पॅकेजिंग एक व्यावसायिक कला

25 Apr 2021 12:44:55

@विराज नाईक

कोणत्याही उत्पादनाच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे उत्पादन करणार्या कंपन्यांचे उत्पादन विकत घेणारा घटक, म्हणजेच ज्यालाएंड यूजरम्हणतात तो. ही संपूर्ण इंडस्ट्री ही याच घटकाच्या जिवावर चालत असते. आणि इथे महत्त्व येते ते पॅकेजिंगच्या आकर्षकपणाला. आकर्षकपणाबरोबरच यूजर फ्रेंडली पॅकेजिंग हादेखील दिवसेंदिवस महत्त्वाचा घटक बनत चालला आहे.


packaging industry_1 

पॅकेजिंग हा काही मानवाने लावलेला शोध नाही. मानवाने निसर्गातून शिकलेल्या अनेक कलांपैकी एक कला आहे. पक्ष्यांची अंडी, शहाळे किंवा नारळ, सर्व प्रकारची फळे - विशेषत्वाने नारळ, सुपारी, बदाम, काजू, अक्रोड, फणस इत्यादी; याखेरीज संत्र, मोसंबी, चिकू, केळे, द्राक्षे इत्यादी; शिवाय शंख, शिंपले, मोती या गोष्टीदेखील आहेतच.. या सगळ्या उदाहरणांकडे जर एक नजर टाकली, तर आपल्या लक्षात येईल की यात गराला दोन प्रकारचे संरक्षण दिसते - पहिले आहे कठीण सालीचे किंवा टरफलाचे, उदा., नारळ, सुपारी . आणि दुसरे पातळ किंवा नाजूक सालीचे उदा., संत्रे, केळे .

पॅकेजिंग इंडस्ट्री ही आजच्या काळातील एक महत्त्वाची आणि रोजच्या जीवनाशी जोडलेली अशी, पण सामान्य जनतेला अपरिचित अशी इंडस्ट्री आहे. सदर इंडस्ट्रीशी थेट संपर्कात असलेल्या दुव्यांनादेखील, त्यांच्या संपर्कात आलेल्या इंडस्ट्रीच्या डिपार्टमेंटपुरतीच इंडस्ट्रीबद्दलची माहिती मर्यादित असते. क्वचित प्रसंगी त्या डिपार्टमेंटलाही संलग्न असलेल्या आणखी एखाद्या डिपार्टमेंटबद्दल थोडीफार माहिती असू शकते. मुळातच ही इंडस्ट्री अत्यंत गुंतागुंतीच्या पटलाखाली गूढ अशीच आहे. या इंडस्ट्रीत इतके वेगवेगळे घटक आहेत की सामान्य जनांना त्यांची माहिती असणे अशक्य नसले, तरी अत्यंत अवघड आहे. काही वेळेला या इंडस्ट्रीत अनेक वर्षे काढलेल्या व्यक्तीलादेखील आपल्या डिपार्टमेंटबाहेरील डिपार्टमेंटबद्दल फार माहिती असेलच असे नाही आणि त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखेदेखील नाही, इतका हा विषय गहन आहे. आपण या लेखात फ्लेक्झिबल पॅकेजिं संदर्भात विचार करू या.

विविध खाद्यपदार्थांसाठी वापरले जाणारे पाउच (नूडल्स, चहा-कॉफी पावडर, डिटर्जंट पावडर .) किंवा सॅशे (शॅम्पू किंवा तेल) आणि प्लास्टिक बाटलीवरील लेबल्स (शॅम्पू .) किंवा स्लिव्हस (च्यवनप्राश, शॅम्पू .) ही फ्लेक्झिबल पॅकेजिंग या सदरात येतात.

सदर इंडस्ट्रीशी संलग्न असलेले घटक अनेक आहेत. यात प्रमुख म्हणजे विविध उत्पादने बनविणार्या कंपन्या आणि जोडीने त्यांच्या उत्पादनासाठी डिझाइन बनविणार्या ॅड एजन्सीज. हे दोन्ही घटक इंडस्ट्रीचे कस्टमर आहेत. इंडस्ट्रीचे सप्लायर्स हे अतिशय विस्तीर्णपणे पसरलेले आहेत आणि त्यांची यादी मारुतीच्या शेपटाप्रमाणे संपणारी ठरेल. आपण यातील महत्त्वाचे सप्लायर्स बघू. पॅकेजिंग मटेरियलसाठी लागणार्या फिल्म्स, कागद, शाई, अधेसिव्ह्ज, ॅल्युमिनियम फॉइल यासारखा कच्चा माल पुरविणार्यांबरोबरच विविध डिपार्टमेंट्सना लागणारी वेगवेगळी मशीनरी, टूल्स आणि अनंत प्रकारच्या सर्व्हिसेस देणार्या कंपन्या. ही इंडस्ट्री स्वतंत्रपणे स्वत:चे उत्पादन करीत नसून उत्पादने बनविणार्या कंपनीने दिलेल्या ऑर्डरप्रमाणे मालपुरवठा करीत असते. त्यामुळे ही एक सर्व्हिस इंडस्ट्री आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. ही यादी झाली थेट संलग्न असलेल्या घटकांची. या दोन्ही घटकांपेक्षा महत्त्वाचा एक घटक असा आहे, ज्याचा संपर्क थेट येत नसला, तरीही तो घटक वरील सर्व घटकांपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो आणि तो म्हणजे उत्पादन करणार्या कंपन्यांचे उत्पादन विकत घेणारा घटक - म्हणजेच ज्यालाएंड यूजरम्हणतात तो. ही संपूर्ण इंडस्ट्री ही याच घटकाच्या जिवावर चालत असते. आणि इथे महत्त्व येते ते पॅकेजिंगच्या आकर्षकपणाला. आकर्षकपणाबरोबरच यूजर फ्रेंडली पॅकेजिंग हादेखील दिवसेंदिवस महत्त्वाचा घटक बनत चालला आहे.


