ज्येष्ठ स्वयंसेवक सुधीर पातकर यांचे निधन

विवेक मराठी    26-Aug-2021
Total Views |

भिवंडी तालुक्यातील पडघा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुधीर पातकर यांचे निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.


RSS_1  H x W: 0 

पडघा येथील रहिवासी असलेले सुधीर रामदास पातकर (५५) हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने प्रेरित झाल्याने त्यांनी स्थानिक संघशाखेमध्ये कार्यवाह, शिक्षक अशी पदे भूषविली होती. तसेच १९८०-८५दरम्यान पडघा येथे झालेल्या संघाच्या शिबिरातील बोरिवली-पडघा भागातून निघालेल्या स्वयंसेवक संचलनामध्ये पुढे घोड्यावर बसून ध्वज फडकावण्याचा मान त्यांना मिळाला होता. पडघा परिसरातील संघाच्या शाखा सुरू करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. मंगळवारी त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार असून त्यांच्या अंत्ययात्रेसाठी परिसरातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

 

पडघ्यामध्ये संघशाखा सुरू होण्यापूर्वी त्यांचे काका मदनभाई पातकर, सुधाकर पातकर आणि वडील रामदास पारकर या तिघा जणांनी, संघावर बंदी घातली होती तेव्हा कारावास भोगला आहे आणि नानाराव ढोबळे, दादा चोळकर, मधुकरावर जोशी, माधवराव काणे, भगवानराव जोशी ह्यांच्याबरोबरसुद्धा बंदीपूर्वी खेडोपाडी संघशाखेचे काम उभे करण्यासाठी पातकर घराण्याचा मोठा वाटा आहे. सुधीरजींनी त्यांचाच वारसा पुढे चालू ठेवला होता. या आमच्या ज्येष्ठ स्वयंसेवकास ईश्वरदरबारी आत्म्यास चिरशांती मिळो, हीच प्रभुचरणी प्रार्थना. ओम शांती.