दहशतवाद आणि भारत

विवेक मराठी    28-Jun-2021   
Total Views |

फुटीरतावादी संघटना आपली अस्मिता जपण्यासाठी स्वतंत्र राज्याची मागणी करताना दिसतात. पण त्यांना चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश ह्यांची मिळणारी मदत ह्या फुटीरतावादाची पाळेमुळे कुठे पोहोचलेली आहेत हे दर्शवते. याचप्रमाणे ईशान्येकडील राज्यांमध्ये ख्रिश्चन धर्माचा वाढता प्रभाव ह्याला धार्मिक पैलू देतो.


Terrorism _1  H 

मागील लेखात पंजाब आणि आसाम येथील दहशतवादाचा आढावा घेतला आहे. ह्या लेखात ईशान्येकडील अन्य राज्यांमधील वाढत्या दहशतवादाचे विश्लेषण केलेले आहे. तेथील फुटीरतावादी संघटना आपली अस्मिता जपण्यासाठी स्वतंत्र राज्याची मागणी करताना दिसतात. पण त्यांना चीन, पाकिस्तान आणि बांगला देश ह्यांची मिळणारी मदत ह्या फुटीरतावादाची पाळेमुळे कुठे पोहोचलेली आहेत, हे दर्शवते. याचप्रमाणे ईशान्येकडील राज्यांमध्ये ख्रिश्चन धर्माचा वाढता प्रभाव ह्याला धार्मिक पैलू देतो. कारण ह्या दहशतवादाला ख्रिश्चन धर्माची थेट मदत आहे, असे पुरावे उपलब्ध आहेत. भारतातील हा दहशतवाद समाजिक आणि धार्मिक ऐक्याला घातक आहे, शिवाय देशाच्या सुरक्षिततेलाही बाधक आहे. ईशान्येकडील काही राज्यांमधील दहशतवादाचा आढावा घेऊ या -

नागालँड

नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त ख्रिश्चन लोकसंख्या असणार्या लोकांचे नागालँड हे राज्य नॅशनॅलिस्ट सोशॅलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड ह्या फुटीरतावादी संघटनेने प्रभवित झालेले आहे. ‘नागालीमह्या स्वतंत्र आणि स्वायत्त राज्याची निर्मिती हे त्यांचे ध्येय आहे. (संदर्भ - नॅशनॅलिस्ट सोशॅलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड - इसाक-मुईवाह, रिट्रीव्ह, 29 नोव्हेंबर 2016.) अरुणाचल, मणिपूर, आसाम आणि म्यानमारचा काही भाग जोडूननागालीमतयार करायचे आहे. वेगळी राज्यघटना, वेगळा ध्वज हेसुद्धा त्यांच्या मागणीमध्ये आहेत. नागा लोकसंख्येचा ईशान्य भारताचा समग्र भाग आणि म्यानमारचा वायव्य भाग ह्यांच्या एकत्रीकरणातून हा स्वायत्त प्रदेश त्यांना बनवायचा आहे. (संदर्भ - इज चायना बॅकिंग इंडियन इन्सर्जंट, दी डिप्लोमॅट, रिट्रीव्ह, 27 एप्रिल 2011.) ह्यांचे ब्रीद आहेनागालँड फॉर ख्रिस्टम्हणजेचखास ख्रिश्चनांसाठी नागालँड’, ह्यावरूनच हा धार्मिक दहशतवादसुद्धा असल्याचे दिसून येते. .झेड. फिझो ह्यांनी 1946मध्ये नागा नॅशनल काउन्सिलची स्थापना केली. नंतर 1975ला नॅशनॅलिस्ट सोशॅलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड तयार झाली. ह्या संघटनेचे पुढील दोन भाग 1988पासून आहेत - 1. नॅशनॅलिस्ट सोशॅलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड-के - ही एस.एस. खापलांगच्या नेतृत्वाखाली आहे. हिच्यावर बंदी घालण्यात आली आहे. (संदर्भ - गव्हर्मेंट डिक्लेअर्स एनएससीएन के ॅज टेररिस्ट ऑर्गनायझेशन अंडर यूएपीए., पिब.निक.इन. रिट्रीव्ह, 17 नोव्हेंबर 2015.) आणि 2. नॅशनॅलिस्ट सोशॅलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड-आय-एम- ही इसाक आणि मुईवाह ह्यांच्या नेतृत्वाखाली आहे.


