पॉवर ‘पॅक’ पितांबरी!

26 Apr 2021 16:49:12

बाजारपेठेतील अनेक उत्पादने त्यांच्या गुणवत्तेइतकेच आकर्षक आणि लक्षवेधी पॅकेजिंगमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरतात. त्यांच्या या वैशिष्ट्यांमुळे ते स्वत:चा ब्रॅण्ड निर्माण करतात. ‘पितांबरीहा असाच एक लोकप्रिय ब्रॅण्ड. पितांबरीचे व्हाइस चेअरमन मार्केटिंग डायरेक्टर परीक्षित प्रभुदेसाई यांची त्यांच्या उत्पादनांच्या पॅकेजिंग धोरणांविषयी जाणून घेणारी विशेष मुलाखत.

pitambari_1  H

आपल्या उत्पादनाकडे ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी पॅकेजिंगची कशी मदत होते?

मार्केटिंगचा अभ्यास करताना 7 ‘P’s of Marketing असा एक विषय येतो. हे सात मझफी म्हणजे 1) प्रॉडक्ट, 2) पॅकेजिंग, 3) प्राइसिंग, 4) पीपल, 5) प्लेस, 6) पोझिशनिंग आणि 7) प्रॉफिट.


मुळात
प्रॉडक्ट चांगलं पाहिजे. प्रॉडक्ट हे जर व्यक्तीचा देह आहे असं मानलं, तर देहाला ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र आणि निवारा अशा तीन मूलभूत गरजा असतात, त्याप्रमाणेच प्रॉडक्टला फॉर्म्युलेशन, पॅकेजिंग आणि प्रमोशन यांची आवश्यकता असते. प्रॉडक्ट हे एक व्यक्तिमत्त्व असतं. विशिष्ट गरजांची पूर्तता करण्यासाठी ते घडवलं जातं. त्यानुसार फॉर्म्युलेशन, पॅकेजिंग आणि प्रमोशन यांमध्ये बदल होत जातो.

पितांबरीची अभिनव आणि दर्जेदार 82 उत्पादनं 162 प्रमाणात म्हणजेच वेगवेगळ्या पॅकेजिंगमध्ये उपलब्ध केली आहेत. याचा फायदा म्हणजे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार आणि परवडणारं उत्पादन विकत घेता येतं.

पितांबरी शायनिंग पावडर हे आमचं पहिलं आणि महत्त्वाचं उत्पादन. उत्कृष्ट गुणवत्तेमुळे आणि ग्राहकप्रियतेमुळे बाजारात त्याची नक्कल करणार्या उत्पादनांचं प्रमाण खूपच वाढलं होतं. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी आम्ही पितांबरी शायनिंग पावडरच्या गुणवैशिष्ट्यांमध्ये, त्याचबरोबरच पॅकेजिंगमध्ये बदल करीत गेलो. पूर्वी फक्त तांबं-पितळ चमकवणारी पितांबरी शायनिंग पावडर आज तांबं, पितळ, स्टेनलेस स्टील, लोखंड, ॅल्युमिनियम, चांदी अशा 6 धातूंनाही अधिक चमक देऊन लख्ख करण्याचं काम प्रभावीपणे करते. हे दर्शवणारे सर्व घटक पॅकेजिंगवर स्पष्टपणे दिसून येतील. त्यामुळे फसवणुकीची शक्यता अजिबात उरत नाही. मटेरियलबाबत सांगायचं झालं, तर आम्ही आमच्या ज्या ज्या उत्पादनांसाठी बाटल्यांचा वापर करतो, त्या बाटल्यांची डिझाइन्ससुद्धा कॉपीराईट, ट्रेडमार्क करून घेतो, जेणेकरून ग्राहकांची फसवणूक होणार नाही. त्यामुळे पितांबरी उत्पादनांवरील ग्राहकांचा विश्वास आणि लोकप्रियता आजवर टिकून आहे. अशा प्रकारे आमच्या दुकानात आलेला 60 टक्के खरेदीदार हा पितांबरीचा कायमस्वरूपी ग्राहक बनला आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो.

याव्यतिरिक्त उत्तम आणि आकर्षक पॅकेजिंगचे तुमच्या मते, अन्य कोणते निकष असतात?

