बदलणाऱ्या प्रायव्हसीची व्याख्या : (अंतिम भाग)

विवेक मराठी    09-May-2021   
Total Views |

प्रायव्हसी 'मस्ट बी फर्स्ट'

 आयफोन युझर्स ना सांगू तर शकतोच ना?? लोकांना ते कशासाठी साईन अप करतायत आणि त्यांचा कुठला डेटा ह्या सगळ्या ऍप घेतायत त्यातला किती डेटा आणि कुठला डेटा कुठल्याशा क्लाउड वर अपलोड करतायत हे कळायलाच हवं. कदाचित काही लोकं इतर लोकांपेक्षा अधिक डेटा ह्या कंपनींसोबत शेयर करू इच्छित असतील. पण त्यांना ह्या कंपनी आणि ऍप्स ने विचारायला हवं त्यांचा होकार घ्यायलाच हवा 


privacy_2  H x

११ वर्षांपूर्वी सिलिकॉन व्हॅलीत झालेल्या D8 कॉन्फरन्स मध्ये ऍपलचे को फाउंडर स्टीव्ह जॉब्स ने प्रायव्हसी संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाचं अप्रतिम उत्तर दिलं होतं. स्टीव्हचं ते नेमकं आणि सटीक उत्तर त्याच्या व्हिजनला प्रमाणित करतात!! मला स्टीव्ह मनापासून आवडतो मी त्याचा फॅन आहे म्हणून मला ते उत्तर आवडलं नव्हतं. मला ते उत्तर आवडलं होतं कारण त्याकाळात सोडाच पण सध्याच्या काळातही इतकं बोल्ड स्टेटमेंट कुठल्याही टेक कंपनीच्या सीईओने करणं धाडसाचं आहे. अर्थात स्टीव्ह ते करू शकला कारण ऍपलचा कोअर बेस हा हार्डवेअर मॅनिफॅक्चरिंग कंपनी असाच आहे. ऍपलचे क्वालिटी हार्डवेयर आणि त्याला कॉम्प्लिमेंट करणारे तोड सॉफ्टवेयर हे कमाल कॉम्बिनेशन आहे.


privacy_1  H x

 

असो तर स्टीव्ह तेंव्हा काय म्हणाला हे सांगतो "आम्ही ऍपलमध्ये प्रायव्हसी ह्या विषयाला प्रचंड गांभीर्याने घेतो. अर्थात आम्ही आमच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा ह्या बाबतीत खूप वेगळे आहोत. सिलिकॉन व्हॅलीतल्या काही कंपनी तर आम्हाला 'ओल्ड फॅशन' देखील म्हणतात. तरीही कुठल्याशा १४ वर्षांच्या मुलीचा तिच्या जवळ असलेल्या ऍपल फोनमधील जीपीएस वापरून कुणी माग काढत असेल तर हा संपूर्ण आमचाच दोष आमच्या यंत्रणेचा दोष नाहीय का?? भलेही ते कुण्या थर्ड पार्टी ऍप ने चोरून आमचं जीपीएस वापरलं असेल पण तरीही ते थर्ड पार्टी ऍप तुमचं जीपीएस लोकेशन वापरतंय, जितक्या वेळा ते वापरतंय तितक्या वेळा आम्ही आमच्या आयफोन युझर्स ना सांगु तर शकतोच ना?? लोकांना ते कशासाठी साईन अप करतायत आणि त्यांचा कुठला डेटा ह्या सगळ्या ऍप घेतायत त्यातला किती डेटा आणि कुठला डेटा कुठल्याशा क्लाउड वर अपलोड करतायत हे कळायलाच हवं. कदाचित काही लोकं इतर लोकांपेक्षा अधिक डेटा ह्या कंपनींसोबत शेयर करू इच्छित असतील. पण त्यांना ह्या कंपनी आणि ऍप्स ने विचारायला हवं त्यांचा होकार घ्यायलाच हवा, त्यांचा होकार प्रत्येक डेटा घेतांना प्रत्येकवेळी विचारायला हवा. त्यांनी होकार दिला तरच ज्याला होकार दिलाय तितकाच युझर डेटा घ्यावा. आमच्यासाठी प्रायव्हसीची इतकी सरळ सोपी व्याख्या आहे"
 

