‘सिक्युलर’ ढुढ्ढाचार्यांचा दुटप्पीपणा

विवेक मराठी    13-Jun-2022   
Total Views |
नुपूर शर्मांनी एका वाहिनीच्या चर्चेदरम्यान केलेल्या विधानाचे पडसाद भारताबाहेर उमटले. कधी नव्हे ते या वेळी शिया-सुन्नी इ. मतभेद बाजूला सारून इस्लामी देशांनी निषेध व्यक्त केला. पण आपल्याकडील आघाडीच्या वृत्तपत्रांनी इस्लामी देशांचे समर्थन करणारी, अर्धा पान भरेल एवढी रसभरीत बातमी या वृत्तपत्राने छापली. अशा कचखाऊ विचारधारेमुळे देशातील आणि देशाबाहेरील विरोधकांचे फावते, याचे या सिक्युलॅरिस्टांना भान येत नाही, ही शोकांतिका आहे.


musalim
 
गेला आठवडा भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मांमुळे गाजला. एका मोठ्या इंग्लिश वृत्तपत्राच्या (इंडियन एक्स्प्रेसच्या) दि. 6 जूनच्या अंकातील बातमीने नव्हे, तर इतर लेखनाने माझे लक्ष वेधले. नुपूर शर्मांना आणि नवीन जिंदाल यांना भाजपाच्या दिल्ली शाखेने पक्षातून तडकाफडकी निलंबित केले. त्यांनी पै. महंमद आणि इस्लाम विरोधात विधाने केल्यामुळे दोघांवरही ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्टीकरण भाजपाकडून देण्यात आले. केवळ एवढीच बातमी असती तरी त्याची नोंद घेण्याचे प्रयोजन नव्हते. त्याला जोडून भाजपाला आणि केंद्रीय नेतृत्वाला जे उपदेशाचे रतीब घातले गेले, ते वाचून मला चोरांच्या उलट्या बोंबांचा प्रत्यय आला.
 
नुपूर शर्मांनी एका वाहिनीच्या चर्चेदरम्यान केलेल्या विधानाचे पडसाद भारताबाहेर उमटले. विशेषत: प्रथम कतार या देशाने भारताच्या राजदूताला बोलावून घेतले आणि केवळ निषेध व्यक्त करण्यावर न थांबता काही तासांवर आलेली उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची सदिच्छा भेट एवढ्या एका कारणासाठी रद्द करण्याची तयारी दाखवली म्हणा किंवा धमकी दिली. अशा भेटी ऐन वेळी स्थगित करण्यात आल्या, तर त्यांचा उलटा संदेश जगात जातो. हे प्रकरण केवळ कतारपुरते मर्यादित न राहता लगोलग इराण, सौदी अरेबिया, पाकिस्तान, थोड्या विलंबाने इंडोनेशिया या मुस्लीम देशांतूनही तशाच प्रतिक्रिया येऊ लागल्या. कधी नव्हे ते या वेळी शिया-सुन्नी इ. मतभेद बाजूला सारून इस्लामी देशांनी निषेध व्यक्त केला. ज्या कतारसारख्या चिमुकल्या देशाने भारतीयांच्या नाकावर टिच्चून, हिंदूंच्या देवीदेवतांची विद्रूप चित्रे काढणार्‍या विकृत मनोवृत्तीच्या, भारतातील हिदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवणार्‍या एम.एफ. हुसेनला राजाश्रय दिला होता, त्याने अशी बोंब मारावी! या चोराच्या उलट्या बोंबा आणि दुटप्पीपणाची कमाल आहे.
musalim 
निषेध करणार्‍या कतार देशाने एम.एफ. हुसेनला राजाश्रय दिला होता.
ज्ञानवापी मशिदीची पाहणी, त्यात सापडलेले शिवलिंग, त्यावर दिवसेंदिवस चाललेल्या आणि प्रचारमाध्यमांतून, वाहिन्यांवरून होणार्‍या हिंदूंचा मनोभंग करणार्‍या चर्चा याची प्रतिक्रिया नुपूर शर्मांच्या विधानातून उमटली. सातत्याने चालणार्‍या या चर्चांना जशास तसे उत्तर मी दिले, असे नंतर नुपूरजींनी स्पष्टीकरण दिले.
त्याच्या पुढची पायरी म्हणजे काही छुपे दहशदवादी नुपूरजींना फोनवरून बलात्काराच्या आणि खून करण्याच्या धमक्या देत आहेत. त्यामुळे त्यांना आणि कुटुंबीयांना संरक्षण देण्यात आले आहे. तसेच ज्ञानवापी परिसरात सर्वेक्षण करायला अनुमती देणारे न्यायाधीश रवीकुमार दिवाकर यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. कोणाच्याही विरोधात तक्रार दाखल केल्यावर न्यायालय काय तो निर्णय देईल, ही भूमिका त्या शांतिप्रियांना पटत नव्हतीच आणि आताही तेच होते आहे. त्यात भर म्हणून खिसगणतीत नसलेल्या भीम आर्मीने नुपूर शर्मांची जीभ कापणार्‍यास एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या भीम आर्मीचे बोलविते धनी कोण असतील हे सांगायची आवश्यकता नाही. त्यात चटकन मिळणार्‍या प्रसिद्धीचा हव्यास हेही एक कारण आहे. एरवी येता-जाता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि घटनेचा हवाला देत कंठशोष करणारे हे लोक आता कायदा हातात घेऊ पाहतात.
 
