डॉ. हेडगेवारांच्या कराड प्रवासाच्या स्मृती

विवेक मराठी    19-Jun-2021
Total Views |

प्रथम सरसंघचालक पू. डॉ. हेडगेवार यांनी 1937 साली कराडमध्ये केलेल्या प्रवासादरम्यानच्या आठवणींना उजाळा देणारा लेख.

RSS_2  H x W: 0

डॉक्टरजींचा कराड प्रवास 23 जानेवारी 1937ला झालेला होता. प्रांत संघचालक काशिनाथपंत लिमयेही डॉक्टरांबरोबर होते. 1935-1937 या काळात कराडमध्ये 5-6 नियमित शाखाही सुरू झाल्या होत्या. या वेळी हरी वामन उर्फ कत (हरिभाऊ) कुलकर्णी कार्यवाह आणि दत्तात्रय वासुदेव उर्फ आबासाहेब धोपाटे संघचालक होते. हरिभाऊ कुलकर्णी यांच्याबद्दल डॉक्टरजी म्हणत, “अहो, हवा असल्याशिवाय आम्ही पुढे कसे जाणार..” इतके प्रेमाचे संबंध डॉक्टर हेडगेवार हरिभाऊ कुलकर्णींमध्ये होते.

HV कुलकर्णी यांच्याकडे कार्यक्रमाच्या व्यवस्थेचे दायित्व होते. दोघांच्याही (डॉक्टरजी आणि काशिनाथपंत) मुक्कामाची व्यवस्था लक्ष्मणराव उर्फ नानासाहेब देशपांडे यांच्या घरी पुढील माडीवर केली होती. दुपारचे जेवण केशवराव वासुदेव जोशी वकील यांच्या घरी झाले. संध्याकाळी कराड शहराचामकरसंक्रमण उत्सवडॉक्टरजींच्या उपस्थितीत टिळक शाखेवर झाला. ही कराड शहरातील दुसरी शाखा होय. पहिली शाखा कमळेश्वर सायं, कमळेश्वर देवळात, तर टिळक शाखा ही टिळक हायस्कूलच्या मैदानावर भरत असे.



संघभाव

आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.

संघाच्या गाभ्याला स्पर्श करणारे, संघविचारांची खोली उलगडणारे आणि संघसूत्रांवर भाष्य करणारे पुस्तक.

मूल्य : 200/- ₹
सवलत मूल्य 160/- ₹
https://www.vivekprakashan.in/books/rss-spirit/


 

या उत्सवानंतर नानासाहेब देशपांडे यांच्या घरी झालेल्या बैठकीत त्या वेळी असलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांशी कराडमधील कामासंबंधी विचारविनिमय झाला. त्यात प्रामुख्याने संघचालक आबासाहेब धोपाटे वकील, केशवराव जोशी वकील यांच्याबरोबरच तरुण कार्यकर्ते HV कुलकर्णी, दत्तात्रय राजाराम टंकसाळे, नरहरीपंत रघुनाथराव देशपांडे, बापूसाहेब परांजपे, रामचंद्र केरो (RK) उर्फ बापूसाहेब कुलकर्णी-शहापूरकर, शंकर नरहर उर्फ अप्पा पेंढारकर, गोविंदराव लाटे उपस्थित होते. यातील बहुतांश तरुण स्वयंसेवकांचे प्रथम वर्ष झालेले होते अथवा प्रथम/द्वितीय वर्षाला जायचे निश्चित झाले होते. याचा परिणाम म्हणून नंतर 1937च्या प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाला दतात्रय टंकसाळे आणि रघुनाथ देशपांडे, तसेच द्वितीय वर्ष संघ शिक्षा वर्गाला  RK उर्फ बापू कुलकर्णी-शहापूरकर कराडमधून गेले होते.

टिळक शाखेवरील डॉक्टरांच्या बौद्धिक वर्गाचे मुख्य अंश

महाभारतातील नागाची गोष्ट

 हिंदू समाज संघटित स्वाभिमानी होण्यानेच सर्व प्रश्न सुटणार आहेत. हिंदू संघटन म्हणजे अन्य समाजास विरोध नव्हे.’ हा त्यांच्या भाषणाचा गाभा होता. आपले बोलणे प्रभावशाली होण्यासाठी डॉक्टर छोट्यामोठ्या गोष्टी, दृष्टान्त सांगत असत. महाभारतातील नागाच्या गोष्टीचा प्रसंग त्यांनी प्रामुख्याने विशद केला होता.
 

