DNS बँकेच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. गणेश धारगळकर यांची निवड

विवेक मराठी    09-Sep-2021
Total Views |
डोंबिवली - डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. 2021 ते 2026 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी 13 जणांचे नवनिर्वाचित संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी व उपनिबंधक (महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था, पुणे) दिलीप उढाण यांनी दि. 5 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत ही घोषणा केली.
 


dns_1  H x W: 0
 
 निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेत बिनविरोध निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष सभा झाली. या सभेत अ‍ॅड. गणेश धारगळकर यांची अध्यक्षपदी, तर नंदिनी कुलकर्णी यांची उपाध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली.
 
 
सर्वश्री सी.ए. जयंत पित्रे, महेश फणसे, मिलिंद आरोलकर, योगेश वाळुंजकर, जितेंद्र पटेल, लक्ष्मण खरपडे, योगेश चौधरी, सी.ए. विजय शेलार, सी.ए. अभिजित मराठे, पूर्वा पेंढरकर व अ‍ॅड. मेघना आंबेकर हे सदस्य संचालक म्हणून निवडून आले आहेत.
 
 
या संचालक मंडळात 3 चार्टर्ड अकाउंटंट, 2 अ‍ॅडव्होकेट, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील 2 तज्ज्ञ, बँकिंगचा प्रदिर्घ अनुभव असलेले, तसेच वास्तुरचनाकार, माध्यम सल्लागार व निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त अशा विविध क्षेत्रांतील अनुभवी व्यक्तींचा समावेश आहे.