय श्रीराम