चवीतील नावीन्य, पॅकेजिंगपासून ते उत्पादन देण्याच्या वेळेपर्यंत लोकांच्या विविध मागण्या असतात. त्या आपल्याला पूर्ण करता आल्या पाहिजेत. सद्य:स्थितीत मार्केटमध्येपॅकेजिंग टू सेल्सयावर विश्वास ठेवून आवरणाबाबत (पॅकेजिंगबाबत) विविध प्रयोग केले जात आहेत. पण बाजारात काही आपण एकटेच वस्तू विकत नसतो. आपल्या प्रयत्नांना बाधा आणणारे स्पर्धकही आपल्याला खोडून काढण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे जाहिरातींच्या गच्च गर्दीतून आपल्या उत्पादनाकडे ग्राहकाचं लक्ष वेधून घेण्यासाठी पितांबरीने चतु:सूत्रीचा अवलंब केला आहे, ती म्हणजे 1) Attention, 2) Interest, 3) Desire, 4) Action. उत्पादनावर ग्राहकाचं लक्ष गेलं, तरी त्याला तुमचं उत्पादन बघावं असं वाटण्याइतपत कुतूहल त्याच्यात निर्माण झालं पाहिजे. या कुतूहलापोटी त्याने तुमचं उत्पादन वाचून त्याच्या मनात ते विकत घेण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे आणि शेवटी तुमचं पॅकेजिंग इतकं प्रभावी हवं की ग्राहकाने तुमचं उत्पादन दुकानात जाऊन किंवा ऑनलाइन खरेदी केलं पाहिजे आणि त्याने जर तुमचं उत्पादन पुन्हा खरेदी करावयास हवं असेल, तर तुमचं उत्पादन वापरल्याने त्याचं समाधान झालं पाहिजे.

 
pitambari_1  H

प्रॉडक्टचं डिझायनिंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे. डिझायनिंगबरोबरच ग्राहकाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आकर्षक फाँटमध्ये तयार केलेलं उत्पादनाचं नाव, त्याबरोबरच तुमचं प्रॉडक्ट कशासाठी आहे? म्हणजेच त्याची उपयुक्तता काय? हे ग्राहकाला कळण्यासाठी आवश्यक चित्रं किंवा इमेज दर्शनी भागावर असणं आवश्यक असतं. उदा., पितांबरी शायनिंग पावडरच्या पॅकवर तांब्यापितळ्यासह स्टेनलेस स्टील, लोखंड, ॅल्युमिनियम, चांदी या 6 धातूंची भांडी दिसतात. रुचियाना लाइम सॉसच्या बाटलीवर ताज्या लिंबाचा फोटो .

 

त्याबरोबरच पॅकेजिंगवर उत्पादनातील घटक पदार्थ, गुणधर्म, उत्पादकाचं नाव, प्रमाण किंवा वजन, किंमत, उत्पादन वापरण्याबाबत थोडक्यात सूचना, उत्पादन तारीख, वापराचा कालावधी . तपशिलाचं लेबल कायदेशीर निकषांनुसार पॅकेजिंगवर छापलेलं असतं, ज्यामुळे ग्राहकाला उत्पादनाची गुणवत्ता समजते त्यांची फसवणूकही होत नाही.

हे सर्व साधण्यासाठी पॅकेजिंगवरील मजकूर कॉपी किंवा मेसेज सर्वात महत्त्वाचा घटक असतो. हा मजकूर ‘Attention to Action’  ही मालिका घडवून आणण्यास जबाबदार असतो. उदा. पितांबरी जॅगरी पावडरच्या बाह्य आवरणावरनो केमिकल जॅगरी पावडरअसं ठळकपणे लिहिलं आहे. शिवाय ती वापरण्याची कारणं या मजकुरात दिली आहे. जे ग्राहक चिकित्सक असतात आणि वस्तू वापरण्यापूर्वी त्याची कारणं जाणून घेऊ इच्छितात, अशा ग्राहकांना असा मजकूर आकर्षित करतो.

याबरोबरच आपलं उत्पादन खरेदीदाराच्या डोळ्यांसमोर राहण्यासाठी विक्रीच्या ठिकाणी सातत्याने असावं लागतं. त्यासाठी पॅकेजिंगसाठी नवनवीन डिझाइन्स करणं, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य तो उपयोग करणं आणि योग्य मटेरियल निवडण्यापासून ते पॅकेजिंग टिकाऊ होईल या दृष्टीने विविध गोष्टी कराव्या लागतात. याबाबत सांगायचं झालं, तर रुचियाना जॅगरी पावडरच्या पॅकिंगचा काही भाग आम्ही पारदर्शक ठेवला आहे. त्यामुळे आतील गूळ पावडरचा रंगही तुम्हाला स्पष्टपणे दिसतो. आकर्षक पॅकेजिंग असलेल्या उत्पादनावर सहज नजर पडली, तरी ती वस्तू आपल्या डोळ्यात भरते.

