प्रगत शेतीसाठी पितांबरीची पर्यावरणपूरक तीन नवी कृषी उत्पादने

विवेक मराठी    22-Oct-2023
Total Views |
शेतकर्‍यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी त्यांच्या प्रगतीत काही प्रमाणात हातभार लावण्याच्या दृष्टीकोनातून पितांबरीच्या अ‍ॅग्री केअर विभागाने शेतीसाठी उपयुक्त विविध उत्पादनांची निर्मिती केली आहे. वर्षानुवर्षे शेतकरी बांधवांच्या पसंतीस उतरलेल्या ’गोमय’ सेंद्रिय खताबरोबरच आता स्ट्रेसिल, बी.व्ही.एफ. शील्ड आणि एफ.व्ही. ग्रो ही पितांबरीची तीन नावीन्यपूर्ण पर्यावरणपूरक उत्पादने सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीकरिता बळीराजासाठी वरदान ठरणार आहेत.
pitambari

सध्याच्या स्पर्धेच्या युगात निर्यातक्षम उत्पादन घेण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर फळ आणि भाजीपाला उत्पादकांबरोबर शेतकर्‍याला पुष्कळ आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. कारण पिकाची उत्तम गुणवत्ता हा सध्या मोठा चर्चेचा विषय झाला आहे. हरितक्रांतीपश्चात पीक उत्पादनात भरघोस वाढ झाली, पण त्याकरिता वापरण्यात आलेल्या रासायनिक निविष्ठांच्या अवाजवी वापरामुळे पुढील काही दशकांतच बहुतांश जमिनी क्षारपड आणि मृत होऊ लागल्या आणि जमिनीबरोबरच आपल्याही आरोग्यावर याचा विपरीत परिणाम दिसू लागला.
 
‘अन्न हे औषध म्हणून खाल्ले, तर औषध अन्न म्हणून खावे लागणार नाही’ या उक्तीचा जर आपण गांभीर्याने विचार केला, तर जगाच्या पोशिंद्या बळीराजावर विषमुक्त अन्ननिर्मितीची खूप मोठी जबाबदारी आहे; म्हणूनच पितांबरीच्या अ‍ॅग्री केअर विभागाने आणि सहउत्पादक कंपनीने सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीकरिता वरदान ठरणारी तीन नावीन्यपूर्ण उत्पादने - ‘स्ट्रेसिल’, ‘बी.व्ही.एफ. शील्ड’ आणि ‘एफ.व्ही. ग्रो’ बळीराजा आणि नर्सरीधारक यांच्याकरिता अत्यंत वाजवी दरात उपलब्ध केली आहेत.
शेती हा इतर उद्योग-व्यवसायांप्रमाणे फायदेशीर आणि यशस्वी उद्योग बनला पाहिजे, या ध्येयाने पितांबरी कंपनी विविध कृषी उत्पादनांची निर्मिती करीत असते. पितांबरीने आपल्या सहउत्पादक कंपनीच्या मदतीने संशोधनाअंती या तिन्ही उत्पादनांची निर्मिती केली आहे. ही तिन्ही उत्पादने पिकांचे उत्तम पोषण, संरक्षण आणि गुणवत्तापूर्ण पिकाची खात्री देणारी आहेत.
पितांबरी ‘स्ट्रेसिल’ हे उत्पादन पिकांची रोगप्रतिकारशक्ती आणि उत्पादन वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणारे आहे. हे पिकांना सिलिका या उपयुक्त अन्नद्रव्याचा पुरवठा जलद गतीने करते. याच्या वापराने पिकांना ताठपणा, ताजेपणा येतो, पीक सशक्त व निरोगी होते. तसेच प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया जलद होऊन पिकांची वाढही जलद गतीने होते. स्ट्रेसिलच्या वापराने पिके हिरवीगार आणि तजेलदार दिसू लागतात. पिकांवर एक संरक्षित आवरण तयार झाल्यामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
 
पाण्याची कमतरता, अतिवृष्टी, कीड-रोगांमुळे पिकांवर निर्माण होणारा ताण (stress) कमी करून उत्पादनवाढीस मदत करते. पिकातील पाणी व्यवस्थापन सुलभ होऊन पिकाची पाणी धारण क्षमता वाढते. पिकातील जस्त, स्फुरद यांच्या, तसेच इतर अन्नद्रव्यांच्या कार्यक्षम वापरासही ते मदत करते. पिकांची अन्नद्रव्य ग्रहणक्षमता वाढविते. परिणामी पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढून 25%पर्यंत उत्पादन वाढते व उत्पादनाची गुणवत्ताही सुधारते.
 
