‘दहशतवाद’ म्हणजे काय?

विवेक मराठी    27-May-2021   
Total Views |

@ रुपाली कुळकर्णी-भुसारी

भीतीकिंवादहशतहे साधन म्हणून वापरून त्याद्वारे आपले साध्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे दहशतवाद. ‘दहशतवादआणिआत्मघातकी दहशतवादअसे हे ठळक प्रकार दिसून येतात. तसेच दहशतवाद हा प्रामुख्याने धार्मिक आणि राजकीय कारणाने फोफावताना दिसतो. दहशतवादी संघटना युवकांसह स्त्रिया आणि लहान मुलांचाही गैरवापर आपल्या स्वार्थासाठी करत आहेत. इंटरनेटसारख्या माध्यमाने तरुणांना आपल्या जाळ्यात खेचण्याचे प्रयत्नही केले जातात. भारतात फुटीरतावादी संघटना आणि माओवादाचे विकृत तत्त्वज्ञान दहशतवाद माजवत आहे. दहशतवादाचे स्वरूप आणि व्याप्ती दिवसेंदिवस बदलत चालली आहे . याशिवाय इसीससारखी संघटना जगात इस्लामिक राज्य प्रस्थापित करायची स्वप्न पहातेय. या लेखमालेद्वारे आपण या विषयाचा अभ्यासपूर्ण मागोवा घेणार आहोत.


musalim_3  H x

दहशतवादाच्या - विशेषत: ‘आत्मघातकी दहशतवादाच्याघटना घडतात, तेव्हा अनेक निरपराध लोक बळी पडतात. हे सगळे दहशतवाद्यांसाठीसॉफ्ट टार्गेटअसतात. हे सगळे बेसावधपणे त्या हल्ल्याला बळी पडलेले असतात. मात्र, दहशत माजवणारी व्यक्ती मनाच्या पूर्ण तयारीने सगळ्यांना ठार मारून, स्वत: ठार होऊन आपले हेविकृत यशसाजरा करून जाते. त्या व्यक्तीच्या मृत्यूवरच त्याच्या हल्ल्याचे यश अवलंबून असते, ह्यालाचआत्मघातकी दहशतवादम्हणतात. रिमोट कंट्रोलद्वारे बाँबस्फोट घडवून आणणे, एखाद्या वाहनात बाँब पेरून निघून जाणे, एखाद्या बॅगेत बाँब ठेवून ती गर्दीत ठेवून देणे ही सगळी दहशतवादाची उदाहरणे आहेत. पण स्वत:वरतीच बाँब लादून आपल्याच हाताने त्याचा स्फोट घडवणे हाआत्मघातकी दहशतवादहोय. ‘दहशतवादआणिआत्मघातकी दहशतवादअसे हे ठळक प्रकार दिसून येतात. दहशतवादाचा हा प्रवास काळाप्रमाणे बदलत चाललेला आहे. म्हणूनच दहशतवाद म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, त्याचे स्वरूप आणि व्याप्ती दिवसेंदिवस कशी बदलत चालली आहे ह्याचा अभ्यासपूर्ण मागोवा घेणे महत्त्वाचे ठरते.

 

दहशतवाद म्हणजे काय?

भीतीकिंवादहशतहे साधन म्हणून वापरून त्याद्वारे आपले साध्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे दहशतवाद. यात प्रामुख्याने राज्यव्यवस्थेवर दबाव आणणे हा हेतू असतो. आपल्या काही मागण्या राज्यव्यवस्थेने पूर्ण कराव्यात ह्यासाठी सामान्य नागरिकांना वेठीला धरले जाते. सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे, त्यांना राज्यव्यवस्थेवर दबाव आणण्यासाठी प्रवृत्त करणे आणि ह्या दबावाद्वारे राज्याला त्याच्या धोरणांना बदलवण्यास भाग पाडणे ह्यासाठी दहशतवादी हल्ले केले जातात. काही अभ्यासकांनी दहशतवादाच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

1994मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जनरल असेम्ब्ली आमसभेमध्ये दहशतवादाचा अर्थ स्पष्ट केला गेला आहे. ‘जाणीवपूर्वक गुन्हेगारी कृत्य करणे, जनतेमध्ये भीती निर्माण करण्यासाठी व्यक्तीने किंवा व्यक्तींच्या गटाने विशिष्ट राजकीय उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी भीती पसरवणे आणि कोणत्याही राजकीय, तात्त्विक, विचारसरणी, वांशिक, धार्मिक कारणाने त्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही असे कृत्य म्हणजे दहशतवाद होय’.

