स्वत:ची वेगळी ओळख असणारी चव, दर्जेदार उत्पादने आणि पॅकेजिंगसारख्या व्यावसायिक कौशल्यावर दिलेला भर याद्वारे ‘चितळे बंधू’ यांनी स्वत:चा ब्रँड तयार केला आहे. ग्राहकांची मने जिंकण्यासाठी आणि उत्पादनांच्या शेल्फ लाइफसाठी त्यांनी पॅकेजिंगबद्दल केलेला विचार आणि त्याविषयीचे अनुभव सांगणारी ‘चितळे बंधू’चे संचालक इंद्रनील चितळे यांची मुलाखत.

परंपरागत व्यवसाय प्रत्येक पिढीनुरूप वृद्धिंगत होत जातो, बहरत जातो. चितळेंची ही या व्यवसायातील चौथी पिढी आहे. या चौथ्या पिढीने ‘चितळे बंधू’ या ब्रँड नेमला एका नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी नक्की काय ध्येय ठेवले आहे?
इतिहासात डोकावले, तर लक्षात येईल की ‘चितळे’ हे नाव नुसते नाव राहिलेले नसून ती आज महाराष्ट्राची खणखणीत ओळख आहे. आगळ्यावेगळ्या चवीमुळे बाकरवडी आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनांमुळे दुग्धजन्य पदार्थ जनमानसांत विलक्षण लोकप्रिय झालेले आहेत. ग्राहकांच्या या विश्वासाच्या आधारावरच आजवरची आमची वाटचाल झालेली आहे. परंतु आता ‘चितळे बंधू मिठाईवाले’ या उद्योग समूहाचा विस्तार देशभर व्हावा आणि वैविध्यपूर्ण उत्पादनांद्वारे ‘चितळे’ हे नाव सर्वदूर घेऊन जावे, असा आमचा प्रयत्न आहे.
आजही सणावाराला पहिली आठवण येते ती चितळेंचीच. तीच आठवण अगदी दररोज, 365 दिवस यावी असा आमचा आता प्रयत्न असणार आहे. त्यासाठी दररोजच्या वापरात येतील अशी उत्पादनांची एक मोठी मालिकाच आम्ही येत्या काळात सादर करणार आहोत. आजच्या घडीला ‘चितळे’ हा एक ‘सेलिब्रेटी ब्रँड’ निश्चितच आहे. परंतु आता लोकांच्या दैनंदिन वापरामध्ये येतील अशी दर्जेदारी उत्पादनांची मालिका ही आता आमची नवी ओळख असणार आहे. पारंपरिक चौकट भेदून आता सर्व प्रकारची खाद्यसामग्री देऊ शकणारी कंपनी अशी आमची नवीन ओळख प्रस्थापित व्हावी, ही आमची खरी मनीषा आहे. त्याच दृष्टीने आम्ही उत्पादनांची मालिका विस्तारण्यावर आणि त्याच्या प्रभावी वितरणासाठी देशभरात साखळी यंत्रणा निर्माण करण्यावर भर देत आहोत.
परंपरागत मिठाईच्या बरोबरीनेच चव, गुणवत्ता यामध्ये कोणतीही तडजोड न करता चितळे सातत्याने नवनवीन मिठाया, नवनवीन प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये घेऊन येत आहे, या प्रयोगांबद्दल काय सांगाल?
कोणत्याही क्षेत्रात प्रगती करण्यासाठी नावीन्य गरजेचे असतेच. परंपरा ही महत्त्वाची असतेच, परंतु ग्राहकांसमोर नवीन उत्पादनांच्या रूपाने नवीन विचार मांडणे आणि त्याप्रमाणे काळाची पावले ओळखून ब्रँड म्हणून विकसित होत राहणे ही आमची जबाबदारी आहे आणि ते करण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही करत आहोत.
चितळेंनी मराठमोळ्या चवीला सातासमुद्रापलीकडे ओळख मिळवून दिली आहे. या एक्स्पोर्टच्या अनुभवाविषयी माहिती द्या.
एक्स्पोर्ट करताना उत्पादनांच्या शेल्फ लाइफचे भान ठेवणे अत्यावश्यक असते जे आमच्या पॅकेजिंगमध्ये आहे. विविध देशांमध्ये एक्स्पोर्ट करताना प्रत्येक देशाचे नियम वेगवेगळे असतात. या सगळ्याचा समन्वय साधण्यासाठी योग्य यंत्रणा आणि तत्पर टीम असणे खूप गरजेचे आहे. या दोन्हीच्या साथीने गेल्या वर्षभरात डोमेस्टिक मार्केटमध्ये मंदी असतानादेखील एक्स्पोर्टमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
प्रत्येक प्रॉडक्टचे पॅकेजिंग हे त्या प्रॉडक्टच्या प्रकारानुसार ठरते. हे वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजिंग वापरण्यामागे ग्राहकांच्या मानसशास्त्राचा, अपेक्षित वयोगटाचा कशा प्रकारे विचार केला जातो?
कोणत्याही पॅकेजिंगचा विचार करताना आम्ही ग्रूप डिस्कशन, सर्वेक्षण, ग्राहकांची प्रतिक्रिया आणि एकूणच पॅकेजिंगची कार्यक्षमता कशी वाढेल, अशा सर्व बाबींचा अभ्यास करतो. कोणतेही उत्पादन बाजारात आणण्यापूर्वी त्याच्या पॅकेजिंगवर किमान सहा महिने काम चालू असते. त्यामुळे ते उत्पादन बाजारात आणण्यापूर्वी रिसर्च अँड डेव्हलपमेंटपासून ते उत्पादनाचे कम्युनिकेशन, कमर्शियलायझेशन ठरवेपर्यंत किमान दोन वर्षांचा तरी कालावधी लागतो.
