पाळीव प्राण्यांबाबतची नियमावली

विवेक मराठी    19-Sep-2022
Total Views |
@बिमल भुटा
 
 
Regulations regarding domestic animals
 
मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888चे कलम 191 (ए) असे नमूद करते की एखाद्या इमारतीच्या सोसायटीमध्ये पाळीव कुत्रा उपद्रव करत असल्यास किंवा एखाद्याला चावल्यास जबाबदारी निश्चित करण्याच्या उद्देशाने कुत्र्यांना परवाना देणे गरजेचे आहे. अशा घटनांमध्ये, मनपाला कुत्र्याला ताब्यात घेण्यास आणि पुन्हा त्याला मालकाकडे सोडण्याचा अधिकार आहे, मात्र जर त्याने परिसरातील सामान्य लोकांना आपल्या कुत्र्याचा उपद्रव होणार नाही याची खात्री करण्याचे आश्वासन दिले, तरच करता येते.
 
 
परवाना नसलेला कुत्रा एमएमसी कायद्याच्या कलम 191 (बी) (3) अन्वये मनपा जप्त करू शकते; मालकाने तीन दिवसांच्या आत त्यावर दावा केला पाहिजे आणि तो परत मिळवण्यासाठी थकबाकी भरली पाहिजे किंवा मग तो कुत्रा मारला जाऊ शकतो.
 
 
पाळीव कुत्र्यांना त्यांचे वार्षिक लसीकरण नियमितपणे मिळावे आणि कुत्र्यांचे मालक जबाबदार असे मालक आहेत हे दर्शवण्यासाठी त्याची खात्री करण्यासाठी परवान्यांच्या वार्षिक नूतनीकरणाची तरतूद ठेवण्यात आली आहे.

 
 
परवाना मिळविण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत
 
• घराच्या पत्त्याचा पुरावा
 
• लसीकरण कार्डची प्रत (रेबीज आणि लेप्टोस्पायरोसिस यांविरुद्ध लसीकरण केले आहे.)
• लसीकरण कार्डच्या प्रतीमध्ये मालकाचे पूर्ण नाव, पत्ता आणि सेल/संपर्क क्रमांक, पाळीव प्राण्यांना लसीकरण केलेल्या डॉक्टरचे नाव किंवा संस्था/क्लिनिक सूचित केले पाहिजे.
 
 
रेबीज आणि लेप्टोस्पायरोसिस यांविरुद्ध लसीकरण ही सार्वजनिक आणि प्राणी आरोग्याच्या हितासाठी कुत्र्याचा परवाना मिळविण्यासाठी पूर्वअट आहे.
 
मुंबईत नोंदणी कशी करावी?
 
1. मनपाच्या वेबसाइटला https://portal.mcgm.gov.in भेट द्या.
 
2. ‘नागरिकांसाठी’ हा टॅब निवडा.
 
3. ‘लागू करा’ शीर्षकाखाली, ‘परवाना - कुत्रा’ हा पर्याय निवडा.
 
4. तुमच्या मागणीनुसार पर्याय निवडा.
 
5. पुढे जाण्यासाठी ‘येथे अर्ज करा’ निवडा.
 
 
पाळीव प्राण्यांचे मायक्रोचिपिंग
 
 
मायक्रोचिप ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ओळखीची कायमस्वरूपी पद्धत आहे. चिप स्वत: खूप लहान - अगदी तांदळाच्या दाण्याएवढी असते. पाळीव प्राण्याच्या मानेच्या मागील बाजूस ती टोचली जाते. मायक्रोचिप पाळीव प्राण्याची विशिष्ट ओळख म्हणून काम करते. चिप वाचण्यासाठी रेडिओ लहरीचा वापर केला जातो. हे संयंत्र मायक्रोचिप स्कॅन करते आणि नंतर एक अद्वितीय अल्फान्यूमेरिक कोड प्रदर्शित करते. मायक्रोचिप टोचल्यानंतर, पाळीव प्राणी मायक्रोचिपिंग कंपनीकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, पाळीव प्राणी आढळल्यास मालकाकडे परत पाठवले जाऊ शकतात. एकदा मायक्रोचिपिंग केल्यावर, ते पाळीव प्राण्यांच्या संपूर्ण आयुष्यभर टिकते. पाळीव प्राण्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यासाठी मायक्रोचिप अनिवार्य आहे. भारतांतर्गत प्रवासासाठीदेखील याची शिफारस केली जाते.
 
 
पाळीव प्राण्यांची दुकाने आणि पाळीव प्राण्यांचे प्रजननक तसेच विक्रीसाठी अनिवार्य नोंदणी
 
 
पाळीव प्राण्यांप्रती क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960नुसार पाळीव प्राण्यांची दुकाने आणि प्रजननकर्ते यांची नोंदणी केली जाते. पाळीव प्राण्यांची विक्री करण्यासाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. राज्य पशुसंवर्धन विभागाने सर्व पाळीव प्राणी मालकांना पाळीव प्राण्यांची दुकाने किंवा ब्रीडर यांच्या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. केवळ परवानाधारक प्रजननकर्त्यांकडूनच घरी पाळीव प्राणी आणावे, ह्यासाठी तसे केलेले आहे. यामध्ये कुत्रे, मांजरी, पक्षी आणि इतर परदेशी प्रजातींसारख्या पाळीव प्राण्यांचा समावेश आहे. वन्यजीव संरक्षणाअंतर्गत समाविष्ट असलेले स्टार कासव, पोपट आणि पॅराकीट्स यांसारख्या प्रजातींना पाळीव प्राणी म्हणून ठेवणे गुन्हा आहे. पाळीव प्राण्यांचे दुकानमालक आणि प्रजननकर्ते यांनी नोंदणी न केल्यास त्यांना त्यांचा परवाना गमवावा लागू शकतो. पाळीव प्राण्यांच्या दुकानांची नोंदणी महाराष्ट्र पशुकल्याण बोर्ड, पुणे यांच्याकडे करावी लागते.