भारताच्या नॅशनल सिक्युरिटी गार्ड कायदा 1986नुसारदहशतवादी म्हणजे अशी व्यक्ती जी बाँब, स्फोटके, ज्वलनशील पदार्थ, जीवघेणी शस्त्रे, विषारी वायू .च्या वापराद्वारे शासन उलथवण्याचा प्रयत्न करते, सामान्य जनतेमध्ये भीती निर्माण करते, तसेच व्यक्तीला जखमी करते वा ठार करते, मालमत्तेचे नुकसान करते, तसेच समाजजीवनाला धोका उत्पन्न करते.’ (संदर्भ - परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाइट, तसेच टाडा कायदा - टेररिस्ट अँड डिसरप्टिव्ह ॅक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॅक्ट.)

 

ऑक्स्फर्ड डिक्शनरीनुसार हिंसेचा बेकायदेशीर वापर विशेषत: सामान्य नागरिकांच्या विरोधात करून आपले राजकीय हेतू साधणे म्हणजे दहशतवाद. जेसिका स्टर्न ह्या अमेरिकन प्राध्यापिका आणि दहशवादावर पुस्तके लिहिणार्या लेखिका आहेत. यांच्या मते, दहशतवाद म्हणजे नागरिकांच्या विरोधात भीतिदायक हिंसेचा वापर असतो, त्याचा उद्देश हा बदला घेणे, घाबरवणे आणि त्याचे परिणाम पाहणार्यावर घडवून आणणे, तर वाल्टर लेक्युयर इतिहासकार आणि पत्रकार यांच्या मते दहशतवाद म्हणजे राजकीय साध्यासाठी एखाद्या गटाने मोठ्या प्रमाणात हिंसेचा वापर करणे होय. मार्था क्रेनशॉ ह्या राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका आणि दहशतवादावर लिहिणार्या लेखिका/संशोधक आहेत. त्यांच्या मते दहशतवाद हे हिंसक माध्यम आहे. त्याद्वारे काही लोकांचा एक लहान समूह ज्याच्याकडे सत्ता नसते, तो मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणू इच्छितो.

 

अशा अनेक व्याख्या आहेत. पण तरीही ह्यातील कोणतीही व्याख्या परिपूर्ण नाही. दहशतवादाचे स्वरूप बदलत राहते. ‘हिंसाहा घटक मात्र यात ठळकपणे आढळतो. आधुनिक काळातदहशतवादहे आव्हान केवळ एखाद्या देशापुढे नाही, तर संपूर्ण जगापुढेच उभे राहिल्याचे दिसते. दहशतवाद हे मुळातच हिंसक कृत्य असल्याने त्याला नागरी समाजात मान्यता नाही. दहशतवादी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी कायदेशीर मार्गांचा उपयोग करता हिंसक मार्गाचा अवलंब करतात. त्यात अनेक निरपराध लोकांचा बळी जातो. म्हणूनच सर्वसामान्य जनतेच्या मनात त्याची भीती असते. ‘आपली भीती वाटणेहे दहशतवादी संघटनांचे उद्दिष्ट असल्यामुळे ते त्यांचे यश असते. दहशतवादामुळे सामान्यांच्या आयुष्यावर तर परिणाम होतोच, तसेच राज्याच्या निर्णयप्रक्रियेवरही मोठा प्रभाव पाडला जातो. शिवाय, दहशतवादी संघटना प्रसारमाध्यमांद्वारे समाजावर आपला प्रभाव पाडण्यासाठी प्रयत्न करतात. जेवढा मोठा हल्ला, तेवढी संघटनेला प्रसिद्धी जास्त. त्यांची भीती जास्त. आपले अस्तित्व दाखवण्यासाठी दहशतवादी संघटना सतत प्रयत्नशील असतात.

