‘पिंडी ते ब्रह्मांडी’ विज्ञान कुंडलिनीचे

विवेक मराठी    04-Jun-2021
Total Views |

@डॉ. सुवर्णा रावळ

rawal_1  H x W:

कुंडलीचे संचालन करणारी ती कुंडलिनी. कुंडली म्हणजे वस्तुमान असणारी एक अशी जिवंत बाब, ज्यात भूत-वर्तमानाची आणि भविष्याची संपर्ण माहिती आहे. ही कुंडलिनी ही प्रत्यक्ष मूलभूत पेशी आहेत, ज्या मानवी शरीरात विविध ठिकाणी विराजमान आहेत. या पेशी म्हणजे मानवी शरीराच्या मूळ पाया असणार्या आधारभूत पेशी आहेत. मूळ पिंडाचे कुंडलिनीचे काही सूत्र मिळतेय का? जुळतेय का?


मागील
लेखात आपण मानवी शरीरातील विविध अवयवरूपी अंगे आणि त्यांची निर्मिती, गुणात्मक संख्यात्मक गुणधर्म पाहिले. या सर्वांचा मूळ निर्माता आणि संचालक म्हणजे डीएनए, हेही आपण अनुभवले. हे सारे आधुनिक विज्ञानाने प्रतिपादन केले आहे.

भारतीय परिभाषेत या सर्व बाबींनायोगया परिप्रेक्ष्यात मांडले आहे आणि त्याची चर्चा करणे, अभ्यास करणे, अनुभूती घेणे यांस आध्यात्मिक मार्ग म्हटले आहे. अध्य+आत्मा म्हणजे अध्यात्म. अध्य या शब्दाचा अर्थ आपण आरंभिक, पूर्व, प्रारंभिक म्हणजे मूळ आणि आत्म म्हणजे तत्त्व. म्हणजेच आत्मतत्त्वाच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे आध्यात्मिक मार्ग. ही संपूर्ण वैज्ञानिक परिभाषा आहे. जे मुळापर्यंत जाऊ इच्छितात, त्याचे विविध मार्ग आहेत. प्रत्येक मार्गाचे अंतिम स्थान ते योग हेच आहे, ज्यामध्ये शरीर, मन आणि आत्मा यांना सुसंगत करण्याचे काम केले जाते. हे संपूर्णत: शास्त्र आहे. शरीर आणि मन अनेक व्याधींनी युक्त असते. कारक-मारक, चांगल्या-वाईट, उपयुक्त-हानिकारक पूरक अशा सर्व व्याधी त्यात आल्या. ‘योगया शास्त्राने या व्यधियुक्त शरीर-मनाला आत्म्याच्या परिप्रेक्ष्यात आणणे म्हणजे शुद्ध, सात्त्विक, सनातन यांच्या परीघात आणणे आणि याच परीघात राहण्यास बाध्य करणे म्हणजेयोगपूर्ती होणे.

शरीर आणि मन या काही ना काही वस्तुमान असणार्या अशा बाबी आहेत. तुम्ही म्हणाल, ते कसे? याचे उत्तर असे आहे की, शरीर जसे अनेक रसायनयुक्त कोशिकांनी बनले आहे, तसे याच कोशिकांमध्ये होणार्या अनेक रासायनिक प्रक्रियांचे बाह्य प्रकटीकरण म्हणजे आपल्या शरीर-मनात उमटणार्या विविध भावभावना. हे शास्त्रशुद्ध भौतिक-तांत्रिक विज्ञान आहे. याच भौतिक-तांत्रिक घडामोडी घडणार्या प्रयोगशाळा कोणत्या? कुठे आहेत? कशा आहेत? कार्यपद्धती काय आहे? आणि त्या नेमक्या कोण?

या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच आहे, ते म्हणजेकुंडलिनी’.

