'पार्क'सोबतचे सामंजस्य करार काश्मीरच्या भविष्यासाठी लाभदायक : उपराज्यपाल मनोज सिन्हा

विवेक मराठी    09-Jun-2021
Total Views |

- कृषी आणि व्यापार व वाणिज्य विभागासोबत 'पार्क'चे सामंजस्य करार

- महाराष्ट्र आणि जम्मू - काश्मीरमध्ये उद्योग सहकार्य गरजेचे : आशिषकुमार चौहान

- काश्मीरच्या प्रत्येक क्षेत्रात विकासाची संधी - विक्रम शंकरनारायणन

vivek_1  H x W:

श्रीनगर (पार्थ कपोले) : जम्मू -काश्मीर सध्या विकासाच्या वाटेवर चालत आहे. महाराष्ट्रातील 'पार्क'ने त्यात घेतलेला पुढाकार राज्याच्या भविष्यासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे, असे प्रतिपादन जम्मू - काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी बुधवारी श्रीनगर येथे केले.

'विवेक व्यासपीठ' संचलित 'पॉलिसी ऍडव्होकसी रिसर्च सेंटर' अर्थात 'पार्क' आणि जम्मू - काश्मीर सरकारच्या कृषी कल्याण व व्यापार-वाणिज्य विभाग यांच्यादरम्यान दोन सामंजस्य करारावर उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे सीईओ आशिषकुमार चौहान, अंबरीश दत्त, पार्कचे संचालक आणि मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार, विक्रम शंकरनारायणन, व्यवसाय प्रमुख रविराज बावडेकर, रुचिता राणे, मुग्धा वहाळकर यांच्यासह महाराष्ट्रातील उद्योजक उपस्थित होते.

उपराज्यपाल म्हणाले, जम्मू - काश्मीर सध्या विकासाच्या वाटेवर वाटचाल करीत आहे. प्रत्येक क्षेत्रात विकासाला येथे भरपूर संधी आहे. महाराष्ट्रातील 'पार्क' ने काश्मीरच्या विकासासाठी घेतलेला पुढाकार हा कौतुकास्पद असून काश्मीरच्या विकासासाठी त्याचा मोठा लाभ होणार असल्याचेही सिन्हा यांनी सांगितले. राज्याचे मुख्य सचिव अरुण मेहता म्हणाले, काश्मिर ही विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. त्याचप्रमाणे स्वच्छ व पारदर्शक

 

कृषी खात्याचे प्रधान सचिव नवीन कुमार चौधरी म्हणाले, राज्यात ११ महिन्यापूर्वी स्थिती फारशी चांगली नव्हती. मात्र, उपराज्यपालांनी सूत्रे हाती घेताच कृषी व शेतकरी कल्याणाकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. उद्योग व वाणिज्य खात्याचे प्रधान सचिव रंजन प्रकाश ठाकूर म्हणाले, काश्मीरमध्ये सध्या भविष्यकालीन विकासाचा पाया रचला जात आहे. हिमाचल प्रदेशनंतर काश्मीर हे उद्योग जगतासाठी सुरक्षित राज्य आहे. त्याचप्रमाणे विमान आणि रेल्वेद्वारे राज्य उर्वरित देशासोबत जोडले जात आहे.

'पार्क' भविष्यात काश्मीरच्या विकासासाठी अनेक प्रकल्प राबविणार असल्याचे संचालक किरण शेलार म्हणाले. नव्या जम्मू - काश्मीरच्या उभारणीत 'पार्क' आणि 'विवेक व्यासपीठ' भरीव योगदान देणार असेही ते म्हणाले. काश्मीरमध्ये कृषी क्षेत्रात विकासाच्या संधी असल्याचे विक्रम शंकरनारायणन म्हणाले. जम्मू काश्मीरमधील जमीनविषयक कायद्यात झालेल्या सुधारणा महत्वाच्या ठरल्याचेही ते म्हणाले.

 

महाराष्ट्रातील पाच उद्योजकांची उपस्थिती

यावेळी अंकुश तिवारी, अर्पित श्रॉफ, जितेन मसद, गीतेश पवार आणि गिरीश सांगवीकर हे उद्योजक उपस्थित होते. उपराज्यपाल सिन्हा यांनी उद्योजकांसोबत सविस्तर चर्चा केली.

 

मुंबई होणार भव्य कार्यक्रम

जम्मू काश्मीर सरकार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि पार्क तर्फे मुंबईत काश्मीरच्या आर्थिक विकास व गुंतवणूक यासाठी भव्य कार्यक्रम होणार आहे. यावेळी उपराज्यपाल सिन्हा उपस्थित राहणार आहेत.


- www.mahamtb.com