बंधुत्वामुळे राष्ट्रभावना जागृत होते .... रवींद्र गोळे

रमेश पतंगे लिखित "आपले संविधान" या पुस्तकाचे प्रकाशन

विवेक मराठी    26-Nov-2022
Total Views |
 
 
RMP
भेदभाव मुक्तीचा मार्ग संविधानाने दाखवला आणि भारत अस्पृश्यता मुक्त होण्याची ग्वाही दिली . पण जोपर्यंत त्याचा स्वीकार दोन्ही बाजूंकडून होत नाही, तोपर्यंत त्याचा उपयोग नाही . बंधुभाव विकसित होतो तेव्हाच राष्ट्रभावना जागृत होते. स्वतंत्रता, समानता आणि बंधुता यासाठीच संविधानाचा गाभा आहे आणि तो फ्रेंच राज्यक्रांतीतून आलेला नसून बुद्धाच्या शिकवणीतून आलेला आहे.
भारत हा आसेतुहिमाचल वैविध्यतेने नटलेला आहे.त्याला संविधानाने एक सूत्रात बांधून ठेवले आहे .जन व जमीन वेगळी असली तरी संस्कृतीच्या समान धाग्याने आपण बांधलेले आहोत, असे प्रतिपादन "साप्ताहिक विवेक" चे सहकार्यकारी संपादक रवींद्र गोळे यांनी संविधानामुळे आपण एकसुत्रात कसे गुंफले गेलो आहेत हे विषद करताना सांगितले.
 
 
RMP
 
२६ नोव्हेंबर या संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित "संवैधानिक राष्ट्रवाद" या विषयावर गुरुवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.त्याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते रविंद्र गोळे बोलत होते.यावेळी "हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे" अध्यक्ष रमेश पतंगे लिखित "आपले संविधान" या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
आपल्या प्रास्ताविकात रवींद्र साठे महासंचालक , रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांनी पुस्तकाविषयी बोलताना, संविधान वाचणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.आधी आपल्या घरातून याची सुरुवात झाली पाहिजे.प्रत्येक भारतीय संविधान साक्षर झाला पाहिजे , असे मत मांडले.
 
 
दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आयोजित करण्यात येणाऱ्या "गुरुवार सभा" या संकल्पनेची माहिती सुत्रसंचालक यदुनाथ देशपांडे यांनी दिली.