वाणीचा योग्य वापर गरजेचा

विवेक मराठी    18-May-2021
Total Views |

@सुहास हिरेमठ

कोरोनाची दुसरी लाट महाप्रलयासारखी थैमान घालत आहे. अशातच आरोग्यसेवेमार्फत काही गोष्टींचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर काही जणांनी उच्च सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिका दाखल केल्या. मा. न्यायाधीशांचा हेतू चांगला असला तरी त्यांच्या व्यक्तव्यांत अविश्वासाचा सूर घुमताना दिसत आहे.

Oxygen Crisis Supreme Cou 

आज आपला देश कोरोना संकटाने ग्रस्त आहे. संपूर्ण देशात अस्वस्थतेचे वातावरण आहे. विशेषतः ही जी दुसरी लाट आली, यात कोणालाही पूर्व कल्पना आलेले ऑक्सिजनच्या अभावाचे फार मोठे संकट आले. त्यामुळे अनेकांचा दुर्दैवी दु:खद मृत्यू झाला, तर त्यांच्या नातेवाइकांना अपार कष्ट मानसिक यातना भोगाव्या लागल्या. त्या सर्वांची भीषण दृश्ये दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवर पाहून हृदय पिळवटून निघत असे. याच काळात काही जणांनी उच्च सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या. ज्यांनी हे केले, त्यापैकी बहुसंख्य मंडळींनी पीडेतून, दु:खातून हे केले आणि ते चूकही नाही. पण या सर्व बाबतीत दोन्ही न्यायालयांच्या मा. न्यायाधीशांचा जो व्यवहार, त्यांच्या प्रतिक्रिया ताशेरे पहिल्या-वाचल्यानंतर मनाला अतिशय वेदना झाल्या. दिल्लीच्या एका उच्च न्यायालयातील सन्माननीय न्यायाधीशद्वयाने असे म्हटले कीमाणसे मरताना आम्ही पाहू शकत नाही.” हे तर कोणीच पाहू शकत नाही, पण याचा अर्थ हा आहे का की केंद्रातील राज्यातील सरकारमधील सत्ताधारी प्रमुख प्रशासनातील अधिकारी हातावर हात ठेवून शांतपणे सर्व बघत बसले आहेत. प्रसारमाध्यमातील (छापील इलेक्ट्रॉनिक) बातम्या वाचणारे आणि पाहणारे अशा सर्वांनी पाहिले आहे की सर्व जण युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. अविश्रांत परिश्रम करीत आहेत. केंद्र सरकारने सर्व मार्गांनी ऑक्सिजन मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. रेल्वे, सेनेची तिन्ही दले यासाठी अखंड काम करीत आहेत. देशातील मोठमोठ्या उद्योगपतींना आवाहन करून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तयार करण्यास प्रेरित केले आहे, जगातील अनेक देशांशी संपर्क साधून तेथूनही ऑक्सिजन औषधे मागविण्याची योजना केली आहे. त्याची कार्यवाहीदेखील चालू झाली आहे आणि याव्यतिरिक्त राज्यांनी, महानगरपालिकांनीदेखील युद्धपातळीवर या विषयात काम चालविले आहे. ही सर्व मंडळी एवढे अविश्रांत परिश्रम करीत असूनही याच सन्माननीय न्यायाधीशद्वयाचे दुसरे वाक्य आहे कीतुम्ही हस्तिदंती मनोर्यात बसून आहात.” ज्यांना उद्देशून आपण बोलत आहोत, त्यांना तेथील मतदारांनी प्रचंड बहुमतांनी निवडून दिले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपवाद वगळता बाकी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री जनतेतून निवडून आले आहेत. केंद्रातील सरकारही दुसर्यांदा प्रचंड बहुमताने निवडून आले आहे. तेव्हा अशा बोलण्यामुळे ते मतदार नाराज होणार नाहीत का? दिल्लीतील दुसर्या उच्च न्यायालयाच्या सन्माननीय महिला न्यायाधीशांनी म्हटले की, “माणसे मरावीत हीच तुमची इच्छा दिसते.” (त्यांचे इंग्लिशमधले शब्द काय आहेत हे मला माहीत नाही. येथील मराठी वृत्तपत्रात जे छापून आले ते मी लिहिले आहे.) हे किती भयंकर वेदना देणारे वाक्य आहे? मद्रास उच्च न्यायालयातील सन्माननीय न्यायाधीशांनी निवडणूक आयोगाला म्हटले, “तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल केला पाहिजे.” निवडणुकीमुळे जर कोरोना वाढत असेल, तर मग ज्या राज्यात कोरोना सर्वाधिक वाढला आहे अशा दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र . राज्यांत निवडणुका नाहीत. अर्थात तरीही कोरोनावाढीच्या धोक्यापासून समाजाला वाचविले पाहिजे, यात काही दुमत नाही, पण ज्या भाषेत माननीय न्यायाधीश महोदय बोलले, ते ऐकून धक्काच बसतो. आयोगाची मंडळी सर्वोच्च न्यायालयात गेली, तर तेथील सन्माननीय न्यायाधीशांनी म्हटले कीतुम्ही त्या शब्दामागचा भाव पाहा.” हा भाव कदाचित आयोगाचे लोक समजतील, पण देशातील सर्वसामान्य नागरिक जे वृत्तपत्रातून फक्त शब्द वाचतात आणि दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांच्या बातम्यातून ऐकतात, त्यांना हा भाव कसा समजणार? फक्त शब्दच त्यांच्या लक्षात राहणार.

याचप्रमाणे सन्माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशात काही मोठ्या शहरांत लॉकडाउन लागू करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. त्याविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या सन्माननीय न्यायमूर्तींनी उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला हा निर्णय त्या त्या सरकारनेच घ्यायचा आहे असे म्हटले. हे धोरण सर्व बाबतीत लागू व्हावे, असे वाटते.

या सर्व माननीय न्यायाधीश महोदयांचा हेतू चांगलाच आहे, पण त्यांच्या वक्तव्यातून पंतप्रधानांपासून ते गावच्या सरपंचापर्यंत एक प्रकारचा अविश्वास जाणवतो. यांनीच जर असा अविश्वास व्यक्त केला, तर सामान्य नागरिक काय करतील? भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे - ‘यद यद् आचरती श्रेष्ठ: ततदेवेतरोजना:!!’ हेच संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत सांगितले आहे - ‘येथ वडिल जे जे करिती, तया नाम धर्म ठेविती॥मला माहीत आहे की मी लहान तोंडी मोठा घास घेत आहे, पण आजच्या परिस्थितीत आपले सर्व प्रकारचे मतभेद दूर ठेवून या प्रचंड संकटातून समाजाला, देशाला वाचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच तळमळीतून मी हे लिहिले आहे. सुज्ञांनी याचा विचार करावा, एवढीच अपेक्षा.