किती स्पष्ट आणि स्वच्छ विचार होते स्टीव्हचे!! तेही ११ वर्षांपूर्वीचे आणि गंम्मत म्हणजे हे विचार मांडताना प्रेक्षकांमध्ये फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्ग बसला होता, आणि त्याचा उल्लेख झाला तेंव्हा स्टीव्ह ने किंचित हसरा चेहरा करून उत्तर दिलं होतं. मी कुठेही स्टीव्हचं अनावश्यक कौतुक करणार नाही पण प्रायव्हसी संदर्भात तो तत्कालीन इतर कंपनीच्या किमान दशकभर पुढे होता!! ऍपलने आणलेल्या App Tracking Transparency (शब्दावर क्लिक करून ह्या संकल्पनेचा व्हिडियो बघू शकता) मागची खरी प्रेरणा स्टीव्ह जॉब्सच आहे. मागच्या लेखात आपण गुगल आणि फेसबुकचे रेव्हिन्यू मॉडेल बघितले. ह्या दोन्ही कंपनी कशा प्रकारे युझर डेटा उचलून तो हार्वेस्ट करतात हे देखील बघितले. ह्या भागात आपण बघूया की तांत्रिक दृष्ट्या नेमकं iOS 14.5.1 अपडेटमध्ये काय होणार आहे, आणि त्यामुळे एन्ड युझर वर काय परिणाम होऊ शकतो, त्याचबरोबर बीइंग अ ट्रेंड सेटर ऍपलच्या निर्णयाचा एकूण इंटरनेट, मोबाईल आणि ऍप मार्केटवर नेमका काय परिणाम होईल हे बघुयात!!

 

आता वाचकांना कल्पना आली असेल की गुगल आणि फेसबुक वाचकांचा डेटा कशाप्रकारे हार्वेस्ट करतात. पण कुठलेही थर्ड पार्टी ऍप किंवा फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्स ऍप, मेसेंजर हे ऍप नेमका कुठला कुठला डेटा आपल्याकडून घेतात?? बऱ्याच लोकांना अनुभव येतो की त्यांनी अमेझॉन ऍप वर काही प्रॉडक्ट्स सर्च केले की त्याच श्रेणीतले इतर प्रॉडक्ट्स माझ्या फेसबुक, इन्स्टा फिड वर स्पॉन्सर्डकॅटेगिरीत कसे दिसायला लागतात?? किंवा एखादा मनुष्य, हायपर पांडा, आयकिया सारख्या तत्सम मोठ्या रिटेल स्टोअरमध्ये जातात आणि काहीही खरेदी न करता बाहेर पडल्यावर देखील काही वेळात त्या स्टोअरच्या डिस्काउंट सेल वाल्या जाहिराती माझ्या फेसबुकवर किंवा ईमेल, अगदी एसएमएस वर कशा येतात?? मिंत्रा किंवा स्विगी झोमॅटो वर सर्च करताना एखादा आयटम ऍड टु कार्ट करून सोडून बघा, लगेच तुम्हाला एसएमएस, ईमेल किंवा फेसबुकवर त्याचं रिमाइंडर येईल!! जेंव्हा मी माझा कुठलाही फोन नंबर दिलेला नसतो, फक्त ईमेलने लॉग इन केलं असतं!! हे सगळं शक्य होतं ते एका युनिक नंबरने ते म्हणजे तुमच्या IDFA/AAID नंबर ने!!