packaging industry_2  

उत्तम प्रकारचे आणि आकर्षक पॅकेजिंग ही या इंडस्ट्रीची कायमच गरज राहिली आहे. आकर्षक पॅकेजिंग नसतानाच्या काळातजाहिरातहा ग्राहकांना भुलवून उत्पादन खरेदी करायला लावणारा एकमेव पर्याय होता. पॅकेजिंग आकर्षक तर हवेच, त्याचबरोबर पॅकेजिंगच्या आत असलेला पदार्थ जास्त दिवस चांगला टिकून ठेवेल असे असणे हीदेखील एक गरज होती. या दोन्ही गरजा पुरवत पॅकेजिंग इंडस्ट्रीला कलाटणी देणारे वर्ष ठरले 1980-81. खरे तर याआधीही 1975-76च्या दरम्यान खाद्यमसाले बनविणार्या एका कंपनीने हळद, तिखट, धने, मोहरी इत्यादी पदार्थ उत्तम पॅकेजिंगमध्ये बाजारात आणले होते. पण त्यांचा उपक्रम सपशेल फसला, याचे एकमेव कारण ही उत्पादने विकत घेणारा ग्राहकवर्ग, जो जवळजवळ 100% महिलावर्ग होता, त्याची हे पदार्थ विकत घ्यायची सवय. पदार्थ हाताळून, त्यांचा वास घेऊन त्यांचा दर्जा ठरविण्याची सवय असलेल्या ग्राहकवर्गाने या दोन्ही गोष्टी करू देणारे पॅकेजिंग सपशेल नापास ठरविले.

मग 1980-81 साली असे काय घडले, ज्यामुळे या इंडस्ट्रीला कलाटणी मिळाली? या वर्षात दोन अतिशय भिन्न असलेली अशी उत्पादने नव्यानेच बाजारात आली, ज्यांनी या इंडस्ट्रीचे भविष्यच बदलून गेले आणि या इंडस्ट्रीला केवळ एकच दिशा दिली ती उत्कर्षाची. याला या दोन उत्पादनांबरोबरच आणखीन दोन गोष्टी कारणीभूत ठरल्या - एक म्हणजे दूरदर्शनवरून केलेल्या या दोन्ही उत्पादनांच्या दिलखेचक जाहिराती आणि भारतात प्रथमच आलेली रंगीबेरंगी लॅमिनेटेड पॅकेजिंग. यातील एक उत्पादन असे आहे, जे आजही मुलांमध्ये अतिशय आवडीचे आहेच, तसेच या सालानंतरच्या पिढ्यांवरदेखील अजून राज्य करीत आहे.. ते उत्पादन म्हणजेमॅगी नूडल्स’. दुसरे उत्पादन आहेलिरिल साबण’. आकर्षक रंगीबेरंगी पॅकेजिंग आणि दूरदर्शनवरील जाहिराती यांनी या दोन उत्पादनांच्या प्रसारात फार महत्त्वाचा वाटा उचललेला आहे. आणि यानंतर पॅकेजिंग इंडस्ट्रीने मागे वळून बघितलेच नाही...

पॅकेजिंग उद्योगात दोन वेगवेगळ्या स्किल्समध्ये संधी उपलब्ध आहेत. पॅकेजिंग आणि प्रिंटिंग. प्रिंटिंगसाठी देशात डिप्लोमा आणि डिग्री अशा शैक्षणिक संधी उपलब्ध आहेत आणि पॅकेजिंगचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत.

पॅकेजिंग हे क्षेत्र पॅकेजमधील उत्पादनासाठी पॅकेजिंग कसे असायला हवे - म्हणजे पॅकेटच्या तांत्रिक गरजा काय आहेत, आतील उत्पादन आणि उत्पादकाच्या गरजेनुसार किती दिवस चांगले राहील (शेल्फ लाइफ) यावर भर देते. शिवाय ते बाजारात कसे डिस्ट्रिब्यूट केले जाणार, त्या दृष्टीने पॅकेजिंगच्या गरजा आणि आवश्यकता यांचा अभ्यास करते.