साधूने नागास विचारले, “तू त्रास का देतोस?” मग त्या साधूच्या उपदेशाने नाग अहिंसक बनला. तो कुणालाही चावेना. त्याचा परिणाम असा झाला की शेंबडे पोरही नागाला दगड मारू लागले. बिचारा नाग हैराण झाला, साधूकडे गेला. तेव्हा साधू म्हणाला, “अरे, मी तुला चावू नकोस असे सांगितले, परंतु फुत्कारू नकोस असे काही मी सांगितले नव्हते. तेव्हा फुत्कारानेच लोक घाबरतील तुझे व्रतही पाळले जाईल.”

मोठी मार्मिक गोष्ट आहे ही. हिंदू समाजाची अशीच अवस्था झाली आहे. तो बलवान सुदृढ आहे, पण फुत्कारतसुद्धा नसल्यामुळे त्याची ही अवस्था झाली आहे. हिंदू समाज कसा उभा राहिला पाहिजे, हे त्यांनी एका हिंदी दोह्याने विशद केले -

ना भय देत काहूको, ना भय जानत आप

ऐसे नर को देखकर, जगत डरावे आप

गावातील बरेच निमंत्रित या बौद्धिक वर्गास उपस्थित होते. डॉक्टरांचे त्या वेळचे भाषण अतिशय आशयपूर्ण प्रभावी झाले. प्रसन्न वातावरणात झालेला तो बौद्धिक वर्ग उपस्थित राहिलेल्या स्वयंसेवकांच्या चांगला लक्षात होता.

ना.. पालकर लिखित डॉ. हेडगेवारांच्या चरित्रात खालील घटनेची नोंद नाही.

पुण्यामध्ये संघ शिक्षा वर्ग 22 एप्रिलला सुरू झाला होता. 13 मे 1937 रोजी पुण्यामध्ये झालेल्या सोन्या मारुती सत्याग्रहात डॉक्टरांनी भाग घेतला होता आणि त्यात त्यांना अटकही झाली होती. या घटनेनंतर दहाच दिवसांनी, म्हणजे 23 मे 1937ला डॉक्टरजी कराडला आले होते. हा त्यांचा शेवटचा प्रवास होता.


 
RSS_1  H x W: 0

सार्थक

कराडमध्ये संघकाम कसे सुरू झाले आणि वाढलेही माहिती जाणून घेण्याच्या उद्देशाने मी साधारणपणे 1998-99मध्ये बर्याच जणांच्या गाठीभेटी घेत असे. त्यातील प्रमुख नाव म्हणजे ना.वा. उर्फ नारायण वासुदेव जोशी सर. (आत्माराम विद्यालय, ओगलेवाडी आणि नंतर टिळक हायस्कूल कराड येथे मुख्याध्यापक.)

पुढे त्यांच्याबरोबर, मूळ कराडचे पण पुण्यात स्थायिक असलेले रघुनाथराव देशपांडे आणि दत्तात्रय राजाराम टंकसाळे (चिंचवड) (मुलगा नंदकुमार टंकसाळे - दत्तात्रय प्रभात कार्यवाह चिंचवड, 9421008466) यांची 14 डिसेंबर 1999 रोजी गाठ घेतली. याच भेटीत रा.स्व. संघाचा अमूल्य ठेवा टंकसाळे यांनी माझ्या हाती सोपवला, तो म्हणजे परमपूज्य डॉक्टरजींचा फोटो.

टंकसाळे काका म्हणतात, “मी 1937मध्ये, कराडहून 2nd year OTCला (द्वितीय वर्षाला) गेलो होतो. सोन्या मारुती सत्याग्रहात (13 मे 1937) डॉक्टरांनी भाग घेतला होता आणि त्या वेळी ते सत्याग्रहात निघण्याआधी एका स्वयंसेवकाने हळूच त्यांचा फोटो काढला. त्याबद्दल ते त्या स्वयंसेवकावर रागावले, पण त्या वेळी त्या फोटोच्या 4-5 प्रिंट काढल्या होत्या, त्यापैकी एका माझ्याकडे आहे. ती आज मी तुम्हाला देणार आहे.”

