प्रेमाचा मृत्युगोल सावध व्हा...सावध राहा...

विवेक मराठी    17-Nov-2022
Total Views |
 @निलेश भिसे 9921111155
अशा घटना का घडतात, याला जबाबदार कोण? आफताब?श्रद्धा?तिचे आई वडील? की कमकुवत कायदा? समाजाला दिशा देणारे बुद्धिजीवी? की निमूटपणे सहन करणारा शोषित हिंदू समाज? तसेच यावरील उपाययोजना काय असाव्या? या सर्वांचा आपण सम्यक विचार करू या. श्रद्धा-आफताब आणि अशी एखादी घटना घडल्यानंतर समाजातून तीव्र आणि उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया येतात, पण स्मशानवैराग्याप्रमाणे आठवडाभरानंतर प्रत्येक जण आपापल्या कामांमध्ये गुंतून जातो. अशा घटना घडल्यानंतर देणार्‍या प्रतिक्रियांपेक्षा अशा घटना घडूच नयेत म्हणून सतत, नित्य काळजी घेणे आवश्यक आहे.
 
love
 
 
प्रेमाचा बुरखा पांघरून जेव्हा जिहाद केला जातो,त्याला म्हणतात ‘लव्ह जिहाद’.दिवसेंदिवस जटिल होत जाणारा प्रश्न जणू अजगराने विळखा टाकावा याप्रमाणे संपूर्ण भारतीय समाजाला गिळंकृत करू लागला आहे. श्रद्धा वालकरच्या झालेल्या निर्घृण हत्येने आणि सोशल मीडियात व वर्तमानपत्रात आलेल्या या बातमीच्या वृत्ताने पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डेटिंग अ‍ॅप्लिकेशन ‘टिंडर’वर श्रद्धाची आफताबशी ओळख झाली, ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले.श्रद्धाचे आई-वडील विभक्त राहत होते.श्रद्धाने आईशी या विषयाबद्दल बोलल्यानंतर आईने विरोध केला,तेव्हा श्रद्धा असे म्हणाली की “मी25 वर्षांची असल्यामुळे मी सज्ञान आहे आणि माझा निर्णय मी स्वत: घेऊ शकते.”तिने वडिलांनाही हेच उत्तर दिले.
 

love 
@निलेश भिसे 9921111155
 
 
आई-वडिलांना डावलून निर्णय घेऊन मोकळी झालेली श्रद्धा “आजपासून मी तुमची मुलगी नाही”असे सुनावून बाहेर पडली आणि आफताबबरोबर लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहायला लागली.
 
