डोंबि(वली) आजोबा

विवेक मराठी    15-May-2021
Total Views |

@तन्वी उमेश अपर्णा पटवारी

मातीत खेळू नकोसहे ऐकण्याच्या वयातमातीशी झाडांशी मैत्री करहे मला डोंबि आजोबांनी शिकवलं. त्यांच्याबरोबर गच्चीत जाऊन झाडांना पाणी घालणं, फुलं काढणं आणि झाड लावणं हे टीव्ही बघण्यापेक्षा कैक पटींनी जास्त आवडणारं होतं. आता वाटतं, ह्या चांगल्या सवयींच्या बिया त्यांनी माझ्यात लहानपणीच रुजवल्या.


dombivali_1  H

झाडाची वाढ होण्यासाठी खत-पाण्याबरोबरच आपलं पूर्ण लक्ष, त्या झाडाबद्दल पूर्ण ज्ञान आणि ते झाड जसं वाढेल त्याच्या कलाकलाने पण योग्य दिशेने त्याला वळवणं हेसुद्धा महत्त्वाचं आहे, हे अगदी लहानपणापासून मला शिकवणारे माझे आजोबा म्हणजेच श्रीपाद वामन उर्फ आबासाहेब पटवारी. ही अशी शिकवण देताना मला त्यांनी ही सवय माणसांशी वागतानाही कधी वापरायला शिकवली, हे मला कळलंच नाही. लहानपणी आजोबा तर दोन्हीकडचे असल्यामुळे मला त्या दोघांनाही काहीतरी खास म्हणायचं असायचं. हे करताना मी ह्या आजोबांचं नाव कायमचंच डोंबि (डोंबिवलीचे) आजोबा असं ठेवलं. पण मी हे खास नाव ठेवायच्या आधीच त्यांनी माझं खूप वेगळंच आणि सुंदर नाव ठेवलं - ‘पांकुर’. आजही हे नाव आठवताना, मला बघून खूश झालेला त्यांचा तो हसरा चेहरा डोळ्यासमोर येतो.

लोकांमध्ये रमणं, त्यांना आपलंसं करून घेणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडून नवीन गोष्टी शिकून घेणं ह्या त्यांच्या अंगभूत कला होत्या. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय ह्या क्षेत्रांत चाललेल्या अनेक घडामोडींचा सखोल अभ्यास करून, त्यावर चर्चा करून, त्यामध्ये आपल्या पातळीवर काही मदत/बदल करू शकतो का, हा त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा. तसंच एखाद्या गोष्टीत प्रभुत्व मिळवायचं असेल, तर मेहनतीबरोबरच ती गोष्ट शिकण्याची एक प्रचंड आस असावी लागते, ती त्यांच्याकडे सतत होती. एखादी गोष्ट साध्य होईपर्यंत त्यात काय काय अडथळे येऊ शकतात आणि ती गोष्ट आपण आणखी कशी वाढवू शकतो/समृद्ध करू शकतो, ह्यावर सतत विचार करणं हा जणू त्यांचा छंदच होता. आपल्याला जे काही येतं, आपण जे काही शिकलो आहोत त्याची समाजाला मदत झाली पाहिजे आणि ती मदत फक्त सुरुवातीलाच करता पुढेही राहिली पाहिजे, ही एक मोठी शिकवण त्यांनी त्यांच्या कामातून दिली.


dombivali_4  H

लहानपणी लावलेल्या सवयी आयुष्यभरासाठी असतात, असं म्हणतात. वयाच्या दुसर्या वर्षापासून मी टेबलाशी बसून सर्वांबरोबर जेवत असे. ताट पूर्ण चौकोनी वाढलेलं असे. ताटात जे आवडी-नावडीचं असेल ते मनापासून खायचं, जितकं जाईल तेवढंच ताटात घ्यायचं आणि एकदा ताटात घेतलेलं टाकायचं नाही ही सवय मला लागली ती त्यांच्या नियमामुळेच. ‘नात आहे ना, मग जाऊ देअसं म्हणण्यापेक्षा त्यांनी ह्यावर लक्ष ठेवलं की मला चांगल्या सवयी कशा लागतील.

लहान असताना घरी माझ्याशी बाकी सगळे मराठीत बोलायचे, पण आजोबा मात्र माझ्याशी नेहमी हिंदीत बोलायचे. मी मुद्दाम मराठीत बोलायला सुरुवात केली, तरी ते मात्र हिंदीतच उत्तर द्यायचे. त्या वेळी, ते नवीन शब्द शिकायला अवघड वाटायचे आणि मनात यायचं कीदोन भाषा कशाला?’ पण आता जेव्हा हिंदीत बोलते, तेव्हा लक्षात येतं की मायबोली जितकी महत्त्वाची, तितकीच राष्ट्रभाषाही महत्त्वाची हे समजावण्याचा तो डोंबि आजोबांचा प्रयत्न असायचा.