याव्यतिरिक्त पॅकेजिंग अधिकाधिक उत्तम आणि आकर्षक करण्यासाठी तुमचे काय निकष आहेत?
मल्टी ब्रँड एन्व्हायर्नमेंटमध्ये उत्पादने आकर्षक दिसणेदेखील खूप गरजेचे आहे. त्यामुळे विविध उत्पादनांच्या गर्दीत आपण उठून दिसतो, ग्राहकांना आपली उत्पादने लक्षात राहतात आणि त्याचा परिणाम खरेदीवर होतो.
पॅकेजिंग करताना पदार्थ दीर्घकाळ टिकावा हादेखील हेतू असतो. यासाठी अनेक preservativesशीदेखील वापरली जातात. ही preservativesशी वापरताना कोणत्या प्रकारच्या preservativesशीना तुमची पसंती असते?
preservativesशीचा वापर जर योग्य प्रकारे केला आणि PPM² level मेंटेन केली, तर ते उपयोगाचे ठरतात. तसेच उत्पादनांच्या कॅटेगरीनुसार त्याला पर्यायदेखील आहेत. त्यामुळे उत्तम पॅकेजिंग आणि रिटॉर्ट प्रोसेसिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादने दीर्घकाळ टिकवता येऊ शकतात.
आपल्या उत्पादनाकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पॅकेजिंगचा कशा प्रकारे उपयोग होतो?
पूर्वी सांगितल्याप्रमाणेच सध्याच्या स्पर्धेच्या युगात सुपरमार्केट्समध्ये, ऑनलाइन मार्केट्समध्ये विविध ब्रँड्सची प्रचंड गर्दी झालेली असताना ग्राहकांना आपले उत्पादन विकत घेण्यास उद्युक्त करण्यासाठी पॅकेजिंग आकर्षक असणे अत्यंत गरजेचे आहे. अशा वेळी तुमचे पॅकेजिंग तुमच्या उत्पादनांचा सेल्समन म्हणून काम करत असते.
आपल्या एखाद्या उत्पादनाच्या वैशिष्ट्यपूर्ण पॅकेजिंगमागे तुम्ही केलेला विचार आणि त्यामुळे ग्राहकांचा त्याला मिळणारा प्रतिसाद यांचे एखादे उदाहरण द्या.
बाजारात नुकतेच आलेले ‘पुरणपोळी’ हे उत्पादन किंवा आमचे ‘रेडी टु ईट गुलाबजाम’ हे याचे उत्तम उदाहरण आहे. पुरणपोळीचे वर्णन तर तुम्ही ‘हीट अँड ईट’ असेच करू शकता, कारण तुम्हाला आमची पुरणपोळी खाण्यासाठी फक्त गरम करण्याची गरज आहे. तसेच ती चार महिन्यापर्यंत टिकते. त्यामुळे या दोन उत्पादनांना आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
पॅकेजिंगमुळे तुमच्या उद्योगाशी जोडले गेलेले इतर उद्योग आणि त्यांची वैशिष्ट्ये सांगू शकाल का?
जेव्हा एखादा उद्योग एखाद्या ठिकाणी सुरू होतो, तेव्हा त्याच्यासह तो अनेक पूरक उद्योगांच्या संधीही वाढवत असतो - उदा., फिल्म सप्लायर, ट्रे सप्लायर, कार्टन सप्लायर, सेकंडरी कार्टन सप्लायर, गॅस सप्लायर, इनग्रेडिएंट सप्लायर, तसेच ट्रान्स्पोर्ट सप्लायर, वेअरहाउसिंग ऑपरेटर इत्यादी अनेक उद्योग बरोबरीने उभे राहत असतात. ह्यात थेट आणि इतर पूरक उद्योग अशा दोन्ही ठिकाणांहून आम्ही रोजगारनिर्मिती करतो.
चितळे बंधू हे नाव सध्या अधिकाधिक automationवर भर देणारे नाव म्हणून प्रसिद्ध आहे. या automationच्या प्रयोगांबद्दल माहिती सांगा आणि या कमीत कमी human touch पॉलिसीचा आणि automationचा productivityच्या दृष्टीने कसा फायदा झाला आहे?
काळानुसार बदल हा स्थायिभाव असतो. परिस्थितीनुसार, गरजेनुसार बदलत राहावे लागते. अन्यथा गुणवत्ता असूनही मागे पडत जाण्याचा धोका असतो. तसेच आपल्या उत्पादनाची गुणवत्ता अन्य कोणत्याही उत्पादनाच्या तुलनेत सरस असली पाहिजे. या बाबतीत आम्ही अतिशय आग्रही आहोत. कारण उत्पादने दर्जेदार असतील तरच ग्राहक पुन्हा पुन्हा खरेदी करण्यासाठी येत राहील. आणि यासाठी उत्पादनाचा वेग वाढणे अतिशय गरजेचे आहे. उदाहरणार्थ, सद्य:स्थितीत आम्ही वीस हजार किलो ‘गुलाबजाम प्रीमिक्स’ दररोज बनवतो. आता यातही वाढ होऊन दररोज चाळीस हजार किलो बनवावे लागेल, इतकी मोठी मागणी आहे. काजूकतली, रेडी टु इट गुलाबजाम, आंबाबर्फी ही सगळी उत्पादने जनमानसांत लोकप्रिय होत असून बाकरवडीच्या बरोबरीने त्यांचीही मोठ्या प्रमाणावर विक्री होते आहे. त्यामुळे झीेर्वीलींर्ळींळीूं वाढण्यासाठी अधिकाधिक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर आमचा भर आहे.
मुलाखत : विवेक प्रतिनिधी