privacy_3  H x

 कुठल्याही आयफोन मध्ये त्याला IDFA (Identifiers For Advertisers) म्हणतात आणि अँड्रॉइडमध्ये त्याला AAID (Android Advertising ID) म्हणतात. आता हे नेमकं काय असतं बघा तुम्ही कुठलेही ऍप तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल केलंत तर तुमच्या मोबाईलनुसार एक युनिक IDFA किंवा AAID नंबर जनरेट होतो. हा नंबर तुमच्या मोबाईल वर स्टोअर असतो. आता गंम्मत कशी असते बघा कुठलेही ऍप इन्स्टॉल केल्यावर त्याला तुमच्या मोबाईल डिव्हाइसच्या काही खास परमिशन हव्या असतात त्या तो इन्स्टॉल केल्यावर किंवा करायच्या आधीच तो मागून घेतो. युझर म्हणून आपणही त्या कुठलाही विचार न करता देऊन टाकतो. ह्यात एक परमिशन अशी असते की तुमच्या डिव्हाइसवर असलेल्या इतर ऍपचे जे काही IDFA/AAID नंबर असतील ते शेयर करण्याची मुभा!! म्हणजे काय समजा फेसबुक, इन्स्टा, व्हाट्स ऍप्प ह्यांच्याकडे तुमच्या युट्युब, किंवा अँग्री बर्ड सारख्या ऍपचे IDFA/AAID नंबर असतील तर फेसबुक तुमचे हे नंबर इतर advertising कंपन्या किंवा इतर प्रॉडक्ट बेस्ड कंपनी जसे की ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, नेटफ्लिक्स सोबत शेयर करतील!! आता तुम्ही विचार कराल की ह्याने असं काय होणार आहे?? तर एक सोपं उदा देतो तुम्ही नेटफ्लिक्स वर एखादी क्राईम सिरीज बघितली तर पुढील काही दिवसात तुमच्या गेम्समधील ऍड ब्रेक असू दे, फेसबुक वरचा स्पॉन्सर्ड सेक्शन असू दे, इन्स्टा असू दे, युट्युब वरील ऍड्स असु दे, गुगलवर ब्राऊझिंग विंडो असु दे की तुमच्या ऑनलाईन वृत्तपत्राची पुरवणी सगळीकडे तुम्हाला दुसऱ्या विविध क्राईम सिरीजच्या ऍड दिसु लागतील. त्याचे व्हिडियो फीड वर येतील. याची दाहकता आणि धोका हळुहळु कसा वाढत जातो बघा आजकाल बऱ्याच लोकांना निद्रानाशाचा त्रास असतो त्यासाठी बरेच स्लिप ट्रॅकिंग ऍप उपलब्ध आहेत. ते तुमच्या झोपेचा पॅटर्न स्टोअर करून तुम्हाला चांगली झोप लागण्याचे उपाय ह्या नावाखाली प्रीमियम सब्स्क्रिप्शनच्या ऍडचा मारा तुमच्यावर सतत होतो शेवटी कंटाळून किंवा उत्सुकतेपोटी ५० पैकी ५ लोक तरी हा प्रीमियम सब्स्क्रिप्शन घेतात. हेच पुढे जाऊन, तुमचे हार्ट बिट्स, तुमचे पिरियड सायकल ह्याची नोंद ठेवून तो डेटा इंश्योरन्स कंपनीकडे जाऊन त्यानुसार तुमच्याकडे ऑफर कॉल येणं सुरु होतं!! काही लोकांना हे आवडु शकेल पण बहुतांश लोकांना ह्या अत्यंत खाजगी गोष्टी पब्लिक डोमेनमध्ये जाणे पटणार नाही. कुठल्या स्त्रिला तिच्या पिरियड सायकलची रेग्युलॅरिटी इर्रेग्युलॅरिटी कुणासाठी प्रॉडक्ट म्हणून वापरली गेलेली आवडेल?? कुठल्या हार्ट पेशंटला त्याचे ECG रिपोर्ट्स किंवा त्याचे प्लस रेग्युलॅरिटी रिपोर्ट्स कुठल्याशा कंपनीला विकलेले आवडतील?? ह्या अत्यंत खाजगी गोष्टी आहेत ज्याचा त्या व्यक्तीशिवाय इतर कुणालाही चर्वीचरण करण्याचा अधिकार नाही!! प्रॉडक्ट म्हणून विकण्याचा तर मुळीच अधिकार नाही!! ह्याच गोष्टीला ऍपलच्या नवीन अपडेट ने चाप लावलाय App Tracking Transparency (ATT) च्या माध्यमातून!!