Terrorism _2  H

4 जून 2015ला भारतीय लष्कराच्या 6 डोग्रा रेजिमेंटवर मणिपूरमध्ये हल्ला चढवून नॅशनलिस्ट सोशॅलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड-के ह्या संघटनेने 18 जवान ठार केले, तर 3 ऑगस्ट 2015ला नॅशनॅलिस्ट सोशॅलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड-आय-एम-इसाक आणि मुईवाह ह्यांनी भारत सरकारसह शांतता करारावर स्वाक्षरी केली. त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंग आणि अजित डोवाल उपस्थित होते. (संदर्भ - इकॉनॉमिक्स टाइम्स, 3 ऑगस्ट 2015.)

त्रिपुरा

त्रिपुरामधील फुटीरतावादी दहशतवाद हा थेट ख्रिश्चन धर्माशी जोडला गेल्याचे आढळते. न्यूझीलंडचे मिशनरी 1940च्या दरम्यान त्रिपुरा येथे आले. इथे स्थायिक झाले. त्यानंतर प्रयत्न करूनही 1980पर्यंत खूप जणांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेला नव्हता. ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुराची - एनएलएफटीची स्थापना करण्यात आली. भारतातून बाहेर पडून स्वतंत्र त्रिपुराची निर्मिती करण्याचे ध्येय बाळगून नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा ही दहशतवादी संघटना 1989पासून सक्रिय झाली. तसेच चर्च ह्या संघटनेला पैसा पुरवते. (संदर्भ - दी प्रीव्हेंशन ऑफ टेररिझम ॅक्ट, 2002, रिपब्लिक ऑफ इंडिया, साउथ आशिया टेररिझम पोर्टल, 2002.) त्रिपुरामध्ये बाहेरून येणार्या बंगाली इत्यादींना येथे विरोध आहे. 1956नंतर त्रिपुरामध्ये जे आले आहेत त्यांना परत पाठवणे आणि भारतीय संघराज्यापासून मुक्ती मिळवणे हे त्यांना साध्य करायचे आहे. ह्या संघटनेची निर्मितीच मुळात बाप्तीस्ट चर्च ऑफ त्रिपुराच्या पाठिंब्याने झालेली असल्यामुळे हा दहशतवादसुद्धा धार्मिकच आहे. तसेच एप्रिल 2000मध्ये नाओपारा बाप्तीस्ट चर्चचे नागमनलाल हलाम ह्यांनी अटक झाल्यावर कबुली दिली होती की त्यांनी गेली दोन वर्षे एनएलएफटीसाठी स्फोटके खरेदी केली होती. (संदर्भ - भौमिक, सुबीर - 18 एप्रिल 2000, ‘चर्च बॅकिंग त्रिपुरा रिबेल्स, बीबीसी.) तसेच सगळी गावे ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित करणे, लोकांना भीती वाटावी म्हणूनबलात्कारहे साधन वापरणे हा मार्ग त्यांनी अवलंबला. (संदर्भ - इन दी नेम ऑफ फादर? ख्रिश्चन मिलीटनटीझम इन त्रिपुरा, नॉर्दन युगांडा अँड एमबोन, स्टडीज इन कॉन्फीक्त अँड टेररिझम.) ह्या संघटनेने 1999 ते 2001 दरम्यान पाच हजार गावकर्यांना सक्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारायला भाग पाडले. त्यात वीस जणांनी प्रतिकारात प्राण गमावले. (संदर्भ - ट्रायबल युनाइट अगेन्स्ट कन्व्हर्जन्स इन त्रिपुरा, रेडीफ.कॉम, 2 ऑगस्ट 2001.) 7 ऑगस्ट 1998ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चार वरिष्ठ नेत्यांचे अपहरण आणि हत्यासुद्धा केली गेली. (संदर्भ - भौमिक सुबीर, 2004, एथनिसिटी, आयडॉलॉजी अँड रिलीजन, सेपरेटिस्ट मूव्हमेंट इन इंडियाज नॉर्थ ईस्ट, आशिया-पॅसिफिक सेंटर फॉर सिक्युरिटी स्टडीज, पृष्ठ 236.)