कुंडलीचे संचालन करणारी ती कुंडलिनी. कुंडली म्हणजे वस्तुमान असणारी एक अशी जिवंत बाब, ज्यात भूत-वर्तमानाची आणि भविष्याची संपर्ण माहिती आहे. ही कुंडलिनी ही प्रत्यक्ष मूलभूत पेशी आहेत, ज्या मानव शरीरात विविध ठिकाणी विराजमान आहेत. या पेशी म्हणजे मानवी शरीराच्या मूळ पाया असणार्या आधारभूत पेशी आहेत. संपूर्ण शरीराची स्थापना, रचना याच पेशीच्या आधारावर झालेली आहे. शरीराचे असंख्य अवयव हे याच पेशींचे प्रकटीकरण आहे. बाह्य परावर्तित रूप आहे. या कुंडलिनीची स्थाने शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी का? याचे उत्तर आपल्याला आईच्या उदरात वाढणार्या गर्भविकासाच्या प्रक्रियेत मिळते.

गर्भधारणा ही आई आणि वडील दोघांकडून आलेल्या गुणसूत्रांच्या एकत्रीकरणाची एक संयुक्त प्रक्रिया आहे. 23 गुणसूत्रे आईची 23 गुणसूत्रे वडिलांची एकत्रित मिळून एक बीज तयार होते. हेच बीज हे एका शरीररूपी झाडाची प्रथम मूलभूत पेशी. एका व्यक्तीच्या (स्त्री किंवा पुरुष) संपूर्ण (भूत-वर्तमान-भविष्य) गुणधर्माची माहिती या 23 गुणसूत्रांत असते. आई-वडिलांकडून मिळणारी गुणसूत्रे एकाच प्रकारच्या गुणधर्माची असतात. ही मूलभूत पेशी आईच्या गर्भाशयात आपल्या संख्यात्मक प्रकटीकरणाला बाध्य होते, म्हणजे गर्भधारणा झाली असे निश्चित होते. हीच मूलभूत पेशी म्हणजे बीज म्हणजेच अंडे आपले विभाजन सम संख्येत करीत राहते. म्हणजे एका पेशीच्या दोन पेशी, दोनच्या चार, चारच्या आठ... 16, 32, 64, 128... इत्यादी.

या पेशींचे विभाजन बीजाच्या अंतरंगी गोलातच होत असते आणि मग या गोलाच्या कडेला पेशींची एक रांग तयार होते. मग त्यातून प्रत्येक पेशी आणखी एक एक पेशी तयार करते आणि ती नवीन पेशी जुन्या पेशीला लागूनच स्थिर होते. अशा दोन रांगा या गोलात तयार होतात आणि या पेशींच्या दोन रांगा मिळून मधली रांग तयार होते. याला आपण पेशीचा आतील थर, बाहेरील थर दोन्ही थरांनी मिळून तयार केलेला मधला थर - यालाच इंग्लिशमध्येइंडोडर्म’, ‘इक्टोडर्ममिसोडर्म’ (एपवेवशीा, एलीेंवशीा चशीेवशीा) म्हणतात. यानंतर या गर्भाला अन्नपूर्ततेसाठीचा मार्ग - म्हणजे नाळ तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. या ज्या तीन थर पेशी आहेत, त्या आता विशिष्ट कर्तव्यासाठी बाध्य करण्याची प्रक्रिया सुरू होते आणि त्यानुसार काही पेशींचा संच या कार्यासाठी निर्धारित केला जातो आणि त्यांचे काही ठिकाणही निश्चित होते. म्हणजेच एकदा ठिकाण निश्चित झाले की, या पेशीसंच आपले निश्चित आणि तेवढेच त्याच कालावधीत कार्य करण्यास बाध्य होतात. कोण डोळे तयार करणार, कोण पचनसंस्था तयार करणार, कोण हृदय, कोण लिव्हर... इत्यादी इत्यादी. मागील लेखात शरीरातील सर्व अंगाची सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती करीत नाही.

ही अवयव निर्माणाची प्रक्रिया अत्यंत काटेकोर, कालप्रमाणित असते की, मानवी घड्याळ त्याचे मापन करूच शकत नाही. जैविक घड्याळ मानवी घड्याळ्याच्या कितीतरी पटीने सूक्ष्म स्तरावर चालते. जैविक प्रक्रियांचे कालमापन करणे मानवाच्या क्षमतेत नाही.