privacy_1  H x

iOS अपडेट केल्यावर आलेला फेसबुक ऍपचा पॉप अप

ऍपलच्या नवीन अपडेटमध्ये (iOS 14.5.1) ATT फॅक्न्श्नलिटी ही प्रत्येक आयफोन युझरला विचारते की कुठल्याही ऍपला तुम्हाला ट्रॅक करायचे असल्यास त्यांनी तुम्हाला तसे विचारावे!! ‘Allow Apps to Request to Track’ हे फिचर ऑन असेल तर तुमच्या आयफोनमधील प्रत्येक ऍपचा असलेला IDFA नंबर हा तुम्ही होकार देत नाही तोपर्यंत कुठल्याच ऍपशी शेयर होणार नाही. म्हणजे ह्या ऍप्प आपापसात तुमचा खाजगी डेटा शेयर करून तुम्हाला प्रॉडक्ट तुमच्यासमोर कस्टमाइड ऍप पेश करू शकणार नाहीत!! तुमचा कुठलाही वैयक्तिक डेटा तुम्ही परवानगी दिल्याशिवाय शेयर होणार नाही. ह्या एका गोष्टीमुळे फेसबुकच्या संपूर्ण रेव्हिन्यू मॉडलवरच गदा आलीय कारण फेसबुकचा ९७% टक्के रेव्हिन्यू पर्सनलाइज्ड ऍड मधूनच येतो!! त्यामुळे ऍपलची ही खेळी फेसबुकच्या प्रॉफिट मार्जिनवर आणि फेसबुकच्या रेव्हिन्यू मॉडेल वर नक्कीच गदा आणेल. फेसबुकची ह्यावरील प्रतिक्रिया मोठी मजेशीर आहे फेसबुक म्हणतं फ्री जाहिरात देणाऱ्या सर्व्हिस हे इंटरनेटच्या वृद्धीसाठी आणि त्याच्या सध्याच्या चैतन्यदायी स्वरूपासाठी आवश्यक आहे त्यामुळे ऍपलच्या ह्या ढोंगी आणि प्रतिस्पर्ध्याला तग न धरू देणाऱ्या धोरणांचा निषेध करतोफेसबुकची ही प्रतिक्रिया फार जळजळीत आणि द्वेषपूर्ण आहे. अर्थात फेसबुककडून ते अपेक्षितच आहे म्हणा कारण ऍपलने थेट त्यांच्या पोटावरचं पाय दिला आहे!! फेसबुकच्या सीएफओ नी पुढे जाऊन हे देखील म्हटले आहे की ऍपलच्या ह्या एका निर्णयाने छोट्या व्यापाऱ्यांना आपल्या व्यवसायांची जाहिरात करणे आणि पर्यायाने तग धरणे कठीण होऊन बसेल. त्याच बरोबर आमच्या सारख्या कंपन्यांना जे आज लोकांकडून कुठलाही पैसा न घेता फक्त त्यांच्या डाटाच्या स्वरूपात त्यांच्याकडून मोबदला घेऊन फ्री सर्व्हिसेस देतायत त्यांना मात्र ह्यापुढे कुठलीही नवीन किंवा चालु असलेली सर्व्हिस फ्रीमध्ये देतांना विचार करावा लागेल!! हे स्टेटमेंट खूप मोठं आहे. मला विचाराल तर फेसबुक ह्या ATT मुळे लगेच भिकेला लागेल ह्याची शक्यता अजिबात शक्यता नाही कारण त्यांच्याकडे तितकं पोटेन्शियल नक्कीच आहे की ते ह्यातून बाहेर पडतील!! ऍपलने ह्या गदारोळावर जे ऑफिशियल स्टेटमेंट दिलंय ते स्पष्ट आणि स्वच्छ आहे आम्ही कुठल्याही प्रकारे IDFA ला ब्लॉक केलेलं नाही. आम्ही त्याच्या शेयरिंगच्या विरोधातही नाही. फक्त आमची एकच पॉलिसी आहे तुम्ही तुमच्या युझर्सना हे विचारा आणि त्यांची परवानगी असेल तर तुम्हाला IDFA नंबर मिळत राहील!!ह्युमन नेचर कसं असतं बघा फेसबुक आणि इतर कंपन्यांना खात्री आहे की आजपर्यंत ज्या लोकांना आपण त्यांचा असा काही डेटा घेतोय ह्याची कल्पनाही नव्हती, त्यांच्या प्रायव्हसीची त्यांना फिकरही नाही ते लोक सुद्धा पर्याय दिला तर ‘Ask App Not To Track’ हाच पर्याय निवडतील आणि हा पर्याय निवडण्याची संख्या ९०% पर्यंतही पोहचू शकते!! ऍपलची खरी किमया ही आहे. आजपर्यंत ज्या लोकांना डेटा प्रायव्हसी बद्दल काहीही माहिती नाही त्या लोकांना देखील ते समजावून सांगितल्यावर आणि पर्याय दिल्यावर लोक प्रायव्हसी हाच पर्याय निवडतील!!

