मैत्रीचा तेजस्वी बंध

30 Jul 2022 14:54:51
@प्रीतम दिलीप मेहेर
१९८०च्या दशकात झालेली ही मैत्री आपला मित्र पंतप्रधान होईल या अपेक्षेपोटी झालेली नव्हती. तर त्यामध्ये जिवलग मित्रत्वाचा बंध गुंफलेला होता. दोघांमध्ये 15 वर्षांचे वयाचे अंतर, तरीसुद्धा त्यांच्या अभेद्य मैत्रीत कधीही अंतर आले नाही. अहमदाबाद येथे पटेल हॉटेलमध्ये ढोकळा आणि चहा घेताना झालेली मैत्री आजपर्यंत टिकून आहे. अनेक कंटकाकीर्ण मार्गावरून जात झालेली ही मैत्री संकटातून तावून सुलाखून निघाली आहे. आणि आज दोन्ही मित्र देशाच्या सर्वाच्च पदावर विराजमान आहेत.

modi

हिंदुस्तानचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व गृहमंत्री अमितजी शहा या तेजस्वी २०१४नंतर देशाच्या राजकारणात अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. तशी ही मैत्री अनेक संकटांची व संघर्षांची साक्षीदार आहे.
 
 
मैत्रीच्या तेजस्वी बंधाची तरंगलांबी मोजताना मला 'शोले'मधील किशोरकुमारांनी गायलेलं "ये दोस्ती हम नही तोडेंगे, तोडेंगे दम मगर, तेरा साथ ना छोडेंगे" हे गाणं आठवल्याशिवाय राहत नाही. कारण ही मैत्री प्रगल्भता आणि जिव्हाळा या दोन बंधांनी गुंफली आहे. हिंदुस्तानाच्या इतिहासात अनेक मैत्रींचा उल्लेख केला जातो. कृष्ण-सुदामाच्या मैत्रीचे दाखले आपण देतो. त्याप्रमाणे सध्याच्या काळात मोदी-शाह यांच्या मैत्रीने संपूर्ण हिंदुस्तानाला भुरळ पाडली आहे. या मैत्रीचा समानधागा म्हणजे दोघेही संघाचे स्वयंसेवक. आठ वर्षात या अभेद्य मैत्रीने पोटशूळ उठला असेल तर तो पुरोगाम्यांना. कारण मोदी सरकार 2 मध्ये मैलाचा दगड ठरतील असे अनेक ऐतिहासिक निर्णय या जोडगोळीने घेतले आहेत.
 
 
modi
१९८०च्या दशकात झालेली ही मैत्री आपला मित्र पंतप्रधान होईल या अपेक्षेपोटी झालेली नव्हती. तर त्यामध्ये जिवलग मित्रत्वाचा बंध गुंफलेला होता. दोघांमध्ये 15 वर्षांचे वयाचे अंतर, तरीसुद्धा त्यांच्या अभेद्य मैत्रीत कधीही अंतर आले नाही. अहमदाबाद येथे पटेल हॉटेलमध्ये ढोकळा आणि चहा घेताना झालेली मैत्री आजपर्यंत टिकून आहे. अनेक कंटकाकीर्ण मार्गावरून जात झालेली ही मैत्री संकटातून तावून सुलाखून निघाली आहे. आणि आज दोन्ही मित्र देशाच्या सर्वाच्च पदावर विराजमान आहेत. कारण आज दोन्ही मित्रांचा सुवर्णकाळ आहे.
 
 
संकटकाळात ही मैत्री कशी टिकून होती, याचे उदाहरण म्हणजे दुर्दैवी गोधरा हत्याकांड. त्यावेळेस मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेस मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे अमितजी शाह होते. त्यानंतर केंद्रात काँग्रेसचे सरकार आले, त्यांनी मोदी-शाह जोडीची CBI चौकशी लावली. तासनतास चौकशी चालत असे. एकप्रकारे त्यांची मानसिक छळ करण्यात आला. २०१० साली अमित शाह गृहमंत्री असताना त्यांना २ वर्षांसाठी तडीपार कऱण्यात आले. त्यावेळेस मोदीजी पूर्णपणे शहांच्या पाठीशी होते. त्यानंतर २०१३ साली अमितजी शाह यांची उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी निवड झाली. आणि त्यांनी लोकसभेच्या ७३ जागा जिंकून दिल्या. आपला मित्र आज पंतप्रधान आहे याचा अमीतजीना अभिमान आहे.
 
 

modi 
 
सार्वजनिक कार्यक्रमात शाह कधीही मोदिजीच्या पुढे पुढे करत नाही. दोघेही आपल्या मर्यादा ओळखून आहेत. दोघेही एकमेकांसमोर कधीही बडेजाव आणत नाही. २०१९ साली पक्षाच्या पत्रकारपरिषदेत मोदीजींसमोर माईक असताना मोदीजी म्हणाले 'मैं पार्टी का अनुशासित कार्यकर्ता हूं, मैं नहीं बोलूंगा. हमारे बीच पार्टी के अध्यक्ष अमितजी शहा मौजूद है, वही बोलेंगे. ही मर्यादा आणि दिलदारपणा.
 
 
आजही दोघेही सामाजिक न्याय केंद्रस्थानी ठेवून कार्य करत आहे. यामुळेच द्रौपदीजी मूर्म या वनवासी समाजातील महिलेला देशाच्या सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी प्राप्त झाली. २०१४नंतर या मैत्रीने राजकारण हे समाजकारण करण्याचे साधन म्हणून वापरले.
 
 
आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि दुसरे गृहमंत्री अमितजी शाह या जोडगोळीने हिंदुस्तानला आपल्या कार्यकर्तव्याने भुरळ पाडली आहे. या मैत्रीच्या परमधर्माचा मतितार्थ या जोडगोळीकडे बघितल्यावर कळतो. हे दोघेही भारतमातेला परमवैभवाला पोहोचवण्यासाठी परिश्रम घेत आहेत. ते भारताला नक्कीच विश्वगुरुपदी विराजमान करतील अशी आशा वाटते.
 
 
Powered By Sangraha 9.0