बडवे ग्रूप ऑफ कंपनीजचे चेअरमनशंकर बडवे यांचे निधन

06 May 2021 17:19:10


badve_1  H x W:

पुणे: बडवे ग्रूप ऑफ कंपनीजचे चेअरमन शंकर प्रभाकर बडवे (वय ८२) यांचे मंगळवारी दि. ४ एप्रिल रोजी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. प्रगतिशील उद्योजक श्रीकांत बडवे यांचे ते वडील आहेत.

 

शंकर बडवे यांनी बजाज ऑटो कंपनीत उच्चपदावर ३७ वर्षे काम केल्यानंतर १९८७ साली बडवे ग्रूप ऑफ कंपनीजची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ३३ वर्षांत कंपनीने देशभरात प्रकल्पांचे विस्तारीकरण करत पाच हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेला मराठी उद्योजकाचा उद्योगसमूह असा नावलौकिक प्राप्त केला आहे.

शंकर बडवे यांच्या निधनाने ऑटोमोबाइल क्षेत्रातील एका बड्या व्यक्तिमत्त्वाला उद्योग विश्व मुकले असल्याच्या भावना या क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केल्या.

शंकर बडवे यांच्या पश्चात पत्नी कुमुद, श्रीकांत आणि संजय ही दोन मुले, एक मुलगी, सुप्रिया आणि योगिता या सुना तसेच सुमेध व स्वस्तिद हे नातू असा परिवार आहे.

Powered By Sangraha 9.0