आरोग्य विमा पॉलिसी दाव्यांची वेळ आणि तक्रारींचे निवारण

विवेक मराठी    26-Aug-2022
Total Views |
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ही भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीतील एक नियामक संस्था आहे. भारतातील विमा आणि पुनर्विमा उद्योगांचे नियमन आणि परवाना देण्याचे काम तिच्याकडे आहे. आयआरडीएआय पॉलिसीधारकांचे हित जोपासणे आणि विमा उद्योगाचे नियमन, प्रोत्साहन आणि सुव्यवस्थित वाढ सुनिश्चित करणे हे कार्य करते.
 
Health Insurance Policy
 
हेल्थ इन्शुरन्स क्लेम्स टाइमलाइन्स - आरोग्य विमा दावे आणि वेळेची मर्यादा
 
 
1) आयआरडीएआय (आरोग्य विमा)च्या नियमन 27च्या दस्तऐवज विनियम, 2016 तरतुदींनुसार प्रत्येक विमाकर्ता आवश्यक कागदपत्राच्या शेवटच्या पावतीवरील तारखेपासून 30 दिवसांच्या आत दावा करू शकतो.
 
 
2) दाव्यातून मिळणारी रक्कम मिळायला विलंब झाल्यास विमा कंपनीकडून व्याज मिळेल. बँक दरापेक्षा 2% जास्त दराने हे व्याज मिळेल. दाव्याच्या शेवटच्या आवश्यक दस्तऐवजाच्या पावतीवरील तारखेपासून तर दाव्यातून रक्कम मिळेपर्यंत हे व्याज विमा कंपनीला द्यावे लागेल.
 
 
3) तथापि, जेथे दाव्याची परिस्थिती विमा कंपनीच्या मतानुसार तपासणे गरजेचे आहे, तिथे ती अशी तपासणी शेवटच्या आवश्यक कागदपत्राची पावतीतील तारखेपासून पुढे 30 दिवसांनंतर पूर्ण करेल. अशा प्रकरणांमध्ये विमाकर्त्याला शेवटचे आवश्यक कागदपत्र/पावती मिळाल्याच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत दावा करावा लागेल.
 
 
4) ‘फ्री लुक कालावधी’ दरम्यान रद्द केल्यावर प्रीमियमचा परतावा जो पॉलिसीधारकास 15 दिवसांच्या आत पॉलिसी परत करण्याची परवानगी देतो (इलेक्ट्रॉनिक पॉलिसी आणि पॉलिसींच्या बाबतीत 30 दिवस) ह्यांची प्रक्रिया विनामूल्य करण्याची विनंती करणार्‍या पावतीच्या तारखेपासून पंधरा दिवसांच्या आत केली जाईल आणि परतावा दिला जाईल.
 
 
तक्रार निवारण प्रक्रिया
 
विमा कंपनी, मध्यस्थ, विमा मध्यस्थ, वितरण यांच्याविरुद्ध तक्रार करू इच्छिणार्‍या तक्रारदाराने विमा विक्री आणि सेवांमध्ये गुंतलेल्या संस्थेने/चॅनलने किंवा इतर नियमन केलेल्या संस्थांनी विमा कंपनीच्या संबंधित तक्रार निवारण अधिकार्‍याकडे (GRO) संपर्क साधावा. जर विमा कंपनीचा तक्रार निवारण अधिकारी प्रतिसाद देत नसेल किंवा त्याने दिलेला निर्णय तक्रारदाराला समाधानकारक नसेल, तर तो प्राधिकरणाच्या तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणालीमध्ये तक्रार नोंदवू शकतो. ह्यामुळे तक्रारीची पुन:तपासणी केली जाते, जेणेकरून विमाकर्त्याच्या तक्रारीचे अंतिमत: निराकरण करता येईल.
 
 
तक्रारी बंद करणे
तक्रार निकाली काढली आणि बंद केली जाईल असे मानले जाईल, जेव्हा -
अ) विमा कंपनीने तक्रारदाराच्या विनंतीस पूर्णपणे मान्यता दिली आहे/स्वीकारली आहे.
ब) जेथे तक्रारदाराने लिखित स्वरूपात सूचित केले आहे, विमा कंपनीच्या प्रतिसादाची स्वीकृती आहे.
क) जेथे तक्रारदाराने विमा कंपनीने लिहून दिल्याच्या आठ आठवड्यांच्या आत विमा कंपनीला प्रतिसाद दिला नाही
ड) जर तक्रारीचे निराकरण पॉलिसीधारकाच्या बाजूने झाले नाही किंवा पॉलिसीधारकाच्या बाजूने अंशत: निराकरण झाले, तर विमा कंपनी तक्रारकर्त्याला विमा लोकपालाच्या नावाचा आणि पत्त्याचा तपशील देऊन विमा लोकपालासमोर प्रकरण घेण्याच्या पर्यायाची माहिती देईल. विमा लोकपाल योजना वैयक्तिक पॉलिसीधारकांसाठी त्यांच्या तक्रारी न्यायालयीन प्रणालीबाहेर कमी खर्चात, कार्यक्षम आणि नि:पक्षपाती मार्गाने निकाली काढण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
 
 
 
 
आयआरडीएआयकडे तक्रार दाखल करणे वेबसाइट - irda.gov.in
ई-मेल - complaints@irdai.gov.in
दूरध्वनी - 155255 किंवा 18004254732.
 
 
- बिमल भुटा
। 9324213959