2000मध्ये तर गौरांगत्तीला, बागबर निर्वासित छावाणी येथे हिंदूंची हत्या केली गेली. हिंदू आध्यात्मिक गुरू शांती काली ह्यांची त्यांच्या आश्रमात हत्या, धर्मांतराला विरोध केला म्हणून लाभकुमार जामातिया हे जामातिया जमातीचे प्रमुख होते ह्यांचे अपहरण आणि हत्या अशा हिंसक कारवाया एनएलएफटीने केल्या. 2000ला दुर्गापूजा उत्सव साजरा करणार्या हिंदू भाविकांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

तसेच 2001मध्ये ख्रिश्चन ऑल त्रिपुरा टायगर फोर्ससह एनएलएफटीने 481 जणांचे अपहरण आणि त्यातील 405 जणांची हत्या केली. (संदर्भ - कन्व्हर्जन विथ फॉरेन फंड, ऑर्गनायझर.इन, 10 एप्रिल 2005, आर्काइव्ह फ्रॉम दी ओरिजिनल ओन 3 मे 2005.) पैसा मिळवण्यासाठी एनएलएफटीने अपहरण केलेल्या जमातीच्या लोकांचा वापर करून पोर्नोग्राफिक फिल्म तयार करून अवैधपणे डीव्हीडी विकल्या. (संदर्भ - भौमिक, सुबीर, 27 ऑगस्ट 2005, इंडिया रिबेल्स मेकिंग पोर्न फिल्म्स, बी.बी.सी. न्यूज.) अशा अत्यंत हीन पातळीला जाऊन आपलातथाकथित स्वतंत्र त्रिपुराचा हट्ट पूर्ण करण्याची धडपड चालू आहे. विशेष म्हणजे ह्या गैरव्यवहाराला चर्चचा पाठिंबा आहे. त्रिपुरा बाप्तीस्त ख्रिश्चन युनियन सेक्रेटरी राणाकुमार देब्बारमा ह्यांनी स्पष्ट केले होते की 250 जणांनी नुकताच ख्रिश्चन धर्म स्वीकारला. चर्चची संख्या वाढून 193वर गेली. रेयांग हे आधी वैष्णवांचे असणारे गाव आत धर्मांतराने 50 टक्के ख्रिश्चन झालेले आहे. (संदर्भ - ‘टेन्शन इन त्रिपुरा हिल्स ओव्हर मास कान्व्हर्जन्स’, मानस पॉल, टाइम्स ऑफ इंडिया, 2 जानेवारी 2007.)


Terrorism _3  H

कामटापूर लिबरेशन ऑर्गनायझेशन - केएलओ ही आणखी एक दहशतवादी संघटना ईशान्येकडे कार्यरत आहे. कोची राजभोंगशी ह्या वंशाच्या नागरिकांचे हितसंबंध जोपासण्यासाठी ह्यांना कामटापूर हे भारतापासून वेगळे करून हवे आहे. पश्चिम बंगाल, आसाम, बिहारचे काही जिल्हे आणि नेपाळचा झापा जिल्हा असे मिळून स्वतंत्र कामटापूर तयार करणे ह्या ध्येयासाठी 28 डिसेंबर 1995ला ही स्थापन झाली. ऑल इंडिया कामटापूर स्टूडंट्स युनियनने सशस्त्र उठावाची तयारी केली होती. त्यासाठी उल्फाची मदत घेण्यात आली होती. पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सनेसुद्धा केएलओला मदत केलेली आहे. ह्याद्वारे भारताच्या पश्चिम बंगालच्या सिलीगुडी भागावर नियंत्रण ठेवण्याचा त्यांचा हेतू होता. (संदर्भ - साउथ आशिया टेररिझम पोर्टल, केएलओ.)