 

 
privacy_1  H x
मोबाईलवर iOS अपडेट केल्यावर फेसबुक ऍप अशा प्रकारे परवानगी  घ्यायला लागते

एप्रिल २०२१ ला ऍपलने एक व्हाईट पेपर पब्लिश केला होता त्याचं नाव होतं A day in the life of your dataह्यात विस्तृतपणे ऍपलने एक क्लेम केला होता. त्यात ऍपलच्या अभ्यासानुसार कमीतकमी ६ ट्रेकर्स रोज तुमच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या घटनांच्या नोंदी तुमच्या मोबाईलच्या साहाय्याने ठेवत असतात. अगदी व्यवस्थित तुमचं एक प्रोफाइल त्यांच्याकडे तयार असतं त्यामुळे आपसूकच तुम्ही एन्ड युझर वरून त्यांच्यासाठी एक प्रॉडक्ट झालेले असता. त्यामुळे ह्या टार्गेटेड ऍप्स किंवा इतर लिंक्समुळे तुमच्या विचारशक्तीवर किंवा आकलन शक्तीवरच प्रभाव पडतो असं नाही तर तुमच्या निर्णय क्षमतेवरच त्याचा प्रभाव पडतो. ज्यांना हा व्हाईट पेपर वाचायचा असेल त्याची लिंक मी व्हाईट पेपरच्या नावात दिली आहे नक्की वाचा म्हणजे तुम्हाला एकूण घटनाक्रम कळेल. ह्या विविध ऍप ह्या फक्त त्यांनी सांगितलेला डेटाच घ्यायच्या का?? उत्तर आहे नाही!! एक उदा देतो फेसबुक मेसेंजरला तुमच्या मोबाईलवर चालायला असा नेमका कितीसा डेटा लागेल?? कॉन्टॅक्टस, तुमचं फेसबुक प्रोफाइल, गॅलरी, जास्तीत जास्त लोकेशन!! बास इतकं पुरेसं आहे. पण मेसेंजर तुमच्या फायनान्शियल डेटा पासून तर तुमची ब्राऊझिंग हिस्ट्री, तुमचे हेल्थ डिटेल्स सगळं, अगदी सगळं खोऱ्याने उचलत असतं. अँड्रॉइड युझरला हे कंट्रोल करायला फारसे काही ऑप्शन्स नसतात पण आयफोन युझर मात्र मेसेंजरने कुठल्या गोष्टी घ्याव्यात आणि कुठल्या घेऊ नये हे तो युझर ठरवू शकतो. असे उदा द्यायचे झालेच तर बरीच उदा देता येतील. iOS 15 जी येत्या सप्टेंबर मध्ये पब्लिक रोल आऊट होईल त्यात ऍपल तुमचा कुठला डेटा कुठल्या ऍप ने कधी वापरला आहे ह्याची विस्तृत माहिती रिपोर्ट बेस्ड देण्याची फंक्शनॅलिटी ऍड करण्याची चर्चा सध्या सुरु आहे. ज्याने त्यांच्या प्रायव्हसी फर्स्ट ला अजुन बळ मिळेल. ऍप प्रायव्हसीमध्ये ऍपलची पॉलिसी सुपीरियर आणि प्रायव्हसी सेंट्रिक आहेच पण त्याच बरोबर डेटा सिक्युरिटी ह्या क्षेत्रात देखील ऍपलच्या पॉलिसी तगड्या आहेत. एन्ड टु एन्ड डेटा इन्क्रिप्शन किंवा डिव्हाईस सेंट्रिक प्रोसेसिंग इन्क्रिप्शन असे चांगले सिक्युरिटी फीचर्स आयफोन आणि ऍपलच्या इतर प्रॉडक्ट्स मध्ये असतात!! ऍपलच्या डेटा सिक्युरिटी वर मी बोलणार नाही कारण आपला आजचा तो विषय ही नाही. आपल्याकडे डेटा प्रायव्हसी आणि डेटा सिक्युरिटी हे दोन्ही विषय एकच आहेत हे मानणारे बरेच लोक आहेत. त्यामुळे डेटा प्रायव्हसी वरील लेखमालेत डेटा सिक्युरिटी ह्या विषयावर मी लिहून अजुन गोंधळ वाढवणार नाही. डेटा सिक्युरिटी वर पुन्हा कधीतरी चर्चा करूयात!!