दि. 5 फेब्रुवारी 2017ला आमचे एक कौटुंबिक मित्र अनिरुद्ध भावे, (पालशेत-चिपळूण) हे आमच्या घरी आले होते. त्यांच्याशी गप्पा मारताना हा फोटो मी त्यांना दाखवला आणि संघ संदर्भ ग्रंथालयाच्या (RSS Archive) मिलिंदराव ओक यांच्याकडे देण्याची इच्छा व्यक्त केली. योगायोगाने भावे आणि ओक यांची ओळख असल्याने, त्यांनी लगेच मिलिंदरावांशी संपर्क साधून या फोटोबद्दल सांगितले.

आता गुढीपाडवा 18 मार्च 2017 रोजी हा फोटो संघ संदर्भ ग्रंथालयाच्या ताब्यात दिला आहे. त्या वेळी सर्वश्री मिलिंदजी ओक, मंदार कुलकर्णी (तरुण भारत, मुंबई व्हिडिओ वार्ताहर) आणि संघ तसेच सावरकर अभ्यासक डॉ. श्रीरंग गोडबोले, पुणे हे तिघेही कराडला माझ्या घरी आले होते आणि मी केलेल्या संशोधनाची दखल घेऊन डॉ. श्रीरंग गोडबोले यांनी याबाबत माझी व्हिडिओ मुलाखत घेतली आहे.

हा फोटो योग्य ठिकाणी गेला, याचा आनंद अवर्णनीय आहे.

- केदार गाडगीळ, कराड

 

 हा कराड प्रवास करण्याआधी डॉक्टरांनी तार पाठवली होती की Arrange Sitting (बैठक आयोजित करा)’. त्या वेळच्या कार्यकर्त्यांना त्या तारेचा अर्थ नीट कळल्यामुळे त्यांना वाटले की Arrange Meeting (जाहीर सभा आयोजित करा)’ असा निरोप आहे. त्यामुळे कृष्णाबाई घाटासमोरच्या जोशी राममंदिरात त्या दिवशी सकाळी 10 वाजता एक सभा आयोजित करण्यात आली होती, त्यानुसार कराडात ठिकठिकाणी डॉ. हेडगेवारांचे भाषण होईल असे बोर्डही लावण्यात आले होते. असा घोटाळा झाला असूनसुद्धा, डॉक्टरांनी सर्व स्वयंसेवकांना सांभाळून घेतले. झालेल्या घोटाळ्याचा उद्वेग ना त्यांनी बोलून दाखवला, ना त्यांच्या चेहर्यावर विषाद होता. या प्रवासात पूज्य डॉक्टरांबरोबर काशिनाथपंत लिमये आणि आणखी एक स्वयंसेवक कराडला सकाळीच पोहोचले होते. डॉ. मा.ना. करमळकर लिहितात, “मोटर स्टँडवर आम्ही सगळे त्यांना उतरवून घेण्यास गेलो होतो. डॉक्टर मोटारीतून उतरले. आम्हा सर्वांकडे त्यांनी मोठ्या प्रेमाने आपलेपणाने त्यांनी पहिले. त्या वेळी त्यांची भेदक पण प्रेमयुक्त नजर अजून माझ्या हृदयात घर करून आहे. केशवराव जोशी वकील यांनी आपली गाडी डॉक्टरांना घरी नेण्यास आणली होती. डॉक्टरांनी मोटारीत बसण्याचे नम्रपणे नाकारले ते आमच्याबरोबर चालत प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करत केशवराव जोशी वकिलांच्या घरी गेले.

कृष्णाबाई घाटावरील जोशी राममंदिरात सर्व स्वयंसेवक जमले होते. डॉक्टर आले. ध्वजारोहण प्रार्थना झाली. डॉक्टरांचे बोलणे सुरू झाले. मध्येच एक तरुण नदीवर स्नान करून, अंगावर पिळलेले धोतर, हातात तांब्या घेऊन आला. लांबूनच चढ्या आवाजात म्हणाला, “काय हो डॉक्टर, पुण्यात सोन्या मारुती सत्याग्रह चालू आहे. संघाने या वेळी काय केले?” डॉक्टर शांतपणे म्हणाले, “असे लांब का उभे राहिलात, जवळ या ना. संघाने जे करावयाचे आहे ते केले आहे.” बौद्धिक वर्ग संपला. डॉक्टरांनी मनमोकळेपणाने त्याच्याशी गप्पा मारल्या सांगितलेपुण्यात वैदिकाश्रमात संघ शिक्षा वर्ग सुरू आहे. तेथून मी सोन्या मारुती चौकात जाऊन घंटा वाजवून सत्याग्रह करून येथे आलो आहे. जे योग्य तेच केले ना?” यावर तो गृहस्थ काय बोलणार? अतिशय खजील होऊन तो गृहस्थ तेथून निघून गेला. अजूनही त्या गृहस्थाचा चढ्या आवाजातील प्रश्न त्याला संघटनकुशल डॉक्टरांनी शांतपणे संयमितपणे दिलेले उत्तर माझ्या कानात वेदवाणीप्रमाणे घुमत आहे.”