उत्पादनाचा प्रकार, वापर, वापराचा कालावधी, वापरकर्ता अशा वेगवेगळ्या निकषांनुसार पॅकेजिंगसाठी वापरलेलं साहित्य हे योग्य गुणवत्तेचं असणं आवश्यक असतं. उत्पादन केंद्रापासून प्रत्यक्ष ग्राहकाच्या हाती पोहोचेपर्यंत वाहतुकीत, हाताळणीत आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या साठवणीत ते सुरक्षित राहणं अत्यंत महत्त्वाचं असतं. उदा., क्युअरऑनसारखी औषधं किंवा अरिशक्ती, सप्तशक्ती अशी आमची खाद्यतेलं अशा द्रव स्वरूपातील उत्पादनांची वाहतूक करताना त्याची गळती होऊ नये यासाठी उत्तम प्रतीच्या प्लास्टिक बाटल्या, कार्टन .ची काळजी घ्यावी लागते. तसंच सुरुवातीला आम्ही रुचियाना गुळाची ढेप तयार करत होतो, तेव्हा प्रवासात उष्णतेमुळे ढेप पाघळण्याचे प्रकार होत होते. योग्य प्रकारचं पॅकेजिंग असेल, तर संबंधित उत्पादन आर्द्रतेपासून, हवेतील वायूपासून संरक्षित राहतं. त्याचं स्वरूप, चव, शेल्फ लाइफ, गुणवत्ता कायम राखली जाते. त्याचा फायदा उत्पादकाला मिळतो.

 
pitambari_2  H  

मोठ्या प्रमाणात मालाची वाहतूक करताना मालाची चढ-उतार करणार्या कर्मचार्यांचा विचार करून त्याप्रमाणेही बल्क पॅकिंगचा आकार मटेरियल ठरवावं लागतं.

उत्पादनाच्या गुणवत्तेसाठी आयएसओ, एचएसीसीपी मानकाप्रमाणे आपल्या उत्पादनाची आणि पॅकेजिंगची गुणवत्ता असावी. त्यानुसारच आपल्या उत्पादनाला ग्राहकाची पसंती मिळते.

वेगवेगळ्या प्रकारचं पॅकेजिंग वापरण्यामागे ग्राहकांच्या मानसशास्त्राचा, अपेक्षित ग्राहकांच्या वयोगटाचा कशा प्रकारे विचार केला आहे?

पितांबरीने नेहमीच आपली उत्पादनं बाजारात आणताना गुणवत्ता ते पॅकेजिंगपर्यंत प्रत्येक गोष्टीत ग्राहकांचा दृष्टीकोन जाणून घेतला आहे. ग्राहकाच्या मानसशास्त्रावर त्याच्या आवडीनिवडी, क्रयप्रेरणा, गरजा, सामाजिक स्थिती, संस्कृती, जीवनविषयक दृष्टीकोन इत्यादी घटकांचा कमी-जास्त प्रमाणात परिणाम होत असतो. त्यामुळेउत्पादन निवडयावरही ग्राहकाच्या मानसशास्त्राचा प्रभाव पडत असतो.

 

मॉल्समध्ये आणि डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये प्रत्येक प्रकारातील 50-60 उत्पादनं असतात. यातून ग्राहकाने आपलं प्रॉडक्ट उचलायला हवं असेल, तर ते त्या सर्व उत्पादनांच्या गर्दीतूनही उठून दिसलं पाहिजे. ग्राहकाच्या नजरेत आणि मनात भरलं पाहिजे. ही निर्णयप्रक्रिया काही सेकंदात होते. यासाठी प्रत्येक प्रॉडक्टचं स्वत:चं एक वैशिष्ट्य पाहिजे. प्रत्येक उत्पादन मी कोण आहे? म्हणजेच माझी उपयुक्तता काय आहे? मी कोणासाठी आहे? माझा ग्राहक कोण आहे? म्हणजेच स्त्री, पुरुष, स्त्री/पुरुष, आर्थिक स्तर (उच्चभ्रू/उच्च मध्यमवर्गीय/मध्यमवर्गीय), वय, वापर . सर्व माहितीच्या आधारे प्रॉडक्ट आणि पॅकेजिंग निश्चित केलं जातं.