privacy_2  H x

 

फेसबुक मेसेंजर तुमच्या मोबाईलच्या इतक्या परवानगी घेते 

आता काही लोकांना वाटु शकतं की मी ऍपल प्रॉडक्टला का एंडोर्स करतोय!! मी एंडोर्स केल्याने ऍपल मला लेटेस्ट आयफोन फुकट देणार असेल तर मी जरूर एंडोर्स करेन हो पण ते शक्य नाहीय. जोक्स अपार्ट पण मी ऍपल ला प्रसिद्धी देत नाहीय, मी डेटा प्रायव्हसी ह्या विषयाला प्रसिद्धी देतोय आणि लोकांमध्ये थोडी फार जागरूकता येऊन त्याबद्दल लोकांनी किमान डोळे उघडे ठेवून विचार करावा ही अपेक्षा करतोय!! आजच्या घडीला ऍपल डेटा प्रायव्हसी ह्या विषयात जागरूक, आणि प्रोऍक्टिव्ह आहे. ऍपल ज्या स्तरावर आज काम करतोय ते मिळवायला अँड्रॉइड आणि इतर ऑपरेटिंग सिस्टमला वेळ, प्रयत्न आणि इच्छा शक्ती ह्या तिन्ही गोष्टी दाखवाव्या लागतील. आज ऍपल ने जे ATT लॉन्च केलंय ते अँड्रॉइडमध्ये नाही पण ऍपलला नेहमीच टेक इंडस्ट्रीचा ट्रेंड सेटर मानलं गेलंय त्यामुळे ऍपल कडे बघून इतर कंपन्यांनी त्यांच्या अँड्रॉइड बेस्ड युआय (युझर इंटरफेस) वर हे फीचर्स आणले तर ऍपल ला डेटा प्रायव्हसी क्षेत्रात नक्कीच कडवट प्रतिस्पर्धी निर्माण होतील!! येणारं दशक हे टेक इंडस्ट्रीसाठी खूप मोठं आणि महत्वाचं ठरणार आहे. Augmented Reality, Virtual Reality, Internet Of Things (IOT), Virtual Specs/glasses असे असंख्य प्रोजेक्ट्स आणि प्रॉडक्ट्स रोल आऊटच्या प्रतीक्षेत आहेत. सामान्य माणूस विचारही करू शकणार नाही. इतक्या गोष्टी इनलाइन्ड आहेत. तुमच्या रोजच्या चष्म्याची काच आता तुमच्या मोबाईल फोनची स्क्रीन होऊ घातलीय, तुमचा फ्रिज, तुमची कार, तुमचं वॉशिंगमशीन, तुमचा मायक्रोवेव्ह ते करू शकणाऱ्या कामांव्यतिरिक्त देखील इतर कम्युनिकेशन करू शकतील, तुमच्या घरासमोरच इलेक्ट्रिक पोल, वायफाय टॉवर ह्या सारख्या गोष्टी सुद्धा तुमच्याशी एसएमएस, ईमेल सारख्या प्लॅटफॉर्मवरून कम्युनिकेट करू शकतील. तुमच्या घराच्या, गाडीच्या चाव्या, तुमचं