या जाहीर कार्यक्रमास काँग्रेसचे कराडमधील प्रमुख कार्यकर्ते आणि स्वतंत्र भारतातील पहिले आमदार बाबुरावजी गोखले आणि पुढे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे संरक्षणमंत्री आणि उपपंतप्रधान झालेले मा. यशवंतराव चव्हाण हे दोघेही उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण या कार्यक्रमाबद्दल आत्मचरित्रात - ‘कृष्णाकाठमध्ये (पान 236-237, -बुक प्रथमावृत्ती, 2006) लिहितात - ‘डॉक्टरांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी वाटले. परंतु त्यांनी सांगितलेल्या विचारांचा माझ्या मनावर काही परिणाम झाला नाही. मी डॉक्टरांना काँग्रेसच्या दृष्टीकोनातून काही प्रश्न विचारले. (काय प्रश्न विचारला हे लिहिलेले नाही, पण त्यांच्या लिखाणावरून अहिंदूंशी संबंधित विचारला असावा, असे लक्षात येते.) डॉक्टरांनी त्यांच्या पद्धतीने उत्तरे दिली. हिंदुत्वाची व्याख्या सांगितलीआसिंधु सिंधु...’ वगैरे..

यावर यशवंतरावांनी प्रश्न विचारला की या व्याख्येत बसत नसतील त्यांचे काय करायचे? डॉक्टर उत्तरले, “तो प्रश्न जेव्हा उभा राहील, तेव्हा पाहता येईल.” यावर यशवंतराव लिहितात - माझी खात्री झाली की चर्चा व्यर्थ आहे. आणि त्यांनी निष्कर्ष काढला की संघाला विशिष्ट वर्गाच्या लोकांची फॅसिस्ट संघटना बनवायची आहे... तेव्हापासून मी संघापासून चार हात दूर राहिलो.. माझ्या मित्रांना त्या विचारापासून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.’

ही सभा झाल्यावर डॉक्टर आणि काशिनाथपंत लिमये यांचे जेवण केशवराव वासुदेव जोशी वकील (ना.वा. जोशी, टिळक हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक यांचे मोठे भाऊ) यांच्या घरी झाले. त्या दिवशी केशवराव जोशी यांच्या घरी नृसिंहजयंतीचे पारणे होते (वैशाख शुद्ध चतुर्दशी), अशी आठवण नारायणराव जोशी यांनी सांगितली होती, म्हणून डॉक्टरांचा हा प्रवास दिनांक 23/05/1937ला झालेला दिसतो.

संशोधन आणि संकलन - केदार गाडगीळ, कराड

9422030422, 9511256918

संदर्भ

1. डॉ. मा.ना. (मार्तंड नारायण) करमळकर यांची आठवण .भा., पुणे - वज्रस्मृती 22.01.1989.

2. ‘युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार - सांस्कृतिक वार्तापत्र विशेषांक वर्षप्रतिपदा शके 1936, 31 मार्च 2014, पान 36-39.

3. ‘संघसरिताकोल्हापूर विभाग पान 22, 23, 24, प्रथम आवृत्ती मार्च 2014.

4. ना.. पालकर लिखित डॉ. हेडगेवारांचे चरित्र, पान 354, आवृत्ती नववी, 26 मे 2016.

5. कराडमधील ज्येष्ठ स्वयंसेवकांशी झालेल्या वेळोवेळी चर्चा:

. नारायणराव जोशी, दत्तोपंत टंकसाळे रघुनाथराव देशपांडे यांच्याशी झालेल्या चर्चा - 17.11.1999. (याची ऑडिओ कॅसेट आहे.)

. बापूसाहेब लाटे सर, अप्पा पेंढारकर, प्रभाकर वाचासुंदर सर यांच्याशी वेळोवेळी झालेली चर्चा.

. डॉ. देव, किशोर मुरलीधर काळे सुहास फडके यांच्याशी वेळोवेळी झालेली चर्चा