 
असे असूनदेखील आई-वडिलांनी तिच्याशी संपर्क ठेवला होता.भाऊ वेळोवेळी तिचे इन्स्टाग्रामचे अकाउंट चेक करून तिच्या ख्यालीखुशालीबद्दल माहिती घेत होता. तिला आफताबकडून होणार्‍या मारहाणीबद्दल तिने आईला फोन करून सांगितले होते.2020मध्ये आई वारल्यानंतर, विभक्त राहणार्‍या वडिलांशी तिचे संभाषण व्हायचे. आफताब मारहाण करत असल्याचे तिने वडिलांनाही अनेक वेळा सांगितले होते.ती वडिलांकडे आली,तेव्हा वडिलांनी तिला आफताबशी संबंध तोडून टाक असे सांगितले, पण आफताबने माफी मागून तिला परत आपल्याबरोबर नेले. त्यानंतर मात्र ती कुठे राहते किंवा वडिलांना तिच्याबद्दल यत्किंचितही माहिती नव्हती.कदाचित तिचे वडील मनातून दुखावले गेले असतील.त्यांनी तिच्याशी संपर्क तोडला असेल किंवा आफताबने ठरवून तिला तिच्या वडिलांशी संपर्क ठेवू नकोस असा तिच्यावर दबाव आणला असेल.पण भाऊ मात्र तिचे इन्स्टाग्राम अकाउंट बघत होता. तिच्या अकाउंटवरून काहीच अपडेट्स नाहीत,तसेच लक्ष्मण नाडर नावाच्या श्रद्धाच्या मित्रानेसुद्धा तिच्या भावाला फोन करून सांगितले की“ती अधूनमधून मला फोन करायची, पण दोन महिन्यांपासून श्रद्धाचा फोनच आला नाही.” विकास वालकर यांनी एफआयआरमध्ये ही सर्व माहिती नोंदवली आहे.आफताब पूनावाला असे नाव असल्यामुळे तो मुस्लीम नाही, पारशी आहे असा निखिल वागळेसारखे भंपक आणि सुपारीबाज पत्रकार दुष्प्रचार करत आहेत, पण श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी एफआयआरमध्ये स्पष्ट लिहिले आहे की आम्ही हिंदू कोळी आहोत आणि आफताब हा मुस्लीम आहे,त्यामुळे आमचा या प्रेमप्रकरणाला विरोध होता.कदाचित तो मुस्लीम असल्यामुळेच त्याचा आणि त्याने केलेल्या क्रूर व मानवतेला काळिमा फासणार्‍या कृतीचा भ्रांत पुरोगामी बुद्धिजंतांनी साधा निषेधदेखील केला नाही.एफआयआर नोंदवल्यानंतर, ते दोघे दिल्लीत वास्तव्यास आहेत असे कळले. दिल्ली पोलिसांनी शोध घेतल्यानंतर डोके सुन्न करणार्‍या गोष्टी समोर आल्या.लग्नाचा तगादा लावल्यामुळे आफताबने श्रद्धाचा गळा आवळून निर्घृण खून केला. अतिशय थंड डोक्याने तिच्या देहाचे35 तुकडे केले. रोज रात्री तो तिच्या मानवी देहाचे दोन तुकडे मेहरौलीच्या जंगलात रात्री दोन वाजता टाकून येत असे. पुरावे नष्ट करण्याचे हे काम 18 दिवस चालू होते.मृतदेहाची दुर्गंधी येऊ नये, म्हणून त्याने आधीपासूनच घरामध्ये परफ्यूमचा स्टॉक करून ठेवला होता.श्रद्धाच्या देहाचे तुकडे केल्यानंतर ते ठेवण्यासाठी आफताबने 300 लीटरचा फ्रीजदेखील घेतला होता.श्रद्धाला मारायचे हे मनात ठरवूनच त्याने तिला मारण्याच्या दहा दिवस आधी विरळ मनुष्यवस्ती आणि आजूबाजूला जंगल असणार्‍या दिल्ली येथील मेहरौली येथे घर घेतले होते. आफताबने अमेरिकन क्राइम शो‘डेक्स्टर’ (dexter) पाहून या हत्येचा कट रचला होता.त्याने शेफ म्हणून प्रशिक्षण घेतले होते.त्यामुळे मटण कापायच्या चाकूनेच त्याने श्रद्धाच्या देहाचे तुकडे केले.
 
 

love
 
अशा घटना का घडतात, याला जबाबदार कोण?आफताब? श्रद्धा? तिचे आई वडील? की कमकुवत कायदा?समाजाला दिशा देणारे बुद्धिजीवी? की निमूटपणे सहन करणारा शोषित हिंदू समाज?तसेच यावरील उपाययोजना काय असाव्या? या सर्वांचा आपण सम्यक विचार करू या.
 
 
लव्ह जिहाद
 
 
आपण कटू सत्याचा स्वीकार केला नाही,तरी त्याचे होणारे परिणाम आपण थांबवू शकत नाही.हा लव्ह जिहाद नाही असे कोणी कितीही म्हटले,तरी मी इथे हे ठामपणे नमूद करतो की हा लव्ह जिहादच आहे.
 