वॉलेट ह्या हरवणाऱ्या गोष्टींचे लोकेशन ट्रॅक करून त्या शोधून देणारे टॅग्स मार्केटमध्ये आधीच आलेले आहेत. माणसाच्या संपूर्ण आयुष्यात टेक्नलॉजीचा विस्तार आणि त्याच्या कक्षा कधी नव्हे त्या कल्पनातीत रुंदावणार आहेत. त्यामुळे तुमच्या डेटाची प्रायव्हसी कधी नव्हे ती आज महत्वाची झालीय. कारण तुमचाच डेटा घेऊन तुमच्यावरच गोष्टी लादून मोठ्या टेक कंपनी तुमच्या निर्णय क्षमतेवरच प्रभाव टाकणार असतील किंवा तुमच्या मोबाईल, ऍप किंवा इंटरनेट युसेज वर स्वतःची दादागिरी आणि जोर जबरदस्ती फक्त ह्या सर्व्हिस ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देतात किंवा ते तुम्हाला ही सर्व्हिस देतात म्हणून करत असतील तर त्याचा विरोध हा आतापासूनच व्हायला हवा!! व्हाट्स ऍपच्या माध्यमातून जबरदस्ती तुम्हाला ऍड देणे, जबरदस्ती तुमचा डेटा घेणे, आयुर्वेद विषयावर लिहिलं म्हणून त्यांच्या नियमात बसत नाही म्हणून पोस्ट उडविणे, अकाउंट सस्पेंड करण्याच्या गोष्टी करणे, कुठला राजकीय स्टॅन्ड घेतला म्हणून अकाउंट उडवून लावणे ह्या गोष्टी ट्विटर असो वा फेसबुक किंवा तत्सम मोठ्या कंपनी ह्यांनी आधीच सुरु केल्या आहेत. त्यामुळे पुढे आपला सगळा डेटा ह्यांच्याजवळ असल्यावर आणि आपण ह्यांच्या प्रॉडक्ट वर पूर्णपणे अवलंबून झाल्यावर ह्या टेक जायंट कंपन्यांची दादागिरी किती वाढेल विचार करा!! त्यामुळेच आपले सरकार ह्या विषयी कायदे आणेल तेंव्हा आणेल (युरोप आणि ऑस्ट्रेलिया ह्यांनी अगोदरच आणले आहेत) पण किमान एक ग्राहक, एक उपभोक्ता, एक एन्ड युझर म्हणून आपण तरी प्रायव्हसीह्या बाबतीत किमान सजग होऊयात ना हा एकमेव उद्देश ठेवून ही लेखमाला मी लिहिली. हा भाग दोन ह्या लेखमालेचा अंतिम भाग होता. शेवटी प्रत्येक माणसाने एक गोष्ट पक्की लक्षात ठेवावी “Technology Serves People and Not The Other Way Round”


@सदर लेख प्रसाद देशपांडे यांच्या ब्लॉगवर पूर्व प्रसिद्ध झाला आहे...