musalim

भीम आर्मीने नुपूर शर्माविरोधोत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.


आनंदाच्या उकळ्या फुटल्या
 
नाही म्हटले तरी इस्लामी देशांकडून आलेल्या दबावामुळे भाजपाला निष्कासनाच्या कारवाया कराव्या लागल्या. त्याची आर्धा पान भरेल एवढी रसभरीत बातमी या वृत्तपत्राने छापली. या घटनेने एक प्रकारे शासनाला पाऊलभर मागे यावे लागले. एक्स्प्रेस संपादकांना आणि त्यातील लेखकूंना त्याचा आनंद झाला. 6 जूनच्या प्रथम संपादकीयातील स्वर मोदी सरकारला आरोपाच्या कोठडीत उभा करणारा आहे. बाहेरच्या हस्तक्षेपासंदर्भात आम्ही एकमुखाने बोलू हे धोरण विशेषकरून मोदी आणि भाजपा विरोधी कावीळग्रस्तांना उमजणारच नाही. या भरकटलेल्या संपादकीयात संपादकांनी लिहिण्याच्या भरात कदाचित अनवधानाने एक शब्द लिहला. त्यातून स्वत:चेच पितळ उघडे पाडले. आपण आतापर्यंत स्यूडो - भोंदू सेक्युलर या शब्दाशी परिचित होतो. संपादकीयात ‘सिक्युलॅरिझम’ - - SICKULARISM हा शब्द संपादकांनी त्यांच्यासारख्या मनोरुग्णांसाठी उद्धृत केला. तो खराच ठरतो आहे.

 
संपादकीयात मोदींना आणि भाजपाला 2014च्या आणि 2019च्या निवडणुकांत मिळालेल्या यशाविषयीचा दुस्वास ठळकपणे प्रकट झाला आहे. भारतीय जनतेने एक नव्हे, दोन वेळा मोदींच्या आणि भाजपाच्या खात्यात यशाचे माप का टाकले, याबाबत चिंतन करण्याची सुबुद्धी संपादकीयात प्रकट झाली नाही. त्या संपादकीयात दुसरी मळमळ व्यक्त झाली आहे. ल्यूटेन्सच्या सीमेपारच्या अनभिजातांच्या - Non-Elitesशीच्या हातात सत्ता गेल्याने ल्यूटोनियनांना लाभांपासून वंचित राहावे लागते, याची ती मळमळ आहे. संपादकीयातील भरतवाक्य उद्धृत करतो - Hate speech is unacceptable in itself, from the mouth of the ruling party members targeting a minority.It mainstreams bigotry, causes dangerous divisions, and is against national interest. केंद्र शासनाला असा उपदेश करण्यापूर्वी भारतातील इतर राजकीय गोंधळी, (होय, ते पक्ष नव्हेतच, ते कौटुंबिक गोंधळी आहेत.) निवडणुकींपाठोपाठ निवडणुकीत अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करताना देशाच्या अखंडतेशी आणि एकात्मतेशी प्रतारणा करत होते, हे सोईस्करपणे विसरण्याचा रोग सिक्युलॅरिस्टांना पूर्वीपासून झाला आहे. सामान्य माणसाला त्याची जाणीव झाल्याने त्याने मोदीजींच्या पारड्यात मते टाकली. कधी नव्हे ते संपादकीयात हिंदू व्होट बँकचा निर्देश आला आहे, तर मुस्लीम मतांच्या पांगुळगाड्याशिवाय पूर्ण बहुमत मिळाले याची मळमळ व्यक्त झाली आहे. हे संपादकीय मुस्लीम देशांमधील अंतर्गत ताणतणावांचे धोरणात्मक विश्लेषण करण्याऐवजी अंतर्गत लाथाळ्या करण्यावर भर देणारे आहे.
अंकातील विस्तृत बातमी आणि संपादकीय याबरोबर, नियमित स्तंभलेखन करणार्‍या अ‍ॅडमिरल अरुण प्रकाश या मान्यवर लेखकाचा लेख आहे. लेखक महाशयांनीही एकाएकी घडल्यासारख्या वाटणार्‍या या मुस्लीम देशांच्या सामूहिक निषेधनाट्याच्या बाबतीत कारणमीमांसा न करता, देशाच्या नेतृत्वाला पांढर्‍या केसांचा सल्ला देण्याची तसदी घेतली. लेखात महाशय स्वत:चे, सत्तरीतील (Septuagenarian) शहाण्या माणसाचे बोल ऐकवायला उत्सुक असल्याचे दिसते. त्यांना अंतर्गत प्रश्न उगाळणे या वेळी अधिक महत्त्वाचे वाटले.