 
श्रद्धाचे धर्मांतर कुठे झाले?तिला मुले कुठे झाली होती?असे प्रश्न विचारणार्‍यांनी लक्षात ठेवावे की धर्मांतर, मुले होणे असे झाले तरच तो लव्ह जिहाद असतो असे नाही. अजून तपास सुरू आहे.तपासात अनेक गोष्टी पुढे येतील किंवा दाबल्याही जातील,पण कशावरून तिच्यावर धर्मांतराचा दबाव टाकला जात नसेल आणि तिने ऐकले नसेल किंवा तिला नमाज पढायला लावला असेल आणि तिने ऐकले नसेल,हिंदू देवतांची उपासना करू नये असे तिला सांगितले असेल आणि तिने ऐकले नसेल..आणि यातूनच तिची हत्या झाली असल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, कारण आधीच्या घटनांमध्ये अशा गोष्टी झाल्या आहेत.मी स्वत: हाताळलेल्या एका केसमध्ये कमरेपर्यंत लांब केस असणार्‍या मुलीचे केस कापून डोक्यावर छोटे केस शिल्लक ठेवले होते,कारण केसांमुळे तिला बुरखा घालता येत नव्हता. नमाज अदा करता येत नव्हता.तिला प्रचंड मारझोड केली होती.तिच्या सुदैवाने ती त्या मुलाच्या तावडीतून निसटली,अन्यथा तिचीदेखील अशीच बातमी वाचायला मिळाली असती.आणि समजा, श्रद्धाचे धर्मांतर नाही झाले,तिने मुले जन्माला नाही घातली असे निष्पन्न झाले, तरी इस्लामनुसार काफिरांना दुय्यम दर्जा असतो.त्यांना मारहाण करणे,लैंगिक गुलाम म्हणून वापरणे हे मान्य असते. तो जिहादचाच एक भाग असतो. आपले साध्य पूर्ण होत नाही असे जाणवल्यावर बर्‍याच वेळा आपल्या हातातील साधन आपण फेकून देतो. याच भावनेने श्रद्धाचा खून झाला असल्याचे नाकारता येत नाही. एफआयआरमध्ये तिचे वडील असे सांगत आहेत की‘तू आफताबशी संबंध तोडून टाक असे मी श्रद्धाला सांगितले होते.पण आफताबने माफी मागून तिला परत आपल्याबरोबर नेले.’ लिव्ह इनमध्ये राहणार्‍या श्रद्धाने आफताबकडे लग्नाचा तगादा लावला म्हणून त्याने हे कृत्य केले असे जे बातम्यातून आपल्यापर्यंत पोहोचविले आहे,ते श्रद्धाच्या वडिलांच्या विधानाशी पूर्णत:विसंगत आहे. लग्नाचा तगादा लावला म्हणून तो हत्या कशाला करेल?कारण ती स्वत:त्याच्यापासून दूर वडिलांकडे गेली होती आणि त्याच्याशी संबंध तोडत होती.त्याच्या हे पथ्यावरच पडले होते.एक प्रकारे सुंठीवाचून खोकला जात होता. त्यामुळे निश्चितच हा लव्ह जिहादचाच प्रकार आहे,ज्यामध्ये यश मिळविण्यासाठी आफताबने तकियासुद्धा केला.तकिया म्हणजे जोपर्यंत तुमची ताकद वाढत नाही किंवा ज्या सावजाची शिकार करायची आहे ते सावज तुमच्या टप्प्यात येत नाही, तोपर्यंत त्या सावजाशी - म्हणजेच काफिराशी केलेली तात्पुरती तडजोड.माफी मागून श्रद्धाला तिच्या वडिलांकडून घेऊन दिल्लीला जाणे हा आफताबने केलेला तकियाच होता.तकिया अधिक जिहाद म्हणजेच लव्ह जिहाद,ज्यामध्ये यश आले असते, तर मुस्लीम जनसंख्या वाढली असती आणि यश नाही आले तरी लैंगिक गुलाम किंवा दुय्यम दर्जा असलेली एक काफिर स्त्री कमी झाली. म्हणजेच अलम दुनियेतील काफीरियत संपविण्यासाठी केलेला हा जिहादच आहे. त्यांच्या डोक्यात जिहादची संकल्पना ठासून भरलेली आहे.गोंधळ फक्त आपल्याकडेच आहे.
 