 

त्याकरिता पितांबरीचं कोणतही नवीन उत्पादन बाजारात येण्यापूर्वी पितांबरीच्यान्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट’ (एनपीडी) विभागातर्फे त्या उत्पादनाचं सर्वेक्षण करण्यात येतं. या सर्वेक्षणात थेट ग्राहकांशीच संवाद साधून उत्पादनाची संकल्पना, त्याची चव, रंग, गंध याबाबत ग्राहकांच्या मनात काय चाललं आहे, त्यांना काय हवं आहे, त्यांची विचारसरणी कशी आहे हे जाणून घेतलं जातं. त्यापाठोपाठ उत्पादनाचं पॅकेजिंग, त्यावरील माहिती, ब्रँडचं नाव, लोगो आणि किंमत याबाबतही ग्राहकांचा दृष्टीकोन जाणून घेतला जातो. कारण, प्रॉडक्ट आणि पॅकेजिंग या दोन्ही गोष्टी बरोबरीने ग्राहकांच्या मानसिक आणि अंतर्गत बाबींवर परिणाम करतात. व्यक्तीपासून तिचा पोषाख किंवा ही वैशिष्ट्यं जशी वेगळी करता येत नाहीत, तसंच प्रॉडक्ट आणि पॅकेजिंग एकमेकांपासून वेगळं करता येत नाही. या सगळ्या बाबींचा अभ्यास करून त्यानंतरच आमचं अंतिम प्रॉडक्ट बाजारात विक्रीस आणलं जातं.

 

पितांबरीची सगळीच उत्पादनं सर्वच वयोगटांसाठी उपयुक्त आणि कस्टमर फ्रेंडली आहेत. आकार, रंगसंगती, त्यावरील छपाई आकर्षक आहेच, तसंच ती हाताळण्यास सोपी आणि प्रतिमा दर्शक असल्यामुळे हातात घेतल्यानंतर चटकन ओळखू येणारी आहेत. उदा., सणासुदीच्या दिवसातही स्वयंपाकघरात राबणार्या भारतीय गृहिणीचा विचार करून आम्ही गुळाच्या ढेपेला पर्याय म्हणूनरुचियाना गूळ पावडरबाजारात आणली. मुलांना चॉकलेट आवडतं, म्हणून त्यांकरिता चॉकलेट फ्लेवरमधीलजिनीहे हेल्थ ड्रिंक उपलब्ध केलं. सांधेदुखीवरील क्युअरऑन ऑइलला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहता प्रवासातही ते वापरता येण्याकरिताक्युअरऑनहे रोलर स्वरूपातही उपलब्ध केलं.

 
pitambari_2  H

ग्राहकांच्या वस्तूबद्दलच्या अपेक्षा उत्पादित वस्तूंचं स्वरूप यामध्ये नीट सामंजस्य असलं की उत्पादित वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री घडवून आणणंही शक्य होतं. एकूणच ग्राहकाला नेमकं काय हवं, ते ज्याला कळलं आणि देता आलं, तो उत्पादक खर्या अर्थाने यशस्वी असं म्हणता येईल

आपल्या एखाद्या उत्पादनाच्या वैशिष्ट्यपूर्ण पॅकेजिंगमागचा तुम्ही केलेला विचार आणि त्यामुळे ग्राहकांचा त्या उत्पादनाला मिळणारा प्रतिसाद याचं एखादं उदाहरण द्याल का?

खरेदीदार हा नेहमी आपली महत्त्वाची तीव्र गरज प्रथम भागवण्याचा प्रयत्न करत असतो. अशा वेळी एखाद्या उत्पादनाचं कार्य भूमिका पॅकेजिंगवरून त्याच्या चटकन लक्षात आली तर तो लगेच ते उत्पादन खरेदी करतो. पण तसं झालं नाही, तर त्या उत्पादनाला बाजारात तग धरून ठेवण्यास समस्या उद्भवू शकते. पितांबरीसंदर्भात घडलेला एक प्रसंग या ठिकाणी सांगावासा वाटतो. पितांबरीचंदीपशक्तीदिव्याचं तेल पहिल्यांदा बाजारात विक्रीस आणलं, तेव्हा त्यास ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्या वेळेस लक्षात आलं की दीपशक्ती तेलाची बाटली बाजारात उपलब्ध इतर बाटल्यांप्रमाणेच सामान्य दिसत असल्यामुळे बाटली मार्केटमध्ये उठून दिसत नव्हती. गुणवत्तापूर्ण असूनही ती लोकांचं चटकन लक्ष वेधून घेण्यास असमर्थ ठरत होती. शिवाय कमकुवत पॅकेजिंगमुळे अनेकदा बाटली लीकेज होण्याच्या घटनाही घडत होत्या. त्यामुळे आम्ही तातडीने दीपशक्ती तेलाची बाटली बदलण्याचा निर्णय घेतला आणि भारतभरातील सगळ्या ब्रँडच्या बाटल्या एकत्रित आणून त्याचा आकार, हाताळणी याबाबत सखोल अभ्यास करून त्यानंतरच दीपशक्ती तेलाच्या बाटलीचं डिझाइन अंतिम केलं. आज दीपशक्ती तेलाच्या बाटलीला जगभरातून मोठी मागणी आहे.

