समाजात स्नेह निर्माण करणारे स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी

26 May 2021 13:39:52

@उत्तरा मोने 

वैयक्तिक
स्वार्थासाठी जगणार्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही सामाजिक स्वार्थासाठी झोकून देऊन काम करत आहेत. ‘स्नेहालयया संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी हे त्यापैकीच एक. स्नेहालय या त्यांच्या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालयचा संपूर्ण परिवार करताना दिसत आहे. गिरीश कुलकर्णी यांनी सुरू केलेल्या या छोट्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे आणि केवळ एक व्यक्ती नाही, तर संस्थेतच मोठी झालेली मुलंच आज या संस्थेचं कार्य पुढे नेत आहेत, हा एक महत्त्वाचा दुवा आहे.


girish_1  H x W

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणार्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही सामाजिक स्वार्थासाठी झोकून देऊन काम करत आहेत. ‘स्नेहालयया संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी हे त्यापैकीच एक. गेली 32 वर्षंस्नेहालयवंचित महिला बालकांसाठी कार्यरत आहे. देहविक्रय करणार्या स्त्रिया, कखत पॉझिटिव्ह रुग्ण आणि त्यांची मुलं यांच्यासाठी त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

एकदा एका वेश्यावस्तीत राहणार्या मित्राकडे गेल्यानंतर तिथली परिस्थिती पाहून 19 वर्षांचा हा युवक अस्वस्थ होतो.. त्या स्त्रियांच्या जागी आपली आई, बहीण असती तर आपण काय केलं असतं असा प्रश्न पडतो, म्हणून या स्त्रियांबद्दल कणव, सहानुभूती असणार्या समवयस्कांना सोबत घेऊन त्याचा प्रवास सुरू होतो.. तो आजवर सुरूच आहे. डॉ. गिरीश कुलकर्णींनी 1989 साली सुरू केलेल्यास्नेहालयचा व्याप आज प्रचंड वाढलाय. ‘डोळ्यात केर आणि कानात फुंकरहा प्रकार या संस्थेला मान्य नाही. त्यामुळे लांब राहून उपदेश करण्यापेक्षा जिथे प्रत्यक्ष देहव्यापार होतो अशा वस्त्यांमध्ये स्नेहालयची कार्यालयं आहेत. विशेष म्हणजे संस्थेला गिरीश कुलकर्णीचं नव्हे, तर स्नेहाचा धागा जपणार्या कार्यकर्त्यांचं स्नेहालय म्हणून ओळखलं जातं. व्यक्तीपेक्षा संस्था आणि संस्थेचं काम मोठं हा तिथे सार्यांचाच नारा आहे.

डॉ. गिरीश कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी ज्या विषयाला भिडून गेली 32 वर्षं काम करत आहेत, तो विषय साधा नाही. जे दृश्य पाहून आपण नजर दुसरीकडे फिरवतो आणि त्याबद्दल काही ऐकू आलं तरी ऐकल्यासारखं करतो, त्या स्थितीशी कधी दोन हात करत, कधी तडजोड करत आणि बहुतेक वेळा तिच्याबरोबर राहत ही मंडळी काम करत आहेत.


girish_2  H x W

वेश्याव्यवसायात असणार्‍या महिलांना मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न

आज स्नेहालयच्या हितचिंतकांमध्ये एस.एन. सुब्बाराव, डॉ. निकोलस नोबेल, डॉ. मार्सिया वॉरेन, आमिर खान, अण्णा हजारे, डॉ. विकास आमटे, पोपटराव पवार, मामा कौंडिण्य या मान्यवरांसह 40,000हून अधिक व्यक्तींचा समावेश आहे. लोकसहभागातून मदत उभी राहिली, तसतशी पीडित महिलांची आणि मुलांची संख्याही वाढली. आजवर स्नेहालयने नगरमधील 18 वर्षांखालील 2000हून अधिक वेश्या, त्यांची मुलं, पुरुष यांना आरोग्य सेवा पुरवली आहे, तर अवैध मानवी वाहतुकीतून वेश्याव्यवसायात आणल्या जाणार्या 50हून अधिक स्त्रियांचं आयुष्य बरबाद होण्यापासून वाचवलंय. Adoption centerमुळे स्त्री-भ्रूणहत्येचं प्रमाणही कमी होतंय.