 

 

लव्ह जिहादच्या सापळ्यात सापडूनही सुखरूप बाहेर येणाऱ्या रणरागिनीची ही कहाणी.
प्रत्येक भारतीयाच्या घरात असलीच पाहिजे अशी कादंबरी.
आजच नोंदणी करा…

 

 

https://www.vivekprakashan.in/books/slavery-of-love/

 

 
 
 
अनेक जण विचारतील - हे लव्ह जिहादचे प्रकरण आहे का? अशांसाठी वर दिलेले स्पष्टीकरण पुरेसे आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला सूर्यप्रकाशाइतके लख्ख असे लव्ह जिहादचे वास्तव स्वीकारायचे नसेल तर नका स्वीकारू, पण त्याचे परिणाम तुम्ही थांबवू शकत नाही.संकटाला आणि शत्रूला ओळखायला शिका..वैचारिक, सैद्धान्तिक आणि व्यावहारिक स्तरावरील समस्या,हिंदू समाजाचे इस्लामबद्दलचे अज्ञान अशा घटनांसाठी सर्वाधिक कारणीभूत आहे.त्यासाठी...
 
 
1) सेक्युलॅरिझमचे आणि सर्वधर्मसमभावाच्या गुंगीचे इंजेक्शन देऊन या समाजाला इतके निपचित झोपविले आहे,त्या निद्रिस्त समाजाला मूलत:इस्लाम समजून घ्यायला प्रवृत्त केले पाहिजे.हिंदू धर्माची जेवढी चिकित्सा झाली आहे,तेवढीच इस्लामचीसुद्धा चिकित्सा झाली पाहिजे.‘मेरा अब्दुल ऐसा नही है’ ही प्रेमात बुडालेल्या हिंदू पोरींची धारणा या सर्वधर्मसमभावाच्या गुंगीतूनच होते.
 
 
 
इस्लामच्या अध्ययनातूनच आपल्याला तकिया,जिहाद, दारुल हरब,दारुल इस्लाम, मोमीन,काफिर, जन्नत, जहनुम दोजग की आग, हुरे, कलमा,गजवा-ए-हिंद,जिझिया, शिर्क, मुश्रीक, उम्मा या संकल्पना कळतील,ज्या सर्वस्वी आपल्याशी निगडित आहेत.त्यासाठी कुराण, हदीस यांची माहिती घेतली पाहिजे.
 
 
सामाजिक स्तरावरील समस्या आणि उपाय
 
Nature and Nurture मूल जन्माला आल्यानंतर ते लहानाचे मोठे कसे होते, हे 20 टक्के Nature - म्हणजेच त्याचा स्वभाव आणि गुणवैशिष्ट्ये यावर आणि80 टक्के हे त्याच्या Natureवर - म्हणजेच त्याचे पालनपोषण आणि संगोपन करण्यासाठी योग्य वातावरण आहे का यावर अवलंबून असते.आपल्या संस्कृतीत अधिकार आणि हक्क यापेक्षादेखील कर्तव्याला सर्वाधिक महत्त्व दिले आहे.कर्तव्य निभावताना स्वत:चा हक्क,स्वत:चे अधिकार गमावले तरी चालेल, पण कर्तव्यात कसूर झाली नाही पाहिजे.याचप्रमाणे प्राधान्यक्रमही निश्चित केले आहेत- आधी समाज, मग कुटुंब आणि सर्वात शेवटी मी.समाज आणि कुटुंब यांच्याप्रति असणारी माझी कर्तव्ये मी निभावणार आणि त्या बदल्यात समाज,कुटुंब माझ्या हक्कांचे, अधिकारांचे रक्षण करणार.पण आधुनिकतेच्या नावाखाली जेव्हा आपण पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करू लागलो,तेव्हा स्वकेंद्रित आणि आत्मकेंद्रित विचार बळावला.विचारस्वातंत्र्याच्या आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या अतिरेकामुळे सर्वप्रथम मी,माझे अधिकार, हक्क आणि नंतर कुटुंबाप्रति असणारी माझी कर्तव्ये अशी उलटी गंगा वाहू लागली.यामध्ये समाज आणि सामाजिक बांधिलकी याचा तर दुरान्वयानेही संबंध येत नाही. त्यामुळे श्रद्धा आणि अशा हजारो मुली“मी अठरा वर्षांची आहे/मी पंचवीस वर्षांची आहे,म्हणून मी माझा निर्णय घेऊ शकते. कायद्याने मला तो अधिकार दिला आहे.तुमचा माझा काहीही संबंध नाही.आजपासून मी तुमच्यासाठी मेले”असे ऐकवितात. अशा वेळी याच आई-वडिलांनी खस्ता खाऊन आपल्याला लहानाचे मोठे केले,आपल्यावर मनापासून प्रेम केले याचा त्यांना सोयीस्कर विसर पडतो.
 