 
या उत्पादन शृंखलेतील दुसरे उत्पादन म्हणजे पितांबरी ‘बी.व्ही.एफ. शील्ड’. कॉपर डस्ट व इतर रासायनिक बुरशीनाशके यांना उत्तम पर्याय असलेले बी.व्ही.एफ. शील्ड हे उत्पादन पर्यावरणपूरक, बहुपयोगी रोगनियंत्रक आहे. नॅनोसिल्व्हर व हायड्रोजन पेरॉक्साइडयुक्त (बिनविषारी द्रव्य) हे उत्पादन विविध प्रकारच्या बुरशीजन्य, विषाणुजन्य, जीवाणुजन्य रोगांवर अत्यंत गुणकारी आहे. भुरी, डाउनी मिल्ड्यू, तेल्या, करपा, फ्युजेरियम, मर रोग इत्यादी विविध रोगांचे प्रभावी नियंत्रण करते. विविध तापमानात प्रभावीपणे कार्य करते. आम्ल व विम्ल सामु (कि)मध्ये क्रियाशील राहते. ते रेसिड्यू-फ्री असून याच्या वापराने पिकांवर कोणत्याही प्रकारचे विषारी अवशेष राहत नाहीत. उत्पादनाच्या काढणीपश्चात निर्जंतुकीकरणासाठी याचा उपयोग फायदेशीर ठरतो. ड्रिप लाइन स्वच्छता, कृषी यंत्रे, अवजारे यांच्या निर्जंतुकीकरणासाठी तसेच सर्व पिकांच्या वापरासाठी पितांबरी बी.व्ही.एफ. शील्ड अतिशय उपयुक्त ठरणारे उत्पादन आहे. शेतीमधील या नावीन्यपूर्ण उत्पादनाच्या वापराने निसर्गावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही, उलटपक्षी रासायनिक निविष्ठांचा वापर करून करण्यात येणार्‍या शेतीमध्येही बी.व्ही.एफ. शील्डची काढणीपूर्व फवारणी करून आपण पिकांवरील रासायनिक अवशेषांचा - थोडक्यात विषाचा नायनाट करू शकता.
पितांबरी ‘एफ.व्ही. ग्रो’ हे तिसरे उत्पादन सर्व प्रकारची फळे, फळभाज्या व इतर पिकांकरिता उत्तम साइझ एन्हान्सर (आकारवर्धक) म्हणून कार्य करते. फळांचा व भाजीचा आकार, पालेभाज्यांच्या पानांचा आकार, चव वाढविण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण वाढीसाठी हे फायदेशीर असून पालेभाज्या, फळे व फुले यांची गुणवत्ता सुधारण्यासाठीदेखील हे उपयुक्त आहे. याशिवाय पिकांची उत्पादकता, पिकांची टिकवण क्षमताही यामुळे सुधारते. पितांबरी एफ.व्ही. ग्रोच्या वापरामुळे इतर पिकांच्या तुलनेने पीक कमी कालावधीत काढणीकरिता तयार झाल्याने, तसेच पिकांची गुणवत्ता वाढल्यामुळे तुमच्या पिकांना उत्तम बाजारभाव मिळतो.
 
शेतकर्‍यांची आणि ग्राहकांची गरज लक्षात घेऊन सेंद्रिय व विषमुक्त शेतीसाठी उपयुक्त उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी पितांबरीचा संशोधन-विकास विभाग आणि सहउत्पादक कंपन्या सतत कार्यरत आहेत. आपण आमच्या तांत्रिक/शेती तज्ज्ञ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाने आपल्या शेतीमध्ये या उत्पादनांचा वापर करून विविध पिकांचे दर्जेदार उत्पादन घेऊ शकता. वर्षानुवर्षे शेतकरी बांधवांच्या पसंतीस उतरलेले आणि देशी गीर गाईंच्या शेणाचा वापर करून बनविलेले पितांबरीचे विश्वासार्ह गोमय या शासनमान्य सेंद्रिय खताबरोबरच पितांबरी स्ट्रेसिल, बी.व्ही.एफ. शील्ड आणि एफ.व्ही. ग्रो यांच्या निव्वळ 2 मि.ली./ली. मात्रेचा उपयोग करून कमी खर्चात आपण विविध पिकांचे दर्जेदार, विषमुक्त आणि निर्यातक्षम उत्पादन घेऊ शकता, यात काही शंका नाही!
 
पितांबरीची ही सर्व कृषी उत्पादने महाराष्ट्रातील कृषी सेवा केंद्रातून आपण विकत घेऊ शकता.
 
 
या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

भ्रमणध्वनी : 9867112714
वेबसाइट -www.pitambari.com
 
प्रगत शेतीसाठी पितांबरीची पर्यावरणपूरक तीन नवी कृषी उत्पादने