आकर्षक आणि दर्जेदार पॅकिंगचा उत्पादनाच्या किंमतीवर किती परिणाम होतो?

नक्कीच परिणाम होतो. उत्पादनाच्या एकूण एमआरपीमध्ये 15 ते 20 टक्के पॅकेजिंगचा खर्च समाविष्ट असतो. प्रॉडक्ट पॅकेजिंग हे तीन प्रकारात मोडतं - प्रीमियम, मीडियम आणि लोअर. उत्पादनाचा ग्राहक कोण आहे, त्याची आर्थिक स्थिती, त्याची जीवनशैली या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन वरील तिन्ही प्रकारच्या पॅकेजिंगमध्ये आम्ही उत्पादन उपलब्ध करतो. उदा. पितांबरीचीक्लेंझ पॉवर वॉश’ (KPW) ही रेग्युलर डिटर्जंट पावडर आहे आणिक्लेंझ नॅनो वॉश’ (KNW) प्रीमियम डिटर्जंट पावडरही आम्ही उपलब्ध केली आहे. क्लेंझ पॉवर वॉश ही पाउच स्वरूपात उपलब्ध आहे, तर क्लेंझ नॅनो वॉशसाठी आकर्षक बॉक्स-स्कूपचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हाताळण्यासही ती अधिक सुलभ आहे.

प्रीमियम प्रॉडक्ट उत्पादनाच्या गुणवत्तेत अधिक प्रभावी असल्यामुळे त्याचं पॅकेजिंगही तितकंच आकर्षक असणं अपेक्षित असतं. शिवाय प्रीमियम रेंजची प्रॉडक्ट्स एक्स्पोर्ट केली जातात. जगभरातील 26हून अधिक देशांमध्ये पितांबरीची प्रॉडक्ट्स वितरित केली जातात. त्यामुळे उत्पादन सुरक्षित राहण्यापासून ते त्याची हाताळणी आणि वितरण सोपं जावं, या दृष्टीनेही विचार करावा लागतो. शिवाय जागतिक स्तरावर तेथील ग्राहकांचा दर्जा लक्षात घेऊन उत्पादनाचं पॅकेजिंग गुणवत्तापूर्ण सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रभावी असावं लागतं. त्यामुळे खासकरून प्रीमियम प्रॉडक्ट्सच्या बाबतीत त्याच्या आकर्षक पॅकेजिंगमुळे उत्पादनाच्या किंमतीवर परिणाम झालेला दिसून येतो.

याशिवाय उत्पादनाचं स्वरूप, प्रमाण यानुसार ठरणारा उत्पादन साहित्याचा प्रकार आणि संख्यात्मक विक्री याचाही परिणाम उत्पादनाच्या किंमतीवरती होतो. त्याबरोबरच यंत्राद्वारे मनुष्यबळाच्या आधारे केलं जाणारं पॅकिंग यामध्ये खर्चात निश्चितच फरक होतो. अधिक वेगाने नेमकेपणाने उत्पादनाचं पॅकेजिंग होण्यासाठी यांत्रिकीकरण हा महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे खर्चातही बचत होते.

पॅकेजिंगमुळे तुमच्या उद्योगाशी जोडले जाणारे उद्योग आणि त्यांची वैशिष्ट्यं सांगू शकाल का?