 
 
‘प्यार अंधा होता है’,प्यार हैसियात, मजहब नही देखता’, ‘एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर’ असे संदेश त्यांना लहान असल्यापासून चित्रपटांद्वारे मिळालेले असतात.याच्या जोडीला समाजात‘सेंट व्हॅलेंटाइन’सारखे तथाकथित आधुनिक संस्कार असतात,जे अशा गोष्टींचे उदात्तीकरण करतात.चार दिवस आई-वडील बोलणार नाहीत,नंतर नातू झाल्यावर त्यांना यावेच लागेल अशी विधाने करून त्या मुलीने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करतात आणि चुकीचे पायंडे पाडण्यासाठी हातभार लावतात.आम्हाला जन्म देऊन लहानाचे मोठे केले म्हणजे काही आमच्यावर उपकार नाही केले,अशी भावना हळूहळू युवा पिढीमध्ये वाढायला लागली आहे,जी अत्यंत घातक आहे.त्यासाठी स्वस्थ,शांत आणि सशक्त समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी युवा पिढीसमोर चांगले जीवन आदर्श असले पाहिजेत. त्यासाठी समाजातील धुरिणांनी आणि विद्वानांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. व्यक्तिस्वातंत्र्याच्या आणि स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण कुठल्या विचारांची पेरणी करतोय हे खरेच पुन्हा एकदा तपासण्याची गरज आहे. व्यसन करणे हे वैयक्तिक अधिकारात येत असले, तरी व्यसने ही वाईट आहेत हे ठासूनच सांगितले पाहिजे.कॉन्डोमचा वापर करा असा जहिरातीचा मारा करताना त्याहीपेक्षा नैतिकतेची आणि चारित्र्याची जोपासना करणे हे अधिक गरजेचे आहे.भाभी म्हणजेच वहिनी- जिला आपण आईच्या जागी मानतो,शिक्षिका ज्यांना आपण गुरू मानतो, बहीण- जी आपली सुखदु:खातील खंबीर पाठराखी असते..असे नातेसंबंध वेबसिरीजच्या आणि रील्सच्या माध्यमातून तथाकथित आधुनिक आणि पुढारलेल्या,हायफाय समाजाच्या विचारसरणीतून चुकीच्या पद्धतीने आपल्यासमोर मांडले जात आहे. ‘तू व्हर्जिन आहेस म्हणजे तू किती मागास आहेस’असे चुकीचे नॅरेटिव्ह सेट केले जाते. हे तातडीने थांबले पाहिजे.या प्रकरणात, ‘मेल्यानंतर तिचे35 तुकडे केलेत, त्यामुळे हा एक साधा खून आहे, त्याचा खूप बाऊ करू नका’अशी निर्लज्ज विधाने काहींनी केली.अशा विधानांमुळे आफताब आणि त्यासारख्या अनेकांचे धाडस व बळ वाढते. त्यामुळे विद्वानांनी आणि समाजातील धुरीणांनी चांगल्या विचारांची पेरणी करणे,चांगले वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज आहे,कारण मुलांची वाढ80 टक्के Nurtureवर - म्हणजेच कुठल्या वातावरणात पालनपोषण होते,यावर अवलंबून असते.
 
कौटुंबिक स्तरावरील समस्या व उपाय
 
बिघडलेली आणि उद्ध्वस्त झालेली कुटुंबसंस्था
 
श्रद्धाचे आणि अशा अनेक मुलींचे कौटुंबिक वातावरण हेदेखील या घटनांना कारणीभूत ठरले आहे.एफआयआरमधील माहितीनुसार श्रद्धाची आई व वडील विभक्त होते.आईचा मृत्यू झाल्यानंतर वडिलांनी तिच्याशी नातेसंबंध आणि बोलणे सुरू केले.या पार्श्वभूमीवर आपण हिंदू समाजातील हळूहळू उद्ध्वस्त होत चाललेल्या कुटुंबसंस्थेबद्दल बोलू या.
 
