रमेश पतंगे यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

विवेक मराठी    27-Jul-2021
Total Views |
'महाराष्ट्र भाजप आपला जिल्हा-आपला संकल्प' प्रकल्पाविषयी चर्चा


bjp_2  H x W: 0
  ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे यांनी मंगळवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा  विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना  चिंता करितो कार्यक्षेत्राची - नाना नवले हे पुस्तक भेट म्हणून दिले.

मुंबई : सा.'विवेक' प्रकाशित करीत असलेल्या ऐतिहासिक 'महाराष्ट्र भाजप आपला जिल्हा आपला संकल्प' या प्रकल्पाचा आराखडा सादर करण्यासाठी सा.'विवेक'चे मंत्रालय प्रतिनिधी यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी 'विवेक समूहा'चे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांनी या संपूर्ण प्रकल्पाविषयी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. यावेळेस सोबत 'हिंदुस्थान प्रकाशन संस्थे'चे अध्यक्ष रमेश पतंगे आणि दै.'मुंबई तरुण भारत'चे संपादक किरण शेलार, सा.'विवेक'चे प्रतिनिधी संपर्क प्रमुख राहुल पाठारे, सा.'विवेक'चे मंत्रालय प्रतिनिधी कृष्णात कदम आदी मान्यवरही उपस्थित होते. फडणवीस यांच्या 'सागर' या शासकीय निवासस्थानी मंगळवार, दि. २७ जुलै रोजी ही भेट झाली.


bjp_1  H x W: 0
www.mahamtb.com