 

गिरीश कुलकर्णींनी आवड आणि परिस्थितीची गरज म्हणून पत्रकारितेची पदवी, व्यवस्थापन क्षेत्रातील मास्टर्स डिग्री मिळवली आहे. कामगार कायद्याचाही त्यांनी अभ्यास केला आणि अथक परिश्रमातून समाजविज्ञान राज्यशास्त्रात डॉक्टरेटही मिळवली. अहमदनगरच्या सारडा कॉलेजमध्ये ते राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. या प्रवासात त्यांना त्यांच्या भावाची आणि पत्नी प्राजक्ताची मोलाची साथ मिळाली.

गिरीश सरांच्याच शब्दात मांडायचं झालं तर Leader is not a person who can perform better than his people but leader is person who inspire his people to perform better than himself. समाजाची गरज म्हणून निर्माण झालेल्या स्नेहालयच्या एकेका उपक्रमाविषयी जाणून घेताना आपण अचंबित होतो. एक एक प्रकल्पाला भेट देऊन तिथल्या आठवणी ऐकताना मन हेलावून जातं.

सर्वोत्कृष्ट चाइल्डलाइन

स्त्रियांना आणि लहान मुलांना मदत करता यावी, म्हणून 1996 सालापासून सुरू केलेल्या हेल्पलाइनचं रूपांतर 2003 साली लहळश्रव श्रळपशमध्ये करण्यात आलं. भारतात 92 शहरांत असलेल्या लहळश्रव श्रळपशपैकी अहमदनगर लहळश्रवश्रळपश सर्वोत्तम मानली जाते. सहकारी सहयोगातून चालणार्या या संस्थेचं स्वरूप मात्र अजिबात सरकारी पद्धतीचं नाही, तर ते एका लोक चळवळीचं आहे. दररोज सुमारे 50हून जास्त बालकांचे फोन घेतले जातात. बाल कामगारांची मुक्तता, कर्करोग, हृदयरोग, लैंगिक शोषण इत्यादी विषयांवर स्नेहालयच्या लहळश्रवश्रळपशची आजवर अनेकांना मदत झाली आहे. त्यात पुन्हा रात्र, सण-वार, ऊन-पाऊस असले अडथळे टीम चाइल्डलाइनला थांबवू शकत नाहीत. देशभर गाजलेलं 14 ते 15 वर्षांच्या बालिकांच्या बाजारू लैंगिक शोषणाचं प्रकरण लहळश्रवश्रळपशद्वारेच 2006मध्ये उघडकीस आणलं गेलं. आरोपींना अटक करण्यात, बळी बालिकांचं पुनर्वसन करण्यात, बळींना सहकुटुंब संरक्षण देण्यात उपक्रमाची महत्त्वाची भूमिका होती.

स्नेहांकुर

नगरच्या सिद्धी बागेजवळ कुत्र्यांनी हाता-पायाचे लचके तोडलेलं बाळ असल्याचा स्नेहालयच्या कार्यालयात फोन आला आणि स्नेहांकुर या प्रकल्पाची सुरुवात झाली. स्नेहांकुरमध्ये अनाथ, बेवारस कुमारी मातांच्या बालकांना आधार दिला जातो. आजही स्नेहालयच्या द्वाराशी ठेवलेली, कचराकुंडीत, उघड्यावर टाकून दिलेली बालकं सापडतात. स्नेहांकुरमधील बालकांना कायदेशीररित्या दत्तक देण्यात येऊन त्यांना चांगलं आयुष्य देण्याचाही प्रयत्न केला जातो. आज इथली अनेक मुलं केवळ महाराष्ट्रात, भारतातच नाही, तर परदेशातही दत्तक दिली जातात आणि एक उत्तम आयुष्य जगतात.