 

दहशतवादाचे स्वरूप

दहशतवादाचे स्वरूप व्यापक आहे. दहशतवादी हल्ले प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात. पहिला, ज्यात हल्लेखोराचा मृत्यू होत नाही आणि दुसरा ज्यात हल्ला करताना दहशतवाद्याचा मृत्यू होतो. ह्यालाचआत्मघातकी दहशतवादम्हणतात. ह्याचे यश हे हल्लेखोराच्या मृत्यूवर अवलंबून असते. दहशतवादाचा हेतू विचारात घेतला, तर हल्ल्याचे दोन प्रकार पडतात - 1. युक्तिपूर्ण, 2. रणनीतिक. जेव्हा जास्तीत जास्त जीवितहानी घडवून आणणे हा हेतू असतो, तेव्हा तो हल्ला युक्तीपूर्ण असतो. पण जेव्हा जीवितहानीसह आणखी मोठे परिणाम घडवून आणायचे असतात - उदाहरणार्थ, सरकार बदलण्यास भाग पाडणे, सरकारच्या धोरणात बदल घडवून आणणे, लष्कराचे वर्चस्व नष्ट करणे इत्यादी, तेव्हा हा हल्ला रणनीतिक स्वरूपाचा असतो. 9/11चा अमेरिकेवरील हल्ला रणनीतिक स्वरूपाचा होता. मुंबईवरचा 26/11चा हल्ला तर थेट देशाच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला होता. कोणतेही एक विशिष्ट कारण नाही, तर अनेक हेतू ह्यामागे होते.musalim_1  H x  

दहशतवादाचे प्रकार

दहशतवादाच्या व्याप्तीवरून 1. राष्ट्रीय पातळीवरचा किंवा देशांतर्गत दहशतवाद, 2. आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि 3. बहुराष्ट्रीय दहशतवाद हे प्रकार केले जातात.

1. देशांतर्गत दहशतवाद - ह्यात दहशतवादी संघटना त्याच देशातील राजकीय व्यवस्थेवर दबाव आणण्यासाठी हल्ला घडवून आणते. यात त्याच देशातील दहशतवादी आपल्याच देशातील नागरिकांना ठार करतात. सामान्य नागरिकांमध्ये आपल्या शासनाप्रती नकारात्मक भावना निर्माण करण्याचा हेतूसुद्धा असतो. उदाहरणार्थ, 11 जुलै 2006ला मुंबईत लोकलमध्ये झालेले सात बाँबस्फोट.

2. आंतरराष्ट्रीय दहशतवाद - यात आपल्या देशाच्या सीमा ओलांडून दुसर्या देशात जाऊन हल्ले केले जातात. उदाहरणार्थ, 26/11ला मुंबईवर लष्कर--तैबाच्या दहशतवाद्यांनी केलेला हल्ला.

3. बहुराष्ट्रीय दहशतवाद - यात अनेक देशांतील दहशतवादी एकत्र येऊन अनेक हल्ले घडवून आणतात. उदाहरणार्थ, अमेरिकेवरचा 9/11चा हल्ला. ह्यात अनेक देशांचे लोक एकत्र आले आणि अमेरिकेत अनेक हल्ले केले.

दहशतवादाचे आणखी काही प्रकार पाडले जातात - राज्यपुरस्कृत दहशतवाद, धार्मिक दहशतवाद, विचारसरणीमुळे निर्माण होणारा दहशतवाद इत्यादी. शस्त्रांच्या वापरावरून बाँबिंग, अपहरण, हत्या, विमानाचे अपहरण असे वर्गीकरणही केले जाते.

 

दहशतवादाची प्रमुख कारणे

जगभरात दहशतवादी हल्ले वेगवेगळ्या कारणांनी होतात. पण दहशतवादाची काही प्रमुख कारणे आढळतात. धार्मिक, राजकीय, सामाजिक, मानसिक आणि आर्थिक ही कारणे आहेत.