पॅकेजिंगसाठी नवनवीन डिझाइन्स करणं, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणं अशा स्वरूपाचं काम करण्यासाठी आमच्याकडे स्वत:चं क्रिएटिव्ह डिपार्टमेंट आहे. आमच्या सर्व उत्पादनांना आकर्षक स्वरूपाचं पॅकेजिंग करण्यासाठी डिझाइन करण्याचं काम याच विभागामार्फत करण्यात येतं. याशिवाय पॅकेजिंगमध्ये विज्ञान, अभियांत्रिकी विषयाबरोबरीने छपाई, मार्केटिंग, ग्राफिक डिझायनिंग अशा अनेक बाबींसाठी प्रिंटर, मोल्ड डिझाइनर, पॅकेजिंग डिझाइनर, पॅकेजिंग इन्स्टिट्यूट अंतर्गत रिसर्च अँड डेव्हलपमेंट, बॉटलर, लॅमिनेटर्स अशा 5-6 प्रकारच्या लघुउद्योजकांचा समावेश असतो. याची संख्याच सांगायची झाली, तर केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर इतर राज्यांमधील पॅकेजिंग मशीन्ससंदर्भातल्या जवळजवळ 55 ते 56 कंपन्या आणि 360 सप्लायर्स आमच्याशी संलग्न झाले आहेत. या सर्वांशी समन्वय साधणं, तसंच पॅकेजिंग मटेरियलच्या गुणवत्तेची इनहाउस तपासणी करणं यामध्ये आमच्या प्रॉडक्शन, पर्चेस डिपार्टमेंट आणि आर अँड डीमधील तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे.


वस्तू
, पदार्थ दीर्घकाळ टिकावा हाही विचार पॅकेजिंग करताना असतो. मग तो टिकवण्यासाठी Preservatives वापरणं ओघाने आलंच. ती वापरताना ग्राहकाच्या आरोग्यावर होऊ शकणारा परिणाम गृहीत असतो का? ही Preservatives वापरताना कोणत्या Preservativesना तुमची पसंती असते?

सर्वच उत्पादनांमध्ये ते चांगल्या प्रकारे टिकून राहण्यासाठी प्रिझर्व्हेटिव्ह वापरली जातात. भारताच्या अन्न औषध प्रशासनाने प्रिझर्व्हेटिव्हच्या बाबतीत काही मानकं आणि नियमावली घालून दिली आहे. त्यानुसार त्यांनी प्रमाणित केलेली प्रिझर्व्हेटिव्ह्ज वापरणं आमच्यावर बंधनकारक असतं. त्याचं आम्ही काटेकोर पालन करतो. पितांबरीने नेहमीच आपल्या उत्पादनांच्या माध्यमातून ग्राहकांच्या आरोग्य रक्षणास प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे आमच्या विविध उत्पादनांमध्ये नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्हचा वापर करण्याला आमची पसंती असते. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन , मीठ, साखर, व्हिनेगर, सायट्रिक ॅसिड यांचा समावेश असून अशा नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्ह्जमुळे पदार्थ दीर्घकाळ टिकतो, त्यांची पौष्टिकताही वाढते. त्यामुळे ग्राहकाच्या आरोग्याच्या दृष्टीनेही ते लाभदायक ठरतं.

उदा., केळा वेफर्स या आमच्या आगामी उत्पादनाच्या पॅकेजिंगमध्ये आम्ही नायट्रोजनचं फिलिंग करणार आहोत. यामुळे हवेतील आर्द्रतेचा त्याच्यावर परिणाम होणार नाही आणि गुणवत्ता, चव कुरकुरीतपणा 6 महिन्यांपर्यंत टिकून राहू शकेल.

 

जो दिखता है वो बिकता है!’ या उक्तीनुसार आकर्षक असतं तेच पटकन निवडलं जातं. त्यामुळे उत्पादनाच्या यशासाठी पॅकेजिंग हेसुद्धा एक मॅनेजमेंट आहे. योग्य निवड, योग्य बदल, योग्य गुणवत्ता आणि स्वयंचलित तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास उद्योगात परिवर्तन घडू शकेल. गेली 32 वर्षं पितांबरी वेगवगेळ्या राज्यांत आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरसुद्धा उत्पादनांची यशस्वी विक्री करत आहे. व्यवसायवृद्धी करतानाच ग्राहकांना सर्वोत्तम आणि जास्तीत जास्त कसं देता येईल यासाठी पितांबरी सदैव तत्पर आहे. कारणग्राहक हाच देवही पितांबरीची धारणा आहे.

 

मुलाखत : विवेक प्रतिनिधी

 

पितांबरी उत्पादनांच्या अधिक माहितीसाठी संपर्क

 022-67035699/5564, टोल फ्री क्र. : 18001031299
Powered By Sangraha 9.0