मणिपूर

झुमी रिव्होल्यूशनरी ऑर्गनायझेशन 1993ला आणि त्यातूनच झुमी रिव्होल्यूशनरी आर्मी ही मणिपूरला 1997मध्ये स्थापन झाली. भारतातील मणिपूर आणि मिझोरम, म्यानमारमधील चिनराज्य आणि बांगला देशमधील चित्तगॉग हिल ट्रॅक ह्यांचे मिळून स्वतंत्रझोगमची निर्मिती करायची आहे. कारण ह्या भागात झुमी लोक विखुरलेले आहेत. ह्या दोन्ही संघटनांमध्येही काही वेळा हिंसाचार झालेला आहे. पीपल्स लिबरेशन आर्मी ऑफ मणिपूरची स्थापना 1978मध्ये झाली. स्वतंत्र मणिपूरची निर्मिती हे त्यांचे ध्येय होते. कम्युनिस्ट आणि माओवादी विचारधारा असणार्या ह्या संघटनेने भारतीय लष्कर, निमलष्करी दले, राज्याचे पोलीस दल ह्यांच्यावर हल्ले केलेले आहेत. ह्या संघटनेला नॅशनल सोशॅलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड ह्यांनी प्रशिक्षण दिले, तर पाकिस्तानच्या आयएसआयशीही ह्यांचे संधान आहे. बांगला देशमध्ये तर ह्यांचे विजनवासातील सरकार आहे. (संदर्भ - साउथ एशियन पोर्टल, अर्काइव्ह, 21 जानेवारी 2018.)

मेघालय

खासी, सिंतेंग आणि गारो ह्या जमातींना स्वत:चे स्वतंत्र मेघालय राज्य हवे होते. त्यासाठी हिनेवट्रेप एचीक लिबरेशन काउन्सिलची - एचएएलसीची स्थापना केली गेली. पण यात गारो ह्या जमातीचे वर्चस्व वाढले आणि एचीक मॅटग्रीक लिबरेशन आर्मी ही नवी संघटना निर्माण झाली. याचप्रमाणे खासी आणि सिंतेंग ह्या जमातींनी 2000 साली हिनेवट्रेप नॅशनल लिबरेशन काउन्सिलची स्थापना केली. ह्या संघटनेने हिंसाचार, अपहरणे, अवैध शस्त्र बाळगणे, खोटे चलन वाटणे असे अनेक गुन्हे केले. ह्या संघटनेलासुद्धा पाकिस्तानच्या आयएसआयची मदत आहे. (संदर्भ - हिनेवट्रेप नॅशनल लिबरेशन काउन्सिल, साउथ आशिया टेररिझम पोर्टल.) सध्या 2019पासून त्यावर बंदी घातलेली आहे. ‘संदर्भ - मेघालया बेस्ड इन्सर्जंट ग्रूप एचएनएलसी बॅन बाय गव्हर्न्मेंट, दी हिंदू, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, 18 नोव्हेंबर 2019.) ह्या एचएएलसी संघटनेचे संबंध 1. नॅशनॅलिस्ट सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड-इसाक-मुईवाह, 2. नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट ऑफ बोदोलँड, 3. नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा आणि 4. युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम ह्या सगळ्या संघटनांशी आहेत. नॅशनलिस्ट सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँडने आर्थिक मदत दिली. बर्माच्यावा जमातीनेविकलेली चिनी शस्त्रे एचएएलसीने मिळवली. बांगला देशच्या बाजारातून मणिपूर-मिझोरमला शस्त्रे पोहोचत होती. (संदर्भ - फॉर मनी ढाक्का टर्नड ब्लाइंड आय टू अवर ॅक्टिव्हिटी, तेहलका मॅगझीन, व्हॉल्यूम 7, इश्यू 42, 23 ऑक्टोबर 2010.)

ईशान्येकडील हा दहशतवाद ख्रिश्चन धर्माच्या तसेच बांगला देश आणि चीन यांच्या मदतीने वाढत आहे. चीनच्या कम्युनिस्ट सरकारला भारतात अस्थैर्य हवे आहेच. चीनच्या माओवादी विचारसरणीने तर भारतात हिंसक संघटना तयार झाल्या आहेत. चीनने आपल्या माओवादी विचारसरणीने भारताच्या अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांना नासवलेले आहे. विचारसरणीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीमुळे हजारो लोकांना प्राण गमवावे लागले. ईशान्येकडून खाली पश्चिम बंगालखाली रेड कॉरिडॉर तयार झालेला आहे. त्याचे विवेचन पुढील लेखात.