या मूलाधार पेशींची ठिकाणे हीच कुंडलिनीची ठिकाणे आहेत. ही ठिकाणे पृथ्वीवरील माणसाच्या शरीरातील ठिकाणे आहेत. अन्य ग्रहावर जर माणूस असेल किंवा निर्माण झाला, तर त्याची कुंडलिनीची ठिकाणे वेगळी असू शकतील. पृथ्वीचे सूर्यमालेतील ठिकाण हे त्याचे कारण आहे. पृथ्वीवर असणार्या मानवाची शरीररचना अशी का आहे? किंवा अन्य प्राणी, पशू, पक्षी, वृक्ष यांची रचना, रंग, रूप असे का आहे, याचेही कारण पृथ्वीचे सूर्यमालेतील स्थान हेच आहे. प्रत्येक ग्रह जो सूर्याच्या कक्षेत स्थिरावला आहे, त्या प्रत्येक ग्रहाचे वैशिष्ट्य आहे. तसेच पृथ्वीला मिळालेले सूर्याच्या कक्षेतील स्थान हेच पृथ्वी ग्रहाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करून देते, तेही फक्त मानवाच्या दृष्टीकोनातून. ब्रह्मांडाच्या दृष्टीकोनातून सर्व समान सर्व शून्यच!


तर
या कुंडलिनीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे योग. या योगाचा प्रथम साक्षात्कारी अभ्यासक, अधिवक्ता, वैज्ञानिक कोण? तर तो आहे आदियोगी. या योगाचा कर्ता, धर्ता, करविता आहे हा आदियोगी. त्यालाच आपण महादेव, शंकर, महेश्वर इत्यादी नावांनी संबोधतो.

 

या आदियोगी शिवाने सात ॠषींना हे योगदान सांगितले-शिकविले-प्रदान केले.. काहीही म्हणा. हे करीत असताना पार्वती त्यामध्ये होतीच. पुराणात एक कथा येते ती अशी - ही शिवपुराणातील कथा आहे. आदियोगी शिव सात लोकांना कुंडलिनी संदर्भातील शरीरचक्रांबाबत सांगत होते. ते सात लोक शिवाच्या चरणी सर्वस्वी लीन-अधीन झालेले शुद्ध आत्मे होते. आदियोगींनी शरीरशास्त्र सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, “मानवाच्या शरीरात एकूण 114 चक्रे असतात. त्यातील 2 चक्रे शरीराच्या बाहेर 112 चक्रे शरीराच्या आत असतात. त्यातील 108 चक्रे प्रत्यक्ष कार्यरत असतात. चार चक्रे शांत (वेीारपीं) असतात. त्यांचा तसा काही विशेष मार्ग नाही. ही 108 चक्रे क्रियान्वित झाली, की त्यातच ही चारही चक्रे येतात.”

हे सांगत असताना पार्वतीने शिवाला प्रतिप्रश्न केला. “कशावरून 112 चक्रे आहेत? जास्तही असू शकतात मार्ग. आपले शरीर किंवा अस्तित्व जाणून घेण्याचे 112पेक्षा जास्तही मार्ग असू शकतात.” यावर शिवाने पार्वतीला या सिद्धीप्रदान प्रक्रियेतून बाहेर जाण्यास सांगितले. सरळ भाषेत हाकलून दिले. पार्वतीही रागाने हट्टाला पेटली तिने सारे ब्रह्मांड भ्रमण केले हे ज्ञान अनुभव करण्याचे. योगाचे 112पेक्षा जास्त मार्ग शोधण्याचे. परंतु तिच्या पदरी निराशा आली. शेवटी ती परत शिवाकडे त्या साधना प्रक्रियेत सामील झाली; परंतु या वेळी ती शिवाच्या बाजूला बसता एक पायरी खाली बसली. हे याचे निर्देशक आहे की, पार्वतीने आपली हार मानली होती. याचा अर्थ असाही होतो की, आदियोगी शिवाने सांगितलेला कुंडलिनी योगाचा मार्ग हा अंतिम सत्य आहे, हेच सनातन सत्य म्हणजे विज्ञान आहे आजच्या परिभाषेत. काय आहे विज्ञान, हे पुढील लेखात सविस्तर पाहू.

क्रमश: