डोंबिवली बँकेचे मिलिंद आरोलकर यांची महाराष्ट्र को-ऑप. बँक्स फेडरेशनवर संचालक म्हणून निवड

विवेक मराठी    18-Nov-2022
Total Views |
महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन या राज्यस्तरीय संस्थेच्या, महाराष्ट्रात 246 सहकारी बँका सदस्य आहेत. या फेडरेशनच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. मुंबई, कोकण, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद व नागपूर अशा 7 विभागांमधून एकूण 21 सदस्यांचे संचालक मंडळ निवडून येते.
 
 
vivek
 
यापैकी कोकण विभागातून डोंबिवली बँकेचे संचालक मिलिंद आरोलकर यांनी खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवली. या मतदारसंघात एकूण 16 नागरी सहकारी बँका मतदार होत्या. पैकी 15 जणांनी मतदान केले. आरोलकर यांना 13 मते मिळून ते विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे आरोलकर यांनी कुठल्याही पॅनेलमध्ये सहभागी न होता, स्वतंत्रपणे निवडणूक लढवून हा निर्विवाद विजय मिळवला आहे. यामुळे, डोंबिवली नागरी सहकारी बँकेला महाराष्ट्र फेडरेशनवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.