 
लग्नसंस्था हा कुटुंबसंस्थेचा पाया आहे.हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचार या गोष्टींची भीती दाखवून लग्नसंस्था नाकारणार्‍यांना आणि लिव्ह इनचा पुरस्कार करणार्‍यांना लिव्ह इनमधल्या त्रुटी येथे जाणवल्या असतील.त्यामुळे हुंडाबळीचा बागुलबुवा उभा करणारे जे लग्नसंस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात,त्यांनी हुंडाबळीचा विरोध करावा,लग्नसंस्थेचा नव्हे. यामध्ये भ्रांत पुरोगामी लोक केवळ आपला अजेंडा रेटण्यासाठी लग्नसंस्थेला विरोध करत असतात. अशा लोकांशी वांझोट्या चर्चेत वेळ न घालवता लग्नसंस्थेचे महत्त्व विद्वानांनी आणि धुरीणांनी समाजाला पटवून दिले पाहिजे.तसेच त्यामध्ये काळानुरूप बदल करण्याची गरज असेल,तर तेही केले पाहिजेत. घटस्फोटांचे वाढलेले प्रमाण या घटकावर चिंतन करून उपाय शोधला पाहिजेत. याव्यतिरिक्त कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांशी झालेल्या विसंवादाचे रूपांतर कालांतराने वादामध्ये होते.चौघा जणांचे छोटे कुटुंब असतानादेखील चौघे जण एकमेकांशी व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपवर बोलतात.कुटुंबामध्ये खूप चांगला संवाद आहे आणि आपल्या कुटुंबाचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप असेल तर हरकत नाही; पण एकमेकांशी संवाद फक्त व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपमधून होत असेल, तर मात्र आपल्या कौटुंबिक संबंधांमध्ये बाधा येऊ शकण्याचा धोका जास्त आहे,हे समजावे.
 
 
love
 
 
त्यासाठी...
 
 
1) सर्व कुटुंबाने दिवसातून किमान एकदा तरी एकत्र भोजन करावे.त्या वेळी टीव्ही,मोबाइल, लॅपटॉप हे गॅजेट्स बाजूला ठेवून एकमेकांशी हसत खेळत संवाद साधावा.दिवसभरातील गोष्टींचे शेअरिंग करावे.
2) वर्षातून किमान एकदा तरी सर्व कुटुंबाने एकत्र फिरायला जावे.
 
 
3) पाल्यावर अविश्वास म्हणून नाही,तर जबाबदारी म्हणून पालकांकडे आपल्या पाल्याचे मित्र आणि मैत्रिणी यांची पूर्ण नावे,कौटुंबिक पार्श्वभूमी इत्यादी आवश्यक ती सर्व माहिती असायला हवी.
 
 
व्यक्तिगत स्तरावरील समस्या आणि उपाय
 
 
एखादा गुन्हा जेव्हा घडतो,तेव्हा अपराध्याला किंवा आरोपीला सगळ्यात जास्त सहकार्य कोण करतो, तर त्या गुन्ह्यामध्ये जो बळी जातो तोच.बळी जाणार्‍या व्यक्तीनेच एका प्रकारे त्याला मदत केलेली असते किंवा गुन्हा घडण्यासाठी त्या गुन्हेगाराला पोषक वातावरण तयार केलेले असते.या आणि अशा अनेक घटनांमध्ये सुरुवातीला मुलाचे पूर्ण नाव,त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी याबद्दल मुलीने बारकाईने माहिती घेतलेली नसते.ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर त्या मुलीला मुलाची हळूहळू माहिती कळायला लागते.पण तेव्हा ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली असल्याने डोळ्यांवर आणि बुद्धीवर झापडे लागलेली असतात. त्याने आपल्याआधी चार हिंदू मुलींना आपल्या जाळ्यात फसविले आहे,ही गोष्ट श्रद्धाला माहीत नव्हती का?माहीत असूनदेखील तिने या गोष्टीकडे का दुर्लक्ष केले?आफताब आपल्याला मारतो,तरीदेखील त्याने माफी मागितली म्हणून आपण त्याच्यावर विश्वास टाकून परत त्याच्याबरोबर जातो.. याचा अर्थ आपण स्वत:बाबतसुद्धा किती बेफिकीर, बेसावध निष्काळजी असतो..या आणि अशा लहान गोष्टींकडे जरी आपण लक्ष दिले,तरी अशा घटना घडणार नाहीत.18 वर्षे पूर्ण झाल्यावर मुली सज्ञान होतात,मी तर 25 वर्षांची आहे हा कायदा जेव्हा मुली स्वत:च्या घरच्यांना सांगतात, तेव्हा त्यांना मुस्लीम पर्सनल लॉ म्हणजे काय हे माहीत असते का?मुस्लिमांना कायद्याने चार बायका करायची परवानगी असते,मुस्लिमांसाठीचे कायदे हिंदूंसारखे महिलांच्या बाजूने नाहीत याची किमान माहिती तरी घेतलेली असते का?स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टखाली इंटरफेथ मॅरेज झाले,तरी मुस्लीम समाज रचनेत टिकायचे असेल तर काही वर्षांनी धर्मांतर करावेच लागते,होणारी संतती ही मुस्लीम म्हणूनच नोंदली जाते याची किंचितदेखील माहिती प्रेमात सर्वस्वाचे समर्पण करायला तयार असणार्‍या हिंदू मुलींना नसते.स्वत:च्या आयुष्याची आणि घरादाराची शेकोटी करून एका परधर्मीयाला ऊब देण्याचा हा आत्मघातकी प्रयोग हिंदू मुलींनी आता तरी थांबवावा.
 
