राज पुरोहित यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

विवेक मराठी    22-Jun-2021
Total Views |


 Raj Purohit as BJP _1&nb

मुंबई
मुंबईतील भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार अ‍ॅड. राज पुरोहित यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.

राज पुरोहित यांनी महाराष्ट्र विधानसभेत सहावेळा प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये त्यांनी दक्षिण मुंबईतील मुंबादेवी मतदारसंघाचे चारवेळा तर कुलाबा मतदारसंघाचे दोनवेळा प्रतिनिधित्व केले आहे. तसेच १९९५-९९ या काळातील भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्रीपदही भूषवले. तसेच २०१४ ते २०१९ दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज पुरोहित यांनी विधानसभेतील भाजपचे मुख्य प्रतोद म्हणूनही काम केले.

दक्षिण मुंबईतील राजकारणामध्ये राज पुरोहित हे एक प्रमुख नाव असून मुंबईसह राज्यभरातील राजस्थानी समाजामध्येही त्यांचा प्रभाव आहे.