बालभवन

लालटाकी, रामवाडी, संजयनगर, बोरकर नगर, मुकुंदनगर यासारख्या नगरच्या झोपडपट्टीतील भागात (2003पासून) स्नेहालयबालभवनहा उपक्रम चालवते. बालकांचे आरोग्य, शिक्षण महिला सक्षमीकरण यावर बालभवनचा भर असतो. पाठ्यपुस्तकातील शिक्षणाबरोबर कपडे आणि शिवणकाम, फॅशन डिझायनिंग यासारखे व्होकेशनल प्रोग्राम्स शिकवले जातात. आजवर बालभवनमुळे झोपडपट्टीतील 900हून जास्त बालकांना प्राथमिक शिक्षणाची संधी मिळाली आहे. 1375 शाळाबाह्य बालकांना बालभवनने नगरमधील विविध शाळांमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. प्रत्येक ठिकाणी महिला बचत गट स्थापन केल्याने सावकारांच्या तावडीतून गरीब परिवारांची सुटका झाली आहे. सामाजिक ऐक्य, बालविवाहाची कुप्रथा, आरोग्याची काळजी, व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम यासारख्या विषयांवरही जागृती केली जाते.

आयटी सेंटर

युवक-युवतींना स्वत:च्या पायावर उभं राहण्यास मदत करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विषयाचे तीन अभ्यासक्रम स्नेहालयच्याखढतर्फे चालवले जातात. युवकांमध्ये सामूहिक श्रम, देश समाजासाठी समर्पण या भावना रुजवण्यासाठी 2006 सालापासून वर्षांतून दोनदा श्रमसंस्कार छावणी आयोजित केली जाते. अण्णा हजारे, मॅगसेसे पुरस्कारप्राप्त रजनीकांत आरोळे, डॉ. प्रकाश आमटे अशा मान्यवरांना मार्गदर्शनासाठी बोलावलं जातं.

एचआयव्ही मार्गदर्शन केंद्रस्पृहा

सुमारे 2500 कखत पॉझिटिव्ह रुग्णांना स्पृहा समुदाय केंद्राने मनोबल, मोफत उपचार दिले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांबरोबर काम करताना भीती नाही वाटत? असं विचारलं असता कार्यकर्ते उत्तरतात, जाळातच काम करायचं ठरल्यावर, आगीच्या भीतीने कशाला पळायचं? त्यांचा हाच पॉझिटिव्ह दृष्टीकोन आज अनेकांना प्रेरणा आणि नवजीवन देत आहे. स्नेहालयचे कार्यकर्ते अनियमित औषधं घेणार्या पुढच्या औषधांचे डोस घेऊन जाणार्या रुग्णांचा शोध घेतात आणि त्यांना औषधं वेळेवर घेण्यास प्रवृत्त करतात. एचआयव्हीग्रस्तांना आत्मविश्वास मिळवून देण्यात आणि त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळवून देण्यातस्पृहामहत्त्वाची कामगिरी बजावते.

एचआयव्ही-एड्सग्रस्त अनेक मुलं आज स्नेहालयमध्ये आनंदाचं आयुष्य जगत आहेत. आज स्नेहालयमुळे नगरमधील 18 वर्षांखालील मुलींना वेश्याव्यवसायातून बाहेर काढण्यात यश आलंय. अवेिींळेप लशपींशीमुळे स्त्री-भ्रूणहत्येचं प्रमाणही कमी होतंय.

