परिचय टिळकांच्या गीतारहस्याचा..

विवेक मराठी    19-Jun-2021
Total Views |

*'संस्कृती संवर्धन आणि संशोधन प्रतिष्ठान'चा नवा उपक्रम

*ऑनलाईन कोर्सद्वारे 'गीतारहस्य' समजून घेण्याची संधी

geeta_1  H x W:

लोकमान्य टिळक यांच्या प्रखर राष्ट्रवादाची, तर्कशुद्ध विचाराची आणि विचारपूर्ण सामाजिक दृष्टीकोनाची साक्ष देणारा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे ‘श्रीमद्भगवतगीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र’. १९१०-११ साली मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांनी आपल्या आयुष्यभराच्या चिंतनाचे संचित म्हणून हा ग्रंथ साकार केला. पुढे तुरुंगातून परतल्यावर ग्रंथाच्या कच्च्या खर्ड्यावर संस्कारणे करून ‘श्रीमद्भगवतगीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र’ हा ग्रंथ प्रकाशित केला गेला.या ग्रंथाचे आणि त्यातील विचारांचे महत्त्व भारताच्या आजवरच्या वैचारिक इतिहासात अनन्यसाधारण आहे.

आपल्यावयाच्या १६व्या वर्षी टिळकांना गीतेतीलविचारांचा प्रथम परिचय झाला.त्यासोबतच तोपर्यंतच्याआद्यशंकराचार्य आदी प्रभृतींनी गीतेतीलमूळ विचाराचा लावलेला अर्थ वमहाभारतातील गीतेचे साक्षात प्रयोजन यातील तफावत टिळकांनाजाणवली. या मुलभूत प्रश्नापासून टिळकांचे गीतेवरील चिंतन सुरु झाले.त्यांच्या राजकीय, सामाजिक, वैचारिक अशा विविध क्षेत्रातील कर्तृत्त्वाला गीतेच्या चिंतनाचा, अभ्यासाचा पाया आहे.

 

या अखंड चिंतनाचे फलित म्हणजे ‘श्रीमद्भगवतगीतारहस्य अथवाकर्मयोगशास्त्र’. टिळकांच्या आधी गीतेवर अनेक भाष्ये लिहिली गेली होती. ही मूळ भाष्येप्रवृत्तीमार्गी आणि निवृत्तीमार्गी अशा दोन भागांत पाहता येतात. आद्यशंकराचार्यांच्या आधी गीतेवरील भाष्ये प्रवृत्तीमार्गी होती. म्हणजेच गीतेचा मूळ संदेश हा ज्ञानप्राप्ती आणि भक्तिमार्गाचा असून जीवनाचे अंतिम साध्य मिळविण्याकरिता कर्मांपासूनसंन्यास न घेता, सद्सद्विवेकाने आणि निरिच्छवृत्तीने कर्म करत राहावे असा विचार प्रवृत्तीमार्गी भाष्ये मांडतात. याउलटशंकराचार्य प्रभृतींचा निवृत्तीमार्गी विचार म्हणजे ज्ञानप्राप्तीनंतर संपूर्ण कर्मसंन्यास घेतल्याशिवाय जीवनाचे अंतिम साध्य सफल होत नाही. त्यामुळे कर्मसंन्यास घेणे जीवनाच्या अंतिम साफल्यासाठी अथवा मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक आहे असा संदेश प्रसारित झाला.

इसवीसनाच्या सातव्या-आठव्या शतकापासून भारतीय विचारविश्वाचा आसमंत निवृत्तीमार्गाने व्यापून राहिला होता. अशा वैचारिक पार्श्वभूमीवर विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात टिळकांच्या तर्कशुद्ध दृष्टीकोनातून साकार झालेल्या गीतारहस्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.ते महत्त्व इतके आहे की, गीतारहस्याच्या प्रकाशनानंतरचे एक संपूर्ण दशक ‘गीतारहस्य युग’ म्हणून संबोधले जाते. त्याकाळातील भारतीय वैचारिक क्षेत्र याग्रंथाने आणि विचाराने ढवळून काढले होते.

 

गीतेचा मूळ संदेश हा प्रवृत्तीमार्गी आणि कर्माला प्रोत्साहन देणारा तर आहेच पण त्यासोबतच त्या संपूर्ण विचाराला समाजधारणेचे स्वरूप आहे. ज्ञानमुलक आणि भक्ती-श्रद्धा यांनी परीपोषित केलेला विशुद्धकर्मयोग टिळकांना अभिप्रेत आहे. आणि त्यापुढे जाऊन ते म्हणतात की अशा ज्ञानसंपन्न आणि सश्रद्ध माणसाने, सिद्ध पुरुषाने सारासारविवेकाने, कर्मयोगी होऊन समाजाचेनेतृत्त्वकरणे, धर्माचे मार्गदर्शन करणे आवश्यक ठरते. टिळकांनी मांडलेला गीतेचा हा विचार म्हणजे आपल्या राष्ट्राच्या, समाजाच्या उभारणीचेपायाभूत मूल्य आहे.

 

यासोबतच गीतारहस्यचे आणखीन एक विशेष म्हणजे टिळकांनी मांडलेला नीतिशास्त्र, समाज-निती यांचा मांडलेला विचार. भारतीय नीतिशास्त्र आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान यांचा साकल्याने विचार करून टिळकांनी गीतेच्या माध्यमातून नैतिक विचारचा एक नवा दृष्टीकोन या ग्रंथातून दिला आहे.

आज२१व्या शतकात टिळकांचा हा विचारआपल्याला विचारांचे, राष्ट्रनिर्मिती आणि समाजधारणेचे नवे आयाम दाखवू शकतो. त्यामुळे गीतारहस्याचासाक्षेपी अभ्यासच नव्हे तर तो संपूर्ण विचार आपल्या आयुष्यात उतरविणे आवश्यक आहे.

 

याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून ‘विवेक’च्या‘संस्कृती संवर्धन आणि संशोधन प्रतिष्ठान’च्यावतीने ‘श्रीमद्भगवतगीतारहस्य’ या विषयावर १५ तासांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आपण सुरु करत आहोत.हा अभ्यासक्रम कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचा एक्स्टेंशन कोर्स असणार आहे.मुंबई विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागाच्या प्रमुख, प्राध्यापक डॉ. शर्मिला वीरकर या अभ्यासक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. हा अभ्यासक्रम इंग्रजीत होणार असून अधिकाधिक लोकांनी या अभ्यासक्रमात भाग घेऊन गीतारहस्य ग्रंथाची ओळखच नव्हे तर पुढील अभ्यासाचा सुदृढ पाया तयार करावा. येत्या२६ जून २०२१ पासून हा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने चालविण्यात येणार आहे. तेव्हा कृपया अधिकाधिक लोकांनी यात सहभाग नोंदवावा.

 

आपला सहभाग नोंदविण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी ९९२०२२७७५५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.धन्यवाद!