प्रिंटिंग हा पॅकेजिंगसाठी एक बेसिक विचार आवश्यक असला, तरीही या इंडस्ट्रीच्या गरजा लक्षात घेऊन त्यात प्रावीण्य मिळविण्यासाठी प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षे घालवावी लागतात. वर्तमानपत्र, मॅगेझीन्स यासारख्या कमर्शियल प्रिंटिंगपेक्षा पॅकेजिंग इंडस्ट्रीत प्रिंटिंगचे ज्ञान हे वेगळ्या प्रकारचे असते आणि त्यासाठी आज तरी देशातच नव्हे, तर जगात कुठलाही कोर्स नाही, इतक्या या इंडस्ट्रीच्या गरजा वेगळ्या आहेत.

कुठलीही कमर्शियल रंगीत छपाई चार रंगांत होते. प्रिंटिंगच्या भाषेत या चार रंगांना Yellow, Magenta, Cyan  आणि Black अशी नावे आहेत. पण पॅकेजिंगमध्ये केवळ या चार रंगांनी छपाई होत नाही. वर सांगितल्याप्रमाणे ही छपाई ज्या फिल्म्सवर केली जाते, त्या फिल्म्स पारदर्शक असल्याने कागदासारखा या छपाईला अपारदर्शक बेस नाही. तो देण्यासाठी थहळींश हादेखील अतिशय महत्त्वाचा रंग म्हणून छपाईसाठी आवश्यक ठरतो. याशिवाय विविध कंपन्यांचे स्वतःचे असे विशेष रंग असतात, जे रंग ही त्या उत्पादनाची ओळख असते - उदा.., कॅडबरी-पर्पल, कोक-लाल, नेस्कॅफे-तपकिरी . आणि हे रंग सर्व पाउचवर सारखेच दिसणे अत्यंत गरजेचे असते, म्हणून वरील पाच रंग सोडून हे रंगदेखील पॅकेजिंगच्या डिझाइनमध्ये वेगळे छापावे लागतात. याखेरीज चंदेरी किंवा सोनेरी चमक आणण्यासाठी डिझाइनच्या गरजेनुसार Silver  किंवा Gold हेदेखील वेगळे छापावे लागतात.

 

packaging industry_3  

आता विचार करू या एंड यूजर या घटकाचा. उत्पादन कुठलेही असले, तरी त्याची भुरळ एकतर लहान मुलांना पडायला हवी किंवा घरातल्या गृहिणीला/स्त्रीला. त्यामुळे उत्पादन कुठलेही असले, तरी या दोन घटकांच्या मनाचा विचार करूनच, जाहिरातींप्रमाणे, पॅकेजिंग डिझाइन बनवले जाते. पॅकेजिंगची रंगसंगती त्यासाठीच अत्यंत आकर्षक हवी आणि मुलांना आणि स्त्रीवर्गाला आकर्षित करण्यासाठीच्या स्कीम्स या चटकन लक्ष जाईल अशा ठिकाणी छापलेल्या असतात. यावरून आपल्या लक्षात येईल की, ‘केवळ मुलांच्या आणि स्त्रियांच्या आवडीच्या म्हणा किंवा गरजेच्या म्हणा, गोष्टींचे पॅकेजिंग जास्त आकर्षक केले जातेअसे म्हणणे चुकीचे ठरते.

वस्तू - मग ती कोणतीही असो, बाजारात विकायची असेल तर ज्या गोष्टी अनिवार्य आहेत, त्यात वस्तूची उपयुक्तता, दर्जा काही प्रमाणात किंमत हे जितके महत्त्वाचे असतात, तितकेच त्या वस्तूचे पॅकेजिंगदेखील महत्त्वाचे असते. गिर्हाइकाला वस्तू नको असताना त्याच्या मनाला भुरळ घालून विकत घ्यायला जे भाग पाडते, ते उत्तम पॅकेजिंग. त्यामुळे ते आकर्षक असायलाच हवे. कोणत्याही दुकानात किंवा मॉलमध्ये सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या उत्पादकांचे एकच उत्पादन शेजारी शेजारी ठेवलेले / मांडलेले असते. अशा वेळीदेखील प्रतिस्पर्ध्याच्या उत्पादनाकडे दुर्लक्ष करून आपले उत्पादन घ्यायला जे भाग पाडते, ते उत्तम पॅकेजिंग. असे पॅकेजिंग निर्माण अथवा तयार करणे ही प्रत्येक पॅकेजिंग कंपनीची अनिवार्यता आहे.

 

पॅकेजिंग क्षेत्रातील माझ्या अनेक गुरूंपैकी एक गुरू, माझ्या पहिल्या पॅकेजिंग कंपनीचे मालक आम्हाला नेहमी सांगायचे, ""Boys! We are in the business of manufacturing 'DUSTBIN FILLERS'. BUT never loose your heart because of that, since it is that dustbin filler which sells the product within.'' त्यांची ही शिकवण मी माझ्या कारकिर्दीत कायमच केंद्रस्थानी ठेवून काम केल्यामुळे मी या क्षेत्रात यशस्वी होऊ शकलो.

 

8097523832

Powered By Sangraha 9.0