 
खबरदारी घ्या...
 
1) अनोळखी मुलांना आपला नंबर शेअर करू नये
 
2) स्विगी, झोमॅटो यावर ऑर्डर करताना,तसेच टॅक्सी करताना सावधानता बाळगावी.
 
 
3) घरामध्ये एसी दुरुस्ती, प्लंबिंग, भंगार आणि रद्दी घेण्यासाठी येणारे यांची नीट माहिती घेतल्याशिवाय त्यांना घरात प्रवेश देऊ नये.
 
4) भाजी आणि फळविक्रेते, पंक्चर तसेच चावी बनवणारे यांनी जर गुड्डू, सोनू, बंटी अशी नावे सांगितली, तर अधिक सावधगिरी बाळगून त्यांची पूर्ण नावे माहीत करून घ्यावीत. तसेच फक्त कोणी कपाळावर गंध लावला आहे किंवा हातामध्ये गंडेदोरे बांधले आहेत फक्त म्हणूनच आपण निर्धास्त होऊ नये.
 
5) सोशल मीडियावर वैयक्तिक गोष्टी शेअर करतना खूप काळजी घावी. व्हॉट्सअ‍ॅपवर प्रायव्हसी सेटिंगचा उपयोग करावा.आपला डीपी अनोळखी लोकांना दिसण्याची काहीच गरज नाही. अनोळखी नंबरवरून किंवा अनोळखी व्यक्तींद्वारे व्हॉट्सअ‍ॅपवर किंवा इतर मेसेंजरवर येणार्‍या हाय,हॅलो, गुड मॉर्निंग, गुड नाइट अशा संदेशांना उत्तर न देता त्याची शहानिशा करावी आणि गरज पडली तर त्यांना ब्लॉकदेखील करावे.जास्तीत जास्त लाइक मिळवण्याच्या नादात आपण कुठल्या प्रकारचे फोटो अपलोड करतोय,याचे भान असावे.
 
 
6) कोणी आपल्याला प्रमाणापेक्षा अधिक मदत करत असेल, अधिक गोड बोलत असेल, तर त्यामागे त्याचा उद्देश काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ नये.
 
 
7) आपल्याला कोणी परफ्यूम, कॅडबरी, केक, मोबाइल किंवा तत्सम भेटवस्तू देत असेल,तर ती भेटवस्तू देण्यामागे त्याचा हेतू काय आहे? खरेच एवढी किमती भेटवस्तू देण्याइतपत त्याचे आणि आपले नाते आहे का? आपण एखाद्या अमिषाला बळी तर पडत नाही ना?आपण कोणाचे मिंधे तर होत नाही ना?आपण आपला स्वाभिमान तर गहाण टाकत नाही ना?असे प्रश्न वारंवार आपल्या मनाला विचारावेत आणि मग योग्य पडताळणी करून ती भेटवस्तू स्वीकारावी किंवा नाकरावी, ती भेटवस्तू स्पष्टपणे नाकारण्याची धमकदेखील आपल्यात पाहिजे.
 