1. धार्मिक कारण - दहशतवादामागे मोठ्या प्रमाणात धार्मिक कारणेही आहेत. आपल्या धार्मिक मूल्यांचे संरक्षण करणे हे मुख्य उद्दिष्ट असते. पण बर्याच वेळा अतिजहाल मूलतत्त्ववादी विचारसरणी दहशतवादी कृत्याला कारणीभूत ठरते. विशेषत: इस्लामी दहशतवादी संघटना ह्या धर्माच्या जोरावर आपला विस्तार आणि प्रभाव टिकवतात. इसीस तसेच अल कैदा ही उदाहरणे आहेतच.

2. राजकीय कारणे - ज्या देशातील राज्यकर्ते राज्यकारभार करण्यास पुरसे सक्षम नसतात, तेथे नागरिकांमध्ये असंतोष वाढीस लागतो. मानवी हक्क सुरक्षित राहत नाहीत. मग दहशतवादी संघटना आपला प्रभावीपणे विस्तार करू शकतात. अफगाणिस्तानमधील तालिबानचा उदय आणि आता इराकच्या विसकळीत राजकीय परिस्थितीमुळे इसीसचा उदय ही उदाहरणे देता येतील.

 शिवाय काही राजकीय निर्णय मागे घ्यावेत यासाठीही दहशतवाद माजवला जातो. 11 मार्च 2004ला स्पेनची राजधानी माद्रिद येथे इराकच्या अल कैदाने बाँबस्फोट घडवले होते. त्यात 192 लोक ठार झाले. निवडणुका केवळ तीन दिवसांवर आल्या असताना हे दहशतवादी हल्ले केले गेले. कारण तेथील पीपल्स पार्टीच्या अझनार ह्यांच्या सरकारने अमेरिकेच्या इराकवरील लष्करी आक्रमणाला पाठिंबा दिला होता. परिणामी ह्या हल्ल्यांच्या नंतर अझनार ह्यांची पीपल्स पार्टी निवडणुकीत हरली.


3. सामाजिक कारण - सामाजिक स्थैर्य नसेल तर दहशतवाद लवकर रुजतो. गरिबी, शिक्षणाच्या तसेच रोजगाराच्या संधींचा अभाव असणे, मोठ्या प्रमाणात विषमता असणे. ओसामा बिन लादेनने अल कैदाची स्थापना केली, कारण त्या वेळी अफगाणिस्तानमध्ये चाललेल्या युद्धामुळे सामाजिक अस्थिरता होती. सोव्हिएत रशियाच्या विरोधात लढण्यासाठी इस्लामी जगतातून अल कैदाची निर्मिती केली गेली. तसेच सद्दाम हुसेन ह्यांच्यानंतर इराकमध्ये मोठी अस्थिरता निर्माण झाली. 2014मध्ये मग अबू मुसाब अल झरक्वावी ह्याने इसीसची स्थापना केली.

4. मानसिक कारण - दहशतवादी संघटना सदस्यांशिवाय काम करू शकत नाहीत. त्यासाठी त्यांची विचारधारा बाळगणारे सदस्य लागतात. दहशतवादी बनण्यासाठी अनेक मानसिक कारणेही आहेत. वैयक्तिक कारणे - सूडाची तीव्र इच्छा, काहीतरी जगावेगळे करून दाखवण्याची इच्छा; तसेच अतिसंवेदनशील असणार्या सदस्यांना हेरून संघटना त्यांच्याकडून हल्ले करवून घेतले जातात.