जशा त्यांनी मला सवयी आणि नियम लावले, तसेच आमच्या-आमच्यात पुरस्कारही दिले. ते पुरस्कारट्रॉफीस्वरूपात नसायचे, पण त्यांच्या चेहर्यावर दिसणारा तो अभिमान आणि झालेला आनंद ह्या स्वरूपात असायचे. पूर्वी आमच्याकडे गौरी-गणपती असायचे. गौरी जेवणाच्या दिवशीसहस्रावर्तनं असायची. त्या दिवशी नवीन कपडे, घरात खूप माणसं ह्याबरोबरच आणखी एक मोठं आकर्षण असायचं, ते म्हणजे पन्नासेक लोकांसमोर स्पष्ट शब्दात, चुकता अथर्वशीर्ष म्हणायचे आणि आजोबांची शाबासकी घ्यायची. दर वर्षी ह्याची तयारी 1-2 महिने आधीच सुरू व्हायची. कुठेही चुकता मी ते म्हटलं की पूजेला बसलेले आजोबा वळून मला म्हणायचे, “शाब्बास पांकुर.” तो माझ्यासाठी एक पुरस्कारच असायचा. ह्या गोष्टीचा आता विचार केला की लक्षात येतं की तेव्हाच्या त्या गोष्टीचे अनेक फायदे होते. अथर्वशीर्ष पाठ होण्याबरोबरच, ‘रंगमंचाचं दडपणम्हणजे काय हे कळायच्या आतच माझ्यावर असं काही दडपण येत नाही, हे मला कळलं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण एखादी गोष्ट मनापासून केली असेल तर ती वाया जात नाही, ती मेहनत दिसून येतेच, हे कळलं. मोठ्या गोष्टी हाताळायला सोप्या पद्धती ही त्यांची खुबीच म्हणता येईल.


dombivali_3  H

मी शाळेतून आले की पुढची दिनचर्या ठरलेली असायची आणि त्यातगच्चीत जाऊन खेळणंअसा एक आनंदाचा भाग असायचा. ‘मातीत खेळू नकोसहे ऐकण्याच्या वयातमातीशी झाडांशी मैत्री करहे मला डोंबि आजोबांनी शिकवलं. त्यांच्याबरोबर गच्चीत जाऊन झाडांना पाणी घालणं, फुलं काढणं आणि झाड लावणं हे टीव्ही बघण्यापेक्षा कैक पटींनी जास्त आवडणारं होतं. निसर्गात रमून त्यात काम करण्याचा आनंद घेणं मला आजोबांनी शिकवलं. ही शिकवण आनंदाबरोबरच एक महत्त्वाचा धडा देणारी होती, हे आता जेव्हाग्लोबल वॉर्मिंगबद्दल ऐकते, तेव्हा कळतं.

अशा अनेक गोष्टी त्यांनी छोट्या छोट्या पद्धतीने माझ्या आयुष्यात लहानपणापासूनच सुरू केल्या होत्या. आता वाटतं, ह्या चांगल्या सवयींच्या बिया त्यांनी माझ्यात लहानपणीच रुजवल्या. अशा अनेक झाडांचा फायदा मला आज होतोय.

माणसाला एखादी गोष्ट करायला लावायची असेल तर त्या गोष्टीत त्याला रमवणं, आनंदाने गुंतवणं ही त्यांची पद्धत होती. हे फक्त माझ्याबाबतीत मर्यादित नसून आजोबांच्या सहवासात आलेल्या अनेकांनी अनुभवलं असेल, अशी माझी खात्री आहे.

कोणत्याही माणसाबरोबर नेहमीचा सहवास असला की त्याच्या उठण्यापासून झोपण्यापर्यंतच्या सवयींबद्दल आपल्याला माहीत असतं. त्या गोष्टींचा चित्रपट आपल्या आयुष्यात सतत डोक्यात चालू असतो. माझ्यासाठी आता हा चित्रपट फक्त आठवणी म्हणून राहता अनेक शिकवणी, बोधवाक्यं आणि चांगल्या सवयी या रूपांत कायम राहील. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या सहवासात वाढण्याची सोनेरी संधी मला मिळाली, ह्यासाठी मी देवाची कायम आभारी राहीन.

9004994807