 
8) तारुण्यसुलभ वयात आपल्या शरीरात होणार्‍या बदलांमुळे - ज्याला आपण हार्मोनल चेंजेस म्हणतो,यामुळे आपल्या मनामध्ये लैंगिकतेबद्दल अनिवार आकर्षण निर्माण झालेले असल्याने या वयात डेटिंग अ‍ॅप्लिकेशनवरील, सोशल मीडियावरील तत्सम गोष्टी आपण कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. यासाठी व्यक्तिगत जीवनात शिक्षण,करिअर, गाडी, बंगला,पैसा याव्यतिरिक्त आपण आपले जीवनध्येय निश्चित केले पाहिजे.एकनाथजी रानडे यांनी‘हिंदू तेजा जाग रे’ या पुस्तकरूपाने स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे संकलन केलेले आहे,ते आपण वयाच्या या टप्प्यावर आवर्जून वाचावे.
 
 
9) आपले आदर्श नक्की करावेत आणि ते एखादी अभिनेत्री किंवा अभिनेता असण्यापेक्षा चारित्र्यसंपन्न, देशभक्त आणि धर्मभक्त महापुरुष आणि रणरागिणी असावेत.अशी ठिकाणे,जिथे लव्ह जिहादच्या घटना घडल्या आहेत किंवा लव्ह जिहाद होण्याची अधिक शक्यता आहे-
 
 
1) युनिसेक्स सलून
 
2) मेंदी आणि टॅटू शॉप्स
 
3) जिम आणि पर्सनल ट्रेनिंग
 
4) मोबाइल रिचार्ज शॉपी
 
5) आर्टिफिशियल ज्वेलरी
 
6) भाजी आणि फळविक्रेते
 
7) गॅरेज आणि पंक्चरची दुकाने
 
8) लेडीज गारमेंट अँड बुटीक
 
 
 
या घटनेतील आफताब हा सेक्युलर, फेमिनिस्ट, एलजीबीटी अ‍ॅक्टिव्हिस्ट असा अतिशय उदारमतवादी, मॉडर्न,बुद्धिजीवी असे स्वत:ला दाखवत होता,पण प्रत्यक्षात तो पाशवी, राक्षसी, भयंकर असा क्रूरकर्मा निघाला. पण कायम फेमिनिझमच्या आणि सेक्युलॅरिझमच्या गप्पा मारणारे जे त्याच्या जमातीतील आहेत,असे हे भ्रांत पुरोगामी आज त्याच्या या कृत्यावर मूग गिळून गप्प का?नौशाद उस्मान नावाच्या एका शहाण्याने तर ‘आफताब हा एलजीबीटी समर्थक आणि लिव्ह इन मध्ये राहत असल्यामुळे तो मुस्लीम ठरत नाही’असा अजब युक्तिवाद केला आहे.मग इतर पुरोगामी, जे लिव्ह इनच्या मुद्द्यावर हिंदूंना कायम झोडपत असतात,त्यांचे नौशादच्या युक्तिवादावर काय म्हणणे आहे? की प्रश्न ‘मजहब’चा असल्यामुळे तोंडात दंड घुसला आहे?कृती कार्यक्रमश्रद्धा-आफताब आणि अशी एखादी घटना घडल्यानंतर समाजातून तीव्र आणि उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया येतात,पण स्मशानवैराग्याप्रमाणे आठवडाभरानंतर प्रत्येक जण आपापल्या कामांमध्ये गुंतून जातो.अशा घटना घडल्यानंतर देणार्‍या प्रतिक्रियांपेक्षा अशा घटना घडूच नयेत म्हणून सतत,नित्य काळजी घेणे आवश्यक आहे.त्यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम करणे खूप गरजेचे आहे. यामध्ये गटचर्चा (ग्रूप डिस्कशन), पॅनल डिस्कशनपासून ते कीर्तन, व्याख्याने, प्रवचने यांतून,तसेच अगदी जाहीर सभांमधूनदेखील हा विषय सतत मांडला गेला पाहिजे.