5. आर्थिक कारणे - गरिबी, बेरोजगारी, घटलेले उत्पन्न यातूनच मग शिक्षणाचा अभाव आणि सामाजिक विषमता ह्यामुळे समाजात राज्यकर्त्यांच्या विरोधात जनमत तयार होत जाते. जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते, तेव्हा शासनाप्रतीचा राग व्यक्त करण्यासाठी दहशतवादी हल्ले केले जाऊ शकतात. मध्यपूर्वेतील अरब-इस्रायलमधील निर्वासितांच्या छावण्यातून दहशतवादी निर्माण होतात. तसेच काही वेळा नैसर्गिक आपत्तीमुळेही दहशतवाद्यांना संधी मिळते, असे मत बेरेबी आणि ओस्टवाल्ड ह्यांनी मांडलेले आहे. उदाहरणार्थ - पाकिस्तानमध्ये 2010ला मोठा पूर आला होता. तेथील शासन ह्या आपत्तीला फारसे प्रभावीपणे सामोरे जाऊ शकले नाही. त्याचा गैरफायदा घेऊन तालिबानने आपली मुळे घट्ट रोवली.

जागतिक स्तरावर दहशतवादाची स्थिती

जगात 2017मध्ये 26,445 जणांचा मृत्यू दहशतवादामुळे झाला. ह्यापैकी 95 टक्के मृत्यू मध्यपूर्व, आफ्रिका आणि दक्षिण आशिया येथे झाले. प्रामुख्याने इसीस, तालिबान, बोको हराम आणि अल शबाब ह्या संघटना ह्याला जबाबदार आहेत. 2017मध्ये इराकमध्ये एकूण मृत्यूंपैकी 4.3 टक्के दहशतवादामुळे झाले, तर अफगाणिस्तान, सीरिया आणि सोमालिया ह्यात प्रत्येकी 1 टक्का मृत्यू दहशतवादामुळे झालेले आहेत. (संदर्भ - ग्लोबल टेररिझम डेटाबेस - 2018)musalim_2  H x

(संदर्भ - ग्लोबल टेररिझम डेटाबेस - नॅशनल कन्सोर्टियम फॉर दि स्टडी ऑफ टेररिझम अँड रिस्पॉन्सेस टू टेररिझम 2018.)

जगातील दहशतवादी हल्ल्यांत ठार होणार्यांची संख्या 2018पर्यंत सलग तीन वर्षे घटली आहे. 2018मध्ये ही संख्या 19 हजार होती. मध्यपूर्व, उत्तर आफ्रिका, अफगाणिस्तान, इराक, नायजेरिया, सोमालिया आणि सीरिया ह्या ठिकाणी प्रामुख्याने हल्ले झाले आहेत. (संदर्भ - संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा समितीमधील दहशतवादविरोधी समितीचा अहवाल - दि युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल काउंटर टेररिझम कमिटी.)

 

2019मध्ये जगात 8,473 दहशतवादी हल्ले झाले आणि त्यात 20,309 जणांचा बळी गेला. 2018मध्ये 9,600 हल्ले आणि 22,980 बळी, तर 2017मध्ये 10,900 हल्ले आणि 24,927 ठार झालेले आहेत. (संदर्भ - ग्लोबल टेररिझम डेटाबेसचा नॅशनल कन्सोर्टियम फॉर दि स्टडी ऑफ टेररिझम अँड रिस्पॉन्सेस टू टेररिझम अहवाल 2019.)

 

भारताचा विचार केल्यास इसीसवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे, कारण, त्यांचे डिजिटल मासिक व्हॉइस ऑफ हिंदने बाबरी मशीदचा बदला घेण्याची धमकी दिलेली आहे. नागरिकत्व कायद्याला विरोध करणार्या लोकांना इसीसने पाठिंबा देऊन भारत सरकारच्या विरोधात जिहाद घोषित केलेला आहे. (संदर्भ - ‘आयएसआयएस प्लॅन टू स्प्रेड व्हॉयलन्स, हेटरेट इन इंडिया अगेन, माउथपीसव्हॉइस ऑफ हिंदक्लेम्स बाबरी विल बी एव्हेंज’, डीएनए वेब टीम, 20 ऑक्टोबर, 2020.) इसीसला जाऊन मिळणार्या आणि पाठिंबा देणार्या लोकांची संख्या वाढते आहे. काश्मीर आणि केरळ येथेही इसीसविषयी काही लोकांमध्ये सहानुभूती असल्याचे आढळले आहे. म्हणून दहशतवाद हा भारताच्या सुरक्षेवर प्रभाव पाडणारा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे.


9922427596