 
त्यांच्यासारख्या चार उन्हाळे-पावसाळे अत्यंत मोठ्या जबाबदारीच्या पदावर काढलेल्या आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींची समज असलेल्या(?) व्यक्तीला सत्तरीतील शहाणपणा शिकवण्याची हौस भागवताना आंतरराष्ट्रीय राजकारणातील रुसव्याफुगव्यांना अनेक कंगोरे असतात हे उमजू नये, याचे आश्चर्य वाटते. सध्या इस्लामी जगतात जे अंतर्गत शक्तिप्रदर्शनाचे प्रवाह वाहत आहेत, तरुण मुस्लीम पिढी इस्लामी धर्मग्रंथांच्या सखोल अभ्यासानंतर भ्रमनिरास होऊन इस्लामचा त्याग करून स्वत:ला पूर्वाश्रमीचे मुस्लीम - एु-र्चीीश्रळा म्हणवून घेते आहे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून इतर तरुण इस्लामचा त्याग करत आहेत, इस्लामी राजवटी त्यामुळे गोंधळलेल्या आहेत, त्यावरून लक्ष उडविण्यासाठी आणि धर्मांधतेचा खुंटा बळकट करण्याचा हा मुस्लीम राज्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. त्याच वेळी युक्रेनमधील युद्ध, अमेरिका, युरोप आणि रशिया यांच्यातील खेचलेला तणाव, त्यात खनिज तेल उत्पादक मुस्लीम देशांची लंगडी बाजू अशा अनेक गोष्टी सामान्य वाचकाला उलगडून सांगण्याऐवजी, सत्तरीतील शहाण्याने शासनावर लाथाळ्या करण्याचा कंडू शमवून घेतला. या घटनेमागे केवळ एकच कारण नाही. ती कारणे शोधून त्यावर योग्य ती उपाययोजना करण्याचे प्रयत्न परराष्ट्र मंत्रालयातर्फे सुरूही झाले असतील.
त्याच वेळी इतर राजकीय पक्षांनी त्यांच्या राजवटींमध्ये शांतता, सुव्यवस्थेचे कसे वाभाडे काढले होते आणि तथाकथित अल्पसंख्याकांच्या उद्दामपणाला गेल्या 60-65 वर्षांत कसे खतपाणी घातले जात होते, याची मीमांसा करण्याचे सिक्युलर विचारवंत मनावर घेत नाहीत. मशिदींमधून होणारी प्रक्षोभक भाषणे, शुक्रवारच्या जुम्मा-नमाझानंतर उसळणार्‍या दंगली यांची कारणमीमांसा त्यांना करायची नाही. छोट्यामोठ्या कारणांवरून हातघाईवर उतरण्याची सवय झालेला अल्पसंख्य समाज अधिकाधिक भरकटतो आहे, त्याच्या डोक्यात काफिरद्वेषाचे - घरषळीेहिेलळरचे भूत कसे पक्के होऊन बसले आहे, याबाबत या चेवळहिेलळरने पछाडलेल्या मनोरुग्ण सिक्युलॅरिस्टांना काही देणे-घेणे नाही. ‘भारत तेरे तुकडे होंगे’ याला विचार आणि आचारस्वातंत्र्य मानण्याइतपत मनाने पंगू झालेली ही सिक्युलॅरिस्ट जमात आहे. इंडियन एक्स्प्रेस हे राष्ट्रीय स्तरावरचे वृत्तपत्र अशा स्वत:च्या देशावरच दुगाण्या झाडणार्‍या लेखांना प्रसिद्धी देत असेल, तर पाकिस्तानातले आणि भारतातले आणि इतर देशांतील भारतद्वेष्ट्यांचे, देशातील हिंदुद्वेष्ट्यांचे फावणारच. सत्तरीतील शहाण्याला या साध्या गोष्टींचे तारतम्य असू नये?