आमिर खानच्यासत्यमेव जयतेमुळे आलेल्या पैशांतून अद्ययावत असे एकावेळी एक हजार जण जेवू शकतील एवढं भोजनालय आणि ऑफिस अशी एक भव्य इमारत बांधली गेली आहे. आवारातच इंग्लिश मीडियम शाळा आहे. ‘स्नेहालयची मुलं तर तेथे शिकतातच, शिवाय गावातून झोपडपट्टीतील मुलं शाळेच्या बसने आणली जातात. सर्वांना शिक्षण मोफत. तेथेच कखत+साठी हॉस्पिटल आहे. तेथे बारा बेड्सची सोय आहे. जवळच सत्तर बेड्सचं हॉस्पिटल आहे. तेथे कखत+साठीचे उपचार मोफत केले जातात. त्यांना काही औषधं नियमित घ्यावी लागतात, तीदेखील मोफत मिळतात.

हिम्मतग्राम

वेश्याव्यवसाय सोडण्याची इच्छा असलेल्या स्त्रियांना या संस्थेच्या रूपाने आशेचा किरण सापडला आहे. या व्यवसायातून अनेक जणी बाहेर पडल्या आहेत. काहींनी शिक्षण पूर्ण केलं आहे. काही जणी शिवणकाम किंवा नर्सिंग यासारखे कोर्सेस करून स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. काहींची लग्न झाली आहेत. अशा स्त्रियांच्या मदतीनेस्नेहालयच्या कार्यकर्त्यांनी नगरजवळच हिसळक या गावी 25 एकर परिसरात उभं केलेलं आशास्थान म्हणजेहिम्मतग्राम’. इथे निवासी संकुल, रुग्णालय, शाळा, सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा मानस आहे. वेश्यांच्या पुनर्वसनामधलं एक महत्त्वाचं पाऊल ठरावं असं हेमॉडेल व्हिलेजआहे.

स्नेहालयने पुढाकार घेऊन 400पेक्षा जास्त आंदोलनं करून सुस्त पोलीस, राजकारणी यांना विधायक पावलं उचलण्यास भाग पाडलं आहे. केवळ दुर्लक्षित महिला किंवा मुलंच नाहीत, तर दिव्यांग व्यक्तींसाठीही स्नेहालयने काम उभं केलं आहे. आजवर लाभलेले कार्यकर्ते हेच स्नेहालयची खरी संपत्ती आहे आणि या संपत्तीच्या बळावरस्नेहालयनेआपलं विश्व उभारलं आहे.

तमसो मा ज्योतिर्गमयहे स्नेहालयचं ब्रीदवाक्य जपत आज अनेक विद्यार्थी अंधारातून प्रकाशाकडे झेपावत आहेत. कुणी उठझऋ मध्ये, तर कुणी इअडऋमध्ये गेलंय. कुणी शिक्षक होऊन चांगली पिढी घडवण्याचा विडा उचललाय, तर संतोष सूर्यवंशीसारखे छोटे दोस्तही लहळश्रवश्रळपशसारख्या इतर उपक्रमांत आपला हातभार लावत आहेत. अंध व्यक्तींसाठीअनाम प्रेमहा नवा प्रकल्प उभा राहिला आहे. स्नेहालयच्या या मुलांपैकी कुणाला खेळात नाव कमवायचंय, तर कुणाला इंजीनिअर व्हायचंय..

मुळात या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालयचा संपूर्ण परिवार करताना दिसत आहे. गिरीश कुलकर्णी यांनी सुरू केलेल्या या छोट्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे आणि केवळ एक व्यक्ती नाही, तर संस्थेतच मोठी झालेली मुलंच आज या संस्थेचं कार्य पुढे नेत आहेत, हा एक महत्त्वाचा दुवा आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी करता करता, समाजासाठी काम करणार्या लोकांना घडवण्याचं काम आज डॉ. गिरीश कुलकर्णी करत आहेत. त्यांच्या पंखात सदैव बळ राहो हीच सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करावीशी वाटते.


Powered By Sangraha 9.0