इस्लामचा तिढा
मुस्लीम समाज नवी उपकरणे, नवे तंत्रज्ञान हाताळण्यास शिकला हे जरी खरे असले, तरी तो मानसिकदृष्ट्या शेकडो वर्षांच्या बुरसट मानसिकतेतून बाहेर पडला नाही. त्यामुळे मुल्लाशाहीच्या कचाट्यातून बाहेर पडणे तर दूरच राहिले, उलट तो समाज अधिकाधिक अतिरेकाकडे झुकतो आहे. त्याचे दुष्परिणाम लवकरच तो समाज अनुभवेल. त्यामागे इस्लामची शिकवण आहे. डोळ्यावर कातडे घट्ट पांघरून बसल्यासारखी त्याची स्थिती झाली आहे. काफिरद्वेष घरषळीेहिेलळर हा या समाजाचा स्थायिभाव राहिला आहे. त्यामुळे तो समाज इतर कुठल्याही गैरमुस्लीम देशात राहायला गेला, तर तिथेही तो स्थानिक नागरिकांशी जुळवून घेऊ शकत नाही. ओपस ींहश र्र्चेीिींशी या इडी हुसेनच्या नुकत्याच (2021) प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात याचे जिवंत उदाहरण आहे. हुसेनने ब्रिटनमध्ये अनेक शहरांमधून निर्माण झालेल्या कैराना वस्त्यांवर अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले आहे. त्यात त्याने ब्रिटनमधील राजकारणी मतांसाठी मुस्लीम मतदारांचा उद्दामपणा कसा जोपासतात हे दिले आहे. ब्रिटनही दशक-दोन दशकांत अंतर्गत फुटीरतेचा जोरदार सामना करणार असल्याची सप्रमाण जाणीव करून दिली आहे. भारतात आपण या फुटीरतावादी वृत्तीचा पूर्वीपासून अनुभव घेतो आहोत.
एकंदरच दार उल हर्ब - गैरइस्लामी जगात - इस्लामी फुटीरतावादी मनोधारणा कशी दूर करून मिळून मिसळून कसे राहता येईल याचा खल न करता, मूळ प्रश्नाला हात न घालता, दंगे माजवण्याकडे जर त्यांचा कल राहिला तर मुस्लीम समाजावर त्याचे दूरगामी अनिष्ट परिणाम होतील, त्यांचेच दीर्घकालीन नुकसान होईल हा विचार सिक्युलॅरिस्ट ढुढ्ढाचार्य मंडळी शांतिधर्मीय अल्पसंख्याकांना रोखठोकपणे सांगू शकत नाहीत. ही त्यांची दुटप्पी विचारधारा सामान्य हिंदूंच्या पुरेपूर लक्षात आली आहे. त्यामुळे ते दृढपणे मोदी आणि भाजपा यांच्यामागे उभे राहिले. शक्तिशाली बनलेल्या वार्ता माध्यमांतून व्यक्त झालेल्या अशा कचखाऊ विचारधारेमुळे देशातील आणि देशाबाहेरील विरोधकांचे फावते, याचे या सिक्युलॅरिस्टांना भान येत नाही, ही त्यांची शोकांतिका आहे.
 

डॉ. प्रमोद पाठक

अभियांत्रिक म्हणून उच्चविद्याविभूषित असणारे डॉ. प्रमोद पाठक हे 'गोवा एनर्जी डेव्हलपमेण्ट एजन्सी' अर्थात 'गेडा'चे प्रमुख म्हणून काम पाहतात. कामानिमित्त अनेक वर्षे परदेशी राहण्याचा त्यांना वारंवार योग आला. मुस्लीम प्रश् आणि आंतरराष्ट्रीय राजकारण हा त्यांचा खास अभ्यासविषय आहे. या विषयावरील लेखन साप्ताहिक विवेक तसेच अन्य नियतकालिकांतून सातत्याने प्रकाशित होत असते.